* सोमा घोष

मराठी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेली अभिनेत्री उर्मिला कोठारे मुंबईची आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, ज्यात प्रथम त्यांना साथ दिली त्यांची आई नीलिमा कानेटकर आणि आता पती आदिनाथ कोठारे यांनी. पती आणि सासरकडचे फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. पती आदिनाथ चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक आहेत. उर्मिला एक कथक डान्सर आहे. मराठी चित्रपट ‘दुनियादारी’ आणि ‘शुभमंगल सावधान’ त्यांच्या गाजलेल्या फिल्म आहेत, ज्यात त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. आता त्या विवाहित आहेत आणि एक मुलगी जिजा कोठारेची आईदेखील आहेत. त्या आपल्या कामात आणि कुटुंबात कसा ताळमेळ बसवतात, चला जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्याच तोंडून...

तुला अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

माझ्या कुटुंबात कुणीही अभिनय क्षेत्रात नाही. मी लहानपणापासूनच कथ्थक डान्सर होते आणि त्या दरम्यान हावभाव करणे चांगले वाटायचे. माझ्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर आहेत. तिथूनच मला लक्षात आले की मला अभिनयाची आवड आहे. त्या दरम्यान मला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी विचारले गेले आणि मी त्यासाठी आपला पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर मी एक मराठी मालिका ‘तुझ्या विना’साठी ऑडिशन दिले आणि ती माझी पहिली सिरियल होती, ज्यात मी वर्षा उसगावकर यांच्या मुलीची भूमिका केली होती. ती सर्वांना फार आवडली आणि पुढे काम मिळू लागले.

तुला कुटुंबाचे किती सहकार्य मिळाले?

माझ्या आईवडिलांचा खूप पाठिंबा होता. आईमुळे मी अभिनय क्षेत्रात येऊ शकले, कारण तिने माझ्या पोर्टफोलिओचा एक फोटो महाराष्ट्र टाइम्सच्या मॉडेल वॉचेस कॉलमसाठी पाठवला होता. त्यात माझ्या फोटोसोबत ईमेल एड्रेसदेखील होता. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या ऑफर मिळाल्या आणि मी काम सुरू करू शकले. त्यावेळी मी ग्रॅज्युएशन करीत होते. शूटिंग शिक्षण संपल्यानंतर सुरू झाले.

डान्सर असण्याचा अॅक्टींगसाठी तुला काही फायदा झाला का?

मी क्लासिकल डान्सर आहे. त्यात अभिनयाचे प्रशिक्षण मिळते. नृत्यात मूक अभिनय असतो, पण भाव पुष्कळ असतो. अशाप्रकारे मी नकळतच अभिनयाचे ट्रेनिंग डान्सच्या माध्यमातून घेतले होते. त्यामुळे मला कोणतीही भूमिका समजण्यास सोपे गेले.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...