* डॉक्टर मनीष वैश्य, सहसंचालक, न्यूरो सर्जरी विभाग, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वैशाली

डोकेदुखीनंतर कंबरदुखी ही सध्याची सर्वसामान्य आरोग्याची समस्या बनत चालली आहे. वाढत्या वयाच्या लोकांनाच नव्हे तर तरुण पिढीलाही हे दुखणे सतावू लागले आहे.

कंबरदुखी

आपल्या पाठीच्या कण्यात ३२ कशेरुका असतात. यातील २२ गतिमान असतात. जेव्हा यांची गती बिघडते तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. पाठीच्या कण्याव्यतिरिक्त आपल्या कमरेच्या रचनेत कार्टिलेज (डिस्क), स्नायू, लिगामेंट म्हणजे अस्थिबंध इत्यादी असतात. यातील कोणत्याही एकामध्ये जरी समस्या निर्माण झाली तरी कंबर दुखू लागते. यामुळे उभे राहताना, वाकताना, वळताना त्रास होतो. सुरुवातीच्या दुखण्यावेळीच योग्य पावले उचलल्यास ही समस्या गंभीर होत नाही.

काय आहेत कारणे

कंबरदुखीच्या समस्येत महिलांची जीवनशैली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. याव्यतिरिक्त इतरही अनेक कारणे आहेत :

* शरीराचे वजन सामान्य वजनाच्या तुलनेत अधिक वाढणे.

* स्नायूंवर ताण येणे.

* अजिबात उसंत न घेता दीर्घकाळ काम करणे.

* नेहमी वाकून चालणे किंवा वाकून बसणे.

* ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिरोगामुळे हाडे कमकुवत होणे.

* दीर्घ काळापर्यंत झोपून राहणे.

* शरीराचे पोश्चर बिघडणे.

* प्रजनन म्हणजे पुनरुत्पादक अवयवांचे संक्रमण, पेल्विक इन्प्लेमेटरी डिसिस म्हणजे ओटीपोटाचा दाह.

* गर्भावस्था.

* उंच टाचांच्या चपला घालणे.

गर्भावस्था आणि कंबरदुखी

गर्भावस्थेदरम्यान महिलांची कंबर दुखणे सामान्य बाब आहे. गर्भावस्थेदरम्यान महिलांचे वजन वाढते आणि बाळाला जन्म देण्यासाठी लिगामेंट्स म्हणजे अस्थिबंध सामान्य करण्यासाठी हार्मोन्सचा स्त्राव वाढतो. बहुतांश गर्भवती महिलांना ५ व्या ते ७ व्या महिन्यादरम्यान कंबरदुखीचा त्रास सुरू होतो. ज्यांची आधीपासूनच कंबर दुखत असते अशा महिलांमध्ये गर्भावस्थेदरम्यान कंबरदुखीची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिकच वाढते.

पूरक आहार घेताना घाबरू नका

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात ५०हून अधिक वयाच्या महिलांपैकी प्रत्येक दुसरी महिला अस्थिरोगाची शिकार आहे. यामुळे त्रस्त ५० टक्के महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असते. अशावेळी त्यांना कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्व, विशेषत: जीवनसत्त्व डी ३ आणि बायोफॉस्फोनेट हे सप्लिमेंट म्हणजे पूरक आहार म्हणून घेण्याचा सल्ला दिला जातो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...