महिलांच्या कमाईवर पुरूषांचा हक्क का?

* पद्मा अग्रवाल

आज जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने आणि कित्येकदा त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत तेव्हा हा त्यांचा अधिकार आहे की त्या या आपल्या कमवलेल्या पैशांना आपल्या इच्छेनुसार खर्च करतील.

परंतु पुरुष नेहमी स्त्रीवर सत्ता गाजवत आला आहे आणि आजदेखील पत्नीवर स्वत:चा अधिकार समजतो.

प्रोफेशनल कॉलेजमध्ये लेक्चरर इला चौधरी यांच्या फोनवर मेसेज आला की त्यांच्या पतीने त्यांच्या जॉइंट अकाउंटमधून ४०,००० काढले आहेत. त्यांचा मूड खराब झाला. त्या चिडून उठल्या.

घरी येऊन स्वत:लाच खूप संयमित करीत काहीशा तिखट आवाजात त्या बोलल्या, ‘‘कॉलेजच्या फंक्शनसाठी मी मॉलमधील एक ड्रेस आणि मॅचिंग सँडल पसंत केले होते. माझ्या अकाउंटमध्ये आता आता केवळ दहा हजारच उरले आहेत आणि अजून पूर्ण महिना जायचा आहे. तो ड्रेस विकला गेल्याशिवाय राहील का?’’

मग काय, पती आदेश नाराज होऊन ओरडू लागले, ‘‘न जाणो आपल्या पैशांची किती घमेंड आली आहे. ड्रेसेस आणि सँडल्सचा भडिमार आहे, परंतु नाही. पॉलिसी एक्सपायर झाली असती, यामुळे मी पैसे काढले.’’

ईला चौधरी म्हणू लागल्या, ‘‘माझी सॅलरी ६०,००० आहे. मला कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने ड्रेसअप होऊन जावे लागते. परंतु जसे मी काही नवे खरेदी करू इच्छिते, तुम्ही राग दाखवून मला माझ्या मनाचे करू देत नाही.’’

पतिने मूर्खात काढले

एका मोठया स्टोअरमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या मृदुला अवस्थी सांगतात, ‘‘आमच्या स्वत:च्या स्टोअरच्या मॅनेजरने पैशात पुष्कळ अफरातफरी केली. त्यामुळे त्याला काढले. पती हैराण होते. मी घरात रिकामी असण्याने दिवसभर वैतागायचे. त्यामुळे मी म्हटले की मी एमबीए आहे. जर तुम्ही म्हणाल तर स्टोअर सांभाळेन, परंतु माझी अट आहे की मी पूर्ण सॅलरी म्हणजेच तितकीच जितकी मॅनेजर घ्यायचा, घेईन.’’

पती अमर खुश होऊन म्हणाले, ‘‘हो. तू पूर्ण सॅलरी घे. तसंही सगळं तुझंच तर आहे.’’

पहिल्या महिन्यात तर कित्येक वेळा मागितल्यानंतर दिली. परंतु पुढच्या महिन्यापासून काही नाही. ‘सगळे काही तुझे वाला’ डायलॉग मूर्ख बनवण्यासाठी पुष्कळ आहे.

यासोबतच कोणतीही चूक झाल्यावर संपूर्ण स्टाफ समोर अपमानित करणेदेखील सोडत नाहीत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील इशिता लग्नाच्या आधीपासूनच काम करायच्या. त्या आपल्या भावाला आपल्या पैशातून शिकवत होत्या आणि नंतर लग्नाच्या दरम्यान हुंडा इत्यादीमध्येदेखील त्यांचा पुष्कळ पैसा खर्च झाला.

पती आशिषने थेट तर नाही परंतु घुमवून फिरवून विचारले की, तू तर मागच्या काही वर्षांपासून काम करत होतीस. बँक बॅलन्स तर काहीही नाही.

पतीचे बोलणे ऐकून ईशिता हैराण झाल्या. त्या अॅडव्हर्टायझिंग फील्डमध्ये होत्या. सोबतच कपडयांचीदेखील त्यांना खूप आवड होती. पार्लरला जाणे त्यांच्यासाठी गरजेचे होते, पण पतीसाठी फालतू खर्च. पत्नीचे ऑफिसला चांगल्या पद्धतीने ड्रेस होऊन जाणे पतिला पसंत नव्हते.

इशिताची सॅलरी नंतर यायची, त्याआधीच खर्च आणि इन्वेस्टमेंटची प्लॅनिंग तयार असायची. जर त्या काही म्हणाल्या, तर नात्यात कडवटपणा. त्यामुळे मन मारून राहायच्या.

मुंबईच्या रीना जौहरी आपली वेदना व्यक्त करीत म्हणतात, ‘‘माद्ब्रा सगळया बोटांमध्ये डायमंड रिंग पाहून स्वत:लादेखील घालण्याची खूप इच्छा होती. मी पतीला सांगून एक रिकरिंग स्कीममधून एक लाख वाचवले. जेव्हा ती रक्कम मॅच्युअर झाली, तेव्हा मी जेव्हा अंगठीची गोष्ट बोलले, तेव्हा पती सुधीर म्हणाले, ‘‘काय फरक पडतो की अंगठी डायमंडची आहे का गोल्ड ची?’’

