* शोभा कटारे
तरुण राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल आणि आहार, झोप आणि झोपण्याच्या वेळातील बदल, व्यायाम जसं की फेरपटका मारणं, धावणं इत्यादी.
जर तुम्ही आपल्या दिनचर्येत बदल करून या सर्व सवयी लावल्या, तर नक्कीच तुम्ही निरोगी आणि ऊर्जेने भरलेले असाल आणि स्वत:ला तरुण झाल्यासारखं वाटेल.
चला तर जाणून घेऊया या सवयी स्वीकारून तुम्ही स्वत:ला दीर्घकाळपर्यंत निरोगी आणि तरुण कसे ठेवू शकता :
रुटीन लाईफ गरजेचं : बदलती लाइफस्टाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात पुरेशी झोप न घेणं एक समस्या बनत चालली आहे. अलीकडे आपण सर्वजण दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीच्या वेळी फ्री असतो आणि तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो व आपलं खानपिणं सर्व कामे टीव्ही पाहतच करतो आणि अनेकदा अनावश्यक आणि जंक फूड इत्यादी जास्तच खातो. अशावेळी वेळ केव्हा निघून जाते आपल्याला समजत नाही आणि मग आपल्याला झोपायला उशीर होतो आणि मग सकाळी लवकर उठताना त्रास होतो. ज्यामुळे आपण आपल्याला स्वत:लाच फ्रेश वाटत नाही. याचा प्रभाव आपल्या आरोग्यावरदेखील पडतो म्हणून स्वत:ला कायम ताजतवानं ठेवण्यासाठी वेळेत झोप आणि उठण्याची सवय लावा.
जर तुम्ही या दिनचर्येचा स्वीकार केला तर शरीरावर अनुकूल फायदे दिसतात :
* चांगल्या झोपेमुळे इम्युनिटी बूस्ट होते, ज्यामुळे आपलं शरीर आजाराशी लढण्यास सक्षम होतं आणि आपण लवकर आजारी पडत नाही.
* एका संशोधनात असं देखील आढळलं आहे की चांगली झोप शरीराला रिपेअर, रिजनरेट आणि रिकव्हर करण्यात खूप मदत करते.
* ७-८ तासाची झोप आपल्या मनाला ताजतवानं ठेवते, ज्यामुळे आपली स्मरण आणि विचार करण्याची शक्ती वाढते. आपण कामे योग्य प्रकारे करू शकतो.
* यामुळे आपली कार्यक्षमतादेखील वाढते म्हणजेच आपण कामे वेगाने करू शकतो.
* मानसिक आरोग्य चांगलं राहतं. कमीत कमी सात आठ तासाची चांगली झोप आपल्याला अनेक आजार जसं की लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाबापासून दूर ठेवते.