आनंदी जीवनासाठी बना स्मार्ट वूमन

* रिता गुप्ता

रक्षिता ही एकत्र कुटुंबातील धाकटी सून. कुटुंबाचा रेडिमेड कपडयांचा मोठा व्यवसाय आहे, सुशिक्षित असल्यामुळे लग्नानंतर तिने व्यवसायातही मदत करायला सुरुवात केली. जिथे तिच्या दोन भावजया घरीच असायच्या तिथे ती रोज तयार होऊन दुकानात जायची आणि व्यवसायाला हातभार लावायची, पण तिचे आर्थिक स्वातंत्र्य तिच्या भावजयांइतकेच होते. ती एका कर्मचाऱ्यासारखे काम करायची आणि तरीही तिला मोबदला दिला जात नव्हता.

रक्षिताला या व्यवस्थेत कोणताही दोष दिसत नाही आणि ती केवळ घराबाहेर पडण्याच्या हक्काच्या आनंदातच समाधानी आहे. घरातल्या महिलांना उत्पन्न, बचत, बँक खाती जाणून घेण्याची गरज आहे, असा साधा विचारही तिचे सासरे, भावजया किंवा तिचा नवरा करू शकत नाहीत. काही महिला स्वत:च असे मानतात की, घरातल्या आर्थिक बाबींमध्ये लक्ष देणे हे त्यांचे काम नाही.

शर्मा यांना कोविड झाला आणि वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सर्व काही इतके अचानक घडले की त्यांची पत्नी जीवनात अचानक आलेल्या या धक्कादायक बदलामुळे गोंधळून गेली. आर्थिकदृष्टया शर्मा दाम्पत्य संपन्न होते. त्यांच्या निधनानंतरही भरपूर बँक बॅलन्स, पेन्शन आणि विमा अशी भक्कम आर्थिक तरतूद होती, पण खंत या गोष्टीची होती की त्यांच्या पत्नीला यातले काहीच माहीत नव्हते.

मुलांवर अवलंबित्व

मुलगा मोठा झाल्यानंतर आणि स्वत: निवृत्त झाल्यानंतर शर्मा यांनी पत्नी उर्मलाला आर्थिक स्थिती, बँक आणि ऑनलाइन व्यवहार समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण उर्मलाला वाटले की, पती सर्व काही पाहात असताना उगाचच आपण लक्ष का घालायचे?

आता शर्मा या जगात नसल्यामुळे त्या उर्मला अचानक पूर्णपणे त्यांच्या मुलावर अवलंबून आहेत. त्या एकटया राहण्याइतक्या सक्षम नाहीत. आता पै-पैसाठी मुलावर अवलंबून राहणे त्यांना त्रासदायक ठरत आहे, पण पर्याय नाही.

उर्मला यांच्या बरोबर विरुद्ध, कांचन बाजपेयी आहेत. उशिरा का होईना, पण त्या सर्व शिकल्या आणि स्वत:चा आत्मसन्मान जपत त्या एक स्वावलंबी जीवन जगत आहेत. कधी गरज भासलीच तर त्यावेळी त्या मुलांची किंवा इतर कोणाची तरी मदत घेतात. उर्मलाप्रमाणेच त्याही गृहिणी होत्या आणि त्यांना आर्थिक ज्ञान शून्य होते.

बाजपेयी यांच्या मृत्यूच्या १० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा पत्नीच्या अज्ञानामुळे रुग्णालयाचे बिल भरण्यापासून ते इतर गोष्टींकरता लागणाऱ्या पैशांसाठी त्यांना नातेवाईक आणि मित्रांवर अवलंबून राहावे लागले. नंतर बरे झाल्यावर त्यांनी ठरवले की, आपल्याला आपल्या पत्नीला सर्व काही शिकवायचेच आहे.