मी पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट केलेले आहेत. ते पैसे तुझेच असतील. तुझ्याच नावाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. ‘‘रिनाच्या डोळयात अश्रू आले. प्रश्न आहे की पैसा पत्नीचा, मग निर्णय पतीने का घ्यावा?

पतीचे कर्तव्य

 

जेव्हा त्यांनी आपल्या पैशांनी स्कूटी खरेदी करण्याची गोष्ट सांगितली तेव्हा घरात वाद झाला.

गरज ही आहे की पतीने पत्नीच्या गरजांना समजावे. पत्नीची आवश्यकता, इच्छा, गरजांचा आदर करावा. तिच्या प्राथमिकतेला समजण्याचा प्रयत्न करावा.

मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या रिद्धीची बहिण सिद्धी तिच्या घरी पहिल्यांदा आली होती. ती आपल्या छोटया बहिणीला मुंबई फिरवण्यासाठी रोज कुठे ना कुठे जायची. त्यावेळी पती अर्पितदेखील त्यांच्यासोबतच असायचे. एक दिवस ते ऑफिसला गेले होते. दोघी बहिणी मॉलमध्ये शॉपिंग करायला गेल्या. तिने छोटया बहिणीला २-३ महाग ड्रेसेस खरेदी करून दिले. पेमेंट करताच पतीच्या फोनवर मेसेज गेला.

अर्पितने घरी येताच रागात रिद्धीला म्हटले, ‘‘खर्च करण्याचीदेखील काही मर्यादा असते. तू तर अशा पद्धतीने पैसे उडवत आहेस जणू आपण करोडपती आहोत.’’ बहिणीसमोर रिद्धीला आपली बेइज्जती सहन झाली नाही आणि छोटयाशा गोष्टीवर चांगलाच वाद सुरू झाला.

वेळेची गरज

आज वेळेचीही गरज आहे, की पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या कुटुंबाला आधुनिक सुख सुविधा द्याव्यात. आर्थिक रुपाने स्वावलंबी होणे महिलांना काम करण्यासाठी सगळयात जास्त प्रेरित करते. काम करण्याने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

वर्किंग कपल्समध्ये बहुधा पती आपल्या पत्नीच्या सॅलरीवर आपला पूर्ण हक्क समजतात. त्यांना वाटते की पत्नीची सॅलरीदेखील तिने आपल्या मर्जीनुसार खर्च करावी.

सुरुवातीला काही महिने पत्नी भले संकोचत ही गोष्ट सहन करेल. होऊ शकते, की तोंडाने बोलणार नाही परंतु ती मनातल्या मनात विचार करेल, की जेव्हा ती पतीला त्याची सॅलरी मागत नाही तर मग पतीला काय अधिकार आहे की त्याने प्रत्येक महिन्याला तिची सॅलरी हातात घ्यावी

वेगवेगळया प्राथमिकता

आजकाल आई-वडील मुलींचे खूप स्पेशल ट्रीटमेंट देऊन पोषण करतात, ज्यामुळे त्या सासरीदेखील स्पेशल ट्रीटमेंट इच्छितात आणि जिथे ती मिळू शकत नाही तिथे वाद आणि असंतोषाचे हे कारण बनते.

पती-पत्नी दोघेही वेगवेगळे वातावरण, विचार आणि परिस्थितीतून गेलेले असतात. त्यामुळे दोघांच्या प्राथमिकता वेगवेगळया असतात. पती-पत्नीमध्ये कोणीही डॉमिनेटिंग नेचरचे असू शकते. अशा वेळी दुसरा हर्ट होतो.

जर पती, पत्नीच्या एखाद्या चुकीवर नाराज होतो तेव्हा ती लगेच चिडते की तिला कोणाचा असा अटीट्युड सहन करण्याची काय गरज आहे, तीदेखील कमावते. कित्येक वेळा नोकरदार पत्नी छोटया गोष्टीवर ओव्हर रिअॅक्ट करून चिडून नाराज होऊन राईचा पर्वत करते.

असे कोणते नाते आहे ज्यात थोडे फार भांडण, वाद-विवाद नसतील. पती पत्नीचे नाते तर लहान मुलांच्या मैत्री सारखे असायला हवे. क्षणात कट्टी, क्षणात बट्टी. आनंद तर आपल्या आजूबाजूलाच विखुरलेला असतो. फक्त तो शोधण्याची गरज असते. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणी आनंद शोधा.

नोकरदार महिलांसाठी सोपे व्यायाम

* सुमीत अरोडा

संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर व्यायामासाठी वेळ काढणे सोपे नाही. पण बऱ्याच जणींना कामातून काही क्षण का होईना, मोकळा वेळ मिळतो. त्याच क्षणांचा फायदा घेऊन त्या थोडाफार व्यायाम करु शकतात.

