- शिखा जैन
लग्नाच्या तयारीत नववधूचे पेहराव सर्वाधिक महत्त्वाचे असतात. लेटेस्ट फॅशन, उत्तम डिद्ब्राइन, बजेट, रंग या सर्व गोष्टी लक्षात घेऊन वधूचे कपडे निवडले जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ब्रायडल वेअरमध्ये कोणते नवीन टे्रंड आहेत हे सांगत आहेत फॅशन डिझायनर अनुभूति जैन.
लहंगा चोली : ही स्टाइल विंटरसाठी एकदम नवीन आणि परफेक्ट आहे. वधूसाठी हा एकदम कम्फर्टेबल पेहराव आहे. हा आउटफिट अशा वधूंसाठी आहे, ज्यांना थंडीच्या दिवसातही गरम राहायचं आहे. यामध्ये ब्लाऊजसोबत लाँग किंवा शॉर्ट जॅकेट असतं. यामुळे जॅकेटला रॉयल लुक येतो.
लहंगा विद टेल : यामध्ये लहंग्याचा घेर मागच्या बाजूने जास्त असतो आणि जमिनीवर लोळत असतो. त्यामुळे लहंगा मागच्या बाजूने कोणीतरी पकडावा लागतो. यामुळे वधूच्या चालण्यात ऐट येते.
जॅकेट लहंगा : हा बराचसा शरारासारखाच असतो आणि यामध्ये लहंग्यावर एक हेवी जॅकेट असतं. यामुळे पूर्ण लहंग्याला हेवी लुक येतो. हे जॅकेट लहंग्याच्या रंगाचं किंवा कान्ट्रॉस्ट रंगाचंही असू शकतं.
नेटचा लहंगा : तुम्हाला गुलाबी रंग आवडत असेल तर तुम्हाला बारीक हस्त कलाकुसर असलेला नेटचा लहंगा शोभून दिसेल. यासोबत पूर्ण बाह्यांचा ब्लाऊज चांगला वाटेल. यामध्ये सोनेरी तारेनं काम केलेलं असतं आणि यामुळे लहंग्याला सोन्याची चमक मिळते.
लहंगा विद मिरर अॅन्ड क्रिस्टल : या संपूर्ण लहंग्यावर काचांची नक्षी असते. यामुळे लहंग्याची चमक वाढते. लग्नाच्या दिवशी वधूला सर्वात वेगळं दिसायचं असतं. त्यामुळे अशा प्रकारचा लहंगाही घेतला जाऊ शकतो.
लाँग स्लिव्ह लहंगा : विंटरमधल्या वधूसाठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये नेट किंवा सिल्कचे स्लिव्हज असतात. हे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही परफेक्ट आहे. लहंग्यावर खालच्या बाजूला आणि स्लिव्हजवर एम्ब्रॉयडरी असते.
वेल्व्हेटचा लहंगा : वेल्व्हेटचा लहंगा पुन्हा फॅशनमध्ये झाला आहे. यावर पॅचवर्क असतं, जे बऱ्याचदा गोल्डन कलरमध्ये केलं जातं. मरून रंगाच्या लहंग्यावर सोनेरी पॅचवर्क उठून दिसतं.
रिसेप्शनसाठी : रिसेप्शनसाठी वेगळं काहीतरी घालायचं असेल तर सोनेरी रंगाची साडी नेसा. यावर तुम्ही दागिन्यांमध्ये एक्सपेरिमेंट करू शकता. याशिवाय रॉयल आणि कंटेम्पररी लुक येण्यासाठी रा सिल्क, जरदोसीमध्ये निळ्या रंगाची साडी रिसेप्शनसाठी चांगली वाटेल. अधिक बोल्ड आणि ब्राइट दिसण्यासाठी यामध्ये लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी किंवा फक्त ओढणी घेऊ शकता. या रंगाच्या साड्यांसोबत मिक्स अॅन्ड मॅच करू शकता. गोटापट्टी वर्कची शिफॉन साडी वास्तविक हलकी असते, परंतु या वर्कमुळे हेवी वाटू लागते. याशिवाय बनारसी सिल्क साडीसुद्धा वधूला शोभून दिसते. यामुळे वधू सगळ्यांत वेगळी दिसते.