कसा करावा फूड बिझनेस

* सोमा घोष

स्वत:चा व्यवसाय असेल तर काम करण्याची इच्छा आपोआप प्रबळ होते. कुटुंबासोबत कामाचा ताळमेळ साधणेही सोपे जाते. कार्यालयात टिफिन म्हणजेच जेवणाचा डबा पोहोचवणे, हे काम घरातून अगदी सहज करता येते, पण या कामातील खरे आव्हान आहे ते म्हणजे स्वच्छता आणि चविष्ट जेवण देणे.

प्रत्येकाला रोजचे जेवण आवडेल आणि ते परत येणार नाही याचीही नेहमी काळजी घ्यावी लागते. लग्नानंतर मोठया शहरांमध्ये तुम्ही हे काम करू शकता. ३०० चौरस फुटांच्या छोटया घरात एका बाजूला स्वयंपाकघर करून १० ते २० लोकांसाठी जेवणाचा डबा बनवण्याची व्यवस्था करता येते.

जेवणात चपाती, पराठा, पुरी आणि डाळी, भाजी, भात असे शाकाहारी पूर्णान्न देता येते. हळूहळू, ग्राहकांची संख्या वाढू लागल्यावर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या महिलांनाही कामाला घेता येते. त्यांना पोटभर जेवण आणि काही पैसे दिले जातात. एका घरातून १०० पेक्षा जास्त लोकांसाठी जेवण तयार करता येते. यासाठी ४-५ लोक आवश्यक असतात, ज्यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही असू शकतात.

चांगला व्यवसाय

विनितालाच घ्या. सासरची परवानगी नव्हती, पण आर्थिक अडचणींमुळे अखेर ते तयार झाले. ती म्हणते की, सासरच्या मंडळींना तिने कुठलाही व्यवसाय करावा, असे वाटत नव्हते, पण तिला घर चालवायचे होते आणि घरभाडेही द्यावे लागत होते, जे पतीच्या कमाईत शक्य नव्हते. माझी मुलंही मोठी होत होती. त्यांना शाळेत पाठवायचे होते, म्हणून शेवटी मी हा व्यवसाय निवडला. माझ्याकडे फारसे शिक्षण नव्हते, जेणेकरून मी बाहेर जाऊन दुसरे काही काम करू शकेन.

मला स्वयंपाकाची आवड पहिल्यापासूनच होती. जेव्हा लोकांना मी केलेले पदार्थ आवडू लागले तेव्हा मला नवनवीन आणि चांगले पदार्थ बनवण्याची प्रेरणा मिळाली. आता माझे पती अरविंद यादव आणि भावजयही या कामात मला मदत करतात. बाजारातून सामान आणणे आणि बनवलेले पदार्थ कार्यालयात पोहोचवणे, ही कामं तेच करतात.

या सेवेतून तुम्ही दरमहा ५० हजार रुपये कमवू शकता. सुमारे १०-१२ किलोमीटरच्या परिसरात खाद्यपदार्थ किंवा जेवण पोहोचवण्याची व्यवस्था करता येते.

कामासोबतच या गोष्टीही लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचा व्यवसाय सुरू राहील :

* लोकांच्या आवडी-निवडींची काळजी घ्या.

* जेवणासाठी चांगल्या दर्जाचे तेल आणि मसाले वापरा.

* स्वच्छतेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते, त्यात भाज्या स्वच्छ धुणे तसेच जेवण बनवणाऱ्या महिलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असते.

विनिताला विश्वास आहे की, तिने हा व्यवसाय योग्यवेळी सुरू केला आहे. तिला लक्ष्य यादव (७ वर्षे) आणि विवेक यादव (३ वर्षे) अशी दोन मुले आहेत. ती आता शाळेत जाऊ लागली आहेत. त्यांना भविष्यातही चांगले शिक्षण द्यायचे आहे. तिला आपला व्यवसाय इतका वाढवायचा आहे की, त्यातून काही महिलांना रोजगार मिळू शकेल. या व्यवसायासाठी ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड इंडिया अॅक्ट २००६’ लागू होतो. तिथे नोंदणी केल्यामुळे ग्राहक मिळतात, पण नंतर स्वच्छता तपासण्यासाठी येणाऱ्या निरीक्षकांना सामोरे जाण्याचा मनस्ताप होतो.