पोस्चर : हे गरजेचे आहे की तुमचे टेबल आणि खुर्चीची उंची योग्य असावी. यामुळे तुमची मान आणि पाठीवर ताण येणार नाही. पाय एकतर सपाट जमिनीवर किंवा फूट रेस्टवर ठेवावे. गुडघे आणि हिप्स ९० डिग्रीपर्यंत झाकलेले असावे. खालचा मणका सरळ तसेच खुर्चीला व्यवस्थित टेकलेला असावा. खुर्ची अशी असावी की, पाठ आणि मानेला पुढील बाजून झुकावे लागू नये. असे न झाल्यास पाठ आणि मान ताणली गेल्याने दुखू शकते. डोकेदुखीही होऊ शकते.

स्टेचिंग

नेक स्ट्रेच : कानाला स्पर्श करुन खांद्यांना स्पर्श करा. चेस्ट ओपनरसाठी खांदे मागच्या बाजूला सरळ धरा. तुम्ही खांद्यांमध्ये ठेवलेली पेन्सिल पकडत आहात असे समजा. दरवाजावर उभे राहून दारावरची चौकट दोन्ही हातांनी पकडून पुढच्या दिशेने तोपर्यंत चालत रहा जोपर्यंत तुम्हाला छाती ताणली गेल्यासारखी वाटणार नाही. सर्वात शेवटी हिप्स पकडून हळूवारपणे पाठीला मागच्या बाजून नेऊन थोडेसा ताण द्या.

ज्या सतत कीबोर्डवर असतात त्यांना कार्पल टनल सिंड्रोम होण्याचा धोका असतो. त्यांनी या सोप्या क्रिया दररोज केल्या हा धोका टाळता येऊ शकतो. डेस्कवर उभे रहा. खांदे सरळ ठेवा. हात डेस्कवर अशा प्रकारे ठेवा की बोटे तुमच्या दिशेने असतील. जोपर्यंत तुम्हाला ताणल्यासारखे वाटणार नाही तोपर्यंत शरीराला हळूहळू खाली झुकवा. दिवसातून जितक्या वेळा तुम्हाला याची गरज वाटेल तितक्या वेळी ही क्रिया करा.

कोर व आर्म्स : खुर्चीवर बसा. पाय क्रॉस करुन खुर्चीवर ठेवा. हातांना खांद्यांच्या टोकांवर ठेवून पोट, स्नायूंचा वापर करुन स्वत:ला सीटपासून थोडे उंच उचला. १०-२० सेकंद याच स्थितीत रहा. त्यानंतर ३० सेकंद आराम करा. ही क्रिया पाच वेळा करा.

शरीराच्या खालच्या भागात ताकद रहावी यासाठी दोन्ही पाय आपल्या समोरच्या दिशेने पसरून २ मिनिटे याच स्थितीत बसा. त्यानंतर एक पाय जेवढा वरती करता येईल तेवढा करा. २ सेकंद त्याच स्थितीत रहा. ही क्रिया दोन्ही पायांनी १५-१५ वेळा करा. लिफ्टऐवजी शिडीचा वापर करा.

डेस्कवर हातांचा व्यायाम

हातांना मागच्या बाजूला न्या. त्यानंतर डेस्कवर ठेवा. हातांचे कोपर डेस्कवर दाबून धरा आणि हाताच्या स्नायूंवर लक्ष केंद्रित करा.

१० मिनिटांसाठी सामान्य वेग ठेवून टेडमिलवर धावा. त्यानंतर १-१ करुन १-१ मिनिटासाठी बायसेप्स कर्ल्स, ट्रायसेप्स एक्स्टेंशस, साईड लेटरल्स आणि स्टँडिंग ट्रायसेप्स करा. यामुळे शरीराचा वरील भाग तंदुरुस्त राहील आणि हृदयही चांगल्या प्रकारे काम करेल.

महिला अमूमम क्रंचेस करताना जास्तकरुन गळयाच्या मांसपेशींचा वापर करतात. असे करणे म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असते. त्यामुळे गळयाऐवजी पोटाच्या मांसपेशींकडे लक्ष द्या.

महिलांना १ तासापेक्षा जास्त वेळ फिटनेस ट्रेनिंगची गरज नसते. म्हणूनच कोणताही व्यायाम गरजेपेक्षा जास्त वेळ करू नका. यामुळे वेळ वाया जातो, सोबतच उगाचच थकायला होते.

सिंगल लेग डेडलिफ्ट : एक डंबेल्सची जोडी घ्या. डाव्या पायावर उभ्या रहा. उजवा पाय मागच्या बाजूने वर करुन गुडघा दुमडा. आता हिप्सच्या मदतीने शरीराला पुढील दिशेने झुकवा आणि हळूहळू जमेल तसे शरीराला खालच्या बाजूला आणा. त्यानंतर त्याच अवस्थेत थांबा. नंतर शरीराला पूर्ववत स्थितीत आणा. ही संपूर्ण क्रिया करताना छाती ताठ ठेवा.

साइड प्लँक

गुडघे सरळ ठेवून उजव्या कुशीत झोपा. शरीराचा वरचा भाग हाताच्या उजव्या कोपऱ्यावर असावा. हिप्स तोपर्यंत वर उचला जोपर्यंत तुमच्या टाचा आणि खांदे एका रेषेत येत नाहीत. ३० सेकंदांपर्यंत अशाच स्थितीत रहा. आता दुसऱ्या कुशीवर वळून म्हणजे डाव्या बाजूला वळून हीच क्रिया करा.

पुशअप

हात आणि पाय जमिनीवर टेकून ठेवा. हात अशाप्रकारे ठेवा की ते खांद्यांच्य समांतर रेषेत असतील. त्यानंतर शरीराला जमिनीच्या दिशेने तोपर्यंत वाकवा जोपर्यंत छाती जवळपास जमिनीला स्पर्श करणार नाही. नंतर पुन्हा मूळ स्थितीत या.

ट्रायसेप्स एक्स्टेंशन

पाठ जमिनीच्या दिशेने वाकवा. गुडघे दुमडा. हात सरळ ठेवा. वजनाचा वरचा भाग छताच्या दिशेने असायला हवा. २-३ पाऊंड वजन उचलून सुमारे १ इंच खाली आणा.

स्टेपअप्स

बाकडा किंवा शिडीच्या समोर उभ्या रहा. शिडीवर उजवा पाय व्यवस्थित ठेवा. तो शिडीवर दाबून धरा आणि शरीराला तोपर्यंत सरळ दिशेत ढकला जोपर्यंत तुमचा डावा पाय एकदम सरळ हवेत अधांतरी राहत नाही. आता शरीराला पुन्हा खालच्या बाजूने तोपर्यंत ढकला जोपर्यंत तुमचा डावा पाय जमिनीला स्पर्श करणार नाही. ही प्रक्रिया दोन्ही बाजूंनी करा.
ब्रिज

पाठीच्या मदतीने जमिनीवर झो. गुढघे दुमडा. पायाचे पंजे जमिनीवर ठेवा. आता तुमचे हिप्स अशाप्रकारे उचला की खांदे आणि गुडघे समान रेषेत येतील. थोडावेळ याच स्थितीत रहा. त्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत या.

शोल्डर स्टँड

पाठीवर झोपून पाय आणि हिप्स वर उचला. पाय उचलून आपल्या डोक्यावर मागच्या बाजूने न्या. पायाचे अंगठे जमिनीला टेकले पाहिजेत. हात पाठीच्या मागे ठेवून पाय हवेत सरळ उभे करा. खांदे आणि टाचा एका रेषेत येतील याकडे लक्ष द्या. मान सैल सोडा.

प्लँक विथ आर्म रेज

पुशअप पोझिशन घ्या, पण दोन्ही कोपर दुमडा. तुमचे उरलेले वजन हातांऐवजी खांद्यांवर घ्या. खांदे आणि टाचांच्यामध्ये शरीर सरळ रेषेत असायला हवे. उजवा हात उचलून थेट तुमच्या समोर आणा. मॅन्युअल थेरपिस्ट अॅक्टिव्हऑर्थो द्या.

नोकरदार महिलांचा वाढता रूबाब

* गरिमा पंकज

देशात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने वाढत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर प्रथमच नोकऱ्यांमध्ये शहरातील महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त झाला आहे. जनगणना मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार शहरांमध्ये ५२.१ टक्के महिला आणि ४५.७ टक्के पुरुष नोकरदार आहेत. हो, ग्रामीण क्षेत्रात महिला नोकऱ्यांमध्ये अजूनदेखील पुरुषांच्या पाठीमागे आहेत. कुठे ना कुठे महिलांचे वाढते प्रोफेशनल आणि टेक्निकल शिक्षण तसेच लोकांचे बदलणारे विचार यांनी बदलाचे हे वारे वाहिले आहे. आता पुरुषदेखील महिलांना सहकार्य करीत आहेत. त्यांची मानसिकता महिलांना सपोर्टिव बनत चाललेली आहे.

घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये खुश

स्त्रिया आज फक्त गरजेसाठीच नव्हे तर आपल्या मनाच्या आनंदासाठीदेखील नोकरदार होणे पसंत करतात. ऑफिसच्या निमित्ताने त्या घरातील तणावापासून बाहेर निघू शकतात. आपली ओळख निर्माण करु शकतात. याचे एक कारण हेदेखील आहे की जेव्हा स्त्रियांना त्यांच्या जॉबमुळे समाधान मिळत नाही तेव्हा त्या आपल्या जॉब बदलतात. जिथे त्यांना चांगले वाटते तिथेच त्या जॉब करतात, परंतु पुरुष असे करत नाहीत. आपल्या जॉबवर समाधानी नसण्यावरदेखील ते त्याच कंपनीत काम करीत राहतात, ज्यामुळे ते ऑफिसमध्ये आनंदी राहू शकत नाहीत. याशिवाय पुरुषांमध्ये जास्त अधिकार प्राप्त करण्यासाठी स्पर्धादेखील चालत राहते. त्यांचा इगोदेखील खूप लवकर होतो.

वर्किंग वाइफ पसंत करतात पुरुष

इंटरेस्टिंग गोष्ट हि आहे कि जिथे लोक आधी लग्नासाठी कर्तव्यदक्ष, संस्कारी आणि घरगुती मुलगी पसंत करायचे तिथे आता या ट्रेण्डमध्ये बदल दिसून येतो आहे. आता पुरुष लग्नासाठी घरात बसलेली मुलगी नाही, तर वर्किंग वूमन पसंत करू लागले आहेत. आपल्या वर्किंग वाईफचा इतरांशी परिचय करून देताना त्यांना अभिमान वाटतो.

चला जाणून घेऊया की पुरुषांच्या या बदलत्या विचाराचे कारण :

पतीची परिस्थिती समजून घेते : जर पत्नी स्वत: नोकरदार आहे तर ती पतीच्या कामाशी निगडित प्रत्येक अडचण व्यवस्थित समजून घेते. ती वेळोवेळी ना पतीला घरी लवकर येण्यासाठी फोन करीत राहते आणि ना घरी परतल्यानंतर हजारो प्रश्न करते. अशाप्रकारे पती-पत्नीचे संबंध सुरळीत चालू राहतात. दोघेही शक्यतोवर एकमेकांची मदत करण्यासाठीदेखील तयार राहतात. हेच कारण आहे की पुरुष नोकरदार मुली शोधू लागले आहेत.

आपला खर्च स्वत: उचलू शकतात : ज्या महिला जॉब करीत नाहीत, त्या आपल्या खर्चासाठी पूर्णपणे पतीवर अवलंबून असतात. छोटयातल्या छोटया गोष्टीसाठीदेखील त्यांना त्यांचे पती आणि घरातील यांच्यासमोर हात पसरावे लागतात. दुसरीकडे वर्किंग वुमन तर वेळप्रसंगी कुटुंबाचीदेखील मदत करतात.

पॉझिटिव्ह असतात : नोकरदार महिलांवर झालेल्या एका रिसर्च नुसार बहुतेक वर्किंग वुमन या सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असतात. त्यांच्यात आत्मविश्वास आणि गोष्टी हँडल करण्याचा व्यवस्थित अनुभव असतो. त्यांना ठाऊक असते की कोणत्या अडचणीशी कशाप्रकारे दोन हात करायला हवेत. त्यामुळे त्या छोटया छोटया गोष्टींवर हायपर होत नाहीत आणि घाबरतदेखील नाहीत. त्यांना ठाऊक असते कि प्रयत्न केल्यानंतर त्या पुष्कळ पुढे जाऊ शकतात.

खर्च कमी बचत जास्त : आजच्या महागाईच्या काळात जर पती पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर जीवन सोपे होते. तुम्हाला कोणताही प्लॅन बनवतेवेळी जास्त विचार करावा लागत नाही. भविष्यासाठी बचतदेखील सहजतेने करू शकता. घर, वाहन किंवा अन्य कोणत्याही आणि गरजेसाठी लोन घ्यायचे असेल तरीदेखील दोघेही आरामात घेऊ शकतात आणि हप्तेदेखील मिळून भरू शकतात. परिस्थिती तर अशी आहे की आज महिला लोन घेण्यात आणि ते फेडण्याच्या बाबतीत पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत. त्या फक्त कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टीने नाही तर आर्थिक दृष्टीनेदेखील घराची धुरा वाहतात.

लोन घेण्यात पुढे

क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी ‘ट्रान्सयुनियन सिबिल’च्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये कर्ज घेण्याच्या बाबतीत महिला अर्जदारांची संख्या वाढत आहे. म्हणू शकता, की स्त्रियांनी पुरुषांना पाठीमागे टाकले आहे.

रिपोर्टनुसार २०१५ ते २०१८ च्या दरम्यान कर्ज घेण्यासाठी यशस्वी महिला अर्जदारांच्या संख्येत ४८ टक्के वाढ झालेली आहे. याच्या तुलनेत यशस्वी पुरुष अर्जदारांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झालेली आहे. वास्तविक एकूण कस्टमर बेसच्या हिशोबाने अजूनदेखील कर्ज घेणाऱ्या पुरुषांची संख्या खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार जवळपास ५.६४ करोड एकूण लोन अकाऊंटमध्ये अजूनदेखील जास्त भाग गोल्ड लोनचा आहे. वास्तविक २०१८ मध्ये यात १३ टक्के कपात झाली आहे. यानंतर बिजनेस लोनचे स्थान आहे. कंजूमर लोन, पर्सनल लोन आणि टू व्हीलर लोनसाठी महिलांकडून मागणी प्रतिवर्षी वाढत चालली आहे. आज प्रत्येक चार कर्जदारांमध्ये एक महिला आहे. हे प्रमाण आणखीदेखील बदलेल. कारण कर्ज घेण्यायोग्य महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत चालली आहे. चांगले शिक्षण आणि श्रम बाजारात चांगल्या सहभागामुळे आता जास्तीत जास्त महिला आपले आर्थिक निर्णय स्वत: घेत आहेत.

