* सोमा घोष

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घराघरांत अगदी आवडीनी पहिली जाते त्याचप्रमाणे अजय-अतुल हेसुद्धा हा कार्यक्रम न चुकता पाहतात. 'इंडियन आयडल मराठी' या सोनी मराठी वाहिनीवर २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने अजय-अतुल यांनी हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावली. 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमामध्ये परीक्षक होण्याचं आम्ही यासाठी ठरवलं की, त्यानिमित्ताने आम्हांला हास्यजत्रेच्या मंचावर जाता येईल, असंही ते या वेळी गमतीने म्हणाले.

अजय-अतुल ही जोडी हास्यजत्रेत आली असताना एक दुग्धशर्करा योग जुळून आला आणि तो म्हणजे अतुल गोगावले यांनी हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण केलं. अजयसाठी हे सरप्राईज होतं. त्याला यातलं काहीच माहीत नव्हतं. आपल्या भावाला मंचावर पाहून अजयला आश्चर्यमिश्रित आनंद झाला.

आम्हांला हसवणाऱ्या आणि आमचं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं, असं वाटल्याचं अतुल म्हणाला.

संगीतकार जेव्हा विनोदी भूमिका करतो, तेव्हा नक्की काय होतं, हे जाणून घेण्यासाठी या आठवड्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नक्की पाहा.

पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', सोम.-गुरु. रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...