* सोमा घोष

२०२५ मध्ये आधुनिक रेल्वेच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त ब्रिटनची रेल्वे आणि भारतातील सर्वात मोठी फिल्म प्रोडक्शन कंपनी यशराज फिल्म्स (YRF) एकत्र येत आहेत. रेलवे 200 या ऐतिहासिक सोहळ्याचा एक भाग म्हणून, दोन्ही देशांमधील संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी हा अनोखा उपक्रम आयोजित केला जात आहे.

योगायोग असा की, २०२५ मध्ये वायआरएफच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) याच्या ३० व्या वर्षाचा मोठ्या दिमाखात उत्सव साजरा केला जाणार आहे. हा चित्रपट भारत, भारतीय आणि संपूर्ण दक्षिण आशियाई प्रेक्षकांसाठी एक पॉप कल्चर माईलस्टोन आहे. डीडीएलजेच्या अनेक दृश्यांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये झाले होते, ज्यामध्ये किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवरील आयकॉनिक सीनदेखील समाविष्ट आहे. याच ठिकाणी शाहरुख खान आणि काजोल यांचे पात्र प्रथम भेटतात आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होते.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ यांनी रेल्वे प्रवासातील रोमान्सला समर्पित करत व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने त्यांच्या सांस्कृतिक सहकार्याची घोषणा केली आहे. सध्या वायआरएफ कम फॉल इन लव  - द  डीडीएलजे म्यूजिकल (CFIL) या डीडीएलजे च्या म्युझिकल अ‍ॅडॅप्टेशनची स निर्मिती करत आहे. या म्युझिकलचा प्रीमियर २९ मे २०२५ रोजी मँचेस्टर ओपेरा हाऊसमध्ये होणार आहे आणि तो २१ जून २०२५ पर्यंत चालणार आहे.

ब्रिटनची रेल्वे आणि वायआरएफ एकत्र येऊन कम फॉल इन लव  - द  डीडीएलजे म्यूजिकलच्या माध्यमातून संस्कृतींना जोडणाऱ्या प्रेमाचा उत्सव साजरा करतील. यासाठी मँचेस्टर आणि लंडनच्या प्रमुख रेल्वे स्टेशनवर खास इमर्सिव्ह अ‍ॅक्टिव्हेशन्स आयोजित केले जातील.

कम फॉल इन लव  - द  डीडीएलजे म्यूजिकल या इंग्रजी संगीत नाटकाचे दिग्दर्शन डीडीएलजे चे मूळ दिग्दर्शक आदित्य चोप्रा करत आहेत. ही कथा एका ब्रिटिश-भारतीय मुलीची आहे, जिला तिच्या कुटुंबाने भारतातील एका मित्रासोबत लग्न करण्यास सांगितले आहे. मात्र, परिस्थिती तेव्हा बदलते जेव्हा ती रॉजर नावाच्या एका ब्रिटिश तरुणाच्या प्रेमात पडते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...