सुखी दाम्पत्यासाठी परस्पर सामंजस्य जरूरी

*प्रा. रेखा नाबर

मुंबईत राहणाऱ्या सुरेशचा विवाह जळगावच्या सुनीतासोबत झाला. विवाहानंतर जळगावमध्ये संथ जीवन व्यतित करणाऱ्या सुनीताची मुंबईतील गतीमान जीवनशैलीत फरफट होऊ लागली. नविन जागा, वातावरण, आप्तजनांचा विरह त्यात जीवनमानांतील आमलाग्र बदल. ती पुरती भांबावून गेली. पदोपदी चुका होऊ लागल्या. सुनीताला धीर देणं दूरच, तिला समजून घेण्याऐवजी सुरेशही तिच्यावर ताशेरे ओढू लागला. तिचा जीव रडकुंडीला आला. हळूहळू स्थिती चिघळू लागली. शेजारच्या दामलेकाकूंना परिस्थितीचा अंदाज आला. आईच्या मायेने त्यांनी सुनीताला मार्गदर्शन केले. सुरेश सुनीता यांच्या संसाराची गाडी सुरळित चालू लागली.

मनीष व मृण्मयी दोघेही आय.टी क्षेत्रांतील नावाजलेल्या कंपन्यांत कार्यरत होते. बाळंतपणानंतर मृण्मयी कामावर रूजू झाली व तिला आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क प्रमोशन मिळाले होते व ट्रेनिंगकरता जर्मनीस सहा महिने जाणे आवश्यक होते. ‘‘कसं स्विकारू मी प्रमोशन मनीष? आपला मन्मय अवघा सहा महिन्यांचा आहे. आई एकट्या नाही सांभाळू शकणार.’’

‘‘अशी पॅनिक होऊ नकोस, निघेल मार्ग काहीतरी,’’ मनीष म्हणाला. मनीषने मृण्मयीच्या आईबाबांना येऊन राहण्याची विनंती केली. स्वत:च्या कामाच्या वेळेतसुद्धा आवश्यक तो बदल केला. आईबाबांनी यायचे कबूल केले, तेव्हा मृण्मयी जर्मनीला जाण्यास राजी झाली होती. इकडे या प्रमोशनमुळे मृण्मयी मनीषपेक्षा उच्चपदावर पोहोचणार होती. परंतु त्याने आपला पुरूषी अहंकार आवरला. यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा पती असू शकतो हे त्याने सिद्ध केले. गृहिणी जी कुटुंबाचा कणा असते, तिच खुश असली की संपूर्ण कुटुंब समाधानी असते.

वानगीदाखल वरील दोन उदाहरणे पेश केली आहेत. परंतु प्रत्येक कुटुंबात परिस्थिती निराळी असते. त्या वातावरणाचा प्रत्येक सदस्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. पूर्वीच्या काळी चूल व मूल हे कार्यक्षेत्र असणाऱ्या स्त्रियांची कुटुंबीयांकडून व स्वत:कडून फारशी अपेक्षा नव्हती. त्या अल्पसंतुष्ट होत्या किंवा परिस्थितीने त्यांना तसे बनवले होते. समाजधुरीणांच्या प्रयत्नांनी त्यांच्या हाती शिक्षणाचे शस्त्र मिळाले. ते हाती धरून त्यांनी चौफेर प्रगती केली. कुटुंबासाठी स्वखुषीने अर्थार्जनांत सहाय्य केले. आजमितीस तिच्यावर संसार व नोकरी किंवा व्यवसाय अशी दुहेरी जबाबदारी आहे. घराचा उंबरठा सोडून अंबराकडे झोप घेताना ती आपले कौटुंबिक योगदान विसरलेली नाही. अशा आधुनिक स्त्रीच्या मन:स्वास्थाचा जरूर विचार व्हायला हवा. आज स्त्री समाजातं निरनिराळे गट निर्माण झाले आहेत. त्यानुसार त्यांच्या मानसिकतेची जडणघडण आढळते.

अविवाहित या गटांतील स्त्रियांना बऱ्याच प्रमाणांत स्वातंत्र्य असते. घरची आघाडी सर्वस्वी सांभाळावी लागत नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्यास बाधा येत नाही. विवाहानंतर मानसिक स्वास्थ्यावर गदा येणार, करिअरवर परिणाम होणार व स्वातंत्र्य गमावणार हे जाणून काही मुली अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात किंवा विवाह शक्य तितका लांबणीवर टाकतात. उशिरा केलेल्या विवाहामुळे उतारवयातील अपत्यप्राप्तीची समस्या मन:शांती धोक्यात आणते.

विवाहित स्त्रियांचे दोन गट पडतात. गृहिणी असणाऱ्या स्त्रिया कायम घरकाम करून कोमेजून जातात. शिवाय ते बिनमोलाचे असल्यामुळे त्यांच्या अस्तित्त्वाची दखल न घेता त्यांना गृहीतच धरले जाते. कुटुंबांतील सदस्यांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास पदरी पडते उपेक्षा. मानसिक स्वास्थ्यावर घाला घालणारी! बाहेरच्या जगाशी संबंध नसल्यामुळे न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. अशा स्त्रियांनी कुठल्या तरी छंदात मन रमवून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा प्रयत्न केला पाहिजे.

विवाहित मिळवती स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा व मोठ्या संख्येचा घटक आहे. विवाहानंतर हाती येणारी पाळण्याची दोरी समस्यांची री ओढत राहाते. जगाचा उधार करणारी ही स्त्री स्वत:साठी व कुटुंबांसाठी एक आधार मानली जाते. एकत्र कुटुंबांत घरच्या आघाडीची समस्या बिकट नसली तरी सर्वांशी जमवून घेऊन नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरतच असते. स्वातंत्र्य अबाधित राहीले नाही तर मानसिक स्वास्थ्य डळमळू लागते. काही जणींच्या बाबतीत आपल्याला मदत करणाऱ्या संबंधितांच्या उपकाराचे ओझे मनावर दडपण आणते.

विभक्त कुटुंबपद्धतीत स्वातंत्र्य मिळाले तरी अपत्यांच्या संगोपनाकरिता पाळणाघर किंवा नोकर अपरिहार्य. ‘माय गुतंली कामासी, चित्त तिचे छकुल्याशी’ अशी मानसिक कुतरओढ. नोकरांच्या अनियमित वागण्याचा आपल्या नोकरीवर किंवा व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम व कुटुंबाची बिघडणारी शिस्त या दुहेरी तणावामुळे मानसिक अस्वास्थ्याची पातळी वाढते.

काही स्त्रिया करिअरला प्राधान्य देतात. करिअरच्या यशस्वीतेची चढण चढताना अपत्याचे आगमन तणाव वाढवते. म्हणून अपत्यप्राप्ती लांबवणे अपरिहार्य होते. स्त्रीच्या करिअरला तिच्या सासरघराने महत्त्व न दिल्यास तिच्या मनाची जीवघेणी कुतरओढ चालू होते. करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आवश्यक असते. त्याचा तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशी संबंध असतो. ती अनुकूल नसेल तर गंभीररित्या ताण जाणवून मानसिक स्वास्थ्य धोक्यांत येते.

स्त्रीच्या बाबतीत शारीरिक बदलाचा तिच्या मन:स्थितीवर होणारा परिणामही लक्षात घेण्याजोगा आहे. वयाच्या १२-१३ वर्षांपासून जवळपास ५० वर्षांपर्यत हे बदल जाणवत असतात, हार्मोन्स असमतोलाच्या स्वरूपात. या सर्वाचा तिच्या वागणुकीवर परिणाम होतोच.

गृहिणी असो वा नोकरदार, स्त्रीला तणावमुक्त राहणे कठिण असते. सततच्या अस्वास्थामुळे तिच्या मनावर निराशेचे मळभ पसरते. सकारात्मक विचार करणारी स्त्रीसुद्धा नकारात्मक विचारांकडे वळते. वयाप्रमाणे शारीरिक व मानसिक शक्ती कमकुवत होऊ लागते. मानसिक अस्वास्थ्याचे परिणाम म्हणून ती मनोकायिक विकारांची बळी ठरते. अशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून घरातील प्रत्येक सभासदाने आपापल्या पातळीवर संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे.

व्यावसायिक आणि स्टायलिश ऑफिसवेअरच्या टीप्स

* पूनम अहमद

ऑफिसच्या कपडयांमध्ये चांगले दिसल्याने केवळ कौतुकच होत नाही तर आत्मविश्वासही वाढतो. एखाद्या स्मार्ट, कामासाठी योग्य आणि ट्रेंडी परिधान केल्याने व्यक्तिमत्व खुलते. पूर्वी महिलांना ऑफिसमध्ये साडी किंवा सूट घालणे आवडायचे पण आता नाही. आज त्या आपल्या ऑफिसच्या लुकमध्ये नव-नवीन गोष्टींचा प्रयोग करू इच्छित आहेत.

व्यावसायिक तसेच स्टायलिश दिसण्यासाठी खालील टीप्सचा विचार करा :

  • आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला जीन्स घालण्याची परवानगी असल्यास पांढऱ्या शर्टसह ब्लू जीन्स आणि ब्लॅक ब्लेझर घाला. हाय हील किंवा पीप टोजने आपण खूप स्मार्ट दिसाल. हे प्रासंगिक आणि व्यावसायिक दोन्ही स्वरूप आणेल.
  • प्लेन ब्लाउजसह स्ट्रीप प्लाझा खूप छान दिसतो पण तुम्हाला सिंगल कलरचा प्लाझा घालायचा असेल तर त्यास प्रिंट केलेल्या ब्लाऊजसह परिधान करा. एखाद्या महत्त्वपूर्ण मीटिंगला किंवा प्रेजेंटेशन डेला ही प्लाझा पॅन्ट आणि ब्लाउज घालता येऊ शकतो.
  • आपल्याला परिपूर्ण कॉर्पोरेट लुक हवा असल्यास व्हाइट शर्टसह ब्लॅक सूट वापरुन पहा. अगदी व्यावसायिक महिला दिसाल आणि याची फॅशन कधीच आऊट होत नाही.
  • फॉर्मल लुकसाठी, चांगल्या फॉर्मल टॉपसह पँट घाला. पातळ लेदर बेल्ट आणि हाय हिलसह खूप छान दिसाल.
  • लांब कुर्ती आणि सिगरेट पँट वापरुन पहा. हा ड्रेस त्यांच्यासाठीच आहे, ज्यांना इंडो-वेस्टर्न फॉर्मल लुक हवा आहे. वेस्टर्न टच असलेले हे भारतीय रूप चांगले दिसते. काही वर्षांपासून सिगरेट पँट फॅशनमध्ये आहे आणि लांब कुर्ती तर सदाफुली आहे.
  • बिजनेस वूमन लुकसाठी, फॉर्मल शर्ट आणि ब्लेझरसह पेन्सिल स्कर्ट घाला, तसेच पेन्सिल हिल पंप आणि कमीतकमी अॅक्सेसरीज घाला.
  • कॅज्युअल ड्रेसाठी रंगीबेरंगी पोलो नेक टी-शर्टसह एकल रंगाचा फॉर्मल ट्राउजर घाला. ब्राइट कलरचा टी-शर्ट आउटफिटला आकर्षक बनवेल.
  • आजच्या युगात, तरुणांना जीन्ससह कॅज्युअल शॉर्ट किर्ती खूप आवडतात. आजकाल, बहुतेक कॉर्पोरेट घरांमध्ये कंफर्टेबल ड्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. हा इंडो-वेस्टर्न पोशाख खूप लोकप्रिय आहे. आपण त्यास सूती स्कार्फसह परिधान करू शकता.
  • सलवार सूटमध्ये जवळजवळ प्रत्येक स्त्री चांगली दिसते. आपल्या ऑफिसच्या खास प्रसंगासाठी, काही पेस्टल रंगाचे सलवार सूट सॉर्ट करून ठेवा. भले सूती सूट असो वा रेशमी फॅब्रिक, त्यात चांगले दिसाल. पारंपारिक भारतीय हातमाग प्रिंट्सदेखील घातले जाऊ शकतात. यात स्टायलिश आणि व्यावसायिक दिसाल.

ऑफिस लुकसाठी अतिरिक्त सूचना

  • आजकाल बहुतेक कॉर्पोरेट घरे कॅज्युअल ड्रेस कोडचे पालन करतात. तरीही मीटिंगसाठी किंवा महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी फॉर्मल ड्रेस घातला पाहिजे.
  • प्रत्येक शनिवारी व रविवारी स्वत:ला तयार करण्यासाठी थोडा वेळ घालवा. नियमितपणे पेडीक्योर, मॅनीक्योर, वॅक्सिंग व आयब्रोजसाठी जावे.
  • जे आपल्या शरीराचा प्रकार आणि शैलीस अनुरूप असेल तेच खरेदी करा. एखाद्या फॅशन मासिकामध्ये एखाद्या मॉडेलला परिधान केलेले पाहुन खरेदी करू नका. तोच पोषाख परिधान करा, जो आपल्यावर परिपूर्ण दिसेल आणि ज्याने आपण गॉर्जियस दिसाल.
  • असे काही खरेदी करा, जे वेगवेगळया कपडयांसह परिधान करून वेगवेगळया प्रकारे छान दिसाल. उदाहरणार्थ एखादा असा टॉप खरेदी करा, जो जीन्स, ट्राउजर किंवा अगदी स्कर्टसहदेखील चांगला दिसेल.
  • ऑफिससाठी परिधान करण्यात येणारे कपडे अधिक सैल किंवा फार घट्ट नसावेत. चुकीच्या फिटिंगच्या कपडयात आपण अस्वस्थ राहाल आणि चांगलेही दिसणार नाहीत, म्हणून आपल्यास अनुकूल असे काहीतरी घाला.
  • कार्यालयात व्यवस्थित प्रेस केलेले कपडे घाला. एक महाग परंतु दुमडलेला पोशाख संपूर्ण लुक खराब करेल.
  • लाउड मेकअप करू नका आणि बिझनेस सूटसह चंकी दागिने घालू नका अन्यथा पोशाखाचा संपूर्ण लुक खराब होईल. ऑफिससाठी कमीतकमी मेकअप करा आणि अॅक्सेसरीजसुद्धा कमी घाला.
  • कामावर जात असताना जसे चांगले कपडे घालणे आवश्यक आहे, चांगले शूज घालणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. जर शूज आउटफिट्समध्ये न जुळले तर सर्व व्यक्तिमत्व वाईट दिसेल. शूज स्वच्छ आणि पॉलिश केलेले असले पाहिजेत. काळे शूज, सँडल आणि न्यूड पंप चांगले दिसतात. जर तुम्हाला काही ब्राइट घालायचे असेल तर निश्चित करा की ते पोषाखाच्या रंगसंगतींसह संयोजित होत आहे.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें