विवाहपूर्व समुपदेशनाचे फायदे

* प्रतिनिधी

आजकाल नात्यामधील संतुलन आणि एकमेकांप्रती धैर्य, भावना संपत चाललेली आहे. यामुळेच विवाहानंतर पती-पत्नी एकमेकांना समजून न घेता छोटया-छोटया गोष्टींवरून वाद घालू लागतात. यावरुन पुढे हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशावेळी नात्यात अंतरंगता आणि अतूटता कायम राखण्यासाठी लग्नापूर्वी समुपदेश करुन घेणे गरजेचे आहे.

विवाह समुपदेशकांकडून नवविवाहित किंवा विवोहच्छूक जोडपी आपल्या समस्यांचे तसेच शंकाचे निराकरण करून घेऊ शकतात. अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून नात्यात वितुष्ट निर्माण होते. याचे कारण लग्नापूर्वी त्यांना नाते निभावण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते.

मानसशास्त्रज्ञ डॉ. सपना नागगौडा यांचे म्हणणे आहे की, ‘‘विवाहपूर्व समुपदेशन हे स्वीकारवृत्ती विकसित करायला शिकवते. नात्यांमधील संबंध, गरजा, विस्तार, मर्यादा, तडजोड इत्यादींसाठी मनाची पूर्वतयारी करणे. समुपदेशनाने भविष्यातील अनेक संकटांना टाळता येते. परंतु आजही आपल्या समाजात पत्रिकेलाच महत्त्व दिले जाते. पण विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे प्रत्यक्षात त्या व्यक्तिसह आयुष्यभर जोडीदार म्हणून आपण राहू शकतो का हे ठरवता येते. तुमच्या जोडीदाराच्या संपूर्ण आयुष्याची ब्ल्यू-प्रिंटच तुमच्यासमोर सादर केली जाते. काहीवेळा गरजेनुसार कौटुंबिक समुपदेशनही केले जाते. लग्न यशस्वी होण्यासाठी संवाद साधणे हेच महत्त्वाचे आहे.’’

विवाह समुपदेशन हे स्वथ्य आणि नाते या दोन गोष्टींशी जोडलेले असतात. समुपदेशनादरम्यान वैवाहिक जीवनात सामान्यपणे येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, अडचणींतून बाहेर येण्याचे उपाय, विवाह यशस्वी बनवण्याची माहिती दिली जाते. नात्यांसंबंधीचे समुपदेशन नवविवाहितांला नव्या वातावरणात जुळून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

समुपदेशनाचे फायदे

लग्नाला संदर्भात मुलगी-मुलगा दोघांच्याही मनात शारीरिक संबंधांव्यतिरिक्त नाते निभावण्याविषयी अनेक प्रश्न असतात. पण या प्रश्नांची उत्तरे मित्र-मंडळींकडे वा कुटुंबाकडे नसतात. अशावेळी विवाह समुपदेशक हीच अशी व्यक्ती असते, जी आपल्या शंकांचे निरसन करू शकते. विवाह समुपदेशनामुळे ज्या गोष्टींवर बोलायला दोघांना संकोच वाटतो, त्या गोष्टींवर ते मोकळेपणाने बोलू लागतात. मग दोघांमध्येही चांगला संवाद प्रस्थापित होतो.

विवाह हे जीवनातील असे एक वळण आहे, ज्यामुळे तुमची जीवनशैली पूर्णत:  बदलून जाते. विवाहापूर्वीच्या समुपदेशनामुळे विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांना येणाऱ्या नव्या जीवनशैलीला समजून त्यानुसार स्वत:ला नव्या वातावरणात समरस होण्यास मदत मिळते.

विवाहानंतर प्रत्यक्षात तुम्ही प्रेमी युगुल न राहाता पति-पत्नी बनता. घरातील नव्या जबाबदाऱ्यांमध्ये होणाऱ्या चुकांचे एकमेकांवर खापर फोडणे आणि आरोप-प्रत्यारोप करणे यांमुळे नातेसंबंधांना तडा जातो. अशावेळी जबाबदाऱ्यां समजून घेणे आणि त्या व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठीच समुपदेशनाची आवश्यकता असते. समुपदेशनातून विवाहसंबंधित बाबी लक्षात घेतल्यामुळे एकमेकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या जास्त चांगल्याप्रकारे समजू लागतात.

विवाह समुपदेशक हे विवाहीत जोडप्यांना मदत करतात कारण वर्तमानाबरोबरच भविष्यातील गोष्टी जसे की कुटुंब नियोजन, सासरच्या मंडळींसोबतच्या नातेबंधातील नियोजन, अर्थ नियोजन इ. बाबत योजना आखून त्यांच्या नात्यात फक्त प्रेमच नाही तर व्यवहारीक विचारही आणतात.

विवाह समुपदेशक जोडप्यांशी फक्त सकारात्मक गोष्टींवरच नव्हे तर ते अशा गोष्टींवर बोलतात, ज्यावर ते बोलू इच्छित नाहीत वा संकोचतात, याउलट लग्न करण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुम्ही खरेच एकमेकांसाठी बनलेले आहात का? तुम्ही भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्टया एकमेकांना साथ देऊ शकता का? तुमच्या नात्यासंबंधी दोघांचेही विचार सारखे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरावरून तुम्ही समजू शकता की तुम्ही खरंच लग्नाला तयार आहात की नाही.

थोडासा ब्रेक घेऊन तर पाहा…

* मदन कोथुनियां

नातेबंधात स्पेस तितकीच जरूरी आहे जितकं जगण्यासाठी ऑक्सिजन. जसं की जर वातवरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर घुसमट जाणवते, अगदी त्याचप्रकारे नातेसंबंधातही स्पेस नसेल तर प्रेमाचा ओलावा हरवू लागतो. जर आपल्या सर्वात गोजिऱ्या नात्याची वीण आयुष्यभर बळकट ठेवू इच्छित असाल तर तुम्हालाही आपल्या बेटर हाफला द्यावा लागेल एक छोटासा ब्रेक.

त्यांचा स्वभाव समजून घ्या, परंतु त्यांची साथ सोडू नका. या ब्रेकनंतर जेव्हा ते परतून तुमच्याकडे येतील, तेव्हा तुमचं हे मिलन हमखास चमत्कारिक असेल. त्यात आपसुकच पूर्वीची टवटवी तुम्ही अनुभवाल. निश्चितच ब्रेकनंतर तुमच्या नात्यात कित्येक पटींनी अधिक गोडवा अन् उत्साह असेल.

‘‘एक वेळ अशी आली होती, जेव्हा आम्हा दोघांना वाटू लागलं की आमचं नातं आता दिर्घकाळ टिकणार नाही, परंतु आज एकमेकांचं मोल आम्हाला कळून चुकलंय, ही कमाल आहे एका छोट्याशा ब्रेकची,’’ असं सांगताना करूणा शर्मांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता.

तुम्ही हे ऐकलं की नाही ठाऊक नाही, परंतु सच्च्या आणि दिर्घकालीन मिलनाकरता दुरावा खूप जरूरी आहे. जर तुमच्या नात्यात कधी ब्रेक लागला नाही, तर निश्चितच तुम्ही त्याचं महत्त्व गमवाल. आजच्या तरुण पिढीला रिलेशनशिपमध्ये थोडीशी स्पेस आणि एक छोटासा ब्रेक हवा असतो. अनेकांनी याचा अनुभव घेतला तेव्हा त्यांना पटलं की काही काळ विलग होऊन पुन्हा एकत्र येणं सुखदायक असतं.

लिव इन रिलेशनशिप, सहजासहजी मिळणारं प्रेम यामुळेच ही नवी पद्धत आता रूढ होऊ लागली आहे. याबद्दल जाणून घेऊ अशाच काही लोकांकडून, ज्यांना जीवनात अशाच एका ब्रेकची गरज होती :

५ महिन्यांचा तो खडतर काळ

जयपूर येथे राहणारी स्मिता सांगते, ‘‘आमच्या नात्याला तब्बल ५ वर्षं पूर्ण झाली. या ५ वर्षांत अंदाजे ५ महिन्यांचा एक दिर्घ अंतराळ आला. जवळपास ३ वर्षं सातत्याने आम्ही प्रेमात ओतप्रोत समरस झालो होतो. सुरूवातीला एकमेकांमध्ये कधीच काही कमतरता जाणवली नाही, परंतु एक वेळ अशीही आली की या नात्यात जीव घुसमटू लागला. एखाद्याला जेव्हा तुम्ही खूप जास्त ओळखू लागता, तेव्हाही समस्या उभ्या राहू लागतात. ज्या गोष्टींकडे पूर्वी सहज दुर्लक्ष करत होतो, त्याच आता अगडबंब वाटू लागल्या होत्या.’’

‘‘अखेरीस तेच झालं, ज्याची भीती होती. परस्पर संमतीने आम्ही या नात्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दोघांनी शब्द दिला की आता कधी फोन, कोणताही संदेश आणि कुणाच्याही माध्यमातून संपर्क साधायचा नाही आणि घडलंही तसंच. मीसुद्धा माझ्या दुनियेत व्यस्त झाले आणि तेसुद्धा. कधी त्यांची आठवण झाली, तरी मी कधी व्यक्त झाले नाही.

‘‘तब्बल ५ महिन्यांनी मनस्थिती बदलली आणि त्यांची उणिव जाणवू लागली. त्यांच्याशी कधीही न बोलण्याचं वचन दिलं होतं, परंतु माझी नजर पुन्हा त्यांचा शोध घेऊ लागली. निसर्गाने साथ दिली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो, परंतु यावेळेस कायमस्वरूपी. इतक्या मोठ्या दुराव्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली होती की नातं भले कोणंतही असो, त्यात थोडी स्पेस जरूर असावी.’’

रबरबॅन्ड थिअरी

नात्यातील ही गुंतागुत समजून घ्यायची असेल तर तुम्ही रबरबॅन्ड थिअरी समजून घेणं जरूरी आहे. जॉन ग्रे यांचं पुस्तक ‘मेन्स आर फ्रॉम मार्स अॅन्ड विमन आर फ्रॉम व्हिनस’ स्त्रीपुरुष नातं समजून घेत त्यात सुधारणा करण्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे. यात स्पष्टपणे पुरुषाची मनोवस्था सांगत त्याची तुलना एका रबरबॅन्डशी केली आहे.

