* अनुष्का जैन

घर असो किंवा बाहेर किंवा कॉर्पोरेटचे जग, महिलांना आभूषणांपासून दूर ठेवणे कठीण आहे. कार्यालयांमध्ये जाऊन काम करणाऱ्या महिलांना योग्य दागिन्यांची निवड करणे कठीण जाते, कारण त्यांना कार्यालयांच्या नियमांना तसेच वातावरणाला अनुसरून दागिने परिधान करावे लागतात.

तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलेलो आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही योग्य आभूषणे निवडू शकता.

भडक दागिने नको : कपडयांप्रमाणे दागिनेदेखील भडक नसले पाहिजेत. काही कार्यस्थळांमध्ये जास्त दागिने घालण्याची परवानगी नसते. कार्यस्थळांना जण्यासाठी दागिन्यांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. शेवटी तुम्ही काय परिधान करता त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण दिसून येतात.

त्वचेचा रंग लक्षात ठेवून निवडा आभूषणे : दागिने तुमच्या त्वचेच्या रंगानुसार आणि तुम्ही कशासह परिधान करणार यावर अवलंबून असते. मेटल आणि जेमस्टोनमुळे त्वचेवर चमक येते. यांचा रंग स्पेक्ट्रम गोल्ड, सिल्व्हर, रोज गोल्ड, टर्काइज आणि एमेथिस्ट असू शकतो.

आभूषणे शरीराच्या अनुरुप असावीत : आभूषणांचा आकारदेखील महत्त्वाचा असतो. त्याची निवड करण्यापूर्वी आपल्या शरीराकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ नेकलेस किंवा इयररिंग्सचा आकार असा असावा की सहकर्मचाऱ्यांची नजर त्यावर खिळून नाही राहिली पाहिजे.

जॉमेट्रीक आकार निवडा : आभूषणांची डिझाइन साधी-सरळ असावी. त्यामध्ये सर्कल, आयत अशा जॉमेट्रीक डिझाइन्स परिधान केल्यावर सालस दिसतात. यामुळे सहकर्मचाऱ्यांचे लक्ष अनावश्यकपणे आकर्षित होणार नाही. डिझाइन कपडयांशी मिळत्या-जुळत्या असाव्यात. कॉर्पोरेटमधील महिला ओव्हल डायमंड इयररिंग, छोटे पेंडेंट आणि साधे डायमंड बँड परिधान करू शकतात.

बोल्ड पीस : जर तुम्ही सर्व आभूषणांना सिमीत केले असेल, तर तुम्ही एक मोठा बोल्ड पीस निवडू शकता. तुम्ही क्लासी इयररिंग्स किंवा स्टेटमेंट रिंग परिधान करू शकता. ऑफिस शर्टसोबत नेकपीस मॅच करू शकता. आपल्या शर्टवर कटवर्क नेकलेस किंवा गोल्ड इटालियन चेनसोबत जेमस्टोन पेडेंट परिधान करू शकता.

सर्व परिधानांसाठी पर्ल किंवा मोती : पर्ल म्हणजेच मोती हे कॉर्पोरेट जगतातील सर्वोत्तम आभूषण समजले जाते. कानात मोत्यांचे स्टड्स, हातात मोत्यांचे ब्रेसलेट परिधान करा. जर ब्रेसलेट तुम्हाला सहज वापरता येत नसेल तर मोत्यांची साधी माळ परिधान करू शकता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...