– पारुल भटनागर

जर गोष्ट चेहऱ्यासंबंधित असेल तर कोणत्याही स्त्रीला याबाबतीत तडजोड करायची नसते, कारण चेहऱ्याचे सौंदर्य हे आपले एकूणच सौंदर्य वाढवण्याचे काम जे करत असते. मग भले आपण कोणताही पोशाख घातला तरी तो नेहमी आपल्या चेहऱ्याला शोभतो. पण जर चेहरा निस्तेज आणि निर्जीव असेल, तो हायड्रेट नसेल, तर तुम्ही कितीही चांगले मेकअप केले किंवा आउटफिट घातले तरी ते तुम्हाला अजिबात शोभणार नाहीत. अशा वेळी आपण फक्त मनातल्या मनात हाच विचार करून त्रस्त होता की चेहऱ्यावर कोणती ब्युटी ट्रीटमेंट करावी किंवा कोणते ब्युटी प्रोडक्ट लावावे, ज्यामुळे चेहरा स्वच्छ तर व्हावाच शिवाय त्वचेवर ओलावा ही टिकून राहावा. अशा परिस्थितीत बायोडर्माचे सेन्सीबायो जेल moussant तुमच्या त्वचेसाठी जादूसारखे काम करेल. चला तर मग याविषयी जाणून घेऊया :

आपली त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा

त्वचेवर जितकी तिखट उत्पादने लावली जातात तितकीच त्वचेची आर्द्रता कमी होऊ लागते. पण आज बाजारात इतकी सौंदर्य उत्पादने आपल्यासमोर आहेत की आपल्या त्वचेची समस्या आपल्यासमोर असूनही आपल्याला सौंदर्य उत्पादने योग्य प्रकारे निवडता येत नाहीत. त्यामुळे त्वचा निस्तेज होण्यासोबतच नैसर्गिक सौंदर्यही गमावू लागते. अशा परिस्थितीत बायोडर्माचे सेन्सीबायो जेल moussant तुमची त्वचा हळुवारपणे स्वच्छ करून त्वचेला जास्त काळ हायड्रेट ठेवण्याचे काम ही करते. हे संवेदनशील त्वचेसाठीदेखील अतिशय सुटेबल आहे. म्हणजेच ते लावल्यानंतर त्वचेवर किंवा डोळयांत कोणत्याही प्रकारची जळजळ होत नाही.

ते विशेष का आहे

यामध्ये अशा काही खास घटकांचा वापर करण्यात आला आहे, जे त्वचेच्या समस्या दूर करतात. त्वचेसाठी ते कोणत्याही पोषणापेक्षा कमी नाहीत, ज्यामुळे हे काही वेळा लावल्यानंतर त्वचेला चमक येते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्यातील व्हिटॅमिन ई ची उपस्थिती, जी त्वचेचे कोलेजन तयार होण्यास मदत करण्याबरोबरच त्वचा तरुण दिसण्यासाठी ही काम करते. शिवाय त्वचेतील निरोगी बॅक्टेरिया, जे त्वचेला पर्यावरणाच्या हानीपासून वाचवण्याचे काम करतात, अशा परिस्थितीत त्यातील प्रीबायोटिक्स त्वचेला पोषण देऊन त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्स आणि यूव्ही किरणांपासून वाचवण्याचे काम करतात. ते शक्तिशाली अँटीएजिंग म्हणून देखील कार्य करतात. अशा परिस्थितीत त्यात ते सर्व घटक समाविष्ट आहेत, जे त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ते त्वचेचा बाह्य थर स्वच्छ करून डाग ही कमी करतात, तसेच सेबम स्राव काढून टाकतात. त्याचा साबणमुक्त फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवतो.

संवेदनशील त्वचेला विशेष काळजी का आवश्यक आहे

२०१९ मध्ये फ्रंटियर ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ६०-७० टक्के महिलांची त्वचा संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, कोरडेपणा, खाज सुटण्याची समस्या सर्वाधिक दिसून येते, कारण संवेदनशील त्वचा नाजूक असल्याने ती प्रदूषण, तणाव आणि मेकअपपासून स्वत:चे संरक्षण जास्त करू शकत नाही आणि जर अशी त्वचा तिखट आणि केमिकल्स असलेल्या प्रोडक्ट्सच्या जास्त संपर्कात आली तर त्वचा कोरडी होऊन तिची स्थिती अजून खराब होऊ शकते. अशा त्वचेची सौम्य सौंदर्य उत्पादनांनी काळजी घेणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत हा सौम्य जेल फेसवॉश, ज्याचा साबण मुक्त फॉर्म्युला त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम न करता त्वचा गुळगुळीत करण्याचे काम करते. याची खास गोष्ट म्हणजे हे त्वचेतील फक्त घाण काढून टाकते, त्वचेचे नैसर्गिक तेल नाही.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जेल moussant नॉन कॉमेडीक आणि सुगंध मुक्त आहे. म्हणजेच त्यामुळे छिद्रे बंद होत नाहीत, तसेच त्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी, जळजळ होत नाही. सकाळी आणि संध्याकाळी याचा वापर केल्याने तुम्ही काही आठवडयांतच तुमच्या चेहऱ्यावर उत्तम परिणाम पाहू शकता.

डीएएफ कॉम्प्लेक्स

त्याचे डीएएफ कॉम्प्लेक्स अशा सक्रिय घटकांनी मिळून बनलेले आहे जे संवेदनशील त्वचेची सहनशीलतेची क्षमता वाढवण्याचे काम करते. त्यात कोको ग्लुकोसाइडसारखे सक्रिय घटक आहेत, जे फोमिंग एजंटचे कार्य करण्यासह नैसर्गिक असते. ज्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. म्हणजेच ते प्रत्येक त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

या गोष्टीही लक्षात ठेवा

* नेहमी सौम्य असलेली सौंदर्य उत्पादने वापरा.

* त्वचेची क्लिंजिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे सुनिश्चित करा.

* त्वचेची बाहेरून काळजी घेण्यासोबतच त्वचा आतूनही निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे समृद्ध आहार घ्या.

* संवेदनशील त्वचा असलेल्यांनी टॉवेलने त्वचा स्वच्छ करण्याऐवजी फेशियल क्लिनिंग वाइप्सने त्वचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...