६० वर्षीय कांचन बाजपेयी यांना एटीएममधून पैसे कसे काढायचे एव्हढेच माहीत नाही तर विविध ऑनलाइन पोर्टलवरून व्यवहार कसे करायचे हेही माहीत आहे. कुठे, किती पैसे कोणत्या बँकेत आहेत, वारसदार कोण आहे, कोणत्या खात्यातून खर्चाचे पैसे काढायचे आहेत, इत्यादी सर्व माहीत आहे. या आर्थिक सजगतेमुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताही निर्माण झाली असून मुलांच्या घरात अडगळीचे सामान बनून पडून राहण्याऐवजी त्या स्वत:च्या घरात स्वत:च्या इच्छेनुसार राहातात.

आर्थिक गुलामगिरी

आर्थिक स्वावलंबन प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे असते. नोकरी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण तरीही आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर असलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. हा लेख मुळात त्या महिलांसाठी आहे ज्या श्रीमंत असूनही आर्थिक गुलामगिरीचे जीवन निवडतात.

बहुतेक महिला आर्थिकदृष्टया वडील, पती किंवा मुलावर अवलंबून असतात आणि तरीही त्यांची विचारसरणीच अशी काही असते की या प्रवलंबित्वाचे त्यांना जराही वाईट वाटत नसते. खरंतर हे गुलामगिरीचेच प्रतीक आहे, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.

गरजा आणि त्रास कधीच सांगून येत नाहीत. प्रत्येक परिस्थितीसाठी पती-पत्नीने सुरुवातीपासूनच योजना आखून महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या भविष्याची तयारी करावी, पतीने आपल्या कुटुंबाला केवळ घरगुती कामासाठीचा माणूस समजू नये. बरेच लोक त्यांची आर्थिक माहिती मित्र, नातेवाईकांना देतात, पण त्यापासून स्वत:च्या कुटुंबाला अनभिज्ञ ठेवतात. दरम्यानच्या काळात वाईट प्रसंग ओढावल्यास पैसे कुठून येणार, हे घरातील महिलांना समजत नाही.

पावला-पावलावर फसवणूक

रामकली घरात ब्लाऊज शिवायच्या. त्या ओळखीतल्या काही शिंपयांना ब्लाऊज शिवून ग्राहकांसाठी देत असत. त्यांची कमाई चांगली होती. त्या स्वत: कमावलेले पैसे टेम्पो चालक असलेले पती रणबीर यांच्या हातात देऊन निश्चिंत व्हायच्या. एके दिवशी रणबीर यांचा टेम्पो चालवताना अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रामकली यांना रुग्णालयाचे बिल कसे आणि कुठून भरायचे, हेच समजत नव्हते.

त्यांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली मात्र काही हजार रुपयांशिवाय काहीही सापडले नाही. रणबीर बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांनी पैसे कुठे ठेवले हे विचारता येत नव्हते. वेळेवर पैसे जमा न झाल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी उशीर झाला. शिलाई मशीन सोडून त्यांनी घरातील जवळपास सर्व वस्तू विकल्या आणि कसेबसे उपचार पूर्ण करून कायमचे अपंगत्व आलेल्या आपल्या पतीला घरी घेऊन आल्या.

नंतर असे समजले की, रणबीर यांनी त्यांची आणि रामकली यांची सर्व कमाई व्याजावर मित्राला दिली होती, ज्याने संपूर्ण रक्कम हडप केली होती. या फसवणुकीनंतर, जेव्हा रामकली यांनी पुन्हा ब्लाऊज शिवणे सुरू केले तेव्हा त्यांनी स्वत:हून आपल्या कमाईचा हिशोब ठेवण्यास सुरुवात केली.

दोष कोणाचा?

बिल गेट्स यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की, जर तुमचा जन्म गरीब कुटुंबात झाला असेल तर तो तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब राहून मेलात तर मात्र तो तुमचाच दोष आहे.

