* गरिमा पंकज

देशात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची संख्या वेगाने वाढत आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर प्रथमच नोकऱ्यांमध्ये शहरातील महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त झाला आहे. जनगणना मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार शहरांमध्ये ५२.१ टक्के महिला आणि ४५.७ टक्के पुरुष नोकरदार आहेत. हो, ग्रामीण क्षेत्रात महिला नोकऱ्यांमध्ये अजूनदेखील पुरुषांच्या पाठीमागे आहेत. कुठे ना कुठे महिलांचे वाढते प्रोफेशनल आणि टेक्निकल शिक्षण तसेच लोकांचे बदलणारे विचार यांनी बदलाचे हे वारे वाहिले आहे. आता पुरुषदेखील महिलांना सहकार्य करीत आहेत. त्यांची मानसिकता महिलांना सपोर्टिव बनत चाललेली आहे.

घरापेक्षा जास्त ऑफिसमध्ये खुश

स्त्रिया आज फक्त गरजेसाठीच नव्हे तर आपल्या मनाच्या आनंदासाठीदेखील नोकरदार होणे पसंत करतात. ऑफिसच्या निमित्ताने त्या घरातील तणावापासून बाहेर निघू शकतात. आपली ओळख निर्माण करु शकतात. याचे एक कारण हेदेखील आहे की जेव्हा स्त्रियांना त्यांच्या जॉबमुळे समाधान मिळत नाही तेव्हा त्या आपल्या जॉब बदलतात. जिथे त्यांना चांगले वाटते तिथेच त्या जॉब करतात, परंतु पुरुष असे करत नाहीत. आपल्या जॉबवर समाधानी नसण्यावरदेखील ते त्याच कंपनीत काम करीत राहतात, ज्यामुळे ते ऑफिसमध्ये आनंदी राहू शकत नाहीत. याशिवाय पुरुषांमध्ये जास्त अधिकार प्राप्त करण्यासाठी स्पर्धादेखील चालत राहते. त्यांचा इगोदेखील खूप लवकर होतो.

वर्किंग वाइफ पसंत करतात पुरुष

इंटरेस्टिंग गोष्ट हि आहे कि जिथे लोक आधी लग्नासाठी कर्तव्यदक्ष, संस्कारी आणि घरगुती मुलगी पसंत करायचे तिथे आता या ट्रेण्डमध्ये बदल दिसून येतो आहे. आता पुरुष लग्नासाठी घरात बसलेली मुलगी नाही, तर वर्किंग वूमन पसंत करू लागले आहेत. आपल्या वर्किंग वाईफचा इतरांशी परिचय करून देताना त्यांना अभिमान वाटतो.

चला जाणून घेऊया की पुरुषांच्या या बदलत्या विचाराचे कारण :

पतीची परिस्थिती समजून घेते : जर पत्नी स्वत: नोकरदार आहे तर ती पतीच्या कामाशी निगडित प्रत्येक अडचण व्यवस्थित समजून घेते. ती वेळोवेळी ना पतीला घरी लवकर येण्यासाठी फोन करीत राहते आणि ना घरी परतल्यानंतर हजारो प्रश्न करते. अशाप्रकारे पती-पत्नीचे संबंध सुरळीत चालू राहतात. दोघेही शक्यतोवर एकमेकांची मदत करण्यासाठीदेखील तयार राहतात. हेच कारण आहे की पुरुष नोकरदार मुली शोधू लागले आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...