* प्रिती जैन
करीना कपूर, विद्या बालन, कतरिना कैफ, अँजेलिना जोली, अमिषा पटेल, सोनाक्षी सिन्हा, प्रिती झिंटा, जरीन खान, समीरा रेड्डी अशा कितीतरी अभिनेत्री आहेत, ज्या सुंदर शरीराबरोबरच रेखीव चेहऱ्याच्या सौंदर्यवती आहेत. पण तुम्ही कधी हे पाहिले आहे की त्यांचा चेहरा त्यांच्या सडपातळ देहापेक्षा किती वजनदार आहे? नाही ना? कारण त्यांच्या चेहऱ्याचं सौंदर्य तुम्हाला वेड लावतं आणि त्याचं कारण आहे, स्लिमिंग मेकअप पद्धती, ज्यामध्ये कुठल्याही महागड्या सर्जरीशिवाय तुम्ही तुमचा चेहरा बारीक व सुंदर भासवू शकता.
परफेक्ट आइज
स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये प्रामुख्याने चेहरा रेखीव केला जातो. जसे, जर तुमचे गाल गरगरीत असतील तर ते कमी दाखवण्यासाठी डोळ्यांचा मेकअप असा करावा ज्याने लहान डोळे मोठे दिसतील. यासाठी काही टीप्स वापरून पाहा :
* आर्टिफिशिअल आयलॅशेज वापरा. त्यासोबत नॅचरल लॅशेज एकत्रित करून मस्काराची डबल कोटिंग करा.
* आऊटर कॉर्नरवर लायनर स्मज करून लावा.
* ब्लॅक काजल ऐवजी व्हाइट पेन्सिलचा वापर करा.
* लायनर लावतेवेळी वरील पापणीवर लायनरची जाड रेघ आणि खालील पापणीवर पातळ रेघ ओढावी.
* कॅट आइज लुक तयार करा. पण जास्त काळा रंग वापरू नये तर ब्लॅक शेडला शेडिंग म्हणून वापरावं.
* डोळे मोठे दाखवण्यासाठी कलर ब्लास्ट किंवा कॉन्टॅ्रस्ट लायनरचा वापरसुद्धा करू शकता. हे बाजारात सहजतेने उपलब्ध आहे.
* लोअर लॅशेजवर ट्रान्सपरंट मस्कारा लावावा.
* डोळे बोल्ड दिसण्यासाठी कलर कॉन्टक्ट लेंसचा वापर करा.
* आयशेडचे २-३ रंग मॅच करून आय मेकअप केल्याने डोळे जास्त उठून दिसतात.
ज्यूसी लिप्स
स्लिमिंग मेकअप पद्धतीमध्ये गोबरे गाल कमी दाखवण्यासाठी ओठांना उठाव दिला जातो. मेकअप आर्टिस्ट स्लिमिंग मेकअप पद्धतींचा वापर करून स्किनटोननुसार अशा सेन्शुअल लिपस्टिक शेडचा उपयोग करतात, जी ओठांचे सौंदर्य अधिक वाढवते.
* लिपस्टिक नेहमी ओठांच्या कोपऱ्यापासून मधल्या भागात लावा.
* लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर हलकेसे लिपग्लॉस किंवा हायग्लॉस जरूर लावावे.
* लिपस्टिक लावल्यानंतर मॅट इफेक्टसाठी टिशू पेपर ठेवून ओठांवर पावडर लावा.