पुरुषांचा हा स्वाभाविक स्वभाव आहे की ते एखाद्या स्त्रीच्या पूर्ण निकट आल्यानंतर काही काळाने दूर जाऊ लागतात. मग भले स्त्री कितीही प्रेम करत असेल. असं होणं स्वाभाविक आहे. आपलं स्वातंत्र्य आणि अस्तित्त्व शोधण्यासाठी ते असं करतात. परंतु हेसुद्धा सत्य आहे की जेव्हा ते पूर्णपणे दूर जातात, तेव्हा ते परतूनही येतात. जेव्हा ते परतून येतात, तेव्हा त्यांचं प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रति आस्था अनेक पटींनी वाढलेली असते. स्त्रिया बुहतेकदा त्यांच्या या स्वभावापासून अनभिज्ञ असल्याने त्यांची साथ सोडून देतात.

जाणूनबुजून घेतला ब्रेक

नीरस होणाऱ्या नात्यात पुन्हा पूर्वीची उमेद जागृत करण्यासाठी काही जोडपी जाणूनबुजून ब्रेक घेऊ लागली आहेत. ते जाणून घेऊ इच्छितात की ते खरोखर परस्परांशिवाय राहू शकत नाहीत का? त्यांच्यात खरोखर प्रेम आहे की केवळ आकर्षण? त्यांना वाटू लागलं आहे की दुरावा हाच तो मार्ग आहे, जो त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.

एमबीए स्टुडन्ट विकास शर्मा सांगतात, ‘‘जर आपण दररोज डाळ खाल्ली, तर एक दिवस नक्कीच असा येईल, जेव्हा डाळ खाताना तिटकारा येईल. आपण ज्याप्रमाणे रोज एकाच चवीचं जेवू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे दररोज एकाच पॅटर्नचं जीवनही जगू शकत नाही. कुणी तुमच्यापासून कायमचं दूर जाणार त्यापेक्षा त्याला काही दिवसांसाठी स्वत:हून दूर करणं अधिक योग्य आहे.

‘‘मी निशावर जिवापाड प्रेम करतो, जेव्हा तिने मला होकार दिला नव्हता, तेव्हा मी तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकत होतो, परंतु जेव्हा तिने मला होकार दिला तेव्हा हळूहळू तिच्याप्रतिची ओढ कमी होऊ लागली. तिची प्रत्येक गोष्ट आता माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नव्हती. कारण मला ठाऊक होतं की ती माझ्यावर प्रेम करते आणि मला सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या या वागणुकीने मी स्वत: हैराण झालो होतो. आपल्या प्रेमाच्या हरवलेल्या जाणीवा पुन्हा परत मिळवण्यासाठी मी निशासोबत एक छोटासा ब्रेकअप केला. ती त्यावेळी खूप रडली. परंतु मी माझ्या मनावर दगड ठेवून तिला स्वत:पासून दूर केलं. सुरूवातीला तिचे फोनही उचलेले नाहीत.

‘‘जवळपास वर्षभरानंतर आम्ही विलग झालो त्याच दिवसापासून माझ्या मनात तिच्याप्रति पुन्हा प्रेम आणि ओढ जाणवू लागली. माझ्याकडे तिचा जो नंबर होता, तो तिने बदलला होता. तिची काहीच खबर नव्हती, परंतु आता माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी निशा माझ्या जीवनात पुन्हा परतावी असं वाटत होतं. तिच्या मित्रमैत्रीणींना भेटून तिच्या घरचा फोननंबर मिळवला. कदाचित त्यावेळेस ती मला दगाबाज प्रियकर समजत होती, त्यामुळे फोनवर यायलाही ती तयार झाली नाही. आटोकाट प्रयत्न केल्यावर तिची पुन्हा भेट झाली. जेव्हा मी दूर जाण्याचं कारण सांगितलं, तेव्हा रडवेल्या नजरेनं एक टक माझ्याकडे पाहात राहिली. मी तिच्या एका होकारासाठी पुन्हा व्याकूळ झालो होतो. त्यादिवशी मला समजलं की जर हा ब्रेकअप झाला नसता तर आम्ही कधी प्रेमातील गहनता समजू शकलो नसतो.’’

आम्हीसुद्धा याचा अवलंब करतो

विशाल आणि कविताचा प्रेमविवाह झाला. दोघांचं प्रोफेशन समान होतं, शिवाय त्यांचे विचारही सारखे होते. ते सांगतात, ‘‘बहुतेकदा लोक आम्हाला सांगतात की प्रेमाचा उत्साह काही काळात ओसरतो. पूर्वीसारखा उत्साह आणि प्रेम त्यांच्या नात्यात राहत नाही. आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला आपलं प्रेम दिर्घकाळ जिवंत राखण्यासाठी काय करायचं आहे. प्रेमातील ओलावा टिकवण्यासाठी आम्ही एकमेकांना स्पेस आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सतत दोघांनी एकत्र असावं ही अपेक्षा बाळगणं योग्य नाही.’’

विशाल सांगतात, ‘‘मी माझ्या पत्नीला तिच्या मित्रमैत्रीणींसोबत आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्याची मुभा देतो. या कालावधीत मी तिला अजिबात फोन करत नाही. तीसुद्धा मला सतत प्रश्न विचारत नाही. हे करताना आम्ही एकमेकांची सातत्याने काळजी घेतो. जेव्हा आम्ही आमच्या एकांतात राहण्याच्या मूडमधून बाहेर पडून एकत्र येतो, तेव्हा आपोआप आमच्या प्रेमभावनेत चैतन्य संचारलेलं असतं.’’

थोडीशी स्पेस आवश्यक

राजस्थान युनिव्हर्सिटी जयपूरमधील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका अंजली सांगतात, ‘‘कामाच्या थकव्यानंतर छान झोप येते. चांगल्या झोपेमुळे स्वप्नंही चांगली पडतात. नातीसुद्धा अशाचप्रकारची गोड स्वप्नं आहेत, जी समाधानी असल्यावरच पडतात. परंतु हे तेव्हा घडतं, जेव्हा आपण नाती जगतो. ब्रेक घेण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही साथिदाराला पूर्णत: विसरून जावं, तर एकांतात विचार करावा की या नातेबंधातून तुम्ही काय प्राप्त केलं आणि सोबतच हेसुद्धा की तुम्ही समोरच्या व्यक्तिला कितपत देऊ केलं? दोन्ही पारड्यांचा समतोल तपासून पाहा आणि विचार करा की जर समतोल साधणं शक्य होत नसेल तर त्यामागचं कारण काय आहे?

‘‘तुमच्यापासून दूर राहून तुमच्या जोडीदारालाही ती स्पेस मिळू शकेल, जेव्हा ते विचार करतील की तुमचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. कायम त्यांना तुम्ही स्वत:मध्येच गुंतवून ठेवलंत तर तुमच्याबद्दल विचार करण्याची स्पेसही तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घ्याल आणि ही स्पेस छोट्याशा ब्रेकने त्यांना मिळू शकेल. जरूरी नाही की हा ब्रेक दिर्घकालीन असावा, परंतु इतका जरूर असावा की तुमचं स्मरण केवळ जबाबदारीच्या रूपात होऊ नये तर स्मरणात इतकी तीव्रता असावी की त्यांनी तुमच्या ओढीने परतून यावं.’’

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की प्रत्येक पतीपत्नीमध्ये भांडणाचं महत्त्वाचं कारण असुरक्षितता आणि इगो असतं. जर तुम्ही आपल्या पार्टनरला योग्य स्पेस दिली, तर त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना उरणार नाही आणि तुम्हालाही ती जाणवणार नाही. तुम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांसोबत राहावं, थट्टामस्करी करावी, परंतु संशयाच्या घेऱ्यात अडकून प्रश्नांची सरबत्ती करू नये. कोणत्याही नातेसंबंधात स्पेस दिल्याने विश्वास अधिकच वाढतो. इतकंच नव्हे, तुमचा जोडीदार तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. सोबतच यामुळे तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा वाढतो. अशावेळी पतीपत्नीने वैयक्तिक स्पेसची काळजी घेतली पाहिजे.

असं असूनही नातेसंबंधात योग्य ताळमेळ बसत नसेल तेव्हा एकमेकांपासून काही काळ विलग होण्याचा प्रयत्न करावा वा दोन आठवड्यांसाठी एकमेकांना संपर्क न साधण्याबाबत परस्पर संमती घ्यावी आणि हे निश्चित केल्यावर स्पष्ट करावं की तुम्ही आत्ताही एकमेकांसोबतच आहात आणि आपलं नातं या कालावधीदरम्यान विशेष राहिल. यानंतर एकत्र वेळ व्यतित करू नका वा एकमेकांना मेसेज पाठवू नका. एकमेकांशी फोनवर बातचित करू नका. हा दुरावा तुमच्यासाठी हे जाणून घेण्यास सहाय्यक ठरेल की तुम्ही या नात्याला किती महत्त्व देता.

हे सुरूवातीला अवघड नक्कीच वाटू शकतं. परंतु जेव्हा तुम्हाला आपल्या जीवनात आपल्या पार्टनरशिवाय बरं वाटतं, तेव्हा कदाचित ब्रेक घेणं अधिक योग्य ठरेल. तुमचं नातं अधिक मजबूत बनवणारा हा उत्तम पर्याय आहे असं म्हणता येईल. आता जर सुरूवातीच्या काही दिवसात ब्रेकअपमध्ये आनंद जाणवला, मात्र त्यानंतर तुम्हाला आपल्या जोडिदारीची उणीव भासू लागती तर तुम्ही पुढाकार घेऊन नातेसंबंध सुधारण्याच्या दृष्टिने प्रयत्न करायला हवेत.

सासू-सुन नात्याची बदलत आहेत परिमाणं

* प्रतिभा अग्निहोत्री

सासू सुनेचे नाते हे फार नाजूक असते. काही वर्षांपूर्वीची सासू ही अतिशय कठोर, सुनेला नियंत्रणात ठेवणारी, सारे निर्णय स्वत: घेणारी आणि कडक आवाजाची असे. तेच आजच्या सासूचे रूप मात्र अतिशय मृदू आणि प्रेमळ आहे. अनेकदा तर सासू सुनेचे परस्पर संबंध इतके घट्ट असतात की जे आई आणि मुलीतही पाहायला मिळत नाहीत. अशा ३ सासू सुनांनी आपापसांतील  संबंधांबाबत बातचीत केली आहे, ज्यांच्या सुंदर नात्याला तोडच नाही.

कांता तिवारी आणि गरिमा

कांता तिवारी २ मुलांच्या आई आहेत. साधारण ५ वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मोठया मुलाचे लग्न इंदूरच्या गरिमाशी केले. मुलगा आणि सुन दोघेही वर्किंग आहेत. सासू सुनेतील आपसांतील ताळमेळ आणि समजदारपणा पाहणाऱ्याला लगेच दिसून येतो. सुन नोकरी करत असल्याने कांता घरी मुलांना सांभाळते. तिचे पती इंदुरवरून येऊन जाऊन असतात. पतिला एकटे सोडून मुलांसोबत राहण्याविषयी ती म्हणते, ‘‘आज माझी नातू लहान आहे. माझ्या मुलांना आणि तिला माझी गरज आहे. आपल्या मुलांविषयी आपण विचार करायचा नाही तर कुणी करायचा? आजी आजोबा असताना माझी नात नोकराणीच्या निगराणीत वाढेल किंवा माझ्या सुनेला तिच्या शिक्षणाचा उपयोग करता येत नसेल हे आम्हाला मंजूरच नाही.’’

अशी गोष्ट जी तुम्हाला एकमेकींची आवडते?

कांताजी, ‘‘मला माझ्या सुनेची सर्वात जास्त ही गोष्ट आवडते की ती कधीही उलट उत्तर देत नाही. मी जे काही सांगेन ते ती लक्षपूर्वक ऐकते. नोकरी करत असूनही घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते. खरं सांगायचं तर तिने माझ्या आयुष्यातील मुलीची कमतरता पूर्ण केली आहे.’’

गरिमा, ‘‘आईंची सर्वात चांगली गोष्ट मला ही वाटते की त्या परिवर्तनशील आणि अतिउत्साही आहेत. जेव्हा त्या गावी राहत तेव्हा डोक्यावर पदर आणि घुंघट यात राहत. पण इथे मुंबईत आल्यावर त्या सूट, लेगिंग्स, जीन्स इ. घालू लागल्या आहेत. जिम, किट्टीही त्यांनी जॉइन केले आहे. आमच्यासोबत राहून त्या फास्टफूडही खायला शिकल्या आहेत. जिथे जातील तिथल्यानुसार स्वत:ला त्या बदलतात. आणि प्रत्येक कामात त्यांचा उत्साह एवढा असतो की आम्हीच त्यांच्यापुढे फिके पडतो.’’

अशी गोष्ट जी सर्वात जास्त खटकते?

कांताजी, ‘‘तशी कोणतीच गोष्ट नाहीए जी तिची मला खटकते, पण ती सर्वांकडे लक्ष देता देता स्वत:विषयी बेफिकीर असते.’’

गरिमा, ‘‘आईंना नवनवीन डिशेस बनवण्याची खूप हौस आहे. मी कितीही खाल्ले तरी त्यांना असेच वाटते की मी कमी खाल्ले आहे. यामुळे मी थोडी त्रासते.’’

गरिमा, ‘‘कोणीही आले तरी आई सर्व स्वत:च सांभाळतात. मला कुठल्याही प्रकारचे टेंशन नसते.’’

जर तुम्हाला एकमेकींची कुठली गोष्ट नापसंत असेल तर तुम्ही तो पेच कसा सोडवता?

यावरही दोघी एकच उत्तर देतात की जेव्हा कुठल्या गोष्टीवर त्यांची मतभिन्नता असते तेव्हा त्या वाद घालण्यापेक्षा ती गोष्ट सरळ सोडून देतात. मग दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर त्याच गोष्टीवर वेगळया पद्धतीने विचार करतात आणि काहीतरी मार्ग मिळतोच.

जेव्हा आईंना राग येतो तेव्हा तुम्ही काय करता?

गरिमा, ‘‘जेव्हा असे वाटते की राग येतो तेव्हा मी शांत राहण्याचा प्रयत्न करते. हळूहळू त्यांचा राग आपोआप शांत होतो.’’

संजीवनी घुले आणि निधी

दुसरी सासू सुनेची जोडी आहे संजीवनी घुले आणि त्यांची मोठी सुन निधी घुले. निधी एक हाऊसवाइफ आहे आणि दिल्लीत आपल्या पतिसोबत राहते आणि तिच्या सासूबाई संजीवनीजी बँकेतून रिटायर्ड आहेत आणि उज्जैनमध्ये राहतात. पण वर्षातून ७-८ महिने त्या सून मुलासोबतच राहतात.

तुम्हाला परस्परांची कोणती गोष्ट आवडते?

संजीवनीजी, ‘‘मला निधीच्या २ गोष्टी सर्वाधिक आवडतात. पहिली म्हणजे ती खूप सेवाभावी आणि सुसंस्कारी आहे. मग कोणीही येवो ती सगळयांकडे लक्ष देते. दुसरी म्हणजे ती नीटनेटकी आहे. रात्री कितीही उशीर झाला तरी ती किचन पूर्ण आवरूनच झोपते.’’

निधी, ‘‘माझ्या सासूबाई खूप समजूतदार, समंजस आणि शांत आहेत. कधीही त्या कुठल्या गोष्टीत रोकटोक करत नाहीत.’’

एकमेकांची न आवडणारी गोष्ट?

संजीवनीजी, ‘‘तिची एक गोष्ट मला मुळीच आवडत नाही ती म्हणजे, छोटया छोटया गोष्टीत ती चिंता करत बसते. कोणतेही काम ती अगदी व्यवस्थित पार पडते, पण ते करताना ती फार टेन्शन घेत असते.’’

निधी, ‘‘त्या कधीही आपली पसंत आणि इच्छा बोलून दाखवत नाहीत.’’

शॉपिंगसाठी एकमेकींसोबत जायला आवडते का?

संजीवनीजी, ‘‘मला तर माझ्या मुलापेक्षा सुनेबरोबरच शॉपिंगला जायला अधिक आवडते. ती विचारपूर्वक शॉपिंग करते. घरातल्या सर्वांसाठी शॉपिंग निधीच माझ्याकडून करून घेते.’’

निधी, ‘‘त्यांची पसंत छान आहे. त्यांच्यासोबत शॉपिंग करताना मी अगदी निश्चिंत असते की कोणतीही चुकीची गोष्ट घरी आणली जाणार नाही.’’

पाहुणे आल्यावर कशी स्पेस देता?

संजीवनीजी, ‘‘आमचे घर खूप मोठे असल्याने अशी समस्या कधी आलीच नाही. कधी जास्त लोक असल्यास मुले स्वत:च अॅडजस्ट करतात. मला विचार करावा लागत नाही.

निधी, ‘‘जास्त लोक आले तर सासू सासऱ्यांना आम्ही त्यांच्या खोलीतच पाठवतो, बाकी आम्ही घरात कुठेही अॅडजस्ट करतो.

सुनेची कोणती गोष्ट न आवडल्यास कसे समजावता?

संजीवनीजी, ‘‘असे कधीतरीच होते की मला तिची एखादी गोष्ट आवडली नाही. मी त्यावेळी शांत राहते नंतर योग्य वातावरण आणि वेळ पाहून मी तिला समजावते आणि ती समजूनही घेते.’’

जेव्हा कधी तुम्हाला सासूबाईंची कुठली गोष्ट आवडत नाही तुम्ही काय करता?

निधी, ‘‘आतापर्यंत १० वर्षांत तरी असे घडलेले नाही की मला त्यांची कुठली गोष्ट आवडली नाही. पण जर असे कधी झालेच तर मी समोरासमोर बसून त्यांच्याशी बोलेन आणि कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करेन.’’

कमलेश चतुर्वेदी आणि तृप्ती

तिसरी सासू सुनेची जोडी कमलेश चतुर्वेदी आणि तृप्ती यांची आहे. कमलेशजी एक कुशल गृहिणी आहेत, आणि तृप्ती एमबीए आहे. २ वर्ष जॉब केल्यांनतर मुलाच्या जन्मानंतर तृप्तीने जॉब सोडला. गेल्या १० वर्षांत पतिसोबत चंदिगढ आणि दिल्ली येथे वास्तव्य करून यावर्षी जूनमध्ये ती उज्जैनमध्ये आपल्या सासूसासऱ्यांच्या देखभालीसाठी शिफ्ट झाली. तिचे पती दिल्लीतच सर्विस करतात. आजच्या काळात असा त्याग फार कमी पाहायला मिळतो.

तुमच्या सुनेचे तुमच्यापाशी शिफ्ट होणे तुम्हाला कसे वाटले, आणि तृप्ती तुला इथे येऊन कसे वाटत आहे?

कमलेशजी, ‘‘कुठल्याही सासूला अशी सून मिळाली तर ती स्वत:ला भाग्यवानच समजेल. खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे माझी सून.’’

तृप्ती, ‘‘आम्ही यांच्यापासून फार दूर राहत होतो. आईबाबांची सतत चिंता सतावत असायची. आता यांच्यासोबत राहून आम्ही आमची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडतोय असे वाटते.’’

अशी गोष्ट जी तुम्हाला एकमेकींची आवडते?

कमलेशजी, ‘‘सर्वात जास्त तिची ही गोष्ट मला आवडते की ती कधीही उलट उत्तर देत नाही. तिला एखादी गोष्ट पसंत नसेल तर ती गप्प राहते.’’

तृप्ती, ‘‘आईंची ही गोष्ट मला सर्वात जास्त आवडते ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत त्या पॉजिटीव्ह विचार करतात. निगेटिव्ह स्थितीला पॉजिटीव्हमध्ये कसे बदलायचे हे मी त्यांच्याकडूनच शिकले आहे.’’

एकमेकींसोबत शॉपिंगसाठी जायला आवडते का?

कमलेशजी, ‘‘हो नक्कीच. तिच्यासोबत गेल्यावर चांगला आणि आधुनिक सल्ला मिळतो.’’

तृप्ती, ‘‘त्या खूप स्मार्ट आणि अनुभवी खरेदीदार आहेत. त्यांच्यासोबत शॉपिंग करणे कधीही रिस्की नसते.’’

तुम्हाला जशी सून हवी होती तशीच मिळाली का आणि तुम्हाला सासू?

कमलेशजी, ‘‘हो नक्कीच. त्याहीपेक्षा खूप चांगली.’’

तृप्ती, ‘‘मी लग्नाचा होकारच मुळी माझ्या सासूबाईंकडे पाहून दिला होता. पहिल्या दिवसापासून मला त्या आपल्या वाटल्या. मी त्यांच्याविषयी जसा विचार केला होता त्याहूनही त्या खूपच चांगल्या आहेत.’’

तुमचा मुलगा १५ दिवसांनी येतो, अशात तुम्ही सुनेला कशी स्पेस देता? तृप्ती तुझे यावर काय मत आहे?

कमलेशजी, ‘‘मुलांना घेऊन मी फिरायला जाते किंवा सरळ झोपून जाते.’’

तृप्ती, ‘‘त्या इतक्या समजूतदार आहेत की न बोलताच सर्व समजून जातात. आज लग्नानंतर १० वर्षांनीदेखील त्या आम्हाला स्पेस देतात.’’

सुनेची एखादी गोष्ट नापसंत असेल तर तुम्ही कसे समजावता?

कमलेशजी, ‘‘मी त्यावेळी शांत राहून तिथून निघून जाते, नंतर प्रेमाने तिला समजावते.’’

आईंना जेव्हा राग येतो तेव्हा तू काय करतेस?

तृप्ती, ‘‘मी त्यावेळी शांत राहते, नंतर त्यांचा राग आपोआप शांत होतो.

सुखी वैवाहिक जीवनासाठी ९ टीप्स

* गरिमा

पती-पत्नी आणि ती वा तो ऐवजी पती-पत्नी आणि जीवनाच्या आनंदासाठी नात्याला प्रेम, विश्वास आणि सामंजस्याच्या धाग्यांनी बळकट बनवावे लागते. लहानसहान गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार बनावे लागते. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते :

मॅसेजवर नव्हे तर संवादावर अवलंबून राहा : ब्रीघम युनिव्हर्सिटीत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जी दाम्पत्य जीवनाच्या छोटया-मोठया क्षणांमध्ये मॅसेज पाठवून जबाबदारी पार पाडतात. उदा-चर्चा करायची असेल तर मॅसेज, माफी मागायची असेल तर मॅसेज, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मॅसेज अशा सवयी नात्यांमध्ये पाडतात जसं की आनंद आणि प्रेम कमी करतात. जेव्हा एखादी मोठी घटना असते तेव्हा जोडीदाराला सांगण्यासाठी खऱ्या चेहऱ्याऐवजी इमोजीचा आधार घेऊ नये.

अशा मित्रांची संगत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे : ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने डिवोर्स घेतला असेल तर आपणही असाच निर्णय घेण्याची शक्यता ७५ क्क्यांपर्यंत वाढते.

पती-पत्नीने बनावे बेस्ट फ्रेंड्स : ‘द नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक’द्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जी दाम्पत्य एकमेकांना बेस्ट फ्रेंड मानतात, ती दुसऱ्यांच्या तुलनेत आपले वैवाहिक जीवन दुपटीने जास्त समाधानाने जगतात.

छोटया-छोटया गोष्टीही असतात महत्वपूर्ण : भक्कम नात्यांसाठी वेळोवेळी आपल्या जीवनसाथीला तो वा ती स्पेशल असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. हे दर्शवणेही आवश्यक आहे की आपण त्यांची काळजी घेता आणि त्यांच्यावर प्रेम करता. यामुळे फारकतिची समस्या येत नाही. आपण जरी जास्त काही नाही तरी एवढे तर करूच शकता एक छोटेसे  प्रेमपत्र जोडीदाराच्या पर्समध्ये हळूच ठेवणे किंवा दिवसभराच्या कामानंतर त्यांच्या खांद्यांना प्रेमाने मसाज देणे. त्यांचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस विशेष बनवा. कधी-कधी त्यांना सरप्राईज द्या. अशा छोटया-छोटया घटना आपल्याला त्यांच्याजवळ नेतात.

आपासातील विवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळा : नवरा-बायकोत विवाद होणे खूप स्वाभाविक आहे आणि यापासून कोणी वाचू शकत नाहीत. पण नात्यांची बळकटी या गोष्टीवर अवलंबून असते की आपण हे कशाप्रकारे हाताळतो. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी सभ्य आणि सौम्य व्यवहार करणाऱ्यांचे नातेसंबंध लवकर तुटत नाहीत. भांडण किंवा वाद-विवादादरम्यान ओरडणे, अपशब्द बोलणे किंवा मारहाण करणे, नात्यांमध्ये विष कालवण्यासारखे आहे. अशा गोष्टी मनुष्य कधीही विसरत नाही आणि  त्यामुळे वैवाहिक जीवनावर याचा अनिष्ट प्रभाव पडतो.

एका अभ्यासात या गोष्टीचा खुलासा केला आहे की कशाप्रकारे फायटिंग स्टाईल आपल्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करते. लग्नाच्या १० वर्षांनंतर असे कपल्स की ज्यांनी फारकत घेतली आहे आणि तसे कपल्स की जे आपल्या जीवनसाथीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत. या दोहोंमध्ये जो सगळयात महत्त्वाचा फरक आढळून आला तो म्हणजे परस्पर म्हणजे लग्नानंतरच्या एक वर्षात त्यांचे परस्परांतील विवाद आणि भांडणे हाताळण्याची पद्धत. ते कपल्स ज्यांनी लग्नाच्या सुरूवातीच्या काळात आपल्या जीवनसाथीबरोबर वेळोवेळी क्रोध आणि नकारात्मक पद्धतीने वर्तन केले त्यांचा डिवोर्स १० वर्षाच्या आतच झाला.

संवादाचा विषय विस्तृत असावा : पती-पत्नीमध्ये संवादाचा विषय घरगुती मुद्दयांव्यतिरिक्त असायला हवा. नेहमी कपल्स म्हणतात की आम्ही तर आपसात बोलत असतो, संवादाची काहीही कमी नाहीए. पण जरा लक्ष्य द्या की आपण काय बोलत असता, नेहमी घर आणि मुलांशी संबंधित बोलणेच पुरेसे नसते. आनंदी जोडपे ते असते, जे आपसात आपली स्वप्नं, आशा, भीती, आनंद आणि यश सर्वावर बोलतात. एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही वयात आणि कधीही रोमँटिक होणे ते जाणतात.

चांगल्या प्रसंगाना सेलिब्रेट करा : ‘जनरल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित एका शोधानुसार चांगल्या प्रसंगांमध्ये पार्टनरचे साथ देणे चांगलेच आहे, पण त्याहीपेक्षा गरजेचे आहे की दु:ख, समस्या आणि अडचणीच्या वेळी आपल्या जीवनसाथीबरोबर उभे राहणे. पूर्व अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटनवर मोनिका लेविंस्कीने जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तेव्हा त्यावेळीसुद्धा हिलरी क्लिंटनने आपल्या पतिची साथ सोडली नाही. त्या दिवसांतील दिलेल्या साथीमुळे दोघांचे नाते अजून बळकट केले.

रिस्क घ्यायला घाबरू नये : पती-पत्नीच्यामध्ये जर नाविन्य, विविधता आणि विस्मयकारक गोष्टी घडत असतील तर नात्यात ताजेपणा आणि सामर्थ्य टिकून राहते. एकसाथ मिळून नवीन-नवीन एक्साइटमेंट्सने भरलेल्या अॅक्टिव्हीटिजमध्ये सहभागी व्हावे, नवीन-नवीन स्थळी फिरायला जावे, रोमांचक प्रवासाची मजा घ्यावी, लाँग ड्राईव्हवर जावे, एक-दुसऱ्याला खाणे-पिणे, फिरणे, हसणे, मस्ती करणे आणि समजून घेण्याचे विकल्प द्यावेत. कधी नात्यामध्ये कंटाळवाणेपणा आणि औदासीन्य येऊ देऊ नये.

केवळ प्रेम पुरेसे नाही : आपण जीवनात आपल्या प्रत्येक प्रकारच्या कमिटमेंटसाठी पूर्ण वेळ देतो. ट्रेनिंग्स घेतो, जेणेकरून आपण त्याला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकू. ज्याप्रकारे खेळाडू खेळाच्या टिप्स शिकतात, वकिल पुस्तके वाचतात, आर्टिस्ट वर्कशॉप्स करतात अगदी त्याचप्रकारे लग्नाला यशस्वी बनवण्यासाठी आपण काही ना काही नवीन शिकायला आणि करायला तयार राहायला हवे. फक्त आपल्या जोडीदाराशी प्रेम करणेच पुरेसे नाही तर त्या प्रेमाची जाणीव करून देणे आणि त्यामुळे मिळणारा आनंद सेलिब्रेट करणेही गरजेचे आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास अशाप्रकारचे नवीन-नवीन अनुभव शरीरात डोपामिन सिस्टमला अॅक्टिवेट करतात. ज्यामुळे आपला मेंदू लग्नाच्या सुरूवातीच्या वर्षात अनुभव होणाऱ्या रोमँटिक क्षणांना जगण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना पॉजिटीव्ह गोष्टी बोलणे, प्रशंसा करणे आणि सोबत राहणे नात्यात बळकटी आणते.

दाम्पत्य जीवनात याला असावी नो एंट्री

* ललिता गोयल

संशयाच्या रोगाला इलाज नाही. जर का याच्या फेऱ्यात खासकरून पतीपत्नीपैकी कुणी एक अडकले तर तो त्यांना हैवान बनवू शकतो. अशीच एक घटना अलीकडेच हैदराबादमध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेने आपल्या पतीला अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयामुळे अशी शिक्षा दिली ज्याची वेदना तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या ३० वर्षीय महिलेने पतीशी झालेल्या वादात चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पतीला गंभीर जखमा झाल्या.

असेच एक प्रकरण दिल्लीच्या निहाल विहार परिसरातसुद्धा घडले, जिथे पतिनेच आपल्या पत्नीची मर्डर केली. पकडले गेल्यावर त्या पतिने पोलिसांना सर्व काही सांगितले. त्याने स्पष्ट केले की त्याचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते, पण पतिला सतत वाटायचे की आपल्या पत्नीची अनेक मुलांसोबत मैत्री आहे आणि याच गोष्टीवरून त्यांच्यात सतत वादविवाद होत आले.

तुटणारी कुटुंबं आणि विखुरणारी नाती

संशयामुळे न जाणो कित्येक हसती खेळती कुटुंबं बरबाद झाली आहेत. दाम्पत्य जीवन जे विश्वासाच्या आधारावर टिकलेले असते, त्यात संशयाची चाहूल विष कालवते. हल्ली अनैतिक संबंधांच्या संशयावरून लाइफपार्टनरवर हल्ला, हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंब पध्दती विखुरणे हे याचे कारण आहे असे मानसशास्त्रज्ञ मत मांडतात.

खरंतर एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा पती आणि पत्नीत भांडणे होत, तेव्हा घरातील मोठी माणसे सामोपचाराने बातचीत करून ती भांडणे सोडवत असत किंवा मग मोठयांच्या उपस्थितित त्यांचे भांडण उग्र रूप धारण करू शकत नसे. मात्र आज पती पत्नी एकटे राहतात, त्यामुळे भांडण झाल्यावर ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. इथे त्यांच्यामध्ये उभी राहिलेली संशयाची भिंत तोडायला कुणीही नसते.

अशात संशय अधिकच बळावल्यामुळे पतीपत्नीचे नाते शेवटच्या घटका मोजू लागते. वर्तमान लाइफस्टाइलमध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरदार असतात. ते दिवसातले ८ ते १० तास घराबाहेर असतात आणि ते विरुद्ध लिंगीय व्यक्तींसोबत कामाच्या निमित्ताने सहवासात असतात. हाच सहवास हे दोघांमधील संशयाचे कारण बनते. अशावेळी पतीपत्नी दोघांनी विश्वास ठेवायला हवा.

बिझी लाइफस्टाइल

लग्नानंतर जिथे वैवाहिक नाते टिकवून ठेवणे ही जशी पतीपत्नीची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे हे नाते संपुष्टात आणण्यासही ही दोघचं कारणीभूत असतात. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा दोघेही आपल्या रुटीन लाइफमध्ये बोअर होतात आणि आपल्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी तिसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होतात, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात, तेव्हा वैवाहिक नात्याचा अंत हा संशयापासून सुरू होऊन एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे ते हत्येपर्यंत पोहोचतो.

अनेकदा तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे जेव्हा पतिपत्नी जीवनातील समस्या सोडवण्यास अक्षम ठरतात, तेव्हा त्यांच्यात खटके उडू लागतात. आणि यासाठी ते बाहेरच्या संबंधांना जबाबदार धरतात. त्यांच्या डोक्यात संशय उत्पन्न होऊ लागतो. हळूहळू हा संशय बळावू लागतो आणि भांडण वाढत जाते.

जर का त्यांना कोणी समजावले तर संशय आणि सगळया समस्या संपुष्टात येऊ शकतात, परंतु एकल परिवारात त्यांना समजावणारे कोणी नसते. यामुळे परिस्थिती मारझोडीपासून हत्येपर्यंत जाऊन पोहोचते.

तू फक्त माझा/माझी आहेस असा विचार

लाइफपार्टनरविषयी जास्तच पझेसिव्ह राहणे हेसुद्धा संशयाचे मोठे कारण असते. आजच्या काळात जिथे स्त्री आणि पुरुष हे ऑफिसमध्ये मोठमोठया जबाबदाऱ्या सांभाळत असतात, अशीवेळी त्यांच्यात सलगी होणे स्वाभाविक असते. मग पती किंवा पत्नी हे जेव्हा एकमेकांना दुसऱ्या व्यक्तिसोबत सलगी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात संशय उत्पन्न होतो. त्यांना हे सहनच होत नाही की त्यांचा लाइफपार्टनर ज्याच्यावर ते मनापासून प्रेम करतात, तो कुणा बाहेरच्या व्यक्तिसोबत सलगी करत आहेत. कारण ते त्यांच्यावर फक्त आपला अधिकार आहे असे समजत असतात.

अशाप्रकारची विचारसरणी नात्यांमध्ये कटुता आणते. पती किंवा पत्नी जेव्हा फोनवर कुणा दुसऱ्या महिलेचा किंवा पुरुषाचा मेसेज किंवा कॉल पाहतात, तेव्हा त्यांना संशय येऊ लागतो. भले वास्तव वेगळेच असो. पण संशयाचे बीज दोघांच्या संबंधात फूट पाडते, ज्याचा अंत हा मारहाण किंवा मग हत्या अशा घटनांत होतो.

हेरगिरीची माध्यमे बनणारे अॅप्स

पती पत्नीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी स्मार्टफोनही काही कमी जबाबदार नाही. सोशल मिडियाने जिथे वैवाहिक जोडीदारांच्या विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घातले आहे तिथे या स्मार्टफोनमध्ये असेही अॅप्स आहेत, जे पती आणि पत्नी यांना एकमेकांवर हेरगिरी करण्याची पूर्ण संधी देतात.

या अॅप्सद्वारे पती किंवा पत्नी हे आपला लाइफपार्टनर त्यांच्याव्यतिरिक्त सर्वाधिक कोणाशी बोलतात. म्हणजेच हल्ली कोणत्या व्यक्तिशी त्याची जवळीक वाढत आहे. त्यांच्यात काय गप्पा होतात, ते कोणत्या प्रकारच्या इमेज किंवा व्हिडिओ शेअर करतात. थोडक्यात लाइफपार्टनरच्या फोनवर कंट्रोल करण्याचीही पूर्ण व्यवस्था आहे. हे अॅप्स लाइफपार्टनरच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवण्याची पूर्ण संधी देतात. या अॅप्सच्या मदतीने लाइफपार्टनरचा फोन पूर्णपणे तुमच्या ताब्यात येऊ शकतो.

आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की या टेक्निकचा सदुपयोग तुम्ही आपसातल्या नात्यात जवळीक आणण्यासाठी की दुरावा वाढवण्यासाठी?

कोरोना या ७ गोष्टींकडे द्या लक्ष

* प्राची भारद्वाज

कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.

जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?

अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

  1. दिनक्रम बिघडू देऊ नका

जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.

  1. घरातली कामे आपापसात वाटून घ्या
  • या काळात घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, कार धुणारे, स्वयंपाकी सर्वांनाच सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातली सर्व कामे आपल्यालाच करायची आहेत. अशावेळी कोणा एकावर सर्व कामांची जबाबदारी अली तर त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून घरातल्या कामांची एक यादीच तयार करा. आपली क्षमता आणि आवडीनुसार कामाचे वाटप करा. जसे की, भांडी पतीने घासली तर साफसफाई पत्नीने करावी. जेवण पत्नीने बनवले तर सर्व पुसून घेणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, ही कामे पतीने करावीत.
  1. जवळ येऊ नका, दूरही जाऊ नका
  • आज परिस्थिती अशी आहे की, जवळही जाता येत नाही आणि फार दूरही राहता येणार नाही. एकाच घरात एकत्र बंद झाल्यामुळे तरुण जोडप्यांमध्ये एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण पती किंवा पत्नी समोर असते तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण सोबतच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणूनच जर जवळ आलात तर त्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अंघोळ करा. तसे तर शॉवरखालीही तुम्ही एकमेकांजवळ येण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे प्रेम आणि स्वछता दोन्ही साधता येईल. पण एकत्र राहिल्यामुळे फक्त प्रेम फुलेल, असेही अजिबात नाही. याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
  1. ओव्हर एक्सपोजरचा धोका
  • सतत सोबत राहिल्यामुळे तरुण जोडप्यात केवळ प्रेमच बहरेल असे नाही तर मतभेदही वाढू शकतात. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना काळात एकमेकांसोबत राहण्यावाचून पर्याय नसलेल्या जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे. चीनचा दक्षिण-पश्चिम भाग सिशुआनमध्ये 24 फेब्रुवारीनंतर ३०० हून अधिक घटस्फोटाचे अर्ज आले आहेत. दक्षिण चीनमधील फुजीआन प्रांतात तर एका दिवसात घटस्फोटाच्या १० अर्जांवर सुनावणी ठेवण्यात आली. असे यामुळे होत आहे की, तरुण जोडपी गरजेपेक्षा जास्त वेळ नाईलाजाने एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळसोबत राहून अनेकदा त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी स्वत:चा अहंकार, राग किंवा जिद्दी स्वभावामुळे ते घटस्फोटाचा निर्णय घेतात.
  1. घरात राहूनही अंतर ठेवणे आहे शक्य
  • स्वत:साठी थोडा वेळ असायला हवा असे प्रत्येकालाच वाटते. आपली स्पेस, आपला वेळ. पण सतत सोबत राहिल्यामुळे जोडीदाराची नजर सर्वकाळ आपल्यावरच खिळून राहिल्यासारखे वाटते. हे टाळण्यासाठी तुम्हाला दोघांची स्वत:साठीची वेळ आणि जागा ठरवून घ्यायला हवी. तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सोबत असूनही एकमेकांपासून थोडे अंतर सहज ठेवू शकता. शिवाय एकमेकांचा कंटाळा येणार नाही.
  1. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
  • अनेकदा तुमच्या मनात काहीतरी वेगळे असते पण प्रत्यक्षात त्यापेक्षा वेगळे वागण्याची कारणे अनेक असतात. जसे की, तुम्हाला राग आला कारण तुमच्या जोडीदाराने त्याची भांडी धुतली नाहीत. जेव्हा की तुम्ही नुकतेच किचन स्वच्छ करून आला असाल. प्रत्यक्षात तुमच्या रागावण्यामागचे खरे कारण असे असते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला होणार त्रास आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.

 मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रियांका सांगतात की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलायला हवे आणि तुमच्या रागामागचे जे खरे कारण आहे ते सांगायला हवे.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण होऊ शकेल अशावेळी खोलीतून बाहेर जा. कुठले तरी दुसरे काम करायला घ्या, जेणेकरून भांडणाचा विषय तुमच्या डोक्यातून निघून जाईल. सतत सोबत राहिल्यामुळे असेही होऊ शकते की, तुम्हाला तुमच्या जोडोदारामधील थोडे जास्तीच दोष दिसू लागतील. पण तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचे आहे. सकारात्मक रहायचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले चांगले क्षण, चांगल्या गोष्टी आठवा. त्याच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही त्रासदायक सवयींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

  1. क्वॉलिटी टाइम घालवा
  • ही वेळ केवळ अडचणींची आहे असे मुळीच नाही. तुम्ही दोघे मिळून या क्षणांना सोनेरी क्षण बनवू शकता. त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत आवडीची पुस्तके वाचा. जुने चित्रपट पहा. आवडीचे गेम खेळा. चित्र काढा. सोबतच व्यायाम करून स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पण या गोष्टीकडे लक्ष द्या की, एकमेकांच्या इतकेही जवळ येऊ नका की, कंटाळा येऊ लागेल. बाहेरच्या जगासोबचे संबंध तोडू नका. तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल म्हणून काय झाले, व्हर्च्युअल वर्ल्ड तर आहेच. त्याच्याद्वारे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांशी कायम संवाद साधा. सोशल मीडियावरही काही वेळ घालवता येऊ शकेल.

संपत्तीची वाटणी कायद्यापेक्षा संस्कार मोठे

* सुधा कसेरा

मोबाइलची रिंग वाजताच दीपा स्क्रीनवर आपल्या मोठया बहिणीचा फोटो पाहून समजून गेली की, नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार, कारण ती कधीच निरर्थक गप्पा मारायला फोन करत नसे.

तिने सांगितले की, ‘‘तुला माहिती आहे का? बिहारमधील वडिलांची सर्व जमीन दोन्ही भावांनी मिळून, तुझी आणि माझी सही स्वत:च करुन कवडीमोल किंमतीने विकली. मला आपल्या एका हितचिंतकाने फोन करुन ही माहिती दिली.’’

हे ऐकून दीपा सुन्न झाली. वडिलांच्या चितेची आग थंड होण्याआधीच भावांनी हे असे पाऊल उचलले, जणू ते त्यांच्या मरणाचीच वाट पाहत होते. वडिलांनी ती जागा स्वत:हून विकली असती तर सर्वांना समान वाटा मिळाला असता, पण अचानक अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी दीपाला बऱ्याचदा सांगितले होते की, कुटुंबात फक्त तिलाच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जमिनीच्या पैशांतून तिला खूप फायदा होईल. ही घटना अपवाद नसून प्रत्येक घराची कथा आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. बहुतांश घरातील पुरुष वडिलोपार्जित व्यवसाय करायचे. त्यामुळेच बहिणींच्या लग्नात त्यांना हुंडा म्हणून वडिलोपार्जित संपत्तीतील काही भाग देत असत. लग्नानंतरही त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात ते सहभागी व्हायचे आणि शक्य तितकी त्यांना मदत करायचे. एखाद्या महिलेला तिच्या सासरच्यांनी सोडून दिले किंवा वैधव्य आले तरी भाऊ किंवा वडील तिला सर्वतोपरी मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य समजत असत.

ते आईवडिलांबाबत असलेली आपली जबाबदारीही पार पाडत असत. दुसरीकडे लग्नानंतर मुलगी पूर्णपणे सासरची होऊन जात असे. पण, कालौघात जग आणि लोकांच्या विचारसरणीतही प्रचंड बदल झाला. आता वडिलोपार्जित व्यवसाय सोडून तरुण इतर शहरांमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती ही त्रिकोणी कुटुंबात परिवर्तीत झाली असून प्रत्येक कुटुंब स्वतंत्रपणे राहू लागले आहे. यामुळे त्यांचा वैयक्तिक खर्चही खूप वाढला आहे.

महिला स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला आहे. मुली या भावांच्या खांद्याला खांदा लावून आईवडिलांची जबाबदारी घ्यायाला पुढे सरसावतात. आता हुंडयाची प्रथा कायदेशीररित्या अमान्य आहे. स्वावलंबी असल्याने मुलीही वडिलांकडून हुंडा घेण्यास विरोध करतात. हे सर्व पाहता वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांनाही हक्क मिळणे आवश्यक झाले आहे.

समान हक्क

१९५६ चा कायदा ‘हिंदू वारसा हक्क सुधारणा दुरुस्ती’ अस्तित्त्वात आल्यानंतर विवाहित महिलांना माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पुरुषांच्या बरोबरीनेच समान हक्क बहाल केला. परंतु तो प्रभावी ठरला नाही. ९ सप्टेंबर २००५ पासून, हिंदू उत्तराधिकार अधिनियमाअंतर्गत नवीन नियमांनुसार, महिला आणि पुरुष दोघांचाही वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, कायदा अस्तित्वात आला, पण प्रत्यक्ष व्यवहारातही तो कुटुंबीयांनी आचरणात आणला आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या बहीण किंवा मुलीने स्वत:हून वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर पुरुषांना ते आवडत नाही. ते तिचे हक्क अमान्य करतात. तिने नेहमीच त्यांच्यासमोर हात पसरावे असे त्यांना वाटत असते आणि अशावेळी तिची मदत करुन त्यांना समाजात कौतुकास पात्र ठरायचे असते.

ते बहिणीला मालमत्तेतील समान वाटेकरी मानण्याऐवजी केवळ आपल्या दयेस पात्र मानून स्वत:चे मोठेपण सुरक्षित ठेवण्यातच धन्यता मानतात. जणू ती त्या घरात जन्मलेलीच नसते. लग्न होताच माहेरच्या घरावरील तिचे सर्व अधिकारही संपुष्टात येतात आणि माहेरचे तिला स्वत:ला परके समजण्यास भाग पाडतात. ही एकप्रकारे तिच्या हक्काची विडंबना आहे.

विस्कटणारी नाती

‘स्त्री-पुरुषांत वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप’ या कायाद्यामुळे कुटुंबातील नात्यात बरीच कटुता आली आहे. यात दुमत नाही की जे काम पुरुष पूर्वी आपली नैतिक जबाबदारी समजून करीत होते तेच आता कायद्याच्या भीतीपोटीही करायला तयार नाहीत. पुरुषप्रधान देशातील पुरुषांच्या शतकानुशतके चालत आलेल्या मानसिकतेत कासवाच्या चालीने बदल होत आहे.

आताही पुरुष आपल्या आईवडिलांसाठी आर्थिक किंवा शारीरिक रुपात काहीही करीत नसतील तरीही वडिलोपार्जित मालमत्तेवर ते त्यांचा संपूर्ण हक्क समजतात. तर, आयुष्यभर, मुलीने जबाबदारीने त्यांच्यासाठी खूप काही केले असली तरी तिने संपत्तीत वाटा मागताच किंवा आईवडिलांनी तिला तो स्वत:हून देण्याची तयारी दाखवताच भाऊ तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या हक्कांसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणे ही खूपच दूरची गोष्ट आहे, असे अनेकींच्या तोंडातून दररोज ऐकायला मिळते.

बहिणींना वाटा मिळणे हा अपवाद आहे. अनेकदा भाऊ भावालाच वाटा द्यायला तयार नसतो. संधी मिळताच मालमत्ता नावावर करायला मागेपुढे पाहत नाही. यामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतचा संबंध तुटला तरी त्यांना फरक पडत नाही.

मानसिकतेत बदल

बहिणींची वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकताही याला कारणीभूत आहे. लग्नानंतर अनेक बहिणी सासरच्या सणसभारंभांमध्ये प्रथापरंपरेनुसार भावांकडून मोठी रक्कम उकळू इच्छितात आणि संपत्तीतही वाटा मागतात. प्रत्यक्षात भावांपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की, कायदा बनवण्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे की, आईवडिलांनी जिवंतपणीच मृत्युपत्र करुन त्यांच्या मालमत्तेची वाटणी करावी, जेणेकरुन त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्या मालमत्तेवर अवैध कब्जा करू शकणार नाही.

कालौघात पुरुष आणि स्त्रीच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. पैशांपेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व  देऊन नैतिकतेच्या आधारावर वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी व्हायाला हवी. आणि यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये एकमेकांसाठी निर्माण केलेली प्रेमाची भावना आणि पैशांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारे केलेले संस्कारच जास्तीत जास्त कुटुंब विभक्त होण्यापासून रोखण्यासाठी आणि समस्येचे निरसन करण्यासाठी सक्षम आहेत.

शिष्टाचार कोणासाठी?

– रीता गुप्ता

‘‘आई, मला माझ्या मैत्रिणीच्या निशाच्या घरी जायचे आहे. आज तिने वर्गात खूप छान नोट्स बनवल्या आहेत. उद्या परीक्षा आहे. मी एकदा तिच्या घरी जाऊन वाचून येते. जवळच रहाते ती. स्कूटीने जाऊन लगेच येते,’’ शशीने सुधा म्हणजे तिच्या आईला सांगितलं.

‘‘ही वेळ आहे का मुलींनी घराबाहेर पडण्याची? मी पहातेय सुधा की तू जरा जास्तच सूट देऊन ठेवली आहेस हिला काही बरंवाईट घडले ना, मग पश्चात्ताप करण्याची वेळ येईल आयुष्यभर,’’ आईने काही बोलायच्या आतच शशीची आजी म्हणाली.

‘‘वर्गातच नोट्स घ्यायचे होते ना तू. रात्र व्हायची वाटच कशाला पाहायची?’’ बाबा घरात शिरताच म्हणाले.

‘‘बेटा, तिच्या नोट्स सोड, तू स्वत: नोट्स बनव. आता रात्री ९ वाजता तुझे असे घराबाहेर पडणे योग्य नाही,’’ आईनेही समजावले.

साधारण तासाभराने शशीचा भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला व आईला म्हणाला, ‘‘आई संध्याकाळपासून कुठे बाहेर गेलो नाहीए मी, एक चक्कर मारून येतो आणि मग बाईक घेऊन निघून गेला. कुठुनही कसला आवाज आला नाही. कोणीच काही विचारले नाही व म्हटलेही नाही.’’

दुटप्पी मानसिकता

प्रत्येक भारतीय घरात जवळपास हीच स्थिती असते. मुलीला तर सातत्याने शिकवण दिली जाते. कधी परक्या घरी जायचे आहे म्हणून, तर कधी जग चांगलं राहिलं नाही म्हणून. असं बोलू नकोस, असं चालू नकोस इ.ची लांबलचक यादी असते. मुलींना शिकवण्यासाठी कधी सरळसरळ तर कधी आडून आडून मुलींना सांगितले जाते की रस्त्यात गुंड मवाल्यांकडे कसे लक्ष द्यायचे नाही. वाटेत कोणी छेडछाड केली तर प्रतिउत्तर न देता निमूटपणे घरी कसे यायचे. जर काही गंभीर घडलेच तर चूका शोधून मुलींनाच दोषी ठरवले जातं की, तिने कपडेच असे घातले होते किंवा मग चांगल्या घरच्या मुली रात्रीचं फिरतात का? वर्तमानपत्रात येणाऱ्या बलात्कारांच्या बातम्या ऐकवून त्यांना अजूनच घाबरवले जाते.

असे नाही वाटू शकत का की त्रास खरं तर मुलांमुळेच आहे? तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काही मुलींनी मिळून एका मुलाला छेडले, बलात्कार केला किंवा असेच काही अजून? नाही ना? रस्त्यांवर वेगाने दुचाकी चालवणारे काही अपवाद वगळले तर अपघातग्रस्त किंवा मृत्यू पावणाऱ्यांमध्येही अधिकीने मुलेच असतात. जेव्हा की मुलीही आता दुचाकी चालवतात.

लहानपणापासूनच शिकवावे

मुली लहानपणापासूनच खूप समजूतदार आणि भावनाप्रधान असतात. आता थोडे ज्ञान मुलांनाही दिले गेले पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच सांगितले जाते, ‘अरे रडतो कशाला, ‘तू मुलगी आहेस का?’ ‘भित्रा कुठला, मुलगी आहेस का तू?’, ‘बांगड्या भरल्या आहेत का हातात?’, ‘अरे, तू किचनमध्ये काय करत आहेस?’ वगैरे. असे बोलून बोलून त्यांना आधीपासूनच संवेदनाहीन बनवले जाते.

दोष कुणाचा

घरात मुलींना नालायक मुलांपासून स्वत:चा बचाव करणे शिकवण्याबरोबरच मुलांना चांगली वर्तणूक करायला शिकवावे. मुले तर मुलेच असतात. मातीच्या गोळ्यासारखी. आपल्याला हवे तसे आपण त्यांना घडवू शकतो. आपल्याला हवे ते संस्कार, विचार त्यांना देऊ शकतो. मग तो मुलगा असो की मुलगी.

जेव्हा आपण एखाद्या रोडरोमियोला किंवा एखाद्या बलात्कारी माणसाला किंवा एखाद्या हिटलरशाही पतीला पाहतो तेव्हा मनमानी, मुजोरी करणे हा आपला हक्कच असल्याचे त्यांच्या वर्तमानातून जाणवते. अशावेळी लक्षात घेतले पाहिजे की हा दोष त्यांच्या संगोपनाचाही आहे. काही अनर्थ घडायला नको म्हणून सुधाने तर तिच्या मुलीला बाहेर जाऊ दिले नाही. पण असेही होऊ शकते की साधाभोळा दिसणारा गुणी मुलगा बाहेर काही अनर्थ घडवून आलेला असेल.

एकत्र कुटुंबातील प्रेम कसे कायम ठेवावे

* गरिमा पंकज

लंच टाईममध्ये पुनीताच्या जेवणाचा डबा उघडताच ऑफिसमध्ये सर्व खूष व्हायचे. तिचा डबा सर्व महिलांच्या आकर्षणाचे केंद्र असायचा, कारण त्यात नेहमीच विविध प्रकारचे चवदार पदार्थ असायचे. सर्वांना आश्चर्य वाटायचे की ती सकाळीच इतके सर्व कसे काय बनवते.

मग एके दिवशी पुनीताने यामागचे कारण सांगितले आणि म्हणाली, ती हे सर्व बनवत नाही, तर तिची बहीण बनवते. हे ऐकून महिलांमध्ये कुजबूज सुरू झाली. विभाने थेट प्रश्नच विचारला, ‘‘बहीण तुझ्याबरोबर सासरी राहाते का?’’

पुनीताने हसत उत्तर दिले की, ‘‘ती माझी सख्खी बहीण नाही, लहान जाऊ आहे, पण माझ्यासाठी बहिणीपेक्षाही खूप काही आहे. तिच रोज माझ्यासाठी आणि मुलांसाठी टिफिन बनवते.’’

हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. ‘‘तिच्याकडे एवढा वेळ असतो? ती नोकरीला जात नाही का?’’

‘‘हो, ती नोकरीला जात नाही, पण सर्व घर सांभाळते. आमच्या सर्वांची लाडकी आहे. ती नसती तर मी इतक्या सहजी नोकरी करू शकले नसते.’’

‘‘छान, ही फारच चांगली गोष्ट आहे. आजच्या जगात कोण दुसऱ्यासाठी एवढे करते?’’ विभा म्हणाली.

‘‘दुसऱ्याचे आणि आपले असे काही नसते. ज्याला आपले मानतो तिच व्यक्ती आपल्यासाठी सर्व काही असते. एक बहीण माहेरी असेल तर एक सासरीही असू शकते,’’ असे म्हणत पुनीता हसली.

पुनीता एकत्र कुटुंबात राहात होती आणि लहान जावशी तिचे चांगले संबंध होते. पुनीताच्या पतिचे निधन झाले होते, पण या कुटुंबाने तिला कधीच ती एकटी पडल्याचे जाणवू दिले नाही. संपूर्ण कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले.

आज बहुसंख्य विभक्त कुटुंबं पाहायला मिळतात, पण जर तुम्ही एकदा एकत्र कुटुंबात राहाल तर कधीच वेगळे राहण्याचा हट्ट करणार नाही. परिस्थितीमुळे आज वेगळे राहिले जाते. महानगरांमध्ये कुटुंबाचा अर्थ पती-पत्नी आणि मुले असाच होऊन गेला आहे.

एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब

अलीकडेच, चित्रपट दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या एका ट्विटने एकत्र कुटुंब विरुद्ध एकटे कुटुंब यातील वादाला तोंड फोडले, जेव्हा त्यांनी सोशल मिडियावर लिहिले, ‘‘आपण आपल्या जीवन पद्धती म्हणजेच एकत्र कुटुंबात परत यायला हवे. सर्व प्रकारची मानसिक असुरक्षितता, एकटेपणा आणि औदासिन्य टाळण्यासाठी कदाचित हा एकमेव मार्ग असेल. कुटुंब नावाची छत्री आपल्या मनाला सुरक्षिततेची भावना देते.’’

यावर मीटू कार्यकर्त्या आणि पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी यांनी लिहिले, ‘‘हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी अतिशय जवळून एक एकत्र कुटुंब पाहिले आहे, जिथे महिलांच्या श्रमांचे शोषण केले जाते. महिला एकमेकींविरोधात उभ्या ठाकतात.’’

अर्थात, कोणत्याही गोष्टीला चांगली आणि वाईट दोन्ही बाजू असतात. आपल्याला जर संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा आणि प्रेम हवे असेल तर आपण काही तडजोडी करायला तयार असले पाहिजे. पण एकंदर विचार केल्यास, अशा एकत्र कुटुंबांत राहण्याचे फायदे नुकसानापेक्षा अधिक असतात. जेव्हा घरात बरेच लोक असतात, तेव्हा खटके उडणे आणि स्वत:ला चांगले सिद्ध करण्यासाठी स्पर्धा लागणे, हे स्वाभाविक आहे. पण या बदल्यात मनाला जो आनंद मिळतो, त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कुटुंबातील महिलांची स्थिती कशी असेल आणि त्यांचे शोषण होईल की नाही हे मोठया प्रमाणावर महिलांची आर्थिक स्थिती आणि घरातील इतर महिलांच्या वृत्तीवर अवलंबून असते.

एकत्र कुटुंबात राहाण्याचे तसे तर बरेच फायदे आहेत, पण आम्ही तुम्हाला काही खास फायदे सांगतो :

वस्तू शेअर करण्याची सवय : एकत्र कुटुंबात राहणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. येथे तुम्ही वस्तू शेअर करायला शिकता. आपल्या वस्तू इतरांशी शेअर करून आनंद घेण्याची मजा तुम्ही लहानपणापासूनच शिकता. तुम्हाला याचा फायदाही होतो. एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल पण घरातील इतर सदस्याकडे असेल तर ती तुम्हाला सहज मिळते. कधी आयुष्यात असाही प्रसंग येतो, जेव्हा मोठे आर्थिक संकट येते, पण एकत्र कुटुंबाच्या आधारावर तुम्ही त्यातून सहज बाहेर पडू  शकता.

नुकसान कमी होते : एका संशोधनानुसार वेगळे राहणाऱ्यांच्या सामग्रीचे ५० टक्क्यांपर्यंत जास्त नुकसान होते. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वात मोठा फायदा असा की तुम्ही कुठल्याच गोष्टी वाया घालवत नाही. जे एकटे राहातात ते वीज, गॅस, पाणी आदी जास्त खर्च करतात. घरात खूप माणसे असतील तर खर्चही विभागला जातो.

कमी तणाव : एकटे राहणाऱ्याला जीवनात जास्त तणावाचा सामना करावा लागतो, पण एकत्र कुटुंबात लोक अधिक सुखी राहतात. एकत्र राहण्याचा हादेखील फायदा आहे की तुम्ही अधिक सुदृढ आणि आनंदी राहता कारण तुम्ही तुमचे सुख-दु:ख इतरांशी वाटून घेऊ शकता.

संरक्षक भिंत : एकत्र कुटुंबात जर पती बाहेरख्याली असेल किंवा पत्नीला मारझोड करत असेल तर अशावेळी कुटुंबातील इतर सदस्य त्याला समजावतात. अशा परिस्थितीत एकत्र कुटुंब महिलांसाठी संरक्षक भिंतीसारखेच काम करते.

पालनपोषणासाठी उपयुक्त : मुलांच्या पालनपोषणासाठी एकत्र कुटुंबातील वातावरण चांगले समजले जाते. मुले आजी-आजोबा, आत्या, काका यांच्या सहवासात कधी मोठी होतात हे कळतदेखील नाही. मुलांच्या मानसिक विकासासाठीही एकत्र कुटुंब उत्तम ठरते.

एकत्र कुटुंबात कसे जुळवून घ्याल

कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम राहावी यासाठी सर्वात गरजेचे आहे की आपल्या मुलांना मोठयांचा आदर करायला शिकवा. हे केवळ मुलांसाठीच लागू होत नाही तर घरातील सर्वच सदस्यांनी मोठयांचा आदर करायला हवा, जेणेकरून कुटुंबरुपी मणी एका माळेत व्यवस्थित गुंफून राहातील.

मुलांसमोर कधीच कोणाला ओरडून बोलू नका. जसे घरातील वातावरण असेल त्याचप्रमाणे मुले शिकतात. मुलांना नेहमीच मोठयांसमोर विनम्र आणि लहान मुलांशी संवेदनशीलपणे वागायला शिकवा. स्वत:ही तसेच वागा.

विभक्त कुटुंबात मुलांचे गरजेपेक्षा जास्त लाड होतात. यामुळे ती हट्टी होऊ शकतात. शक्य तेवढे आपल्या मुलांना पाय जमिनीवरच ठेवून चालायला शिकवा.

असा वाढवा मुलांचा आत्मविश्वास

* ऋचा शुक्ला, सीसेम, वर्कशॉप इंडिया

राहुलने वर्तुळातून चेंडू काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. आणि मग हताश होऊन रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची आई तिथे आली आणि त्याला उचलून मिठी मारली. मग तिने सांगितले की सातत्याने प्रयत्न करत राहा म्हणजे नक्कीच यशस्वी होशील. तिने राहुलला त्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा तो आपले नावही लिहू शकत नव्हता. सातत्यापूर्ण प्रयत्नांनी तो पुढे आपले नाव लिहू लागला.

अशाप्रकारच्या प्रोत्साहन आणि सकारात्मकतेमुळे मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. मुलांच्या स्वत: आणि प्रतिच्या धारणा कमी वयातच विकसित होतात. एक मूल कसा विचार करते? काय पाहते? काय ऐकत असते? आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देते? इत्यादी बाबी त्याच्या संपूर्ण प्रतिमेची निर्मिती करतात. जर एखाद्या मुलामध्ये चिंता, ताण, असंतोष आणि भयाची भावना निर्माण झाली तर तो चिडचिड करू लागतो. त्याचा आत्मविश्वास ढळू लागतो.

अनेक संशोधनातून कळंय की लहान वयातच अनेक मुले ताण-तणावाचे बळी बनतात. बालपणीच्या नकारात्मक अनुभवांमुळे त्यांच्या शरीरावर आयुष्यभरासाठी नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येते.

मुल तणावग्रस्त राहण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात एखादे कठीण कार्य करताना, काही विरूद्ध परिस्थिती निर्माण होते. मूल जेव्हा आपल्या शाळा आणि ट्यूशनचा अभ्यास समजण्यात किंवा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते, तेव्हादेखील त्याच्यात तणाव निर्माण होतो. तो प्रदर्शित करण्यास आणि अभ्यास करण्यात ते स्वत:ला अपयशी समजू लागतो, कारण त्याच्या मित्रांसाठी असे करणे सोपे असते. यामुळे आत्मविश्वास ढळू लागतो.

मुलाने गमावलेला आत्मविश्वास हे त्याच्या संकोचावरून वा गप्प असण्यावरून समजू शकते. अशावेळी आई-वडिलांनी हे संकेत ओळखणे गरजेचे असते. अशा काही पद्धतींचा अवलंब करावा, जेणेकरून मुलांना आपल्या समस्यांना तोंड देण्यात सहाय्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आईवडिलांची भूमिका ही घरातील वातावरण मैत्रीपूर्ण करण्याच्या दृष्टीने असावी. मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांना कोणीही न ओरडू नये. त्यांचे म्हणणे त्यांना निर्धास्त सांगण्याची संधी मिळाली पाहिजे.

संवाद ठेवा : मुलांमध्ये सामाजिक कौशल्य विकास हे त्यांच्या कुटुंबासोबत जोडले गेल्याने तसेच संवाद साधल्याने होतो. त्यामुळे मुलांसोबत प्रभावी संवाद साधा. सहयोगी, सुखदायी आणि स्नेहशील बना. यामुळे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. मग, मुलांमध्ये मोकळेपणाने आत्मविश्वास वाढेल.

आपली आवड निवडण्याची संधी : आपली आवड निवडणे, पर्याय आणि मतं मांडण्यात त्यांना मदत करण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांना त्यांच्या आवडीची निवड करण्याची संधी द्या. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही सर्वात योग्य पद्धत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात, स्वत:ची निवड समजण्यात ते सक्षम होतात, ज्यामुळे त्यांना आनंद मिळू शकतो.

प्रशंसा आणि पुरस्कार : आपल्या मुलांना सांगा की आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती विशेष आहे. प्रत्येकाची स्वत:ची क्षमता आणि प्रतिभा असते. हे आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलांसाठी सकारात्मक आठवणींची निर्मिती करा. छोट्या-छोट्या संकेतांच्या माध्यमातून त्यांच्या यशाचे कौतुक करा. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टिकर, कुकीज अशा छोट्या वस्तूंनी त्यांना पुरस्कृत करा. तुमच्या अपेक्षांवर खरे न उतरल्यास त्यांना ओरडू नका. पुढच्या वेळेस त्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुलना कधीच करू नका : आपल्या मुलांच्या क्षमतांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करू नका. सर्व मुलांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. त्यांच्या मित्रांशी त्यांची तुलना केल्याने त्याच्या मनात हीनभावना निर्माण होते. तुलना केल्याने प्रतिस्पर्धी असल्याची भावना मुलाच्या मनात निर्माण होते, ज्यामुळे मुलांच्या मनात ईर्षा होते आणि मुलांसाठी हानिकारक ठरू शकते.

कामात दृढ असणे : मूल जेव्हा त्याला दिले गेलेले काम पूर्ण करतं तेव्हा त्याला स्वत:मध्ये आत्मविश्वास जाणवतो. त्याला प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ जेव्हा विवेक आपल्या बूटाची लेस बांधण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता, पण तरीही त्याला जमत नव्हते. तेव्हा तो निराश झाला. यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याला हार न मानता प्रयत्न चालू ठेवण्यास यशस्वी होशील असे सांगितले आणि तो खरंच यशस्वी झाला. त्यांना अशाप्रकारे समजवण्याची गरज असते, जेणेकरून त्यांना ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

शिक्षकांशी बातचीत करा : आईवडिलांनी मुलाची शिक्षक आणि मित्रांप्रति असलेली वागणूक समजूण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाचं सामाजिक जीवन समजण्यास मदत मिळते. बाहेरच्या जगात त्याचे वागणे समजून घेणे गरजेचे आहे. जर तो घरी एखादी गोष्ट करू शकत नसेल, तर तो शाळेत करण्यास सक्षम आहे का?

यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे समजेल की मुलांना शिकण्यात काही समस्या येत आहेत का? किंवा त्यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे का? मुलांच्या मित्रांशी तसेच शिक्षकांशी बोला, जेणेकरून त्याची रूची जाणून घेता येईल.

काल्पनिक खेळ खेळा : काल्पनिक खेळांच्या माध्यमातून मुले त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या आणि वस्तूंच्या मदतीने काल्पनिक परिस्थिती तयार करतात आणि त्यात आपली भूमिका बजावतात. अशा खेळात त्यांना खूप विचार करता येतो. ते ज्या प्रकारचे जीवन असण्याची इच्छा बाळगतात त्याविषयी माहिती मिळते. या खेळांत सामील झाल्यामुळे आईवडिलांना त्यांच्या काल्पनिक जगात डोकावण्याची आणि त्यांना आत्मविश्वासाने प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.

मुलासह विश्वासाचे आणि मित्रत्त्वाचे संबंध विकसित करा, जेणेकरून जेव्हा त्याला समस्या असेल तेव्हा तो तुमच्याजवळ येईल. तुमचं ऐकेल आणि तुमच्या सल्ल्याचा सन्मान त्याला आपलं मत विकसित करण्यात मदत करा. त्याच्या आत्मविश्वास आणि समजूतदार होण्याची सीमा वाढेल. यामुळे त्याला आपल्या मित्रांसमोर आपले म्हणणे मांडण्यात त्यांचे म्हणणे ऐकण्यात आणि दुसऱ्यांच्या मनांचा मान ठेवण्यात मदत मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये आपली ओळख आणि स्वतंत्र अस्तित्त्व राखण्याच्या दृष्टिने हे महत्त्वाचे ठरेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें