* गरिमा पंकज द्वारे फॅशन डिझायनर आशिमा शर्मा आणि मोनिका ओसवाल यांच्याशी बातचीत वर आधारित
उन्हाळा सुरु होताच प्रत्येकाला काहीतरी नवीन वापरण्याची इच्छा होतेच.
चला तर जाणून घेऊया की यंदाच्या उन्हाळयात तुमचं वॉर्डरोब कलेक्शन कसं असायला हवं :
सिक्वेन्स वर्कने सजलेले कपडे : उन्हाळयात टिकल्यांचे (स्किवेन्स) म्हणजे चमकदार पेहराव अधिक पसंत केले जातात. एका छानशा दिवसाच्या सुरुवातीसाठी सिक्वेन्स वर्कचा टॉप आणि लेगिंग्स वापरा वा ए लाइन स्कर्ट वापरा, हे दोन्ही ड्रेसेस तुम्हाला स्टायलिश लुक देतील. गोल्डन सिल्वरसारख्या चमकदार रंगासोबतच निळा, काळा, लाल, नारंगी, मर्जेंडा बोल्ड रंगांचा वापर करा. या सोबतच हलक्या रंगाचा स्कार्फ व जॅकेट वापरा. मॅचिंग मास्कचीदेखील व्यवस्था करा.
पेस्टल कलरचे कपडे : या मोसमात पेस्टल म्हणजेच हलक्या रंगाचे कपडे तुमच्या वॉर्डरोबमधील सर्वात सुंदर पर्याय असतील. पिवळा, हिरवा, गुलाबी, नारिंगीसारख्या कपडयांची निवड करा. हे रंग हलके असतात खरे परंतु आकर्षक दिसतात.
विंटेज फ्लोरल्स : अशा प्रकारच्या कपडयांची फॅशन ४० आणि ५०च्या दशकात होती. आता पुन्हा याची मागणी वाढली आहे. फ्लोरल डिझाइनचे मॅक्सी वा मिडी वापरा वा फ्लोरल टॉपसोबत डेनिम जॅकेट वापरा. या व्यतिरिक्त फ्लोरल प्रिंटचा स्कार्फ, मोबाईल कव्हर, बॅक वा मोजेदेखील वापरू शकता.
हेरिटेज चेक्स : उन्हाळयात फॉर्मल कपडयांसाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. हेरिटेज चेक्स पॅटरनच्या फ्लोटि फॅमिनन बिझनेस सूट वापरा. हा कोणत्याही ऑफिशियल मीटिंगसाठी परफेक्ट आहे. प्लेड पेन्सिल स्कर्ट वा ट्राउझरसोबत लिनन शर्टदेखील वापरू शकता. चेक्स शर्ट तुम्ही दररोज कपडयांच्या पर्यायाच्या रूपात वापरू शकता. हे अधिक आकर्षक बनवण्यासाठी या सोबत स्कार्फ वापरू शकता.
लायलॅक कलर (लाईट पर्पल) : लायलॅक रंग उन्हाळयात खूप उठून दिसतो. लवेंडर शेड विविध प्रकारे वापरला जातो. लायलॅक टॉप आणि ब्लाउजपासून ट्राउझर आणि स्कर्टपर्यंतदेखील वापरू शकता. या रंगाला गडद आणि हलक्या दोन्ही प्रकारच्या रंगासोबत पेयर करून वापरू शकता.