कशी कराल घरबसल्या जास्त कमाई

– पारुल भटनागर   

असे म्हणतात की, प्रत्येक संकट एक नवी संधी घेऊन येते. कोरोना हेही एक मोठे संकट होते. परंतु, हाच कोरोना काळ संकटासोबत बऱ्याच संधी घेऊन आला आहे. विशेष करून अशा प्रकारचे व्यवसाय आणि कामांसाठी ही संधी आहे जे शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत. डिजिटल उत्पादने ही व्हर्चुअल म्हणजे आभासी जगाची गरज आहेत, कारण कोरोना काळात ज्या प्रकारे लोक एकमेकांपासून दूर होऊन घरात बंद झाले, तिथे सॉफ्टवेअर, आयटी, ऑनलाइन डिलिव्हरी, व्हर्चुअल शिक्षण, अॅप्लिकेशन या सर्वांची मागणी वाढली आहे. झुम एका रात्रीत करोडपती अॅप्लिकेशन झाले आहे. इतरही अनेक अॅप्लिकेशन अशीच चांगली स्थिती आहे.

या संकट काळात शिकवणीचा व्यवसायही जोरात सुरू आहे. तसे तर कोरोना काळापूर्वीही तो चांगला सुरू होता, मात्र शाळा, महाविद्यालये बंद झाल्यानंतर हा व्यवसाय अधिक जोमाने सुरू आहे. म्हणूनच जर तुम्ही घरात बसून असाल, तुम्हाला नोकरी नसेल किंवा व्यवसाय ठप्प झाला असेल तर तुम्ही तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा व्यवसायाच्या रूपात वापर करू शकता. ते कसे, हे माहिती करून घेऊया :

घरबसल्या शिका केक बनवायला

घरात कोणाचा वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस किंवा बारसं असो, प्रत्येक शुभ प्रसंगी केक कापला जातो. कोरोना काळाने हा व्यवसाय जोमाने वाढवण्याचे काम केले आहे. बाजारातून केक विकत घेण्याची भीती लोकांना वाटत आहे. त्याऐवजी ते एखाद्या ओळखीच्या माणसाकडून किंवा घरातच केक बनवू लागले आहेत. म्हणूनच जर तुमच्याकडे केक बनवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही हे कौशल्य स्वत:पुरते मर्यादित ठेवू नका. ते इतरांनाही शिकवून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात मेराकी होम बेकरीच्या दीप्ती जांगडा सांगतात की, त्यांना केक बनवायला आवडते आणि लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या या कलेला चांगला वाव मिळाला आहे. त्या साधे तसेच कस्टमाईज्ड डिझाईनचे केक बनवतात. ज्याला जसा केक हवा असतो ती वस्तू किंवा चित्रासारखाच हुबेहूब केक बनवण्याची कला त्यांच्या अंगी आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या कलेला लोकांचे चांगले प्रोत्साहन मिळत आहे. ज्यामुळे त्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे, शिवाय हे त्यांच्या उत्पन्नाचे चांगले माध्यम झाले आहे, जे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम करत आहे.

त्यांनी सांगितले की, साधा केक शिकण्यासाठी रू १,५०० पासून ते रू २,००० पर्यंत तर डिझायनर केक बनवणे शिकवण्यासाठी रू ३,००० पासून ते रू ५,००० पर्यंत खर्च येतो. सांगायचे तात्पर्य असे की, जर तुमच्या अंगी कौशल्य असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण देऊन कमाई करू शकता, शिवाय यातून जो आनंद तुम्हाला मिळेल तो अनमोल असेल. त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्यातील कलागुण ओळखून त्याचा वापर करून घेणे गरजेचे आहे.

नृत्याची शिकवणी

नृत्य ही लोकांची पूर्वापार चालत आलेली आवड आहे, ज्यामुळे आजही त्याला बरीच मागणी असते. लग्न असो किंवा लग्नाची हळद, पार्टी किंवा स्नेहसंमेलन असो, प्रत्येक ठिकाणी नृत्य केले जातेच. नाचता येत नसल्यामुळे हसे होऊ नये म्हणून नृत्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. हौशी लोक नाच शिकण्यासाठी कितीही पैसे मोजायला तयार असतात. जर तुम्हाला एखादे विशिष्ट प्रकारचे नृत्य जसे की, हिपहॉप, बॅले, पारंपरिक नृत्य, शास्त्रीय नृत्य चांगल्या प्रकारे येत असेल तर तुम्ही याचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:मधील कौशल्य वाढवण्यासोबतच या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. कारण तुम्ही घरूनच हे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरू करणार असल्यामुळे त्यासाठी विशेष काहीच गुंतवणूक करावी लागणार नाही.

व्यक्तिमत्त्व विकास

मोठी माणसे असोत किंवा मुले, कोरोनाने सर्वांनाच घरात बसवून ठेवले. त्यामुळे घरातील वातावरण कंटाळवाणे झाले आहे. प्रत्येकाला काहीतरी बदल हवा आहे. अशा वेळी तुमच्यामध्ये जर व्यक्तिमत्त्व विकासाचे  कौशल्य असेल तर हा काळ तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण या मोकळया वेळेचा फायदा घेऊन मुलांना सर्व काही शिकवण्याची इच्छा प्रत्येक पालकाला आहे. ज्यामुळे अभ्यासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास होईल. त्यामुळेच तुम्ही तुमच्यातील कौशल्याच्या बळावर या काळात ऑनलाईन व्यक्तिमत्त्व विकासाचे शिकवणी वर्ग सुरू करा. मुलांसोबत पालकांनाही शिकायची इच्छा असेल तर सवलत मिळेल, अशी ऑफरही तुम्ही देऊ शकता. सध्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिकवणीला बरीच मागणी आहे. तुम्हाला ३-४ लोक मिळाले तरी तुम्ही महिन्याला रू १२,००० ते रू १५,००० पर्यंत कमवू शकता. फक्त तुमच्यातील कौशल्याचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.

कोडिंगची शिकवणी

तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:ची ओळख निर्माण करायची असेल तर कोडिंगशी नाते जोडावेच लागेल, हे मुलांना माहिती आहे. कारण आजच्या युगात तंत्रज्ञानाची मदत घ्यावीच लागते. त्यामुळे आयटी शिक्षकांना चांगली संधी आहे, सोबतच मुलांनाही या माध्यमातून नवीन काहीतरी शिकायला मिळत आहे, जे त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल बनवण्यास मदत करेल. कोडिंग प्रोग्रामिंग ही एक भाषा आहे जिच्या मदतीने तुम्ही अॅप्स, वेबसाईट्स, सॉफ्टवेअर बनवू शकता. कोरोनानंतर कोडिंगची मागणी वाढली आहे. त्यामुळे जर तुम्ही आयटी म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाशी जोडले गेले असाल अणि तुमच्याकडे कोडिंगचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन शिकवणी घेऊन चांगली कमाई करू शकता. यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल, शिवाय तुम्ही चांगले पैसेही कमवू शकाल.

करियरबाबत समुपदेशन

दहावीनंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा किंवा बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडून आपली कारकीर्द किंवा करियर घडवावे, हे न समजल्याने बरीच मुले गोंधळून जातात. प्रत्यक्षात त्यांच्यावर इतर हुशार मुलांचे तसेच पालकांच्या अपेक्षांचेही दडपण असते. त्यामुळेच ते त्यांच्यातील क्षमता ओळखू शकत नाहीत आणि चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे पुढे पश्चातापाची वेळ येते. अशा परिस्थितीत करियरबाबत काऊन्सलिंग म्हणजेच समुपदेशन मुलांसाठी खूपच उपयोगाचे ठरते. त्यांच्याशी बोलून, त्यांची आवड लक्षात घेऊन आणि त्यांना नेमकी अडचण कुठे येते, हे ओळखून त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायला हवे, यासाठीची मदत करिअर काऊन्सलिंगद्वारे केली जाते. यामुळे त्यांना करिअरबाबत निर्णय घेण्यास मदत होते, शिवाय योग्य करिअर निवडल्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त यश मिळवण्याची शक्यता अधिक वाढते.

