नवजात बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्या

* गरिमा पंकज

नवजात बाळाची त्वचा अतिशय पातळ आणि नाजूक असते, कारण त्वचा इतक्या लवकर संरक्षणासाठी आवश्यक असलेले अडथळे पूर्णपणे विकसित करू शकत नाही. त्यासाठी सुमारे वर्षाचा कालावधी लागतो. वातावरण, तापमानातील बदलांचा थेट परिणाम बाळाच्या त्वचेवर होतो. त्यामुळे त्याच्या त्वचेची जास्त काळजी घेण्याची गरज असते. म्हणूनच बाळासाठी चांगली बेबी केअर उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय योग्य तापमान आणि मॉइश्चरायझरचा पुरेसा वापर या बाबींचाही विचार करावा लागेल. बाळाच्या त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अॅलर्जी किंवा संसर्गाचा धोका कमी करणे ही आई-वडिलांची जबाबदारी असते.

त्वचेवर उद्भवणाऱ्या सामान्य समस्या

सुरकुत्या, त्वचेवर लालसरपणा आणि कोरडेपणा यासारख्या समस्या नवजात बाळामध्ये सामान्य असतात. त्याच्या त्वचेत काही समस्या दिसल्यास घाबरू नका. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर तो नव्या वातावरणात स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची त्वचा नवीन वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर काही समस्या नैसर्गिकरित्या उद्भवू शकतात, ज्या काळानुरूप बऱ्या होतात. अनेकदा वेळेआधी जन्मलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर आणि पाठीवर मऊ केस असतात. याउलट उशिरा जन्मलेल्या बाळाची त्वचा अनेकदा कोरडी आणि सालपटे निघाल्यासारखी दिसते. मात्र काही आठवडयांतच त्याच्या त्वचेची ही समस्या दूर होऊ लागते, पण जर काळानुरूप नवजात बाळाच्या त्वचेवर उद्भवलेल्या समस्या बऱ्या होत नसतील तर डॉक्टरांशी संपर्क साधा.

जन्मखुणा

रक्त पुरेसे परिपक्व न झाल्यामुळे बाळाच्या त्वचेवर छोटे लाल डाग दिसू शकतात. या खुणा चेहरा आणि मानेच्या मागे येतात. बाळ रडू लागल्यानंतर त्या प्रकर्षांने जाणवतात, पण या सर्व खुणा वर्षभराच्या आत स्वत:हून निघून जातात. जन्माला आल्यानंतर बाळाच्या त्वचेवर खरचटल्यासारखे किंवा रक्ताचे डाग दिसू शकतात, तेही काही आठवडयांत बरे होतात.

काही विशेष खबरदारी घ्या

बाळाची त्वचा निरोगी आणि मुलायम राहावी यासाठी दैनंदिन जीवनात काही विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते :

बाळाला अंघोळ घालणे : नवजात बाळाची त्वचा अत्यंत संवेदनशील आणि कोमल असते. त्यामुळे त्याला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे असते. त्याला रोज अंघोळ घालण्याची गरज नसते. जन्माला आल्यानंतर पहिले काही आठवडे बाळाचे खराब डायपर बदलणे आणि स्पंज बाथ पुरेसा असतो. वर्षभरानंतर त्याला प्रत्येक २-३ दिवसांनी अंघोळ घालायला हरकत नाही. यामुळे किटाणूंपासून संरक्षण होण्यासह त्याला प्रसन्न वाटेल. अंघोळ घालण्यासाठी टपात ३-४ इंच पाणी भरणे गरजेचे असते. बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी पाणी जास्त गरम नाही ना? हे तपासून पाहा. त्याला कोमट पाण्यात २-३ मिनिटे अंघोळ घालणे पुरेसे ठरते. यादरम्यान शाम्पू किंवा साबण त्याच्या डोळयात जाणार नाही, याची काळजी घ्या.

सतत अंघोळ घातल्यास बाळाची त्वचा कोरडी होऊ शकते. म्हणूनच तुम्ही बाळाला अंघोळीनंतर एखादी चांगली बेबी पावडर आणि मॉइश्चरायझर लावू शकता. लोशन लावत असाल तर ते त्याच्या ओल्या त्वचेवर लावा. त्वचेवर ते घासून लावण्याऐवजी हळूवारपणे लावा. बाळाच्या त्वचेसाठी वापरली जाणारी उत्पादने जसे की, लोशन, साबण, शाम्पू इत्यादीची निवड करण्यापूर्वी ते मुलायम आणि पेराबिन फ्री असतील याकडे लक्ष द्या. शक्य झाल्यास त्याच्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या खास बेबी स्किन केअरचीच निवड करा.

मालिश : बाळाची मालिश करण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. नैसर्गिक तेलाने केलेली मालिश त्याच्या त्वचेला पोषण देते. बाळाची मालिश करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल, राईचे तेल, खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल वापरता येईल. हे तेल खूपच गुणकारी असते. बाळाची सुगंधित आणि केमिकल असलेल्या तेलाने मालिश करणे टाळावे, अन्यथा त्याच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते. मालिश करण्यापूर्वी बाळाला दूध पाजलेले नसावे आणि ज्या खोलीत मालिश केली जाईल तिचे तापमान सामान्य असेल याकडे लक्ष द्यावे.

डायपरसंबंधी काळजी : बाळाच्या शरीरावर डायपरमुळे चट्टे पडू शकतात. डायपर खूप वेळापर्यंत बाळाला घालून ठेवल्यामुळे ही समस्या निर्माण होऊ शकते. बाळ सतत डायपर ओले करू शकते. त्यामुळे वेळेवर डायपर न बदलल्यास त्याला रॅशेश होऊ शकतात. बाळाच्या त्या भागाच्या आसपासची त्वचा लाल आणि सालपट निघाल्यासारखी दिसते. त्वचेला खाज येऊ शकते. यापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या लवकर ओला डायपर बदला. डायपर खूप घट्ट असेल किंवा बाळाच्या त्वचेला एखाद्या खास ब्रँडच्या डायपरमुळे अॅलर्जी झाली असेल तर तुम्ही डायपर लगेचच बदलायला हवा, अन्यथा यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

बाळाचा गुप्तांगाचा भाग नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. बाळाचा डायपर बदलताना तो भाग गरम पाण्याने स्वच्छ करून व्यवस्थित पुसून नंतरच नवीन डायपर घाला. त्याच्यासाठी असा डायपर निवडा जो मुलायम आणि जास्त शोषून घेणारा असेल. जास्तच लालसर चट्टे येऊ लागल्यास तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने झिंक ऑक्साईड असलेले डायपर रॅश क्रीम लावू शकता.

सूर्य किरणे : बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या काळात त्याचा थेट सूर्यकिरणांशी संपर्क येऊ देऊ नका. यामुळे त्याला सनबर्न होऊ शकते. तुम्हाला बाहेर जायचे असल्यास आणि त्यावेळी बाळाचा उन्हाशी संपर्क येणार असल्यास त्याला संपूर्ण हातांचे शर्ट, पॅन्ट आणि टोपी घाला. उघडया राहणाऱ्या भागावर बेबीसेफ सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. तो थोडा मोठा झाल्यावर त्याला काही वेळ कोवळया उन्हात नेता येईल. यामुळे त्याच्या शरीरातील ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघेल.

सुती कपडे घाला

बाळाला अगदी सहज लालसर चट्टे येतात, कारण त्याची त्वचा जिथे दुमडते तिथे त्याला घाम खूप जास्त येतो. त्यामुळे त्याला सुती कपडे घालायला हवे. हे कपडे नरम असतात आणि घाम अगदी सहज शोषून घेतात. सिंथेटिकच्या कपडयांमुळे बाळाला अॅलर्जी होऊ शकते. त्याचे कपडे धुण्यासाठी नेहमी सौम्य साबण किंवा पावडर वापरा. आजकाल बाजारात बाळाचे कपडे धुण्यासाठी खास तयार करण्यात आलेले साबण, पावडर उपलब्ध आहेत.

तापमानाकडे लक्ष द्या

बाळाच्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी वातावरण, तापमानाकडे लक्ष देणे गरजेचे असते. तापमान कमी किंवा जास्त असल्यास बाळ व्यवस्थित झोपू शकणार नाही. याचा परिणाम त्याच्या शारीरिक विकासावर होईल. त्यामुळे तुम्हाला तापमानातील बदलांकडे लक्ष द्यावे लागेल. विशेष करून जास्त गरम होत असल्यास किंवा जास्त थंडीच्या दिवसात बाळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते.

जिराफः संरक्षण की अत्याचार

* मेनका गांधी

१९९०मध्ये कोलकाताच्या प्रसिद्ध प्राणिसंग्रहालयात एका मादी जिराफाला आफ्रिकेतून मागवण्यात आले होते. मादी जिराफ प्रत्यक्षात खूपच सुंदर होती. तिचं नाव एका तिस्ता नावाच्या नदीवरून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी जेव्हा हरकत घेतली गेली की अलीपूर प्राणिसंग्रहालय खूप छोटे आहे, त्यावेळी तत्कालीन मंत्र्यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयाला मोकळ्या जागेत नेलं जाईल, जिथे तिस्ता मोकळेपणाने फिरू शकेल. तो दिवस अजूनपर्यंत उगवला नाहीए. तिस्ताही वाचली नाही आणि ४००० इतर प्राणीही अकाली मृत्यूचे शिकार झाले.

कोलकाता प्राणिसंग्रहालयाने जिराफांना एका ट्रकमधून ओडिशाच्या नंदनकानन प्राणिसंग्रहालयात पाठविलं होतं, पण वाटेत लागलेल्या खराब रस्त्यांच्या धक्क्यांमुळे तिस्ताची कातडी सोलवटली आणि डोकं एका विजेच्या वायरीला लागलं. त्यामुळे करंट लागून तिचा मृत्यू झाला.

मोजकेच राहिलेत जिराफ

जगाला वाघ, हत्ती आणि चिंपांजींची काळजी आहे, पण लुप्तप्राय होणाऱ्या जिराफांची कोणी काळजी करत नाहीए. गेल्या १५ वर्षांत त्यांची संख्या ४० टक्के घटली आहे आणि आता जगभरात केवळ ८०,००० जिराफ राहिले आहेत.

यातील मुख्य दोषींमध्ये अमेरिकाही आहे, जी त्यांना धोकादायक स्थितीत पोहोचलेल्या प्राण्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करायला तयार नाहीए, अमेरिकी पर्यटक जिराफांच्या हाडांपासून बनलेल्या सजावटी वस्तू आवडीने खरेदी करतात. अमेरिकी शान मिरवण्यासाठी रोज सरासरी १ जिराफ मारले जाते. अजून चीनींना याची नशा चढलेली नाही. ज्या दिवशी त्यांच्यावर जिराफांपासून बनलेल्या वस्तू खरेदी करण्याची नशा चढेल, ते आपल्या मनी पॉवरने सर्व जिराफांना एका महिन्यात मारून तुकडे करून चीनमध्ये मागवतील. जिराफांची संख्या आता हत्तींपेक्षा कमी आहे.

जिराफ जगातील सर्वात उंच प्राणी आहे. त्यांचे पाय साधारण उंच माणसापेक्षाही जास्त उंच असतात. ते आफ्रिकेतील ओसाड व कोरड्या भागात चरताना दिसून येतात. ते खूप वेगाने धावू शकतात – प्रतितास ३५ मिलोमीटर वेगाने, पण हा वेग बंदुकीच्या गोळीपेक्षा खूप कमी आहे.

सहजपणे शिकार

जिराफांची मान उंच असते, त्यामुळे जमिनीवरील गवत तर खाऊ शकत नाहीत, पण झाडांची पाने खाऊ शकतात. जवळपास ४५ किलो दिवसातून दोनदा.

अर्थात, ते उंच असतात, त्यांची इच्छा असली, तरी ते वाघांप्रमाणे लपू शकत नाहीत आणि प्राणी, चोर सहजपणे त्यांची शिकार करू शकतात.

तसेही जिराफ समूहाने राहणारा प्राणी आहे. तो पिल्लं आणि मादींसह राहतो. त्यांचे सरासरी वय ४० वर्षे असते. जसे ते मोठे आणि वृध्द होतात, त्यांच्यावरील डाग गडद होतात. जिराफ मादी उभी राहूनच पिल्लांना जन्म देते. पिल्लू जवळपास ६ फुटांचे असते. ते अर्ध्या तासात आपल्या पायावर चालू लागते. एक मादी ५ पिल्लांपर्यंत जन्माला घालू शकते, पण अर्धीच वाचतात.

कधी काळी ते आफ्रिकेतील खूप मोठ्या भागात राहात होते, पण आता छोट्या भागात राहिले आहेत आणि त्यांचे समूह २०हून घटून ६-७चा राहिले आहेत.

तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले

* प्रतिनिधी

वयाच्या 35 व्या वर्षी तरुण आता आपली बचत कमी करत आहेत आणि आपली सर्व कमाई आज छंदात पूर्ण करत आहेत. कोविडमुळे ही महागाई वाढली आहे कारण एकटे राहणारे लोक आता आजचा विचार करतात, उद्या काय होईल माहित नाही? ज्यांचे जवळचे नातेवाईक कोविडच्या मृत्यूचे बळी ठरले आहेत, त्यांच्यात नकारात्मकता भरली होती की उद्यासाठी काय करायचे, उद्यासाठी का वाचवायचे.

ही एक धोकादायक स्थिती आहे. रोगाने खरोखर बचत करण्याची सवय लावली पाहिजे कारण महामारीच्या दिवसात जेव्हा कमाई थांबते आणि उपचारांवरचा खर्च वाढतो तेव्हाच तुमची बचत उपयोगी पडते, कोविडच्या दिवसात उपचारांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, हॉस्पिटलसाठी पैसे नव्हते.

समस्या अशी आहे की कोविडच्या अलगावने लोकांना मोबाईल, लॅपटॉपचे गुलाम बनवले आहे, जे पुन्हा पुन्हा नवीन खरेदी करण्यास चिथावणी देत ​​आहेत. मोबाईल आणि लॅपटॉपवरील ऑनलाइन माहिती केवळ जाहिरातींनी भरलेली नसते, वाचताना ते वारंवार व्यत्यय आणतात आणि आता जाहिरातमुक्त साइटसाठी पैसे दिल्याशिवाय ते गरज नसलेल्या गोष्टी विकतात. कुठेही किंमती तपासू शकत नाहीत.

ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदी करण्याचा एक फायदा म्हणजे दुकानदार स्वतःमध्ये एक फिल्टर आहे. तो फक्त तोच माल ठेवतो जो चांगला आहे आणि ज्यासाठी ग्राहक वेगळ्या दिवशी घरी आल्यावर तक्रार करण्यासाठी पुन्हा उभा राहत नाही. ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी प्रवास करताना खर्च होणारा वेळ आणि पैसा यांचा फिल्टर आहे ज्यामुळे अनावश्यक खरेदी रोखली जाते. दुकानातून सामान घरापर्यंत नेण्याच्या भीतीला आणखी एक गाळण मिळते. माल जर चांगला आणि लोकप्रिय असेल तर तोच माल आजूबाजूच्या अनेक दुकानात मिळतो आणि दुकानदार नफा कमी करून स्पर्धेत स्वस्तात विकतात.

ऑनलाइन खरेदीमध्ये कार्ड पेमेंट करताना लोक या महिन्यात किती वस्तू खरेदी केल्या हे विसरतात. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत. पेमेंट केल्यावर, डिलिव्हरीची वेळ उशीर झाल्यास, गिमीकी दिवा विसरणे ही काही मोठी गोष्ट नाही. वस्तू मिळाल्यावर ती एक प्रकारे भेटवस्तू असल्याचे भासते आणि एखाद्याने भेट दिल्याप्रमाणे पॅकेट उघडले जाते.

या मानसिकतेचा परिणाम म्हणजे आजचा तरुण पैसा कमवत नाही. युरोप, अमेरिकेतील शेकडो तरुण आता पुन्हा मोठ्या शहरांमधून त्यांच्या पालकांकडे स्थलांतरित होत आहेत जिथे राहण्यासाठी अन्न मोफत आहे. जनरेशन गॅप मॅरेज होतात पण एकल पालकही खुश असतात. लग्नानंतर मुलं रिकाम्या हाताने आल्यावर ते अडचणीत येतात आणि मग सासू-सुनेचा वाद सुरू होतो. वेळेत बचत केली असती तर हे घडले नसते.

तरुणांना वाचण्याची कमी-जास्त सवय आणि पिंग-पिग मेसेजमुळे त्यांना गंभीरपणे काहीही करायला वेळ मिळत नाही. रिकामा असणारा प्रत्येक माणूस जेव्हा जेव्हा त्याला कोणालातरी उच्चाचा संदेश पाठवायचा असतो तेव्हा काहीतरी फॉरवर्ड करतो. मोबाईल हातात येताच जाहिरातीही टपकू लागतात आणि लाख प्रयत्न करूनही ते सुटत नाही.

महागड्या तरुणांमुळे संपूर्ण पिढी उपाशी राहणार नाही तर विकास थांबेल. जगाचा विकास बचतीवर झाला. रोमन काळात, पाणी आणण्यासाठी रस्ते आणि जलवाहिनी बांधण्यात आली, यामुळे सामान्य लोकांच्या बचतीमुळे. जेव्हा तरुणांची उत्पादकता जास्त असेल, तेव्हा ते जास्त खर्च करून बचत करणार नाहीत, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कचराकुंडीत जाऊन बसेल. हे कोविड आणि रशियन हल्ल्यांसारखे आहे ज्याचे धोकादायक परिणाम होऊ शकतात.

निरुपयोगी वस्तू खरेदी करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. काहीतरी बनवा आणि ते बनवण्यासाठी वाचून काही माहिती मिळवा. आज आणि उद्या आनंदी राहण्यासाठी बचत करणे सर्वात महत्वाचे आहे.

महिलेच्या माथी प्रत्येक दोषाची जबाबदारी

* रोचिका अरुण शर्मा

आजही स्त्रियांसमोर सामाजिक तसेच धार्मिक बंधने अशा प्रकारे आवासून उभी आहेत की ती कधीही त्यांना गिळंकृत करतील. अनेक योजना येतात, लेख लिहिले जातात, कथा तयार होतात, स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी ‘महिला दिवस’ही साजरा केला जातो. प्रत्यक्षात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत समाज आणि धर्माच्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे महिला घराच्या चार भिंतींआड उसासे टाकत कशाबशा जगत आहेत.

कुमारी मुलगी आणि विधवा दोष

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. झुणझुणवाला यांच्या २५ वर्षीय मुलीचे लग्न ठरवले जात होते. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही. मिठाई कधी देणार, असे झुणझुणवाला यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मिठाई खाऊ घालायला आम्ही तयार आहोत, पण मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. त्यामुळे कुठलेच स्थळ जमत नाही.’’

कसला दोष? असे विचारताच म्हणाल्या, मुलाकडच्यांनी भटाला मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी सांगितले की, पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार मुलीला वैधव्य योग आहे. लग्नानंतर काही वर्षांतच ती विधवा होईल. असे असताना कोण आपल्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून देईल? त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठया स्पष्ट दिसत होत्या.

अविवाहित मुलीला मंगळ दोष

पुण्यात राहणारी स्मिता सांगते की, तिचे लग्न वय उलटून गेल्यावर झाले, कारण तिच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. असे म्हटले जाते की, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न मंगळ असलेल्या मुलाशीच लावून द्यावे लागते, तरच ते यशस्वी होऊ शकते. तसे न झाल्यास दोघांपैकी एकाचा मृत्यू किंवा घटस्फोट होतो. अशा मुलाच्या शोधात अनेकदा मंगळ असलेल्या मुली वय होऊनही कुमारिकाच राहतात किंवा मंगळ दोष दूर करण्यासाठी पूजा अथवा उपाय सांगितले जातात. ते केल्यानंतरच अशा मुलींचे लग्न होते. शिवाय वय वाढूनही लग्न होत नसेल तर समाजाचे टोमणे ठरलेलेच असतात.

घटस्फोटित स्त्री

हैदराबादमध्ये राहणाऱ्या संजनाचा लग्नाच्या ५ वर्षांनंतर वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना मुलगा होता. मुलाला त्यांनी स्वत:कडे ठेवले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने पुनर्विवाह केला. त्या मात्र ५० वर्षांच्या झाल्या तरी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्या स्वत: आयटी इंडस्ट्रीत कामाला आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.

पुनर्विवाहाबाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आता या वयात माझ्याशी कोण लग्न करणार? जेव्हा तरुण होते तेव्हा एका मुलाची आई असल्यामुळे माझ्याशी कोण लग्न करणार होते? दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी कोण कशाला घेईल?’’

अशा प्रकारची कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील जिथे मुलीच्या पत्रिकेत दोष असल्याचे सांगून तिला नाईलाजाने एकाकी, असहाय जीवन जगायला लावले जाते.

विधवा स्त्री

अशाच प्रकारे एक प्रकरण पाहायला मिळाले जिथे एका सुशिक्षित, सुंदर, स्मार्ट महिलेच्या नवऱ्याचा कमी वयातच मृत्यू झाला. नवरा सरकारी नोकरीत असल्यामुळे तिला त्याच्या मृत्यूपश्चात चांगले पैसे मिळाले. तिला लहान बाळही होते.

काही कारणांमुळे सासरच्या माणसांचा आधार न मिळाल्याने ती माहेरी राहू लागली. माहेरी भाऊ-वहिनीला तिचे तिथे राहणे आवडत नव्हते. आईवडिलांनी सुशिक्षित, चांगला कमावणारा, घटस्फोटित मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. पुढे तिच्या मुलावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला मिळालेल्या पैशांवर तिच्या नव्या सासूचा डोळा होता. विधवा, त्यात एका मुलाची आई तरीही तुझ्याशी लग्न केले, असे टोमणे, भांडण झाल्यावर तिला सतत नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागत होते. रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून अखेर तिने स्वत:च घटस्फोट घेतला.

येथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ती विधवा झाली यात तिचा दोष काय? मुलगा लग्नानंतर झाला होता. दुसरा नवरा मात्र घटस्फोटित होता. त्याचे किंवा त्याच्या घरच्यांचे वागणे चांगले नसेल म्हणून कदाचित त्याच्या बायकोने घटस्फोट घेतला असेल. यात त्याची चूक असू शकते. तरीही महिलेलाच सतत विधवा झाल्याचा दोष देणे कितपत योग्य आहे?

ती सुशिक्षित, हुशार होती म्हणून तिचा पुनर्विवाह होऊ शकला आणि दुसऱ्या नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती घटस्फोट घेऊ शकली. तिच्या जागी गावातली, कमी शिकलेली, आर्थिकदृष्टया असहाय मुलगी असती तर तिला जगणे कठीण झाले असते.

सक्षम वीरांगणा

अशाच प्रकारचे आणखी एका महिलेचे उदाहरण आहे, जिचा नवरा सैन्यात होता आणि शहीद झाला. ती महिला सुशिक्षित आहे. तिला एक मुलगा आहे. तिला तिच्या पतीच्या निधनानंतर सैन्यात नोकरी मिळाली. त्यामुळे ती आर्थिकदृष्टया सक्षम आहे. मुलाला तिने प्रेमाने, चांगले संस्कार देऊन वाढवले.

तिला अनेकदा वाईट वाटते, कारण सर्व काही असूनही तिला एकाकी जीवन जगावे लागत आहे. तिला कुठेतरी छानशा ठिकाणी फिरायला जावेसे वाटते, पण कशी आणि कोणाबरोबर जाणार, कारण कमी वयातच पतीचे निधन झाले होते. सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न तिनेही बघितले होते. पतीच्या हातात हात घालून आणि छानसे कपडे घालून एखाद्या सिने अभिनेत्रीप्रमाणे फिरण्याची तिचीही इच्छा होती. तिलाही तिचे खूप सारे सुंदर फोटो काढायचे होते.

सोशल मीडियाचे युग आहे. स्वत:चे फोटो इतरांसोबत शेअर करावे, असे तिलाही वाटत होते. मात्र पती नसल्यामुळे ती मन मारून जगत होती. वय झाल्यावर पतीचे निधन झाले असते तर कदाचित तिचा या सर्व गोष्टींचा आंनद उपभोगून झाला असता. हौस पूर्ण झाली असती. मुलगा लहान असल्यामुळे ती एकटी पडली. मुलाला घेऊन कोणाबरोबर फिरायला जाणार होती, कारण कोणीही नातेवाईक किंवा मित्राला त्याच्या कुटुंबासोबत फिरायला अशी एखादी स्त्री आलेली आवडत नाही. शिवाय कोणीही तिची जबाबदारी घ्यायला तयार नसते.

परितक्ती स्त्री

असेच एक उदाहरण आहे परितक्त्या स्त्रीचे, जिला तिच्या नवऱ्याने भांडण करून घरातून हाकलून दिले. तिची ५ वर्षांची मुलगीही नाईलाजाने आपल्या आईसोबत आजोळी आली. ती महिला माहेरी आल्यानंतर नोकरी करू लागली. आईवडिलांनी विचार केला की, कधीपर्यंत ते तिला आधार देणार? त्यांचेही वय झाले होते. त्यामुळे त्यांनी नातीला तिच्या वडिलांच्या आईवडिलांकडे पाठवले. त्यांना वाटले की, मुलीला आईची गरज भासेलच तेव्हा सासरची मंडळी सुनेला बोलावून घेतील. पण तसे काहीच झाले नाही. अखेर मुलीच्या आईवडिलांनी तिला घटस्फोट मिळवून दिला आणि एका अशा माणसाशी लग्न लावून दिले ज्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याची २ मुले आणि वृद्ध, आजारी आई होती.

हे लग्न झाले, पण ती महिला तिच्या मुलीला स्वत:सोबत ठेवू शकली नाही. जेव्हा ती दुसऱ्या नवऱ्याच्या दोन मुलांना सांभाळत असेल तेव्हा तिला पोटच्या मुलीची आठवण येत नसेल का? त्या ५ वर्षांच्या मुलीवर अन्याय झाला नाही का?

महिलेचे दोन्ही पती त्यांचे आयुष्य अगदी मनासारखे जगत होते. या प्रकरणात मला असे वाटते की, दुसऱ्या लग्नात त्या महिलेला पत्नीचा नाही तर घर सांभाळणाऱ्या बाईचा दर्जा देण्यात आला होता. असे नसते तर दुसऱ्या नवऱ्याने तिच्या मुलीचा स्वीकार केला असता. आई-मुलींची ताटातूट झाली नसती.

पत्रिकेतील दोष आणि उपाय

अनेकदा असेही पाहायला मिळते की, मुलीच्या पत्रिकेत दोष दाखवला जातो. त्यानंतर एखादी पूजा, यज्ञ, होमहवन करून दोषाचे निवारण केले जाते. त्यानंतरच तिच्या लग्नाची पुढची बोलणी केली जातात.

अशाच प्रकारे विधवा महिलांसाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे त्यांचे जीवन लाचार, दयनीय, नरक बनते. एखाद्या महिलेचे विधवा होणे हा तिच्यासाठी शाप ठरतो.

वैदिक ज्योतिष कुंडलीनुसार, विवाह, वैवाहिक जीवन आणि वैवाहिक स्थितीसाठी सप्तम भावाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार विवाहानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या परिस्थितीची जाणीव  स्त्री-पुरुष दोघांनाही करून देण्यात येते. पण डोळयावर अंधश्रद्धेची कापडे लावून बुरसटलेल्या प्रथांच्या जास्त अधीन गेल्यास वैवाहिक जीवनातील सुखाला गालबोट लागते.

सप्तम भावाच्या अभ्यासानुसार, या भावातील मंगळ आणि पाप ग्रह मुलीच्या पत्रिकेत असल्यास विधवा योग येतो.

वेगवेगळे भाव, पत्रिकेतील चंद्र्राचे स्थान आणि राहूच्या दशेनुसार मुलगी विधवा होणार, हे निश्चित होते.

पत्रिकेतील काही दोषांमुळे एखादी स्त्री लग्नानंतर ७-८ वर्षांच्या आतच विधवा होते. लग्न आणि सप्तम या दोन्ही घरात पाप ग्रह असतील तर लग्नानंतर ७ व्या वर्षी नवऱ्याचे निधन होते.

अशा प्रकारचे अनेक योग आणि दशा ज्योतिषांनी वेळोवेळी लिहिले आणि सांगितले. आता तर ही माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

फक्त एवढेच नाही तर अशा माहितीसोबत वेगवेगळया शहरात राहणाऱ्या महिलांची त्यांच्या नावासह त्यांच्या पत्रिकेतील दोष आणि विधवा होण्याच्या योगाची माहितीही देण्यात आली आहे. जेणेकरून हे सत्य असल्याची लोकांची खात्री होईल आणि पत्रिका पाहण्यावर त्यांचा विश्वास बसेल.

या सर्वांव्यतिरिक्त इंटरनेटवर मेनका गांधी आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेचा उल्लेख करण्यात आलाय. हेदेखील सांगितले आहे की, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानानंतर किती कमी वयात त्यांना वैधव्य येणार हे समजले होते आणि तसेच घडले. सोबतच असेही सांगण्यात आले आहे की, जर शनी, मंगळासाठी उपाय केला तर वैधव्य योग टाळता येऊ शकतो.

विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत

धर्मग्रंथांमध्ये ज्या प्रमाणे स्त्रीसाठी पतिव्रता धर्म आहे त्याचप्रमाणे विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत असते. या व्रतानुसार, विधवा स्त्रीने कशा प्रकारे जीवन जगावे, हे निश्चित करण्यात आले आहे.

* विधवा स्त्रीने पुरुषासोबत किंवा तिच्या माहेरीच रहायला हवे.

* विधवा स्त्रीने साजशृंगार, दागिने घालणे किंवा केस धुणे सोडून द्यायला हवे.

* विधवा स्त्रीने दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस अन्नाचा त्याग करावा.

* विधवा स्त्रीने आंबट-गोड खाऊ नये. फक्त साधे अन्न खावे.

* सार्वजनिक कार्यक्रम, शुभकार्य, विवाह, गृहप्रवेशावेळी तिने हजर राहू नये.

* विधवा स्त्रीने शंकराची उपासना करावी. आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्यासाठी उपवास करावेत.

* विधवेसोबत विवाह करणारा नरकात जातो.

* याशिवाय जर एखादी महिला विधवा नसेल पण तिचा पती परदेशात गेला असेल तर तिनेही विधवा व्रताचेच पालन करावे.

व्हिडीओही उपलब्ध

पत्रिका, ज्योतिष, विधवा व्रत इत्यादींवर लेख उपलब्ध आहेत. सोबतच असे व्हिडीओही आहेत ज्यात विधवा स्त्रीने पुनर्विवाह करावा की नाही, हे सांगितले आहे.

विधवा स्त्रीच्या हातून कोणतेही शुभकार्य का केले जात नाही? विधवा स्त्रीने सफेद साडीच का नेसावी? घरातील दोषांमुळेही स्त्री विधवा कशी होते? इत्यादी माहिती या व्हिडीओतून मिळते.

स्त्रीला आशीर्वाद दिला जातो, ‘अखंड सौभाग्यवती भव’ म्हणजे जोपर्यंत ती जिवंत राहील तिचे सौभाग्य अबाधित रहावे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, असा आशीर्वाद एखाद्या पुरुषाला दिला जात नाही, कारण पत्नी मेल्यास त्या पुरुषाला पुनर्विवाहाचा अधिकार असतो. त्याला २-३ मुले असली तरी एखादी स्त्री त्याच्याशी लग्न करतेच. याउलट जर एखादी स्त्री विधवा झाली तर आपला समाज आणि धर्म तिच्यावर असे काही आघात करतो की, तिचे जगणे जणू नरक होते.

विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, जर पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचा दोष स्त्रीच्या पत्रिकेतील ग्रहांना दिला जातो. प्रत्यक्षात हा आपल्या समाजातील बुरसटलेल्या नियमांचा दोष नाही का? हा दोष निवारण्यासाठी उपाय का असू नयेत?

आज एकीकडे आपण विज्ञानातील नवीन शोध, प्रगतीच्या गप्पा मारतो. मग दुसरीकडे विधवा, परितक्त्या, अविवाहित स्त्रीच्या जीवनातील सुधारणेचा विचार दाबून का टाकला जातो. अशा महिलांवर मन मारून जगण्याची वेळ का येते? प्रत्यक्षात फक्त व्यासपीठांवर कायक्रमांचे आयोजन करून काहीच होणार नाही, तर उदार अंतकरणाने त्यांना चांगल्या प्रकारे जगण्याचा हक्क देणे गरजेचे आहे. कारण त्या जशा आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, पण माणूस तर त्याही आहेत.

जर नवरा फ्लर्टी असेल

* पूनम अहमद

रेखाने लग्नाच्या पहिल्याच वर्षी हे नमूद केले होते की तिचा पती अनिलला इतर महिलांसोबत फ्लर्टिंग करण्याची सवय आहे. आधी तिला वाटलं की लग्नाआधी सगळी मुलं फ्लर्ट करतातच. अनिलची सवय हळूहळू दूर होईल, पण तसे झाले नाही.

रेखाला आश्चर्य वाटत होते की तिच्या उपस्थितीतही अनिल इतर महिलांसोबत फ्लर्ट करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांना २ मुलेही होती.

रेखाला वाटायचे, जेव्हा ही अवस्था माझ्यासमोरच आहे, तर मग ऑफिस किंवा बाहेर काय-काय करत असतील. अनिलची कृती पाहून ती विचित्रशा नैराश्यात राहू लागली.

एक दिवस तर खूपच झाले. तिच्याच सोसायटीत राहणारी खास मैत्रीण रीना ही संध्याकाळी त्यांच्या घरी आली. अनिल घरीच होता. जोपर्यंत रेखा रीनासाठी चहा आणते तोपर्यंत अनिल उघडपणे रीनाशी फ्लर्ट करत होता. रेखाला खूप राग आला.

रीना निघून गेल्यावर तिने अनिलला रागाने विचारले, ‘‘रीनाशी इतके फालतू बोलायची काय गरज होती?’’

अनिल म्हणाला, ‘‘मी फक्त तिच्याशी बोलत होतो. ती आमची पाहुणी होती.’’

