* मोनिका गुप्ता

फॅशन जगतात बदल होणे यालाच फॅशन म्हणतात. फॅशनच्या बदलत्या काळाचे कारणच साडयांच्या डिझाइन्समध्ये निरनिराळे पॅटर्न पाहायला मिळत आहेत. बनारसी, सिल्क, शिफॉन, नेट अशा साड्या आहेत, ज्या अनेक स्त्रियांनी नेसल्याचे दिसून येते. पण आता याच साडयांना वेगवेगळया प्रकारे डिझाईन केले जात आहे. प्लाजो साडी, धोती साडी, स्कर्ट साडी यानंतर आता रफ्फल साडीची क्रेझ वाढत आहे.

रफ्फल साडीचे डिझाइन्स

ट्रेंडसोबत साडीचे डिझाईन आणि तिला परिधान करण्याची पद्धत बदलत आहे.

रफ्फल साडीसुद्धा तुम्ही वेगवेगळया पद्धतीने नेसू शकता. रफ्फल साडी अशी साडी असते, जिच्या खालच्या भागावर नागमोडी पद्धतीने लेस असते. साडी नेसल्यावर ही लेस फिरून पदारापर्यंत येते, जे अतिशय सुंदर आणि सेक्सि लुक देते.

अलीकडे रफ्फल साडयांची मागणी वाढत आहे. ऑनलाईन शॉपिंगपासून ते स्थानिक बाजारापर्यंत रफ्फल साडया सहज उपलब्ध असतात. मित्र, अमेझन, फ्लिपकार्ट इत्यादी साईट्सवर विनायक टेक्सटाईल्स, आराध्या फॅशन, सरगम फॅशन या ब्रँड्सच्या रफ्फल साडया सहज उपलब्ध असतात. तुम्हाला हवे असेल तर साडीचे डिझाईनसुद्धा आपल्या आवडसीनुसार करवून घेऊ शकता.

रफ्फल साडीत बॉलीवुडचा अंदाज

शिल्पा शेट्टी : मोठया पडद्यापासून ते लहान पडद्यापर्यंत सेलिब्रिटीज रफ्फल साडीत अत्यंत सुंदर दिसतात. आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीसाठी नेहमी चर्चेत असलेली शिल्पा शेट्टी हिचा या साडीतील लुक लोकांना खूपच आवडला आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टी ब्लॅक अँड व्हाईट रफ्फल साडीत दिसली होती. आपल्या त्या साडीवर तिने काळा सेक्सी ब्लाउज घातला होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखीनच खुलले होते. शिल्पाने आपल्या साडीसोबत चंदेरी मोठे कानातले आणि हातात आम्रपालीच्या बांगडया घातल्या होत्या, ज्या तिच्या लुकला परिपूर्ण करत होत्या.

  • मानुषी छिल्लरची अदा : २०१७ ची मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी मानुषी छिल्लरसुद्धा ब्लॅक रफ्फल साडीत दिसली होती. तिने काळया रफ्फल साडीवर लाल ट्यूब ब्लाउज घातले होते, ज्यात ती अतिशय मादक दिसत होती.

दृष्टी धामी : टीव्ही सिरीयल ‘मधुबाला’मध्ये धमाल उडवणारी अभिनेत्री दृष्टी धामी अलीकडेच तिच्या सध्या सुरु असलेला कार्यक्रम ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ यामध्ये प्रिंटेड गुलाबी आणि ग्रे रफल साडीत आढळली. अशा अनेक टीव्ही अभिनेत्री आहेत, ज्या रफ्फल साडीचा वाढता ट्रेंड वापरताना बघण्यात आले आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...