* नम्रता पवार

दिल्ली प्रेस पब्लिकेशन यांनी अलीकडेच गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दिनांक २९ जून रोजी दादर, मुंबई येथील वनमाळी सभागृहात हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

महिलांचं आवडतं मासिक असलेल्या गृहशोभिका ‘एम्पॉवर हर’ कार्यक्रमासाठी मुंबई तसंच मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, बोरिवली, विरार, पालघरमधून अनेक महिला या रंगीबेरंगी पेहरावा कार्यक्रमासाठी उपस्थितीत होत्या. ११.०० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पाऊस असूनसुद्धा १०.०० वाजल्यापासून अनेक महिला उपस्थित होत्या.

होस्ट योगिता सकपाळ यांच्या जोशपूर्ण निवेदनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. योगिता यांनी या कार्यक्रमाच्या रूपरेषेची सर्वांना ओळख करून दिली तसंच दिल्ली प्रेस प्रकाशनाची विविध मासिकं आणि प्रकाशनाची सुरुवात याचा एक छोटासा लघुपट दाखवण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रायोजकांचीसुद्धा ओळख आणि माहिती करून दिली.

सर्वप्रथम कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन डॉक्टर प्रतिक्षा कदम यांनी डाएट का महत्त्वाचं आहे तसंच हार्मोनल प्रॉब्लेम्स, इंटरमिटेन्ट फास्टिंग, व्यायाम या सर्वांचे महत्त्व सांगितलं.

Banner_660x400_1

त्यांनी पुढे सांगितलं की, स्त्रीला एम्पॉवर केलं तर ती जगाला एम्पॉवर करू शकते. स्त्री एक शक्ती आहे. जेव्हा आपण शक्ती वगैरे म्हणतो त्याचाच अर्थ आपल्या हार्मोन्स. सर्वात पावरफुल हार्मोन्स आपल्या शरीरात आहे. कोणालाच इतरांना दिलेले नाहीत .

आज आपण प्रत्येक स्त्रीला बघतोय की जिच्यामध्ये हार्मोनल प्रॉब्लेम आहे. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हार्मोनल प्रॉब्लेम एक्झिक्ट करत नाही. आपण मोठया हॉस्पिटलमध्ये जायला घाबरतो, परंतु तिथे योग्य डायग्नोसीस होतं आणि त्यावर उपाय उपचारदेखील होतात. मोठमोठे हॉस्पिटल चांगले पॅकेजेस देत असतात त्याचा फायदा घ्या.

तुमच्यामध्ये जर हार्मोनल इशूज दिसून आले तर पॅकेज्ड फूड अजिबात खायचं नाही. त्यामध्ये प्रीजर्वेटिव असतं. त्यामध्ये सोडीयम अधिक असतं.

एकदा का तुम्ही हेल्दी लाईफचा स्वीकार केला की लठ्ठपणा, पीसीओडी, डायबिटीस या गोष्टी पूर्णपणे निघून जातात.

डॉक्टर प्रतीक्षा कदम यांनी सर्व महिलांना एक गुरु मंत्र दिला तो म्हणजे वेट लॉस. ही फ्रीमध्ये होणारी गोष्ट आहे. चालणं फ्री आहे फक्त इच्छाशक्ती आपल्या हातात आहे. वेटलॉस करण्यापूर्वी हेल्दी लाईफचा स्वीकार करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...