*सोमा घोष

तनुज गर्ग आणि सोनी पिक्चर्ससह लूप लपेटाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या फोटोग्राफर अतुल कसबेकर यांनी काल मुंबई मध्ये फिल्म लूप लपेटाचे पोस्टर शूट केले आणि हा त्यांच्या कारकीर्दीमधील 200 वा चित्रपट आहे ज्याच्या पब्लिसिटी कँपैनचा शूट त्यांनी केलं. विशेष बाब म्हणजे ह्या चित्रपटाचे ते प्रोडूसरही आहेत आणि आपल्याच चित्रपटाच्या पोस्टर शूटने त्यांनी 2 शतक पूर्ण केले.

फॅशनच्या दुनियेत नामांकित असूनही चित्रपटाचे पोस्टर शूटिंग करणे हा त्याचा दुसरा छंद आहे.

अतुल कसबेकर म्हणतात, "कॅमेरा हे माझं पहिलं प्रेम आहे आणि चित्रपटाच्या निर्माता या नात्याने मला ह्या चित्रपटाच्या पब्लिसिटी कँपैनमध्येदेखील तो विजन शेप देण्याची परवानगी मिळाली. मी 3 दशकांहून अधिक काळ चित्रपटांच्या मोहिमेचे शूटिंग करत आहे आणि हा चित्रपट खरोखरच विशेष आहे.

२०२२ मधील ‘लूप लपेटा’ हा बहुप्रतिक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक आहे. टीझरच्या घोषणेच्या वेळी बरीच चर्चा रंगली होती आणि आता पोस्टर पाहण्याची उत्सुकता आहे ज्याचे रविवारी मुंबई मध्ये एका फिल्म स्टुडिओमध्ये शूट झाले.

सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडिया, एलिसिस एंटरटेनमेंट आणि आयुष माहेश्वरी निर्मित ‘लूप लपेटा’ हा चित्रपट यावर्षी रिलीज होणार आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...