त्याच धर्तीवर एखादी महिला आर्थिकदृष्टया सक्षम असूनही स्वत:चा मूर्खपणा आणि अज्ञानामुळे इतर कोणावर अवलंबून राहून जगत असेल तर ती तिची चूक आहे. अशा अनेक महिला आपल्या आजूबाजूला दिसतील ज्या आर्थिकदृष्टया सक्षम असूनही आपल्या पतीच्या निधनानंतर असहाय्यपणे इतरांवर अवलंबून असतात. सर्व काही असूनही त्यांचे असे परावलंबित्व पाहून दु:ख होते. अनेकदा गृहिणी तर कधी नोकरदार महिलाही पतीच्या सल्ल्याला न जुमानता आर्थिक ज्ञानापासून गाफील राहणे पसंत करतात. हे चुकीचे आहे. अगदी सुरुवातीपासूनच पतीचा सहाय्यक बनून सर्व माहिती ठेवायला हवी. बदलत्या काळानुसार स्वत:ला अपडेट करत राहायला हवे.

सरला माथूर वयाच्या ७२ व्या वर्षीही खूप सक्रिय आहेत. पती माथूर काही वर्षांपूर्वी खूप आजारी पडले तेव्हा सरला यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्यांसह बँक, पोस्ट ऑफिस, पेन्शन, वैद्यकीय विमा अशा सर्व आर्थिक बाबींचा ताबाही स्वत:कडे घेतला. वेगळया राहणाऱ्या मुलांच्या घरी गेल्यावरही त्या त्यांच्यावर अवलंबून राहात नाहीत. घरात सुरुवातीपासूनच पती-पत्नीमध्ये सामंजस्य होते.

हे कटू सत्य आहे की, पती-पत्नीपैकी एकाचे आधी निधन होते. वय कमी असल्यामुळे बहुतेक पत्नी राहाते. अशावेळी एकतर पती निधनाचे दु:ख आणि दुसरे म्हणजे परावलंबित्व, असे दुहेरी संकट कोसळते. त्यामुळेच काळाची गरज ओळखा. एक हुशार महिला बना आणि स्वत:च्या अटींवर जीवन जगण्याची कला अवगत करा. आर्थिक स्वातंत्र्य ही सुखद, आनंदी, जीवनाची गुरुकिल्ली आहे.

स्मार्ट पत्नीसह कसा असावा ताळमेळ

– रितु वर्मा

दीपांशुचे लहानपणापासूनच एक स्वप्न होते की त्याची पत्नी खूपच सुंदर असावी. त्याच्यासाठी इतर सर्व गुण सौंदर्यापुढे गौण होते. ठरलेल्या वेळी दिपांशुने उदयोन्मुख मॉडेल रुचिकाशी लग्न केले. वर्षभर तो सर्वत्र आपल्या स्मार्ट पत्नीचे प्रदर्शन करत राहिला. परंतु गृहस्थीची गाडी केवळ सौंदर्यानेच चालत नाही. रुचिकाच्या सौंदर्यामुळे आणि स्मार्टनेसमुळे दीपांशु आता चिडचिडत आहे. त्याच्या पगाराचा ४० टक्के हिस्सा रुचिकाच्या सजावटीवरच खर्च होत असे. रुचिका घराच्या कोणत्याही कामाला हात लावत नसे त्यामुळे ३० टक्के हिस्सा नोकरांवर खर्च केला जायचा. दिपांशु मोठया कठिणाईने गृहस्थीचा रथ खेचत होता. अधून-मधून रुचिकाला जे मॉडेलिंग असाईनमेंट मिळायचे त्यांचे पैसे ती पार्टीवर खर्च करायची. दीपांशुला स्वप्नातही कल्पना नव्हती की स्मार्ट पत्नी त्याला इतकी महाग पडेल.

दुसरीकडे, जेव्हा साधारण रुपरंगाच्या सिद्धार्थला खूप स्मार्ट आणि सुंदर पत्नी पूजा मिळाली, तेव्हा जणू त्याला खजिनाच गवसल्यासारखे वाटले. सुरुवातीला जेव्हा नातेवाईक त्याचे अभिनंदन करत असत किंवा माकडाबरोबर अप्सरा म्हणून विनोद करत तेव्हा तो हसून हे टाळायचा.पण हळू हळू याच गोष्टींमुळे त्याच्या मनात निकृष्ट भावनेने घर बनवले आणि एक चांगले नाते भरभराटीस येण्यापूर्वीच कोमजले गेले.

कमतरता कुठे आहे

जर आपण दोन्ही उदाहरणे पाहिली तर दोन्ही प्रकरणांमध्ये परस्पर समजुतीचा अभाव ठळकपणे दिसून येईल. काळ बदलला, युग बदलले. लोकांची विचारसरणीही काही प्रमाणात बदलली आहे, परंतु कदाचितच असा विवाहयोग्य मुलगा असेल, जो गुणांच्या सौंदर्याला प्राधान्य देईल. आता जर आपण वर्तमानपत्रांवर आणि वैवाहिक साईट्सवर पोस्ट केलेल्या वैवाहिक जाहिराती पाहिल्या तर आपल्याला कळेल की आता एक विवाहयोग्य कन्या शोधणे अधिक कठीण झाले आहे. पूर्वी जिथे गोरा रंग, उंच शरीरयष्टी, आकर्षक चेहरा-मोहरा आणि घरगुती मुलीची मागणी असायची तेथे आता या गुणांसह स्मार्ट आणि सर्व प्रकारे स्वतंत्र मुलीची मागणी असते.

ही स्मार्टनेस पहिल्यांदा नवरा आणि त्याच्या कुटुंबीयांना खूपच आवडते, परंतु जेव्हा ती स्मार्ट बायको घराच्या प्रत्येक छोटया-मोठया निर्णयामध्ये आपले मत देऊ पाहते किंवा देते तेव्हा तिला फटकळ म्हटले जाते.

ताप्तीसारख्या स्मार्ट व सुंदर मुलीशी लग्न केल्यावर अनुज खूप खुश होता, पण लवकरच त्याला त्याच्या स्मार्ट बायकोचे मूल्यही कळले. स्मार्ट आणि फिट राहण्यासाठी ती आठवडयातून ३ दिवस जिममध्ये जायची. पत्नी व्यायामशाळेत जात असल्यामुळे अनुजला त्याचा सकाळचा नाश्ता आणि इतर कामे ऑफिसला जाण्यापूर्वी स्वत:च करावी लागत. ताप्ती तिच्या पगाराची संपूर्ण रक्कम स्वत:वरच खर्च करायची. अनुजने कधी काही मागितले तर त्याला न जाणे कोण-कोणत्या विशेषणांनी संबोधले जाई. स्मार्ट ताप्ती चुकूनही घरात खोलवर तळलेल पदार्थ बनवत नसे. परिणामी अनुजला ते खाद्यपदार्थ बाहेरून मागवून खावे लागत.

ताप्ती नक्कीच आजच्या युगातील हुशार पत्नी आहे, पण तिच्यात जर थोडीशी लवचिकता असती तर त्यांचे वैवाहिक जीवन थोडे सोपे झाले असते. हुशार बायका जेथे आधी नवऱ्याला त्यांच्या स्मार्टनेसने मोहित करतात, तेथे काही वर्षांनी त्यांच्या आडमुठया स्वभावामुळे आणि स्वत:ला प्रत्येक गोष्टीत पारंगत समजल्यामुळे त्यांना स्वत:च्याच घरात परके असल्यासारखे वाटते आणि मग सुरू होते स्त्रीवाद आणि पुरुषांच्या पारंपारिक विचारसरणी दरम्यान ओढाताण.

काय करावे

अशा परिस्थितीत आपण आपले वैवाहिक संबंध अशा प्रकारे सुरू केले तर पत्नीच्या हुशारपणाचा त्रास होणार नाही :

* आपण आणि आपली पत्नी एकमेकांना पूरक आहात. हे आवश्यक नाही की ती आपली स्मार्टनेस दर्शविण्यासाठी प्रत्येक कार्य करत असेल. आपणास असे वाटत असेल तर थंड आणि मोकळया मनाने आपल्या पत्नीशी चर्चा करा.

* आपल्या स्मार्ट बायकोमुळे आपण निकृष्ट असल्याचे समजणारे मित्र, हे आवश्यक नाही की आपले खरे मित्र नसतील. म्हणून, त्यांच्या सल्याबद्दल हृदयापासून नव्हे तर मनाने विचार करा. आपण आपल्या मित्रांच्या सल्ल्याचे अनुसरण करण्यापूर्वी किंवा त्यांच्या मतावर आधारित आपल्या स्मार्ट पत्नीची प्रतिमा बनवण्यापूर्वी, हे अवश्य लक्षात ठेवा की आपली पत्नीच आपल्या प्रत्येक         सुख-दु:खाची भागीदार आहे. प्रत्येक व्यक्तीचा स्वत:चा स्वभाव असतो. जर आपल्या पत्नीने प्रत्येक कामात पुढाकार घेतला असेल किंवा प्रत्येक कार्य स्वत:च्या मार्गाने करत असेल तर ती अभिमानास्पद बाब असावी.

* जर तुम्हाला स्मार्ट पत्नी हवी असेल तर तुम्हाला थोडी-फार तडजोड करावीच लागेल. जीवनात काहीही विनामूल्य उपलब्ध नाही. स्मार्ट दिसण्यासाठी पत्नीला तिच्या देखरेखीची काळजी घ्यावी लागेल, त्यासाठी तिला जिम आणि पार्लरमध्येही जावे लागेल. या सर्व गोष्टींसाठी आपण किती खर्च करू शकता हे ठरविणे आपल्या दोघांसाठी चांगले होईल आणि आपणदेखील आपल्या स्मार्ट पत्नीसमवेत जिममध्ये सामील होऊ शकता.

द्य ज्याप्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रकारे जर आपली पत्नी हुशार असेल तर आयुष्यातील बऱ्याच चढ-उतारांमध्ये ती आपल्याबरोबर ढाल बनून राहील. जर आपल्या स्मार्ट पत्नीला आयुष्याच्या एखाद्या वळणावर स्वत:हून पुढाकार घ्यायचा असेल तर अजिबात संकोच करू नका तर तिला प्रोत्साहित करा. तुम्हाला कळणारही नाही की आयुष्याचा प्रवास कसा हसत-बोलत व्यतीत होईल.

* जर आपली हुशार पत्नी घरातील कामांसाठी नोकरांवर अवलंबून असेल तर मग ती आपल्या स्मार्टनेसमुळे त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करवून घेईल असे म्हणणेदेखील चुकीचे ठरणार नाही.

* तुमची हुशार पत्नी, कारण प्रत्येक निर्णय स्वत: घेत असते, तेव्हा होऊ शकते की कदाचित काही गोष्टींमध्ये तुम्हा दोघांचा दृष्टीकोन वेगळा असेल. अशा परिस्थितीत डोळे बंद करुन ती तुमची प्रत्येक गोष्ट स्वीकारेल असा अजिबात विचार करू नका. जर तिला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती नक्कीच प्रश्न विचारेल. तिला अन्यथा घेऊ नका.

स्मार्ट बायको थोडी महाग अवश्य आहे पण आजच्या स्पर्धात्मक युगात ती आपली खरी मार्गदर्शक ठरू शकते. फक्त मुद्यांकडे थोडया वेगळया प्रकारे पाहण्याची आवश्यकता आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें