* सोमा घोष

सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले आहे. प्रेक्षकांना फ्रेश एपिसोड्सची मेजवानी मिळतच होती आणि आता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या हास्यजत्रेने राज्याबाहेर, दमणमध्ये चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाची सुरुवात दणक्यात झाली आहे. ती सुरुवात संगीत कलाविश्वात  मोठं नाव असलेले गायकगीतकार अनु मलिक यांच्या कार्यक्रमातल्या हजेरीने! ३आणि ४ मे रोजी सोनी मराठीवरील हास्यजत्रेमध्ये पाहुणे अनु मलिक प्रेक्षकांनापाहायला मिळतील. यावेळी अनु मलिकने सेटवर धमाल केली आणि प्रसाद ओक याच्याबरोबर 'आम्ही ढोलकर' हे मराठी गाणंही  गायलं. 'आग लगा दी' असं म्हणून स्पर्धकांचं कौतुक करणाऱ्या अनु मलिकने  हास्यजत्रेच्या स्पर्धकांचं मराठमोळं कौतुक केलं आहे.

हा भाग म्हणजे मनोरंजनाचा धमाका असणार आहे, हे नक्की. पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', ३ आणि ४ मे, रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवाहिनीवर.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...