जेव्हा सहनशक्तीच्या बाहेर होईल

पुन्हा हा प्रकार घडला, अनिलने तिचे बोलणे नाही मानले. अनिल घरी असतांना जेव्हा केव्हा रीना घरी यायची तेव्हा तो तिथेच टिकून असायचा.

एके दिवशी तर हद्दच झाली, जेव्हा त्याने रीनाचा हात मस्करीत पकडला. जेव्हा ती घरी जाण्यासाठी उठली तेव्हा अनिल तिचा हात धरून म्हणाला, ‘‘अहो, अजून थोडा वेळ बसा. इथे सोसायटीतच तर जायचं आहे.’’

रीना तर खजील होत निघून गेली पण रेखाला तिच्या पतीच्या या कृत्याची खूप लाज वाटली. रीना निघून गेल्यावर तिचं अनिलशी खूप भांडण झालं. पण अनिलवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

रेखा आणि रीना खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. रेखाने आपल्या पतीच्या या कृत्याबद्दल एकांतात तिची माफी मागितली आणि तिला असेही सांगावे लागले, ‘‘रीना, अनिल घरी असतांना तू येत जाऊ नकोस. मला फोन कर, मीच येत जाईन.’’

एक दु:खद परिस्थिती बनते

त्या दिवसापासून रीना अनिलच्या उपस्थितीत रेखाच्या घरी कधीच आली नाही. त्यात आणखीनच दु:खद परिस्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा रीनाने अनेकांना सांगितले की रेखा तिच्या नवऱ्याच्या रुपलोभी स्वभावामुळे सुंदर स्त्रियांना घरी येण्यास नकार देते.

अनिल एका कंपनीत अधिकारी म्हणून होता आणि रेखा साध्या स्वभावाची होती. अनिलच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे तिची प्रतिमा डागाळली. ही गोष्ट रेखा कधीच विसरली नाही आणि दु:खी होत राहिली. दोघांमध्ये वारंवार बेबनाव होत राहिला.

एके दिवशी मुलगीही असे म्हणाली,  ‘‘बाबा, माझ्या मैत्रिणी येतील, तेव्हा तुम्ही तुमच्या खोलीतच राहा.’’

मुलाचे लग्न झाले. आता सून घरात आली, तेव्हा अनिल कधी बोलता-बोलता नव्या सुनेचा हात धरून बसवायचा, तर कधी तिच्या खांद्यावर हात ठेवायचा. रेखाला हे सर्व सहन होत नव्हते.

एके दिवशी ती खाजगीत कडक शब्दात म्हणाली, ‘‘तुम्ही जर ही सवय कुठल्याही प्रकारे सोडली नाही, तर आता परिणाम खूप वाईट होईल, विचार करा.’’

रीनाशी गप्पा मारताना तिने तिच्या आयुष्यातील या सर्व गोष्टीही सांगितल्या, ‘‘मी अनिलची फ्लर्टिंगची सवय आयुष्यभर सोडवू शकले नाही. मला माहित नाही काय कारण असेल की एवढया वयातही अनिल इतर महिलांशी फ्लर्टिंगची संधी आजही सोडत नाहीत. त्यांच्या या स्वभावामुळे मी माझ्या माहेरच्या घरीही कधीच शांततेने जाऊन राहू शकले नाही आणि सासरी तर जणू त्यांना त्यांच्या वहीनींसोबत फ्लर्ट करण्याचा परवानाच होता. त्यांच्या या सवयीने मला आयुष्यभर दु:खाने भरून ठेवले आहे.’’

त्याचवेळी आरतीही तिच्या नवऱ्याच्या फ्लर्टिंगच्या सवयीमुळे खूप नाराज आहे. ती म्हणते, ‘‘जर कुठे एखाद्या काउंटरवर मुलगा-मुलगी दोघेही असतील, तर माझा नवरा कपिल मुलीच्या काउंटरवरच अडकतो. माहित नाही की त्याला बोलण्यासाठी किती बहाणे सापडतात.

‘‘हे बघून मला लाज वाटते, जेव्हा मला त्या मुलीच्या डोळयात चिडचिड दिसते. एखाद्या मुलाशी बोलत असताना केवळ कामाबद्दल बोलतो आणि फोन ठेवतो, पण जर एखाद्या मुलीचा फोन असेल तर त्याचा टोनच बदललेला असतो.’’

नातेसंबंधात निर्माण झाला असंतोष

सेक्स रोल्समध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन संशोधनानुसार पुरुष या कारणांसाठी फ्लर्ट करतात – सेक्स करण्यासाठी, नातेसंबंधात राहण्यासाठी, एखादे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी, एखादी गोष्ट ट्राय करण्यासाठी, आत्मसन्मान वाढवण्यासाठी  किंवा मग मौजमस्ती करण्यासाठी, कौटुंबिक थेरपिस्ट कासेंडा लेन यांच्या मते, ‘‘पुरुष आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतो आणि त्याची काळजी घेतो, परंतु तो उत्साह किंवा अहंकार वाढवण्यासाठी फ्लर्टदेखील करू शकतो.’’

लाइफ कोच आणि लव्ह गुरू टोन्या म्हणतात की फ्लर्टिंग फसवणूक नाही, परंतु फ्लर्टिंग समस्या देऊ शकते, फ्लर्टी जोडीदारासह आत्मसन्मान कमी होऊ शकतो.

अशा परिस्थितीत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी तुमच्या जोडीदारावर आरोप न करता त्याच्याशी बोला. त्याला सांगा तुम्हाला काय लक्षात येतं? त्याच्या फ्लर्टिंग सवयीबद्दल लोक तुम्हाला काय सांगतात? तुम्हाला काय वाटते? कधीकधी फ्लर्टी पार्टनरला हे जाणवतच नाही की त्याच्या कृतीमुळे त्याच्या पार्टनरला त्रास होत आहे. जर एखादी व्यक्ती आनंदी नसेल तर ती अशा प्रकारे आनंदाच्या शोधात फ्लर्टिंग करू शकते, स्वत:वर लक्ष केंद्रित करा, संपूर्ण परिस्थिती काळजीपूर्वक समजून घ्या.

महिलांविरुद्ध नवीन शस्त्र बदला अश्लील

* रोहित सिंग

ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा हँडहेल्ड की पॅड फोन सामान्य होते परंतु स्मार्ट आणि डिजिटल फोन अस्तित्वात नसत. शाळेच्या स्वच्छतागृहांच्या भिंतींवर मुलींचे फोन नंबर लिहिले होते. शाळेच्या मागच्या भागात कुठेतरी एका मुलीचे तिच्या नावाचे अश्लील चित्र होते. बहुतेक शाळकरी मुले ती चित्रे बघून मद्यधुंद स्मितहास्य करून जात असत.

सहसा हे कृत्य 2 प्रकारच्या मुलांनी केले होते – एक ज्यांना ती मुलगी कोणतीही भावना देत नाही आणि दुसरे ज्यांना फसवले गेले आहे ते मुलीला लंपट प्रियकराप्रमाणे तिरस्कार करतात. पण त्या दोघांमध्ये काय साम्य होतं ते म्हणजे या दोन प्रवृत्तींची मुलं मुलीवर सूड उगवण्यासाठी आणि तिला बदनाम करण्याच्या हेतूने हे काम करायचे. ही गोष्ट त्यावेळी सामान्य वाटली, पण कुठेतरी रिव्हेंज पॉर्नच्या क्षेत्रात.

काळ बदलला. तरुणांच्या हातात स्मार्ट फोनसह इंटरनेट आले, जेव्हा सर्च बॉक्समध्ये WWW चा पर्याय सापडला तेव्हा लोक डिजिटल सामाजिक बनले. लहान जग अचानक सोशल मीडियावर मोठे झाले. या मोठ्या आभासी जगात, जिथे जगभरातील माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमर्यादित पर्याय उघडले गेले, तेथे इतरांशी संपर्क साधण्याची संधी होती, तर या देवाणघेवाणीमुळे काही धोकेही निर्माण झाले. इंटरनेटवर रिव्हेंज पॉर्न या धमकीच्या स्वरूपात उदयास आले.

सूड पॉर्न केसेस

मेरियम वेबस्टर डिक्शनरीद्वारे परिभाषित केल्यानुसार, रिव्हेंज पॉर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय, विशेषत: सूड किंवा छळ म्हणून, एखाद्याचे अंतरंग चित्र किंवा क्लिप पोस्ट करणे.

म्हणजेच, एखाद्या व्यक्तीच्या खाजगी किंवा वैयक्तिक क्षणांशी संबंधित सामग्री किंवा अश्लील सामग्री या आभासी जगात त्याच्या भागीदाराच्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय ऑनलाइन शेअर करणे याला रिव्हेंज पोर्न किंवा रिव्हेंज पॉर्नोग्राफी म्हणतात. आता प्रश्न असा आहे की आपण या विषयावर का बोलत आहोत?

खरं तर, गेल्या काही वर्षांमध्ये, भारतातही असा ट्रेंड दिसून येत आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर किंवा अश्लील वेबसाइटवर अपलोड करण्याच्या तक्रारी आहेत ज्या सूडभावनेने केल्या गेल्या आहेत. अशीच एक घटना यावर्षी फेब्रुवारीमध्ये चेन्नईमध्ये घडली, जिथे 29 वर्षीय हसनने एका महिलेचे अश्लील व्हिडिओ लीक केले.

वास्तविक मुलीच्या पालकांनी मुलगा आणि मुलगी यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी दोघे 2019 मध्ये गुंतले होते आणि काही महिन्यांनी त्यांचे लग्न होणार होते. कुटुंबातील सदस्यांना मुलाच्या वागण्यावर संशय आल्यावर त्यांनी लग्न थांबवले.

अशा परिस्थितीत, जेव्हा दोघे रिलेशनशिपमध्ये होते, तेव्हा मुलाने त्याचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड केले. लग्न थांबल्यानंतर संतप्त मुलाने ते व्हिडिओ त्याच्या मित्रांना लीक केले आणि ती छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. यासोबतच संतप्त मुलाने हे व्हिडिओ मुलीच्या भावालाही शेअर केले, त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळाली, त्यानंतर त्यांनी मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

ब्रेकअपचा बदला

असेच एक प्रकरण गेल्या वर्षी जून महिन्यात घडले. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे, जिथे प्रियकराने त्याचे सुमारे 300 फोटो पॉर्न साइटला विकले आणि आपल्या मैत्रिणीसोबतच्या ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी पॉर्न साइटवर 1000 व्हिडिओ अपलोड केले.

तो दररोज अनेक प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत असे. एवढेच नाही तर तो पेटीएमद्वारे फोटो व्हिडीओ विकत असे. पीडित मुलीला कंटाळून त्याने पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा त्याला पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी प्रियकराने मैत्रिणीचा बदला घेण्यासाठी हे केले. हे रिव्हेंज पॉर्नचे प्रकरण होते. आरोपीचे पीडितेशी 4-5 वर्षांपूर्वी संबंध होते. त्यानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अश्लील व्हिडिओ बनवले. त्या काळातही आरोपीने त्याचे अनेक ठिकाणी अश्लील फोटो शेअर केले होते.

आधी आरोपीने अश्लील व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देऊन मुलीला ब्लॅकमेल केले आणि आरोपींनी व्हिडिओ कॉलद्वारे तिचे लैंगिक शोषणही केले. जेव्हा पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केले, तेव्हा त्याने पॉर्न साइटवर व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले.

विसरण्याचा अधिकार

एवढेच नव्हे तर 3 मे 2020 रोजी ओरिसाच्या ढेकानल जिल्ह्यात एफआयआर नोंदवण्यात आला. येथील गिरीधरप्रसाद गावात कार्तिक पूजेच्या दिवशी आरोपी शुभ्रांशु राऊत महिलेच्या घरी गेला. दोघेही एकाच गावाचे असल्याने आणि एकत्र अभ्यास करत असल्याने महिलेने शुभ्रांशु राऊतला घरी येऊ दिले.

एफआयआरनुसार, घरात कोणीही नाही हे जाणून शुभ्रांशुने महिलेवर बलात्कार केला. यादरम्यान त्याने आपल्या मोबाईलवरून पीडितेचा व्हिडिओ बनवला आणि फोटोही काढले.

शुभ्रांशुने पीडितेला धमकी दिली की जर तिने कोणाकडे तक्रार केली तर ती व्हिडिओ सार्वजनिक करेल. पीडितेने आरोप केला होता की, या घटनेनंतर आरोपीने 10 नोव्हेंबर 2019 पासून सतत तिला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा पीडित मुलीला कंटाळा आला आणि तिने तिच्या पालकांना हे सांगितले, तेव्हा शुभ्रांशुने पीडितेच्या नावाने फेसबुकवर एक खाते तयार केले आणि त्यावर व्हिडिओ आणि फोटो अपलोड केले.

अनेक प्रयत्नांनंतर, पोलिसांनी एप्रिल 2020 मध्ये गुन्हा दाखल केला आणि शुभ्रांशुला अटक केली. त्याने ओरिसा उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला, जो न्यायालयाने फेटाळला. या सुनावणीदरम्यान, ओरिसा उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस के पाणिग्राही यांनी ‘विसरण्याचा हक्क’ नमूद केला.

विसरण्याचा हक्क या प्रकरणात गोपनीयतेच्या अधिकारापेक्षा वेगळा आहे कारण जिथे गोपनीयतेच्या अधिकारामध्ये माहिती समाविष्ट आहे जी कदाचित हक्काच्या खरेदीदारापर्यंत मर्यादित असू शकते, विसरण्याच्या अधिकारामध्ये एका विशिष्ट वेळी सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेली माहिती समाविष्ट असते. यामध्ये माहिती हटवणे आणि तृतीय पक्षांना माहितीमध्ये प्रवेश करण्यापासून रोखणे समाविष्ट आहे.

गुन्हेगारी धमकी

अशाच एका प्रकरणात चेन्नईच्या एका कोर्टाने दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या बदलत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली होती. प्रकरण गेल्या वर्षी नोव्हेंबरचे आहे. बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपाखाली 24 वर्षीय व्यक्तीला 10 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावताना न्यायालयाने तिखट टिप्पणी केली.

 

कोर्टाने म्हटले की मुले त्यांच्या जोडीदारासोबत घालवलेल्या जिव्हाळ्याच्या क्षणांचे व्हिडीओग्राफ करतात आणि नंतर त्याचा वापर धमकी आणि शोषण म्हणून करतात. न्यायालयाने म्हटले की हा ट्रेंड नवीन सामाजिक वाईट आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालानुसार, आरोपी 2014 मध्ये अंबत्तूर येथील एका कारखान्यात भेटले तेव्हा पीडितेच्या संपर्कात आले. पीडित मुलगी त्या कारखान्यात काम करायची. आरोपी सुरेश एका बँकेत प्रतिनिधी म्हणून काम करत होता आणि पीडितेचा तपशील गोळा करण्यासाठी कारखान्यात गेला होता.

पीडितेला तिचे बँक खाते सुरू करण्यासाठी तपशील देणे आवश्यक होते. पीडितेच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपीने मोबाईल नंबर घेतल्यानंतर मुलीला त्रास देणे सुरू केले. तो अनेकदा तिच्यावर बोलण्यासाठी दबाव आणत असे.

बातमीनुसार, आरोपीने मुलीला कथितरित्या कामाच्या संदर्भात त्याच्या घरी आणले होते जिथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते, ज्याचे व्हिडिओ आरोपींनी रेकॉर्ड केले होते. आरोपीने त्याला वारंवार धमकी देऊन घरी येण्यास सांगितले आणि तसे न केल्यास व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा मुलगी गर्भवती झाली, तेव्हा कुटुंबाला कळल्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार करण्यात आली, ज्यामध्ये न्यायालयाने सुरेशला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

प्रकरणाची पहिली सुनावणी

 

भारतामध्ये रिव्हेंज पॉर्नचे पहिले प्रकरण 2018 मध्ये ‘स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वि. अनिमेश बॉक्सी’ म्हणून समोर आले, ज्यात आरोपीला पीडितेच्या संमतीशिवाय सोशल साइटवर खासगी क्लिप आणि फोटो शेअर केल्याबद्दल 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. 9 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

वास्तविक, आरोपी लग्नाच्या बहाण्याने पीडितेशी सतत संबंध ठेवत होता. या दरम्यान तो या दोघांची जिव्हाळ्याची चित्रे आणि क्लिप बनवत राहिला. लग्नाची खोटी चर्चा पीडितेसमोर आल्यावर आरोपींनी ती छायाचित्रे सोशल साईटवर अपलोड करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. आरोपींनीही मुलीचा फोन वापरून अधिक चित्रे गोळा केली.

नंतर, जेव्हा पीडितेने नातेसंबंध संपवण्याची आणि मुलापासून सुटका मिळवण्याविषयी बोलले, तेव्हा आरोपीने ती छायाचित्रे प्रसिद्ध प्रौढ वेबसाइटवर अपलोड केली, ज्यामुळे पीडित आणि तिच्या वडिलांची ओळख उघड झाली. या प्रकरणाच्या सुनावणीत कोर्टाने सरकारला पीडितेला बलात्कार पीडित मानून योग्य मोबदला देण्याचे निर्देश दिले.

महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांची आकडेवारी

कोरोना महामारीमुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, सोशल मीडियावर लोकांचा क्रियाकलाप वाढला. अशा परिस्थितीत सायबर गुन्ह्यांची प्रकरणेही वाढली. एका अहवालानुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये रिव्हेंज पॉर्नची अधिक प्रकरणे नोंदवली गेली, तर ती वेळ आहे जेव्हा 70% पीडित महिला अशा केसेस नोंदवत नाहीत.

सायबर अँड फ्लेम फाउंडेशन नावाच्या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की भारतात 13 ते 45 वयोगटातील 27% इंटरनेट वापरकर्ते अशा प्रकारच्या बदलांच्या अश्लीलतेच्या अधीन आहेत.

रिव्हेंज पॉर्नची समस्या अशी आहे की एकदा ती ऑनलाईन पोस्ट केली की, ती केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या इतर भागांमध्येही प्रवेश करता येते. याव्यतिरिक्त, जरी सामग्री एका साइटवरून काढून टाकली गेली असली तरी, याचा प्रसार होऊ शकत नाही कारण ज्याने सामग्री डाउनलोड केली आहे ती इतरत्र पुन्हा प्रकाशित करू शकते, म्हणून इंटरनेट प्रवेशाची आवश्यकता आहे. सामग्रीचे अस्तित्व राखते.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2012 ते 2014 दरम्यान अश्लील सामग्रीच्या ऑनलाइन शेअरिंगच्या प्रमाणात 104 ची वाढ झाली आहे. 2010 च्या सायबर क्राईम अहवालात असे दिसून आले आहे की केवळ 35 टक्के महिला त्यांच्या पीडितांची तक्रार करतात. यात असेही म्हटले गेले आहे की 18.3% महिलांना बळी पडल्याची माहितीही नव्हती.

गेल्या वर्षी, ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया’ च्या एका कार्यक्रमात, कायदा आणि आयटी मंत्री यांनी भारतातील रिव्हेंज पॉर्नच्या घटनेबद्दल बोलले. त्यांनी स्वतः कबूल केले की रिव्हेंज पॉर्नच्या घटना भारतात वाढत आहेत जे योग्य लक्षण नाही. ते म्हणाले, “भारतात रिव्हेंज पॉर्नची एक झलक आहे आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मचाही यात गैरवापर होत आहे. या विषयावर मी सुंदर पिचाईंशी बोललो आहे.

महिलांसाठी घातक

भारतात डिजिटलवर रिव्हेंज पॉर्नच्या बहुतेक घटना किंवा त्याऐवजी 90 टक्के घटना महिलांसोबत घडतात. महिला त्यांच्या दैनंदिन जीवनात नेहमीच गुन्हेगारी आणि लैंगिक हिंसाचाराला बळी पडतात. यापूर्वीही बदलाच्या नावाखाली अॅसिड हल्ला, लैंगिक अत्याचार, खून यासारख्या घटना घडत असत. आता रिव्हेंज पॉर्न देखील महिला अत्याचाराचे वैशिष्ट्य बनत आहे.

भारतातील डिजिटलायझेशनमुळे देशातील तांत्रिक शक्ती आणि तंत्रज्ञानातील प्रवेश वाढला आहे, परंतु या आभासी जगात छळ आणि गुन्ह्यांची प्रकरणे नंतर वाढली आहेत. असे गुन्हे, ज्यांना सायबर गुन्हे म्हटले जाते, एक मोठी समस्या बनली आहे जी देशात आणि जगभरात कायदेशीर समस्या बनली आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें