- पाककृती सहकार्य : लतिका बत्रा
नो बेक बटर पीनट बाईट्स
काय लागेल
* दिड कप रोल्ड ओट्स
* अर्धा कप पीनट बटर
* एक तृतीयांश कप मॅपल सिरप
* एक तृतीयांश कप चॉकलेट चिप्स.
कसं कराल
सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्रित करून अर्ध्या तासासाठी झाकून फ्रीजमध्ये ठेवा. नंतर बॉल्स बनवून एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करा.
नाचणी बिस्किट
काय लागेल
* अर्धा कप नाचणी पीठ
* अर्धा कप कणिक
* अर्धा कप बटर
* अर्धा कप ब्राऊन शुगर
* तीन चतुर्थांश छोटा चमचा बेकिंग पावडर
* १ मोठा चमचा कोको पावडर
* अर्धा छोटा चमचा व्हॅनिला एक्सट्रॅक्ट थोडसं दूध.
कसं कराल
एका पॅनमध्ये नाचणीचे पीठ १ मिनिटापर्यंत परतवा. नंतर यामध्ये सर्व साहित्य एकत्रित करून डो तयार करा. आता मळलेल्या पिठाचे गोळे बनवून गोल आकार द्या. यांना क्लिंगने झाकून फ्रीजमध्ये २० ते ३० मिनिटांसाठी ठेवून द्या. यानंतर ओवनमध्ये १६० डिग्री सेंटीग्रेडवर १४-१५ मिनिटांसाठी बेक करा. नंतर तयार नाचणी बिस्किटं थंड करून एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करा.
बनाना ओटमिल कुकीज
काय कराल
* एक केळ पिकलेलं
* एक चतुर्थांश कप पीनट बटर
* दिड कप ओट्स
* एक चतुर्थांश कप किशमिश.
कसं कराल
सर्व साहित्य एकत्रित करून घ्या, नंतर तयार डोने आवडता आकार देऊन ओव्हनमध्ये १६० डिग्रीवर १०-१२ मिनिटांसाठी बेक करा. ओटमिल कुकीज तयार आहेत.
होल वीट जॅगरी कुकीज
काय लागेल
* दिड कप कणिक
* अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर
* अर्धा छोटा चमचा वेलची पावडर
* एक चतुर्थांश छोटा चमचा दालचिनी पावडर
* अर्धा कप तूप
* अर्धा कप गूळ
* ३ मोठे चमचे दूध.
कसं कराल
सर्व साहित्य व्यवस्थित एकत्रित करून डो तयार करा. नंतर याचे गोळे बनवून कुकिजच्या आकारात कापून घ्या. ओवनमध्ये १६० डिग्री सेंटीग्रेडवर १७-१८ मिनिटांसाठी बेक करा. जॅगरी कुकीज तयार आहे.