करियरबाबतच्या समुपदेशनाचे महत्त्व कोरोना काळात अधिक वाढले आहे, कारण या काळात जणू मुलांचे करियर पणाला लागले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मनात करियरबाबत निर्माण झालेला संशय समुपदेशनातूनच दूर केला जाऊ शकतो. यासाठी पैसेही चांगले मिळतात. जसे की, तुम्ही २ तास मुलांचे समुपदेशन केले तर तुम्ही एका मुलाकडून कमीत कमी रू २,००० ते रू ३,००० शुल्क घेऊ शकता. तुमच्यात कौशल्य असेल आणि तुम्ही मुलांसह पालकांना चांगले मार्गदर्शन करू शकत असाल तर तुम्ही ऑनलाईन करिअर क्लासेस सुरू करून चांगली कमाई करू शकता.

फिटनेसबाबत प्रशिक्षण

आजकाल बहुतांश लोक स्वत:च्या आरोग्याबाबत जास्त सजग झाले आहेत. म्हणूनच तर त्यांच्या नेहमीच्या वागण्या-बोलण्यात झुंबा, एरोबिक्स, जिम इत्यादी ऐकायला मिळते. इतकेच नाही तर यासाठी ते दरमहा हजारो रूपये खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत. हे योग्यच आहे, कारण जर तुम्ही निरोगी असाल तरच जीवनाचा खऱ्या अर्थी आनंद घेऊ शकता. परंतु, कोरोनाने फिटनेसला काहीसा ब्रेक लावला आहे. आता लोक जिम व अन्य प्रकारचे व्यायाम करण्यासाठी एखाद्या प्रशिक्षकाकडे जाऊन शिकणे योग्य समजत नाहीत. अशा वेळी त्यांची गरज आणि तुमच्याकडील कौशल्य तुमच्या कमाईचे माध्यम ठरू शकते. तुम्ही झुम, मीटसारख्या अॅपच्या मदतीने त्यांना घरबसल्या फिटनेसचे प्रशिक्षण देऊ शकता. आजच्या काळात तुमच्याकडील हे कौशल्य खूपच उपयोगाचे ठरेल, कारण आता लोक आपल्या आरोग्याशी तडजोड करू इच्छित नाहीत. दिवस, तास किंवा अभ्यासक्रमाच्या आधारे तुम्ही शुल्क आकारून चांगली कमाई करू शकता.

यासंदर्भात एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हेल्थ अँड फिटनेस सल्लागार हरिश कुमार शर्मा यांनी सांगितले की, फिटनेसबाबत प्रशिक्षण देण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर यासाठी व्यक्तीमागे तुम्हाला स्टँडर्ड अभ्यासक्रमासाठी तासाला रू ५०० ते रू ८०० कमावता येतील. अभ्यासक्रमाच्या प्रकारानुसार तुम्ही शुल्क आकारून स्वत:चे उत्पन्न वाढवू शकता.

प्रवेश परीक्षेसाठी प्रशिक्षण

शिकवणीचा बाजार नेहमीच बहरलेला असतो. मात्र आता कोरोनामुळे ऑनलाईन शिकवणीची मागणी अधिक वाढली आहे, कारण अभ्यासात खंड पडावा असे पालकांना आणि मुलांनाही वाटत नाही. अशा परिस्थितीत जॉईंट इंटरन्स एझिम असो किंवा ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनीअरिंग किंवा बँकिंग सेक्टर इत्यादींसाठीची इंटरन्स एझिम असो. त्यात अपयश पदरी पडू नये यासाठी मुले ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन या इंटरन्स एझिमची म्हणजे प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळेच तुम्ही जर यापैकी एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण देऊ शकत असाल आणि जर याचे चांगले ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही ऑनलाईन प्रशिक्षण देऊन घरबसल्या तासिकेच्या हिशोबानुसार चांगली कमाई करू शकता.

व्यावसायिक प्रशिक्षण

कोरोनामुळे तुम्हाला नोकरी गमवावी लागली असेल किंवा नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची तुमची इच्छा असेल, पण कोणता व्यवसाय करावा, ज्यामुळे स्वत:चा चांगला फायदा होईल आणि ग्राहकांशीही ओळख होईल, हेच जर तुम्हाला समजत नसेल तर यासाठी तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागेल. यामुळे व्यवसायाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली लहानात लहान गोष्टही तुम्हाला प्रशिक्षकाकडून शिकून घेता येईल. जर तुम्हाला व्यवसाय आणि बाजाराबाबत चांगले ज्ञान असेल आणि बाजाराची सध्याची मागणी काय आहे किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो कोणता व्यवसाय करायला सक्षम आहे, हे तुम्ही अचूक ओळखू शकत असाल तर तुम्ही व्यवसायाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन स्वत:चे उत्पन्न वाढवण्यासोबतच लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदतही करू शकता.

विषयानुरूप प्रशिक्षण

कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ अर्थात घरी बसून काम करण्याची संस्कृती वाढली आहे. अशा वेळी जर पतीपत्नी दोघेही नोकरदार असतील तर ते मुलांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नाहीत. शाळेचे ऑनलाईन वर्गही नावापुरतेच आहेत. त्यामुळेच मुलांना अतिरिक्त शिकवणीची गरज भासू लागली आहे. तुम्ही जर एखाद्या विषयाचे तज्ज्ञ असाल तर त्या विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊ शकता. या माध्यमातून कमी वेळेत तुम्ही जास्त पैसे कमवू शकता. तुम्ही एखाद्या मुलाला किंवा दोन अथवा त्याहून अधिक मुलांनाही एकत्र ऑनलाईन शिकवू शकता.

रहा नेहमीच युवायुवा

* गरिमा पंकज

तुम्ही तुमचे वय वाढणे तर थांबवू शकत नाही, मात्र वाढणाऱ्या वयाच्या प्रभावाला तर जरूर कमी करू शकता. सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सीनियर डायटिशिअन निधी धवन यांच्या मते आपण काय खातो आणि कसे खातो याच्याशी आपले आरोग्य आणि सक्रियता यांचा थेट संबंध असतो.

काय खाल

* अँटीऑक्सिडंट्स पदार्थ जसे सुका मेवा, अख्खे धान्य, चिकन, अंडी, भाज्या आणि फळे खा. अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि वृद्धत्वाची   लक्षणे कमी करतात. हे इम्यून सिस्टीम मजबूत करून इन्फेक्शन पासूनही   वाचवतात.

* दिवसातून कमीतकमी एक कप ग्रीन टी प्यायल्याने वाढत्या वयासोबत स्मरणशक्ती चांगली राहते.

* ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट्सयक्त भरपूर पदार्थ जसे मासे, सुके मेवे, ऑलिव्ह ऑइल वापरा. ओमेगा ३ तुम्हाला तरुण आणि सुंदर    राखते.

* व्हिटॅमिन सी शरीरासाठी नॅचरल बोटॉक्स समान काम करते. यामुळे स्किन टिशूज हेल्दी राहतात आणि त्यावर सुरकुत्या पडत नाहीत. यासाठी संत्री, मोसंबी, पानकोबी इ. खा.

* जर काही गोड खावेसे वाटले तर डार्क चॉकलेट खा. यात भरपूर फ्लॅवेनॉल असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते.

* दुपारच्या जेवणासोबत एक वाटी दही जरूर घ्या. यात कॅल्शियम असते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या आजाराचा प्रतिबंध करता येतो.

* तरुण आणि सक्रिय दिसू इच्छिता तर ओव्हर इटिंग टाळा. तुम्हाला जितकी भूक आहे त्याच्या ८० टक्केच खा.

काय खाऊ नका

* असे पदार्थ ज्यांच्यामुळे रक्तातील साखर वाढते जसे गोड फळे, ज्यूस, साखर कमी खा.

* सोयाबीन, कॉर्न, कॅनोला ऑइल टाळा, कारण यांत पॉलीसॅच्युरेटेड मेद जास्त प्रमाणात असते. ऑलिव्ह ऑइल वापरा.

* रेड मीट, पनीर, फुल फॅट दूध, आणि क्रीम यांत अत्यधिक मात्रेत सॅच्युरेटेड फॅट असते. यामुळे हृदयाच्या धमन्या ब्लॉक होऊ शकतात.

* सफेद ब्रेड, पास्ता, पिझ्झा इ. कमी खावे.

डॉ. निधी म्हणतात, ‘‘लठ्ठपणा आणि कॅलरी इनटेक यांच्यात थेट संबंध आहे. लठ्ठपणा वाढल्याने न केवळ आरोग्य बिघडते तर शारीरिक सक्रियतासुद्धा कमी होते.’’

जीवनशैलीतील बदल

जेपी हॉस्पिटल, नोएडा येथील डॉ. करुणा चतुर्वेदी यांच्या मते आपल्या दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये छोटे छोटे बदल केल्यास आपण दीर्घ काळापर्यंत तरुण आणि सक्रिय राहू शकतो :

* आपले मन नेहमी व्यस्त ठेवा. काहीतरी नवीन शिकत रहा म्हणजे आपला मेंदू सक्रिय राहील.

* आपल्या हार्मोन्सच्या स्तरावर नियंत्रण ठेवा जेणेकरून तुम्ही एजिंगच्या लक्षणांपासून दूर रहाल.

* कमीतकमी ६-७ तास जरूर झोपा. जेव्हा तुम्ही झोप घेत असता तेव्हा त्वचेच्या कोशिका आपली झिज भरून काढत असतात. यामुळे त्वचेच्या सुरकुत्या आणि फाइन लाइन्स दूर होतात.

* तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहता हेही महत्त्वाचे असते. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पहा. स्वत:ला खुश आणि मोटिव्हेटेड ठेवा.

त्वचेला तरुण आणि सुरक्षित ठेवा

* उन्हात गेल्याने त्वचा काळवंडते आणि काळया झालेल्या भागावर सुरकुत्या लवकर पडतात. म्हणून बाहेर जाण्याआधी सनस्क्रीन अवश्य लावा.

* त्वचेला स्वस्थ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार नॉन टॉक्सिक मॉइश्चरायझर निवडा. झोपण्याआधी तो जरूर लावा.

फेशिअल एक्सरसाइ

चेहऱ्याच्या पेशींना दिलेल्या मसाजमुळे चेहऱ्याचे सुरकुत्यांपासून रक्षण होते. आपल्या कपाळावरील सुरकुत्या रोखण्यासाठी आपले दोन्ही हात कपाळावर ठेवा आणि बोटांना हेअरलाइन आणि भुवयांच्यामध्ये पसरवून हळूहळू हलकासा दाब देत बोटे बाहेरच्या दिशेने सरकवा.

काही फेशिअल एक्सरसाइ

चीकू लिफ्ट : आपले ओठ हलकेसे बंद करा आणि गालांना डोळयांनी बंद करा आणि गालांना डोळयांच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा. रुंद अशा स्मितासह आपल्या ओठांचे बाहेरील कोन उचला. काही वेळ याच मुद्रेत रहा. स्मित करणे हा गालांसाठी चांगला व्यायाम आहे.

फिश फेस : हा गालांसाठी आणि जबडयासाठी उत्तम व्यायाम आहे. यामुळे तुमचे ओठ योग्य शेपमध्ये येतात. हलकेसे ओठ बंद करा. गाल जितके शक्य होतील तितके आत खेचण्याचा प्रयत्न करा. याच मुद्रेत हसण्याचा प्रयत्न करा आणि १५ सेकंद याच अवस्थेत रहा. असे ५ वेळा करा.

पपेट फेस : हा व्यायाम पूर्ण चेहऱ्यासाठी आहे. यामुळे गालांच्या पेशी मजबूत होऊन त्या सैल पडत नाहीत. आपल्या बोटांची पेरे गालांवर ठेवा आणि स्मित करा. गाल वरच्या दिशेने खेचा आणि स्मित मुद्रेत काही वेळ रहा.

मातृत्व किंवा करिअर

* पारुल भटनागर

शुभ्राला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला कारण की ती गर्भवती होती आणि डॉक्टरांनीही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. असं असलं तरी, काही कंपन्यांना गर्भवती महिलांना नोकरीवर ठेवण्यास आवडत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, यापुढे त्या नोकरीकडे पूर्ण लक्ष देण्यास सक्षम राहणार नाहीत, तथापि त्यांना आपल्या घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे माहित असते. तरीही त्यांचे कौटुंबिक नियोजन हे त्यांच्या कारकीर्दीत अडथळा ठरते. हीच भीती त्यांना कुटुंब नियोजनाबद्दल विचार करू देत नाही.

सर्वेक्षण काय म्हणते

लंडन बिझिनेस स्कूलने केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार, ७० टक्के महिला आपल्या करिअरच्या ब्रेकमुळे काळजीत आहेत. त्यांच्यासाठी करिअर ब्रेक घेणे म्हणजे सहसा प्रसूती रजेसाठी वेळ काढून घेणे किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून मागे हटणे आहे.

गेल्या वर्षी लेबर पार्टीच्या संशोधनानुसार, ५० हजाराहून अधिक महिलांना प्रसूती रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

कंपन्या मोठया प्रतिभा गमावतात

आज केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात झेंडा फडकवित आहेत. तिने आपल्या प्रतिभेने हे सिद्ध केले आहे की ती एकटयाने सर्व काही करू शकते. त्यांनी आपली घरापर्यंत मर्यादीत असलेली प्रतिमा बदलली आहे. चला, अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे :

इंदिरा नुई, पेप्सीको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने भारतातील सर्वोत्कृष्ट बँक रिटेल पुरस्कार जिंकला आहे. तसे आजकाल चंदा कोचर अनेक घोटाळयांमध्ये आरोपी आहे.

मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहिल्या आहेत, त्यासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा परिस्थितीत जर आपण स्त्रियांना कमी लेखले असते तर त्या देशात नाव कसे कमवू शकल्या असत्या?

महिलांची विचारसरणी बदलली आहे

पूर्वी, जेथे महिला घराच्या चार भिंतींपर्यंतच मर्यादीत राहत असत आणि घरा-घरातील पुरुषच कुटुंबासाठी जबाबदार असत, परंतु आता वेळ आणि परिस्थिती बदलल्यामुळे महिलांनीही घराच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरवात केली आहे. आता त्याही कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून चालण्यास सुरवात केली आहे, आता त्यांचे लक्ष करियर बनवण्याकडे जास्त आहे.

कुटुंब नियोजनात विलंब

आजच्या महिलेस आपली उच्च पात्रता घरापर्यंतच मर्यादित ठेवणे मुळीच मान्य नाही. तिला पात्र झाल्यावरच लग्न करणे आवडते. कोणत्याही गोष्टीसाठी कोणासमोर गरजू बनणे तिला आवडत नाही. ती तिचा विचार करते आणि आपल्या योग्य जोडीदार शोधते तेव्हाच ती लग्न करते जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आडवी येऊ नये.

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कुटुंब नियोजनाबद्दल विचार करण्याविषयी दबाव वाढू लागतो. पण आजची पिढी यास उशीर करण्यातच समजदारी मानते, विशेषत: कार्यरत महिला. कौटुंबिक नियोजनामुळे त्या नोकरी गमवू इच्छित नाहीत. या भीतीने, त्या यास उशीर करतात.

जास्त पैसे कमविण्याची इच्छा देखील योग्य नाही

दिल्लीच्या केशव पुरम भागात राहणारी प्रीती आयटी क्षेत्रात काम करते. तिचा नवरादेखील याच व्यवसायात आहे. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. आता जेव्हा त्यांना वाटले की त्यांची लाईफ सेटल झाली आहे, तेव्हा त्यांनी मुलं जन्मास घालण्याबद्दल विचार केला. पण त्यांना यश मिळालं नाही. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना हे समजले की वय जास्त झाल्याने आणि इतर कारणांमुळे त्यांना आई होण्यास समस्या येत आहे. आता केव्हा ती आई बनू शकेल, याचा विचार करून-करून तिचे आयुष्य तणावग्रस्त झाले आहे.

वर्क ऐट होमचा पर्यायदेखील

जर आपल्याला असे वाटत असेल की नोकरी म्हणजे फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करणे असते, तर असे नाही आहे. आपण घरी काम करूनदेखील जॉब सुरू ठेवू शकता.

आज इंटरनेटच्या जगात नोकऱ्यांची कमतरता नाही. फक्त मनात काहीतरी करण्याची उत्कटता होणे आणि आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आपल्या कारकीर्दीला ब्रेक लागण्यापासून थांबवू शकता आणि याचा कौटुंबिक नियोजनावरही परिणाम होणार नाही. घरातून स्वतंत्रपणे काम करू शकता, टिफिन सिस्टम, शिकवणी घेणे, भाषांतर कार्य, ब्लॉगिंग इ.

तर आता असे समजू नका की लग्न केल्याने आणि मूल जन्मास घातल्याने तुमच्या कारकीर्दिला ब्रेक लागेल.

योग्य ब्रा कशी निवडावी

* गरिमा द्य

सर्वोत्तम फॅशन लुक मिळविणे ही प्रत्येक मुलीची आणि स्त्रीची इच्छा असते. आपले फॅशन कोशंट वाढवण्यासाठी योग्य ब्राची भूमिका महत्वाची असते. चला, याविषयी जिवामेच्या किरुबा देवीकडून तपशीलवार जाणून घेऊया :

आर्नेट ग्लिट् ब्रा : ही एक अतिशय सुंदर, भव्य, हाइ ग्लॅम ब्रा आहे, जिला खूपच लहान आणि सुंदर स्पार्कल्सने सजवले जाते. ही ब्रा कोणत्याही लेहंगा किंवा साडीसह उत्तम प्रकारे शोभते. रिच वाइन आणि बेज कलरच्या या संग्रहात ब्लाउज ब्रादेखील असते, जी स्टाईलिश होण्याबरोबरच उत्तम फिटिंगचीदेखील असते.

स्वीट कॅरोलिन ब्रा : फ्लोरल प्रिंट्सने सजविलेले टी-शर्ट ब्रॅलेट दिवसा आउटिंगदरम्यान परिधान करण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपल्याला हाय ग्लॅम लुकमधून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर या फुलांच्या ब्रॅलेटवर कोणतेही श्रग, हाय-वेस्ट पॅन्ट आणि स्नीकर्स घाला आणि आपल्या मित्रांसह एखाद्या कॉफी शॉपमध्ये चिल टाइमसाठी सज्ज व्हा. एवढेच नाही तर आपण या डे लुकला नाइट लुकमध्येदेखील सहज बदलू शकता. जीन्सच्या जागी कोणत्याही फुलांचा स्कर्ट घाला.

विंटेज लेस ब्रा : जुन्या बॉलिवूड अभिनेत्रींनी क्लासिक साडयांसह कोणतेही मेकअप न करता अद्वितीय परफॉरमन्सने विंटेज युग संस्मरणीय बनवले आहे, म्हणून विंटेज लेस ब्रा घालून आपणदेखील तेच सौंदर्य, तसाच प्रणय आपल्या फॅशनद्वारे दर्शवू शकता. या छानदार ब्रासह पफ्ड स्लीव्ह ब्लाउज आणि आपल्या आजीची सर्वात आवडती साडी घाला.

ट्रिव्लाईट ब्लूम ब्रा : जर आपण जुन्या स्टाईलच्या ब्लाउजने कंटाळले असाल तर या ब्रासह उत्तम प्रकारे फिट होणारी पांढरी क्रॉप टॉप घाला. त्याबरोबर फ्लेर्ड पॅन्ट्स, चंकी चांदीचे दागिने आणि मस्त फ्लॅटसह आत्मविश्वासाने बाहेर पडा. दुपारच्या वेळी एखाद्या उत्सवात जाऊ इच्छित असल्यास किंवा मंडपातील मित्रांसह वेळ घालवायचा असेल तर हा लुक सर्वोत्कृष्ट आहे.

हे देखील जाणून घ्या

चांगल्या आरोग्यासाठी आणि आकर्षक देखाव्यासाठी योग्य आकाराची आणि शेपची ब्रा निवडणे आवश्यक असते. इतकेच नाही तर ब्राची काळजी कशी घ्यावी, आपल्या शरीराच्या आकार-प्रकार आणि आवश्यकतेनुसार कोणती ब्रा निवडावी.

चला, अशी माहिती जाणून घ्या, जी आपल्याला आपले मित्र, तज्ज्ञ आणि इंटरनेटकडून वारंवार मिळते ती किती खरी आणि किती खोटी असते :

दररोज ब्रा धुणे आवश्यक नाही : हे मुळीच खरे नाही. कोणी असे तुमच्या दुसऱ्या अंतर्वस्त्रांसाठी सांगितले आहे का? शेवटी सर्व अंतर्वस्त्र त्वचेच्या अगदी वर घातले जातात. अशा परिस्थितीत जर हे कपडे योग्य प्रकारे स्वच्छ केले गेले नाहीत तर ते केवळ थोडया काळासाठीच टिकत नाहीत तर त्यांची लवचिकता देखील कमी होते.

पांढऱ्या कपडयांखाली पांढरी ब्रा : वास्तविक पांढऱ्या कपडयांखाली रंगीत ब्रापेक्षा पांढरी ब्रा अधिक सहज दिसते. म्हणून आपण केवळ फिकट गुलाबी, न्यूड आणि तपकिरी रंगाची ब्रा घालणेच चांगले आहे.

अंडर वायर ब्रा घालण्यामुळे कर्करोग होतो : या गोष्टीचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. स्तनाचा कर्करोग होण्यामागे ब्राचा वापर हे कारण असू शकत नाही, मग भले ती गडद रंगाची असो किंवा अंडरवायर्ड. म्हणून ही गोष्ट त्वरित आपल्या मनातून काढून टाका. होय, हे सांगणे योग्य आहे की योग्य मापाची ब्रा घालणे महत्वाचे आहे जेणेकरून ही वायर स्तनाच्या ऊतकात घुसल्याने आपणास समस्या उद्भवणार नाही.

आकार : हे लक्षात ठेवा की वेगवेगळया ब्रँडचे आपले वेगवेगळया आकाराचे चार्ट असतात. हे साईज मॉडलच्या शारीरिक आकार-प्रकारानुसार ठरविले जातात आणि प्रत्येक ब्रँडचे स्वत:चे वेगळे फिट मॉडेल असते. म्हणून एखाद्या नवीन ब्रँडची ब्रा खरेदी करण्यापूर्वी आपली साईज अवश्य मोजून घ्या.

ब्राचा वापर : शारीरिक क्रियाकलापांदरम्यान ब्रेस्टला अधिक चांगला सपोर्ट देण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरली जाते. ही सामान्य ब्रापेक्षा किंचित वेगळी असते. प्रत्येक महिलेने धावताना किंवा व्यायाम करताना योग्य स्पोर्ट्स ब्रा घातली पाहिजे.

योग्य ब्रा कशी निवडावी

* गरिमा द्य

सर्वोत्तम फॅशन लुक मिळविणे ही प्रत्येक मुलीची आणि स्त्रीची इच्छा असते. आपले फॅशन कोशंट वाढवण्यासाठी योग्य ब्राची भूमिका महत्वाची असते. चला, याविषयी जिवामेच्या किरुबा देवीकडून तपशीलवार जाणून घेऊया :

आर्नेट ग्लिट् ब्रा : ही एक अतिशय सुंदर, भव्य, हाइ ग्लॅम ब्रा आहे, जिला खूपच लहान आणि सुंदर स्पार्कल्सने सजवले जाते. ही ब्रा कोणत्याही लेहंगा किंवा साडीसह उत्तम प्रकारे शोभते. रिच वाइन आणि बेज कलरच्या या संग्रहात ब्लाउज ब्रादेखील असते, जी स्टाईलिश होण्याबरोबरच उत्तम फिटिंगचीदेखील असते.

स्वीट कॅरोलिन ब्रा : फ्लोरल प्रिंट्सने सजविलेले टी-शर्ट ब्रॅलेट दिवसा आउटिंगदरम्यान परिधान करण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपल्याला हाय ग्लॅम लुकमधून थोडा ब्रेक घ्यायचा असेल तर या फुलांच्या ब्रॅलेटवर कोणतेही श्रग, हाय-वेस्ट पॅन्ट आणि स्नीकर्स घाला आणि आपल्या मित्रांसह एखाद्या कॉफी शॉपमध्ये चिल टाइमसाठी सज्ज व्हा. एवढेच नाही तर आपण या डे लुकला नाइट लुकमध्येदेखील सहज बदलू शकता. जीन्सच्या जागी कोणत्याही फुलांचा स्कर्ट घाला.

विंटेज लेस ब्रा : जुन्या बॉलिवूड अभिनेत्रींनी क्लासिक साडयांसह कोणतेही मेकअप न करता अद्वितीय परफॉरमन्सने विंटेज युग संस्मरणीय बनवले आहे, म्हणून विंटेज लेस ब्रा घालून आपणदेखील तेच सौंदर्य, तसाच प्रणय आपल्या फॅशनद्वारे दर्शवू शकता. या छानदार ब्रासह पफ्ड स्लीव्ह ब्लाउज आणि आपल्या आजीची सर्वात आवडती साडी घाला.

ट्रिव्लाईट ब्लूम ब्रा : जर आपण जुन्या स्टाईलच्या ब्लाउजने कंटाळले असाल तर या ब्रासह उत्तम प्रकारे फिट होणारी पांढरी क्रॉप टॉप घाला. त्याबरोबर फ्लेर्ड पॅन्ट्स, चंकी चांदीचे दागिने आणि मस्त फ्लॅटसह आत्मविश्वासाने बाहेर पडा. दुपारच्या वेळी एखाद्या उत्सवात जाऊ इच्छित असल्यास किंवा मंडपातील मित्रांसह वेळ घालवायचा असेल तर हा लुक सर्वोत्कृष्ट आहे.

हे देखील जाणून घ्या

चांगल्या आरोग्यासाठी आणि आकर्षक देखाव्यासाठी योग्य आकाराची आणि शेपची ब्रा निवडणे आवश्यक असते. इतकेच नाही तर ब्राची काळजी कशी घ्यावी, आपल्या शरीराच्या आकार-प्रकार आणि आवश्यकतेनुसार कोणती ब्रा निवडावी.

चला, अशी माहिती जाणून घ्या, जी आपल्याला आपले मित्र, तज्ज्ञ आणि इंटरनेटकडून वारंवार मिळते ती किती खरी आणि किती खोटी असते :

दररोज ब्रा धुणे आवश्यक नाही : हे मुळीच खरे नाही. कोणी असे तुमच्या दुसऱ्या अंतर्वस्त्रांसाठी सांगितले आहे का? शेवटी सर्व अंतर्वस्त्र त्वचेच्या अगदी वर घातले जातात. अशा परिस्थितीत जर हे कपडे योग्य प्रकारे स्वच्छ केले गेले नाहीत तर ते केवळ थोडया काळासाठीच टिकत नाहीत तर त्यांची लवचिकता देखील कमी होते.

पांढऱ्या कपडयांखाली पांढरी ब्रा : वास्तविक पांढऱ्या कपडयांखाली रंगीत ब्रापेक्षा पांढरी ब्रा अधिक सहज दिसते. म्हणून आपण केवळ फिकट गुलाबी, न्यूड आणि तपकिरी रंगाची ब्रा घालणेच चांगले आहे.

अंडर वायर ब्रा घालण्यामुळे कर्करोग होतो : या गोष्टीचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. स्तनाचा कर्करोग होण्यामागे ब्राचा वापर हे कारण असू शकत नाही, मग भले ती गडद रंगाची असो किंवा अंडरवायर्ड. म्हणून ही गोष्ट त्वरित आपल्या मनातून काढून टाका. होय, हे सांगणे योग्य आहे की योग्य मापाची ब्रा घालणे महत्वाचे आहे जेणेकरून ही वायर स्तनाच्या ऊतकात घुसल्याने आपणास समस्या उद्भवणार नाही.

आकार : हे लक्षात ठेवा की वेगवेगळया ब्रँडचे आपले वेगवेगळया आकाराचे चार्ट असतात. हे साईज मॉडलच्या शारीरिक आकार-प्रकारानुसार ठरविले जातात आणि प्रत्येक ब्रँडचे स्वत:चे वेगळे फिट मॉडेल असते. म्हणून एखाद्या नवीन ब्रँडची ब्रा खरेदी करण्यापूर्वी आपली साईज अवश्य मोजून घ्या.

ब्राचा वापर : शारीरिक क्रियाकलापांदरम्यान ब्रेस्टला अधिक चांगला सपोर्ट देण्यासाठी स्पोर्ट्स ब्रा वापरली जाते. ही सामान्य ब्रापेक्षा किंचित वेगळी असते. प्रत्येक महिलेने धावताना किंवा व्यायाम करताना योग्य स्पोर्ट्स ब्रा घातली पाहिजे.

विणकामभरतकाम कौशल्याने करा व्यवसाय

* गरिमा पंकज

कोरोनामुळे आगामी काळात सोशल डिस्टंसिंग कायम राहणार आहे. याच कारणामुळे वर्क फ्रॉम होम आणि घरगुती व्यवसायात वेगाने वाढ होतेय. यामध्ये कसलाच संशय नाहीए की घरच्या घरी सामान बनवणं आणि ते विकून पैसे कमावणं एक खूपच चांगली बाब आहे. घरबसल्या तुम्ही तुमचा छंद, कला वा तुमच्या आवडीलादेखील व्यवसायात बदलू शकता. विणकामभरतकाम या अशा कला आहेत, ज्यामुळे घरबसल्या मिळकतीचा उत्तम मार्ग होऊ शकतो.

हातात कला असेल तर

याकाळात तसंही लोकांचे व्यवसाय बंद होत आहेत. अशावेळी विणकाम, शिवणकाम आणि भरतकाम काही असे व्यवसाय आहेत, जे तुम्ही आतादेखील सुरु करू शकता. यासाठी अधिक पैशाचीदेखील गरज नाहीए. तुमच्याजवळ जर कला असेल तर तर तुम्ही थोडा पैसा लावूनदेखील सहजपणे हा व्यवसाय सुरु करून पुढे जाऊ शकता. तुम्ही छोटया गावात असा वा मोठया शहरात तुमच्या हातात कला असेल तर हा व्यवसाय वाढण्यास कोणीच रोखू शकत नाही.

तुम्ही घरबसल्या मुलं आणि मोठयांसाठी कपडे शिवू शकता. विविध डिझाईनचे सुंदर स्वेटर बनवू शकता. तसंही कोरोना काळात बाहेरून जेवढया कमी वस्तू खरेदी कराल तेवढं योग्यच आहे. तुम्ही घरी विणलेले स्वेटर मुलांनी घातले तर तुम्हाला त्यांनी योग्य पेहराव घातल्याचं समाधान तरी मिळेल. हाताने बनविलेले असल्यामुळे यामध्ये वेगळंच आकर्षण असेल.

मुलांच्या कपडयांना कायमच खूप मागणी असते. तुम्ही सहजपणे घरच्या घरी मुलांचे सुंदर पेहराव बनवू शकता. अलीकडे अशा प्रकारची कामे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पुढे वाढू शकतात. पोस्ट कोरोना काळात अशाप्रकारे घरातूनच तुम्ही तुमचा छान बिझनेस चालवू शकता.

व्यायामदेखील आहे

अशा प्रकारे विविध कपडे जसं की टेबलक्लॉथ, बेडशीट, ड्रेसेस इत्यादीवर कशिदा काढून तुम्ही त्यांना छान लुक देऊ शकता. तुम्ही घरच्या घरी स्वत:चा भरतकामाचा व्यवसाय सुरु करू शकता. विणकामभरतकामाची कला तुम्हाला विविध प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांपासूनदेखील वाचविते. विणकामभरतकाम केल्यामुळे बोटे व हात सक्रिय राहतात आणि सांध्याचे आजार होत नाहीत. विणकामभरतकाम केल्यामुळे मनदेखील सक्रिय राहतं, कारण यामुळे दोन्ही हातांबरोबरच डोकंदेखील एकत्रित काम करतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते.

महत्वाचं म्हणजे कला कोणतीही असो ती तुम्हाला रिलॅक्स ठेवते. कोरोना काळ खूपच समस्यानीं भरलेला आहे आणि अशा वेळी विणकामभरतकामसारखी कामं अर्थाजनाबरोबरच तुमचा तणाव कमी करण्यातदेखील मदतनीस ठरू शकतो.

पैशांचं व्यवस्थापन आयुष्याच्या आनंदाची चावी

* धीरज कुमार

आभाचे पती आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. तिच्या पतींचा कार अपघात झाला. अचानकपणे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये सर्वात अगोदर पैशाची गरज लागली. तिने पैसे तसे कधी स्वत:जवळ ठेवलेच नव्हते. सर्व गरजेचं सामान पतीच आणत असत. पैसा पतीच्या बँक खात्यामध्ये होते. तेच सर्व व्यवहार करत होते. परंतु त्यांच्या ऑपरेशनसाठी गरज लागली तेव्हा स्वत: जवळ पैसे असूनदेखील अनेक नातेवाईकांच्या पुढे हात पसरावे लागले.

आभा स्वत:च्या पतीवर एवढी अवलंबून असायची की पतीचा एटीएम कार्डचा पिन क्रमांकदेखील तिला माहीत नव्हता. त्या दिवसात जेव्हा पैशाची खरोखरंच गरज होती,  तेव्हा फोन करून नातेवाईकांना विनंती करून हात पसरावे लागले होते. कसबसं करून पैशांची व्यवस्था झाली आणि त्यानंतर पतींचे ऑपरेशन झालं.

मेहुल सरकारी कंपनीत कंम्प्यूटर इंजिनियर (आऊटसोर्सिंग) या पदावर कार्यरत होते. जवळजवळ ८ वर्षे नोकरी करत होता. अचानक तपासणी केल्यानंतर समजलं की पत्नीला कॅन्सर झाला आहे. घाईगडबडीत पत्नीला इस्पितळात दाखल करावं लागलं. नोकरीच्या दरम्यान कधी बचतीबद्दल विचारच केला नव्हता. जेव्हादेखील पगार मिळत असे पत्नी,  मुलं,  भाऊ,  भाचे आणि आपल्या आई-वडिलांवर मोकळया हाताने पैसे उधळले होते. तसं त्यांचं आयुष्य खूपच समाधानी होतं. जेव्हा पत्नीला कॅन्सरच्या आजाराबद्दल समजलं,  तेव्हा पैसे जुळविण्यात हातपाय कापू लागले. अनेक मित्रांकडून उधार घ्यावे लागले,  काही मित्रांनी उधार देण्यास नकार दिला. जवळच्या नातेवाईकांकडून उधार पैसे घेऊन उपचार करण्यात आले. परंतु पैसे काही वेळेवर जुळवता न आल्यामुळे पत्नीला चांगल्या इस्पितळात उपचार करू शकले नाही. शेवटी तो काही त्यांच्या पत्नीला वाचवू शकला नाही.

मेहुलला या गोष्टीची कायमच रुखरुख लागून राहिली की त्याने मिळालेल्या पगारातून कधी बचतीचा विचारच केला नव्हता. तो व्यवस्थित बचत करू शकला असता. त्याच्याजवळ स्वत:च्या बचतीचे पैसे असते तर पत्नीला चांगल्या इस्पितळात आणि योग्यवेळी उपचार करू शकला असता.

मेहुलला महिन्याला पगारा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नव्हती. अगदी त्याचा पीएफदेखील कापला जात नव्हता. त्यामुळे कर्जदेखील मिळू शकत नव्हतं, कारण कंपनी महिन्याच्या पगाराव्यतिरिक्त कोणतीही इतर सुविधा देत नव्हती. तो भविष्याच्या चिंतापासून दूर राहिला आणि कधी कल्पनादेखील केली नव्हती की भविष्यात अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. आजदेखील अशा प्रकारची अनेक जोडपी आहेत, जी आपल्या नकारात्मक स्थितीकडे कानडोळा करून मनी मॅनेजमेंट म्हणजेच पैशाचं व्यवस्थापन करत नाही आहेत. ते कधी विपरीत परिस्थितीबद्दल विचारच करत नाहीत. ते विचारच करत नाहीत की आयुष्यात एकसारखं कधीच काही चालत नाही. आयुष्यात कधीही उतार-चढाव येऊ शकतात. अशा या काळासाठी तयार राहायला हवं. आपण आयुष्य तर बदलू शकत नाही परंतु सावधानता नक्कीच बाळगू शकतो. पैशाची भविष्यासाठी योग्य व्यवस्था तसेच त्यांच अगोदरच प्लॅनिंग करून जीवन सरळ बनवू शकतो.

आपल्या पार्टनरला आर्थिक माहिती नक्की द्या

पती असो वा पत्नी जर तुम्ही नोकरी करत असाल तर आपल्या साथीदाराला घरची आर्थिक माहिती नक्की द्या. काही चेक एकमेकांसाठी सहीदेखील करून ठेवायला हवे. एकमेकांच्या एटीएमच्या पिन इत्यादीची माहिती पती-पत्नीना नक्कीच असायला हवी. फक्त पतीपत्नीच नाही तर आपल्या मोठया होणाऱ्या मुलांनादेखील याची माहिती द्यायला हवी,  म्हणजे कोणत्याही संकटाच्या दिवसात मुलं येतील त्या संकटाचा सामना सहजपणे करू शकतील. अशा प्रकारे परिवारातील सर्व सदस्यांनी तयार राहायला हवं. शक्य असल्यास पतीपत्नी व मुलांचे जॉइंट अकाउंटदेखील उघडायला हवं,  म्हणजे गरज लागल्यास कोणीही पैसे काढू शकतात.

बचतीची सवय ठेवा

तुम्ही भलेही कितीही कमावत असाल व खर्च करत असाल, तर तेदेखील कमी पडू शकतं. परंतु जर तुम्हाला बचत करायची असेल तर थोडयाशा कमाईतदेखील बचत करता येऊ शकते. थोडे थोडे पैसे साठवून भविष्यासाठी जमा करता येतात. माणसाला आपल्या भविष्याबद्दल काहीच माहिती नसतं, की ते पुढे काय होईल. संकटं काही सांगून येत नाही ती अचानकपणे येतात. म्हणून जसं तुमचं इन्कम आहे तशीच बचत असायला हवी. बचत भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी,  घर बनविण्यासाठी, भविष्यात मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी,  मुलांचं लग्न करण्यासाठी अगोदरपासूनच विचारपूर्वक करायला हवी. या व्यतिरिक्त काही पैसे आकस्मिक खर्चासाठीदेखील ठेवायला हवेत. बचतीची अजूनदेखील अनेक कारणं असू शकतात.

जीवन विमा आवश्यकता

तुम्ही नोकरदार आहात, गृहिणी आहात, शिक्षक आहात वा तुम्ही एखाद्या पदावर कार्यरत असाल तेव्हा तुमचा जीवन विमा नक्कीच काढा. जीवन विमा आयुष्याच्यासोबत आणि आयुष्याच्यानंतरदेखील तुमच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा देतं. जर तुमच्या दरवाजावर विमा विकणारी व्यक्ती आली तर त्यांना फालतू समजून टाळू नका, उलट त्यांच्याजवळ तुमच्या ऐपतीनुसार विमा घेण्याबद्दल बोलणं करा. विमा हा तुम्ही नसताना तुमच्या आश्रित कुटुंबाला सुरक्षा प्रदान करतं. एवढंच नाही तर  आता अनेक प्रकारचे विमादेखील उपलब्ध आहेत. जसं घर, गाडी, आरोग्य इत्यादींसाठी तुमच्या गरज आणि सुविधेनुसार नक्कीच घ्यायला हवं.

तुमच्या गरजा थोडया कमी ठेवा

घरातील जेष्ठ जेव्हा सांगतात की मोकळया हाताने पैसे खर्च करु नका. भविष्यासाठी थोडी बचत करत जा. आताच्या तरुणांना हे आवडत नाही. परंतु त्यांचं असं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे. भविष्यासाठी पैसे साठवणं खूपच गरजेचे आहे. तुम्ही व्यापारी असा वा नोकरदार व्यक्ती, तुमचा व्यापार वा तुमची नोकरी ज्या दिवशी सुरू होते त्याच दिवसापासून बचतीचादेखील विचार करायला हवा. तुमच्या गरजांना थोडी आवर घाला. तुमच्याकडे जर दोन-चार चांगले कपडे असतील तर विनाकारण डझनभर कपडे ठेवल्याने काय फायदा. जर १-२ खोल्याच्या भाडयाच्या घरात तुमचं चालू शकतं तर उगाच दिखाव्यासाठी मोठा फ्लॅट घेऊन समाजात तुम्ही काय दिखावा करणार आहात.

इन्वेस्टमेंट गरजेची आहे

आजकाल अनेक कंपन्या इन्वेस्टमेंटसाठी काम करत आहेत. शेअर मार्केट, इक्विटी आणि डेट म्युच्युअल फंड, ईपीएफ, नॅशनल पेन्शन सिस्टम, रियल इस्टेट, गोल्ड इत्यादींमध्ये इन्वेस्टमेंट तुमच्या सुविधानुसार केली जाऊ शकते. इन्वेस्टमेंटमध्ये चांगला परतवा मिळतो. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून योग्य माहिती घ्यायला हवी. इन्व्हेस्टमेंट अशी असायला हवी की बचत इत्यादीवर त्याचा कोणताही परिणाम होता कामा नये.

तुमच्या गरजा प्राथमिकता द्या

शेवटी  एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपली जशी गरज आहे त्यानुसार बचत आणि खरेदीसाठी प्राथमिकता द्यायला हवी. जर तुम्ही भाडयाने राहात असाल तर गरजेचं आहे की तुम्ही फ्लॅट घेण्याबाबत विचार करा. जर नोकरी व बिझनेससाठी येण्या जाण्याचा त्रास होत असेल, तर तुम्ही कार खरेदी करण्याबद्दल विचार करत असाल तर घर आणि काम ज्याची पहिली गरज आहे त्यालाच प्राथमिकता द्यायला हवी. समजा मुलाचं लग्न करायचं आहे आणि घरदेखील घ्यायचं असेल तर अगोदर मुला-मुलींचे लग्न करण्याला प्राथमिकता द्यायला हवी. घर बनविणे या गोष्टी नंतर होतील. प्राथमिकता आपल्या गरजेनुसार व्हायला हवी.

फायनान्शियल अॅडव्हायरचा सल्ला

इन्शुरन्स अॅडव्हायझर राजेश कुमार सिंह सांगतात की मनी मॅनेजमेंट खूपच हुशारीने करायला हवं. यामध्ये लहान मोठी चूकदेखील खूप मोठे नुकसान करू शकते. दुसरीकडे हुशारीने पैशाची बचत होईल आणि तेदेखील योग्य जागी इन्वेस्टमेंट केलं तर चांगला लाभदेखील मिळू शकेल. मनी मॅनेजमेंटमध्ये खूपच हुशारीची गरज असते. योग्य प्रकारे केलेलं मनी मॅनेजमेंट कुटुंब आणि स्वत:च्या आयुष्याला आर्थिक सुरक्षेची हमी देतं. मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थेसाठी आर्थिक सल्लागाराची मदत नक्कीच घ्यायला हवी. मनी मॅनेजमेंट खूपच विचारपूर्वक करायला हवं, म्हणजे भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. हे सुखद भविष्यासाठी खूपच गरजेचं आहे. जर याचं प्लॅनिंग योग्यप्रकारे केलं तर भविष्याची आधारशीला मजबूत राहील. कुटुंब तसेच स्वत:चे भविष्य सुरक्षित राहील.

प्रवास स्मार्ट आणि सुरक्षित करा

* गृहशोभिका टीम

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल, तर त्यासोबतच तुम्ही स्मार्ट प्रवासी असणे आवश्यक आहे, म्हणून आज आम्ही तुमचा प्रवास स्मार्ट आणि सुरक्षित कसा बनवू शकतो याबद्दल बोलणार आहोत.

स्मार्ट पॅकिंग – पॅकिंग करताना हे लक्षात ठेवा की खूप हलके रंगाचे आणि सहज घाण होणारे कपडे कधीही घेऊ नका, यामुळे तुम्हाला कपडे पुन्हा पुन्हा धुण्याच्या समस्येपासून वाचता येईल. याशिवाय असे काही कपडे सोबत ठेवा जे तुम्ही मिक्सिंग आणि मॅचिंग करून घालू शकता. यामुळे तुम्ही कोणतेही कष्ट न करता स्टायलिश दिसाल आणि तुम्हाला जास्त कपडे घेऊन जाण्याचीही गरज भासणार नाही.

लहान सामान – आपण जिथे जातो तिथे खरेदी करतो आणि स्मृतीचिन्ह म्हणून नक्कीच काहीतरी आणतो, त्यामुळे कमी सामान घेऊन घर सोडले तर बरे होईल जेणेकरून थोडी जास्त खरेदी केली तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तुमच्या वस्तूंबाबत समस्या.

औषधे – अनेक वेळा असे घडते की थकवा, हवामान किंवा खाण्याच्या सवयी बदलणे, अपचन, लूज मोशन, सर्दी-ताप यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर खबरदारी म्हणून काही औषधे आधीच सोबत ठेवावीत.

पैसा प्रवासादरम्यान, हे लक्षात ठेवा की कधीही जास्त रोख किंवा मौल्यवान वस्तू घेऊन प्रवास करू नका आणि तुम्ही तुमचा डेव्हिड, क्रेडिट देखील सुरक्षित ठेवा. याशिवाय कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नका हे लक्षात ठेवा.

तुम्ही कुठेही जात असाल, शक्य तितकी माहिती तुमच्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहाल.

मग जुने फर्निचरदेखील दिसेल नवीन

* अपूर्ण अग्रवाल

घर सजवण्यासाठी व सुंदर बनविण्यासाठी भिंतीचा रंग कसा असावा, फर्निचर कसे असावे हे पाहणे फार महत्त्वाचे आहे. घर सजवण्यासाठी फर्निचरच खरेदी करणे आवश्यक नाही. आपण आपले जुने फर्निचर आणि लाकडी वस्तू रंगवून त्यास अगदी नवीन रूप देऊ शकता. आपल्या शयनकक्षाची गोष्ट असो किंवा मग आपल्या आधुनिक स्वयंपाकघराची असो, लाकडी फर्निचर प्रत्येक घराचा अभिमान बनला आहे. अशा परिस्थितीत याचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

अशी निवडा पॉलिश

कोणत्याही प्रकारचे फर्निचर असो, त्यावर लागलेले डाग आणि ओरखडे त्यास खराब करतात. बऱ्याच वेळा आपण फर्निचर साफ करण्यासाठी फर्निचर वॅक्सचा वापर करतो, परंतु याच्या गुळगुळीतपणामुळे फर्निचरला धूळमाती चिकटते, ज्यामुळे ते खराब होऊ लागते.

आपण आपल्या घराचे फर्निचर जसे की सोफे, पलंग, लाकडी कपाटे, टेबल्स किंवा साइड टेबल्स, खुर्च्या, संगणक टेबल्स, स्टूल इत्यादी पेंट किंवा पॉलिश करून घेऊन त्यांना पुन्हा नवीन बनवू शकता. होय, हे लक्षात ठेवा की जर फर्निचर यापूर्वी पेंट केले गेले असेल तर ते पुन्हा पेंटच करा आणि जर ते पॉलिश केले गेले असेल तर ते पुन्हा पॉलिशच करा. आधुनिक कोटिंग पेंट रासायनिक प्रतिरोधक असतात. ते केवळ फर्निचरचे आर्द्रतेपासूनच संरक्षण करत नाहीत तर कुजण्यापासून आणि वाळवीपासूनदेखील संरक्षण करतात.

रंगांची पुनरावृत्ती करू नका

आपल्या घरास नवीन रूप देण्यासाठी रंगांची पुनरावृत्ती करू नका. जर आपल्याला एखादा रंग अधिक आवडत असेल तर याचा अर्थ असा नाही की आपण केवळ तोच रंग पुन्हा- पुन्हा वापरावा. आपण नवीन आकर्षक रंगाचे पेंट वापरावे. नवीन रंग आपल्या घरात आणि आपल्यात नवीन ऊर्जा मिसळण्यास मदत करतील आणि घर आतून सुंदरही बनवतील.

जर आपल्या लाकडी फर्निचरवर ओरखडे आले असतील किंवा त्यावर खिळयांचे खड्डे असतील तर पेंट करण्यापूर्वी ते ओरखडे आणि खड्डे वुड फिलरने भरा. वुड फिलर लाकडासाठी पुट्टी आणि त्यास गुळगुळीत पृष्ठभाग देण्यासाठी कार्य करते.

फिलरचा रंग नेहमी फर्निचरच्या रंगापेक्षा किंचित गडद असावा. प्रथम लाकडात असलेली छिद्रे स्वच्छ करा. नंतर फिलर भरा आणि ते ६-७ तास तसेच सोडा. फिलर पृष्ठभागाच्या वरपर्यंत असल्यास सॅण्ड पेपरच्या सहाय्याने ते स्वच्छ करा. मग ते रंगवा.

एक पेंट असा निवडा, जो पाण्याला लाकडी फर्निचरमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंध करेल आणि त्याच वेळी तो पाण्याने खराब होणारा नसावा. बऱ्याच वेळा पेंट काही दिवस पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर निघून जातो, जो केवळ वाईटच दिसत नाही तर आपल्या घराचे सौंदर्यही खराब करतो.

लाकडी कोटिंग महत्वाचे आहे

आजकाल बाजारात आधुनिक लाकूड कोटिंग पेंट्स उपलब्ध आहेत, जे वॉटरबेसड फॉर्म्युल्यांवर बनवलेले आहेत आणि ते दीर्घकाळ टिकणारेदेखील आहेत. असे लाकडी कोटिंग पेंटस केवळ फर्निचरला पाण्यापासूनच वाचवित नाहीत, तर त्यांच्यावर जर धूळमातीही जमलेली असेल तर आपण ते देखील कापडाच्या सहाय्याने सहजपणे साफ करू शकता. आजकाल अशा लाकडी कोटिंगदेखील उपलब्ध आहेत, ज्या फर्निचरचे स्क्रॅचपासून संरक्षण करतात. आपण इच्छित असल्यास, वॉटरबेस्ड मैट टॉपकोटदेखील वापरू शकता. हे पेंट पिवळसरपणा येऊ देत नाही आणि फर्निचरला एक चमकदार देखावा देते.

आपण फर्निचरला त्याच्या वास्तविक रंगात पाहू इच्छित असल्यास आपण वार्निश वापरू शकता. वार्निश फर्निचरच्या लाकडाचा रंग चमकविण्यात मदत करते आणि ते अगदी नवीनसारखे बनवते. हे देखील फर्निचरला आर्द्रता, धूळ, पाणी आणि सूर्यप्रकाशापासून खराब होण्यास प्रतिबंधित करते.

घरात पेस्ट कंट्रोल आवश्यक

* सोमा घोष

मुंबईतील एका घरात झुरळांचा इतका उपद्रव झाला होता की, त्यांच्यामुळे घरात राहणारे लोक उलटी, जुलाब यांसारख्या आजारांचे शिकार होऊ लागले होते. औषधे घेऊनही ते बरे होत नव्हते. अशा वेळी त्यांना कोणीतरी घरात पेस्ट कंट्रोल करण्याचा सल्ला दिला. त्यांनी लगेच सल्ला अंमलात आणला आणि घरात दोन वेळा पेस्ट कंट्रोल केले, त्यानंतरच त्यांची झुरळांपासून सुटका झाली.

खरं म्हणजे, या छोटयाशा घरात भरपूर सामान ठासून भरलेले होते. भरपूर वर्षे झाली, पण कोणीही ते सामान हटवून घर साफ केले नव्हते. जेव्हा रात्री लाइट बंद होते, तेव्हा हे जीवजंतू सहजपणे बाहेर येतात आणि खरकटया भांडयांवरून पळू लागतात. असे करताना ते आपल्यासोबतचे बॅक्टेरिया त्यांच्यावर सोडतात.

याबाबत मुंबईच्या कल्पतरू हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट आर.एम. हेगडे, जे ३० वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत, ते सांगतात की, घरात पेस्ट कंट्रोल नेहमीच आवश्यक आहे. शहरांत गटार किंवा पाइपच्या मार्गाने जीवजंतू घरात प्रवेश करतात आणि त्यांचा जर योग्य पद्धतीने बंदोबस्त केला नाहीत, तर ते तिथेच राहून आपला डेरा जमवतात.

नेहमीच असे चित्र दिसते की, बहुतेक घरांमध्ये रात्री उष्टी-खरकटी भांडी तशीच बेसिनमध्ये ठेवली जातात. झुरळे किंवा इतर जीव त्या भांडयांवर फिरून मग स्वच्छ भांडयांवर फिरतात. अशा वेळी अनेक आजार उदा. डायरिया, डिसेंट्री, अस्थमा इ. आगंतुक पाहुण्यासारखे हजर होतात. पेस्ट कंट्रोलमुळे ते सर्व जीवजंतू मरून जातात.

गावांमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरते. याउलट शहरांत गटारांमध्ये पाणी साठून राहाते. त्यामुळे झुरळे, डास व माश्यांची पैदास होते. म्हणूनच पेस्ट कंट्रोल दर तीन महिन्यांनी करणे आवश्यक आहे. जर झुरळे जास्त झाली असतील, तर ३० दिवसांत एकदा पेस्ट कंट्रोल करा. जेणेकरून त्यांची अंडी नष्ट होतील.

पेस्ट कंट्रोलच्या पद्धती

* पेस्ट कंट्रोलच्या केमिकल उपायांमध्ये घरातील सामान हटविणे आवश्यक असते. त्याबरोबरच, अशा प्रकारे पेस्ट कंट्रोल केल्यानंतर २ ते ३ तास खोली बंद केल्यानंतर, ती क्लीन करून, खिडकी, दरवाजे उघडून पंखा चालविला पाहिजे. कारण केमिकल ट्रिटमेंटमध्ये जर केमिकलचा दर्प तसाच राहिला आणि तुम्ही खिडकी, दरवाजे न उघडता, एसी लावलात, तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो.

* हर्बल उपायांमध्ये सामान हटविण्याची गरज नसते. खोलीच्या कोपऱ्यांमध्ये हा उपाय केला जातो आणि व्यक्ती घरात राहूनही पेस्ट कंट्रोल करू शकते.

* जेल उपायांमध्येही सामान हटविण्याची गरज भासत नाही. ‘डॉट’ लावून हा केला जातो आणि हा परिणामकारकही असतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक जेल किंवा हर्बल उपाय अवलंबतात. मात्र, याच्या तुलनेत केमिकल उपायांचा परिणाम दीर्घकाळ राहतो.

या उपायांबरोबरच आपण हेही आजमावू शकता

बोरीक अॅसिड, गव्हाचे पीठ आणि साखर समान प्रमाणात घेऊन छोटया-छोटया गोळया बनवा व घराच्या कोपर्ऱ्यांत २-३ गोळया टाका. त्यामुळे जीवजंतू आणि झुरळे मरतील.

या गोष्टींकडेही लक्ष द्या

* घराच्या मध्यभागी सामान ठेऊन साफसफाई करा. म्हणजे कोपऱ्यांत जीवजंतू उत्पन्न होणार नाहीत.

* जर तुम्ही बेसिनमध्ये खरकटी भांडी ठेवत असाल, तर ती धुऊन एका छोटया प्लॅस्टिक टबमध्ये गरम पाणी आणि सर्फ घालून भिजवून ठेवा.

* काम संपल्यानंतर सिंकमध्ये गरम पाणी ओता, जेणेकरून जीवजंतू वरती येणार नाहीत.

* नालीच्या वरती जाळी अवश्य लावा. म्हणजे झुरळे वरती येणार नाहीत. एवढे करूनही घरात जीवजंतूंचा प्रादुर्भाव होत असेल, तर प्रोफेशनलची मदत घ्या.

कोणती काळजी घ्याल

पेस्ट कंट्रोल करताना खालील काळजी घ्या

* केमिकल उपाय अवलंबताना घरातील वृद्ध आणि लहान मुलांना दुसरीकडे शिफ्ट करा.

* घरातील कोणाही व्यक्तिला श्वसनासंबंधी आजार असेल, तर केमिकल उपायांचा अवलंब करणे टाळा. कारण त्यामुळे त्यांचा त्रास अधिक वाढू शकतो.

* पेस्ट कंट्रोल केल्यानंतर घर योग्य पद्धतीने व्हेंटिलेट करा. जेणेकरून श्वास कोंडणार नाही. यासाठीच जवळपास २ तासांनंतर खिडकी-दरवाजे उघडून पंखा सुरू करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें