* आशिमा शर्मा, फॅशन डिझायनर

भारतीय कपडे आणि ते परिधान करण्याची पद्धत खूप बदलली आहे, पण साडी हा असा पारंपरिक पोशाख आहे ज्याचा लुक सर्वात हटके असतो. चला, जाणून घेऊया साडी नेसण्याच्या काही अनोख्या पद्धती :

फुलपाखरू ड्रेपिंग

फुलपाखरू किंवा बटरफ्लाय साडी ड्रेपिंग बारीक आणि सुडौल बॉडी असलेल्या महिलांसाठी योग्य पर्याय आहे. ड्रेपिंगची बटरफ्लाय स्टाईल कोणत्याही साडीसोबत ट्राय करता येते.

तुम्ही जर कोटा किंवा शिफॉनसारखी हलकी साडी निवडली तर फुलपाखराचे पंख उभे राहतात. साडी अशी निवडा ज्यावर थोडी नक्षी असेल. ही स्टाईल समोरच्या पदरासोबत केली जाते. सोनम कपूरला अशा प्रकारची साडी नेसायला आवडते. परफेक्ट लुक मिळवण्यासाठी, हलक्या साडीसोबत हेवी पेपलम ब्लाऊज घाला.

धोती साडी

सध्या तरुणाईत धोती स्टाईल साडीचा ट्रेंड आहे, कारण ती नेसायला सोपी आणि आरामदायक आहे. सोनम कपूर, दिया मिझा इत्यादी अनेक बॉलिवूड अभिनेत्री अशा प्रकारच्या साडीमध्ये दिसल्या आहेत.

हा ट्रेंड तुमची फॅशन स्टेटमेंट लेव्हल वाढवतो. ही साडी कट ब्लाऊज, क्रॉप टॉप किंवा शर्टसह परिधान करता येते. हिवाळयात तुम्ही ती जाकिट आणि ब्लेझरसोबतही नेसू शकता.

लेहेंगा साडी

ही स्टाईल आजकाल सर्वसामान्य आहे आणि तुम्ही ती लग्न सोहळा, दिवाळीतही नेसू शकता.

सध्या नववधूचा लेहेंगा याच पॅटर्नमध्ये असतो. रेड कार्पेटवरही लेहेंगा साडी पाहायला मिळते. साडीसारखा दिसणारा हा पॅटर्न साडीच्या प्रकारात सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. या स्टाईलसाठी तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभासी रंगाची लेहेंगाचोळी आणि एक साडी गरजेची असते. यामुळे काहीसा साडीसारखा लुक देता येतो.

मुमताज साडी

अभिनेत्री मुमताज फंकी ही स्टाईल स्टेटमेंटसाठी खूपच लोकप्रिय होती. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चरचे...’ या गाण्यात मुमताजने नेसलेली साडी आताही लोकप्रिय आहे. चमकदार किनार आणि कूल ड्रेपिंग स्टाईलचा अजूनही तरुण मुलींमध्ये ट्रेंड आहे.

दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोपडासह अनेक अभिनेत्री या अनोख्या साडी लुकमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. शिफॉन साडीत पेवी आणि मोठया किनारीची शिमर आणि भरजरी कलाकुसर असलेली साडी सर्व प्रकारच्या सण-समारंभात नेसण्यासाठी सर्वोत्तम आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...