* गरिमा द्य
सर्वोत्तम फॅशन लुक मिळविणे ही प्रत्येक मुलीची आणि स्त्रीची इच्छा असते. आपले फॅशन कोशंट वाढवण्यासाठी योग्य ब्राची भूमिका महत्वाची असते. चला, याविषयी जिवामेच्या किरुबा देवीकडून तपशीलवार जाणून घेऊया :
आर्नेट ग्लिट्झ ब्रा : ही एक अतिशय सुंदर, भव्य, हाइ ग्लॅम ब्रा आहे, जिला खूपच लहान आणि सुंदर स्पार्कल्सने सजवले जाते. ही ब्रा कोणत्याही लेहंगा किंवा साडीसह उत्तम प्रकारे शोभते. रिच वाइन आणि बेज कलरच्या या संग्रहात ब्लाउज ब्रादेखील असते, जी स्टाईलिश होण्याबरोबरच उत्तम फिटिंगचीदेखील असते.
स्वीट कॅरोलिन ब्रा : फ्लोरल प्रिंट्सने सजविलेले टी-शर्ट ब्रॅलेट दिवसा आउटिंगदरम्यान परिधान करण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपल्याला हाय ग्लॅम लुकमधून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर या फुलांच्या ब्रॅलेटवर कोणतेही श्रग, हाय-वेस्ट पॅन्ट आणि स्नीकर्स घाला आणि आपल्या मित्रांसह एखाद्या कॉफी शॉपमध्ये चिल टाइमसाठी सज्ज व्हा. एवढेच नाही तर आपण या डे लुकला नाइट लुकमध्येदेखील सहज बदलू शकता. जीन्सच्या जागी कोणत्याही फुलांचा स्कर्ट घाला.
विंटेज लेस ब्रा : जुन्या बॉलिवूड अभिनेत्रींनी क्लासिक साडयांसह कोणतेही मेकअप न करता अद्वितीय परफॉरमन्सने विंटेज युग संस्मरणीय बनवले आहे, म्हणून विंटेज लेस ब्रा घालून आपणदेखील तेच सौंदर्य, तसाच प्रणय आपल्या फॅशनद्वारे दर्शवू शकता. या छानदार ब्रासह पफ्ड स्लीव्ह ब्लाउज आणि आपल्या आजीची सर्वात आवडती साडी घाला.
ट्रिव्लाईट ब्लूम ब्रा : जर आपण जुन्या स्टाईलच्या ब्लाउजने कंटाळले असाल तर या ब्रासह उत्तम प्रकारे फिट होणारी पांढरी क्रॉप टॉप घाला. त्याबरोबर फ्लेर्ड पॅन्ट्स, चंकी चांदीचे दागिने आणि मस्त फ्लॅटसह आत्मविश्वासाने बाहेर पडा. दुपारच्या वेळी एखाद्या उत्सवात जाऊ इच्छित असल्यास किंवा मंडपातील मित्रांसह वेळ घालवायचा असेल तर हा लुक सर्वोत्कृष्ट आहे.
हे देखील जाणून घ्या
चांगल्या आरोग्यासाठी आणि आकर्षक देखाव्यासाठी योग्य आकाराची आणि शेपची ब्रा निवडणे आवश्यक असते. इतकेच नाही तर ब्राची काळजी कशी घ्यावी, आपल्या शरीराच्या आकार-प्रकार आणि आवश्यकतेनुसार कोणती ब्रा निवडावी.