महिला दिन विशेष

आश्मीन मुंजाल,  कॉस्मेटोलॉजिस्ट

*  गरिमा पंकज

आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतून २५ वर्षांपूर्वी आश्मीन मुंजाल यांनी ‘आश्मीन ग्रेस’ नावाचे पार्लर सुरू केले. हळूहळू महिलांना ते आवडू लागले आणि त्यामुळेच पार्लरचा विस्तार होत गेला आणि पहिल्या मजल्यावरील इतर खोल्यांमध्येही पार्लरचे काम सुरू झाले. ८ वर्षांनंतर प्रथमच साऊथ एक्सच्या कमर्शिअल मार्केटमध्ये त्यांनी पार्लर उघडले आणि त्याला ‘आश्मीन मुंजालस अंपायर ऑफ मेकओव्हर’ असे नाव दिले,  मागणी वाढत गेली आणि लोक युनिसेक्स सलूनची मागणी करू लागले. त्यावेळी त्यांनी ‘स्टार सलून प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने स्वत:ची कंपनी नोंदणीकृत केली,  जिथे त्या कंपनीच्या संचालक होत्या आणि इतर भागीदार होते. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी स्टार सलूनमध्ये ‘स्टार अकॅडमी’ सुरू केली,  जिथे लोकांना सुंदर बनवण्याचे शिक्षण दिले जाऊ लागले. अशाप्रकारे, केवळ एका खोलीतून सुरू झालेले पार्लर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सलून बनले.

आश्मीन मुंजाल यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कौशल्य विकासासाठी पुरस्कार मिळाले. उपराष्ट्रपती एम. वैकय्या नायडू यांच्याकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना महिला सक्षमीकरणासाठीही पुरस्कार मिळाले आहेत. सुषमा स्वराज पुरस्कारही मिळाला आहे. मेकअप आणि सौंदर्य क्षेत्रात अनेक ऑल इंडिया एक्सलन्स पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.

आश्मीन मुंजाल मानतात की, जीवनात वेळेचे योग्य व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. तुमचे करिअर घडत राहील. पैसा आणि प्रसिद्धीही येत-जात राहील. तुमची आवडही कधी ना कधी जोपासता येईल, पण तुमच्या मुलांचे बालपण मात्र कधीच परत येणार नाही. म्हणूनच आपल्या मुलांचे बालपण आनंदाने अनुभवा. त्यांना पूर्ण वेळ द्या,  नाहीतर येणारी अपराधीपणाची भावना भविष्यात तुम्हाला तुमच्या यशाचा आनंद घेऊ देणार नाही.

या क्षेत्रात महिलांची प्रगती कशी होईल?

जर तुमची आवड लोकांना सुंदर बनवण्याची असेल तर तुम्ही पार्लर उघडले नाही तरी तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आज इन्स्टाग्राम, फेसबुक, गुगल, जस्ट डायल इत्यादी गोष्टी आहेत, ज्याद्वारे सर्व काही फोनवर उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त ब्युटी किट आणि इतर पार्लर प्रसाधनांसाठी थोडीफार गुंतवणूक करावी लागेल. बाकी तुम्ही सर्व काम तुमच्या घरातूनच व्यवस्थापित करू शकता. वेगळे दुकान असण्याची विशेष गरज नाही. ग्राहकांना तुमचा पत्ताही मोबाईलवरच मिळेल. नवीन तंत्रज्ञानामुळे सर्व कामं खूप सोपी झाली आहेत. त्यामुळे महिलांना घरून काम करणे सोपे आहे. तसेही, आजकाल लोकांमध्ये छान तयार होण्याची आणि सुंदर दिसण्याची खूप क्रेझ आहे. हेअरस्टाईल करणं असो किंवा मेकअप करणं असो,  महिला पार्लरमध्ये येतच असतात.

एखादी महिला सक्षम कशी होऊ शकते?

तुम्हाला स्वत:ला जे बनायचे आहे ते तुम्ही बनता. जर तुम्ही स्वत:ला बिचारी, कमककुवत महिला म्हणून पाहात असाल किंवा तसा विचार करत असाल तर तुम्ही तशाच बनाल, पण जर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर यायचे असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. जोपर्यंत तुमचा स्वत:वर विश्वास नाही की तुम्ही अमुक एक गोष्ट करू शकता, तोपर्यंत तुम्ही ती कशी करू शकाल? प्रत्येक महिलेच्या आत शक्ती आणि ऊर्जा असते. ही शक्ती फक्त तुमच्यात आहे. ती कोणत्या मार्गाने वळवायची, हे देखील तुमच्याच हातात आहे.

पुढे जाण्यासाठीची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

माझ्या आईने मला नेहमीच खूप पाठिंबा दिला. ती एक नोकरदार महिला होती. दिल्ली पोलिसात इन्स्पेक्टर होती. तिने आयुष्यभर काम केले आणि कुटुंब तसेच तिच्या नोकरीत समतोल साधला. पुढे ती पोलीस स्टेशनची प्रभारी झाली. अनेकदा ती वुमन क्राइम सेलची प्रभारी होती. अनेक कठीण जबाबदाऱ्या तिने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. या सोबतच तिने आपल्या तीन मुलांचे संगोपन करणे, नातेवाईकांशी संपर्क ठेवणे, प्रवास करणे इत्यादी सर्व काही व्यवस्थित केले. त्यामुळेच आई माझी प्रेरणा झाली. तिने मला नेहमी शिकवले की, तू लग्न केलेस आणि मूल झाले तरी तू स्वावलंबी होण्यासाठी, स्वत:साठी काहीतरी केलं पाहिजेस.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें