* गरिमा पंकज
तुम्ही तुमचे वय वाढणे तर थांबवू शकत नाही, मात्र वाढणाऱ्या वयाच्या प्रभावाला तर जरूर कमी करू शकता. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशिअन निधी धवन यांच्या मते आपण काय खातो आणि कसे खातो याच्याशी आपले आरोग्य आणि सक्रियता यांचा थेट संबंध असतो.
काय खाल
* अँटीऑक्सिडंट्स पदार्थ जसे सुका मेवा, अख्खे धान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे खा. अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात. हे इम्यून सिस्टीम मजबूत करून इन्फेक्शन पासूनही वाचवतात.
* दिवसातून कमीतकमी एक कप ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती चांगली राहते.
* ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्सयक्त भरपूर पदार्थ जसे मासे, सुके मेवे, ऑलिव्ह ऑइल वापरा. ओमेगा ३ तुम्हाला तरुण आणि सुंदर राखते.
* व्हिटॅमिन सी शरीरासाठी नॅचरल बोटॉक्स समान काम करते. यामुळे स्किन टिशूज हेल्दी राहतात आणि त्यावर सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी संत्री, मोसंबी, पानकोबी इ. खा.
* जर काही गोड खावेसे वाटले तर डार्क चॉकलेट खा. यात भरपूर फ्लॅवेनॉल असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.
* दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही जरूर घ्या. यात कॅल्शियम असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचा प्रतिबंध करता येतो.
* तरुण आणि सक्रिय दिसू इच्छिता तर ओव्हर इटिंग टाळा. तुम्हाला जितकी भूक आहे त्याच्या ८० टक्केच खा.
काय खाऊ नका
* असे पदार्थ ज्यांच्यामुळे रक्तातील साखर वाढते जसे गोड फळे, ज्यूस, साखर कमी खा.
* सोयाबीन, कॉर्न, कॅनोला ऑइल टाळा, कारण यांत पॉलीसॅच्युरेटेड मेद जास्त प्रमाणात असते. ऑलिव्ह ऑइल वापरा.
* रेड मीट, पनीर, फुल फॅट दूध, आणि क्रीम यांत अत्यधिक मात्रेत सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात.
* सफेद ब्रेड, पास्ता, पिझ्झा इ. कमी खावे.
डॉ. निधी म्हणतात, ‘‘लठ्ठपणा आणि कॅलरी इनटेक यांच्यात थेट संबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने न केवळ आरोग्य बिघडते तर शारीरिक सक्रियतासुद्धा कमी होते.’’