*सोमा घोष

या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील येणार आहेत. भास्करराव पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला 'आदर्श गाव' पुरस्कार मिळाला आहे. गावाला आत्तापर्यंत विविध २२ पुरस्कारही मिळाले आहेत. दर १५ मिनिटांवर हात धुण्याची सोय, स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स, शेतीसाठी गावात पाणी आणण्याची सोय, एक गाव एक गणपती योजना, अद्ययावत शाळा; असे अनेक उपक्रम भास्कररावांनी आपल्या गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी राबवले आहेत.

भास्कररावांनी महासत्ता म्हणजे नेमकं काय आणि ती कशी असावी, याबद्दलही सांगितलं. त्यांना वाचनाची आवड आहे. वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि आपल्या गावाचा विकास करणं त्यांना आवडतं. गावात प्रत्येकानी शिक्षित असावं, आपल्या पायांवर उभं असावं असा त्यांचा प्रयत्न असतो. माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून भास्कररावांचा सन्मान झाला आहे. या आदर्श गावाला अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी भेट दिली आहे.

कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी 'घरबसल्या लखपती' होण्याची संधी घेऊन आली आहे. 'कोण होणार करोडपती' टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात 'कोण होणार करोडपती - प्ले अलॉंग'! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि/किंवा हॉट सीटवर येण्याची संधी.

पाहा, 'कोण होणार करोडपती - कर्मवीर विशेष' ३१ जुलै, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...