* गरिमा पंकज
वातावरणात वाढती आर्द्रता केस गळण्याचे मुख्य कारण आहे. या मोसमात केस हायड्रोजन शोषून घेतात, ज्यामुळे ते कोरडे व निर्जीव बनतात. अशा परिस्थितीत त्वचाविज्ञान क्लिनिकच्या चेयरमॅन व संस्थापक डॉ. निवेदिता दादू म्हणतात की काही सोप्या उपायांद्वारे केसांची उत्तम देखभाल करता येईल :
डीप कंडिशनिंग करा : सूर्यप्रकाशाशी दीर्घकाळ संपर्क राहिल्यास केस वारंवार कोरडे आणि निस्तेज बनतात. केसांना पुर्नजीवित करण्यासाठी टाळूपर्यंत डिप कंडिशनिंग आवश्यक आहे, जेणेकरून या मोसमातही केसांना आणि टाळूला अतिरिक्त पोषण मिळू शकेल.
केसांना हिटपासून दूर ठेवा : पावसाळयातील आर्द्रतेमुळे जेव्हा आपण आपल्या ओल्या केसांवर हिट जनरेटिंग उत्पादने वापरता, तेव्हा त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच ब्लोड्रायर, स्ट्रेटनर, कर्लिंग रॉड यासारख्या हिट जनरेटिंग उत्पादनांपासून केस दूर ठेवावेत. ते केस निर्जीव करतात, म्हणून केसांचं नैसर्गिकरित्या स्टायलिंग करा.
केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचू द्या : वर्षभर केसांना तेल लावणे चांगले असले तरी या मोसमात तेल लावणे फार महत्वाचे आहे. आठवडयातून कमीतकमी एकदा खोबरेल किंवा ऑल्हिच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते.
भरपूर आहार घ्या : इतर सर्व घटकांव्यतिरिक्त एक गोष्ट जी केसांचे सौंदर्य आणि निरोगी केस टिकवून ठेवण्यात प्रमुख भूमिका निभावते ती म्हणजे आपला आहार. आपल्या आहारात अंडी, मासे आणि स्प्राउट्ससारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. ते प्रथिने आणि लोहाने समृद्ध असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी अक्रोडदेखील चांगले असतात, कारण त्यात भरपूर प्रमाणात ओमेगा -३, फॅटी असिड्स आणि व्हिटॅमिन ई असतात.
आपले केस ट्रिम करा : कोरडे किंवा द्विमुखी केसांपासून मुक्त होण्यासाठी त्यांना ट्रिम करणे खूप महत्वाचे आहे.
आपले केस घट्ट बांधू नका : सैल बन्स, नॉट्स आणि मेसी ब्रेड्स बरेच ट्रेंडी आणि फॅशनेबल दिसतात. पावसाळयातील वातावरणात जास्त आर्द्रता असल्यामुळे घट्ट केस खूप त्रासदायक ठरू शकतात, सोबतच त्यांची मुळेदेखील कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळतात आणि तुटतात.