कसे रूळावर येईल बेहाल बॉलीवूड

सीमा ठाकुर

चित्रपट सृष्टीवरही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. बॉलीवूड असो किंवा प्रादेशिक सिनेमा, सर्वांनाच कोरोनाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. इंड्रस्टीतील सर्व विभाग आणि प्रोडक्शनचे काम जसे की, कास्टिंग, लोकेशन शोधणे, टेक स्काऊटिंग, कॉस्च्युम फिटिंग, वॉर्डरोब, हेअर आणि मेकअप आर्ट, साऊंड आणि कॅमेरा, केटरिंग, एडिटिंग, साऊंड आणि व्हॉईस ओव्हरसारखी सर्व कामे ठप्प आहेत. ती करणाऱ्यांच्या हातात कोणतेही काम नाही आणि कमाईचे साधनही नाही.

तज्ज्ञांच्या मते, सिनेमागृह बंद पडणे, शूटिंग थांबणे, प्रमोशनल इव्हेंट न झाल्यामुळे  आणि मुलाखतीही मिळत नसल्याने टीव्ही आणि चित्रपटसृष्टीला आगामी काळात मोठा तोटा सहन करावा लागेल.

हे नुकसान किती मोठे असेल याची अचूक आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही, परंतु असा अंदाज आहे की, इंडस्ट्रीचे सुमारे १०० ते ३० कोटींचे नुकसान होऊ शकते.

बंद पडली आहेत सिनेमागृह

सुमारे ९,५०० सिनेमागृह बंद करण्यात आली आहेत आणि येत्या काही आठवडयात  ती सुरू होण्याची शक्यता नाही. दरवर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत १,२०० चित्रपटांची निर्मिती होते. हे चित्रपट मल्टिप्लेक्सद्वारे कमाई करतात, जे लॉकडाऊनमध्ये बंद आहेत.

मार्चमध्ये सर्वप्रथम रिलायन्स एन्टरटेन्मेंटने रोहित शेट्टीचा चित्रपट ‘सूर्यवंशी’ची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर ‘संदीप और पिंकी फरार’, ‘हाथी मेरे साथी’सह ८३ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.

‘बागी’ हा चित्रपट ३ मार्च रोजी प्रदर्शित झाला, पण त्याची तिकिटे विकली गेली नाहीत. यामागचे कारण भारतातील कोरोनाचा वाढता संसर्ग हे होते.

याचप्रमाणे इरफान खान आणि राधिका मदान यांचा ‘अंग्रेजी मीडियम’ बॉक्स ऑफिसऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आला. प्रादेशिक चित्रपटही प्रदर्शित करण्यात आले नाहीत.

ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वोत्तम पर्याय नाही

चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याने आणि चित्रपटगृहे बंद असल्यामुळे चित्रपट, टीव्ही आणि वेब सिरीजचे शूटिंग थांबविण्यात आले होते, जे लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद झाले. ओटीटी प्लॅटफॉर्म जसे की, अमेझॅन प्राइम, नेटफ्लिक्सवर काही चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु ओटीटीपर्यंत पोहोचणे प्रत्येक चित्रपटाला शक्य नाही. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म प्रत्येक मोठा चित्रपट खरेदी करू शकत नाही.

लोकप्रिय तेलगू चित्रपटाचे निर्माता एस. के. एन यांनी सांगितले की, सुमारे एक हजार खुर्च्यांची क्षमता असणाऱ्या चित्रपटगृहांचे दरमहा दहा लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्म मोठया शर्यतीत पळणाऱ्या घोडयांप्रमाणे उपयुक्त ठरतील की नाही, याबाबत एस. के. एन. यांना खात्री नाही. त्यांनी सांगितले, ‘‘मला वाटत नाही की ओटीटी प्लॅटफॉर्म असे चित्रपट विकत घेतील जे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेले नाहीत. कारण चित्रपटगृहात कोणता चित्रपट हिट ठरेल आणि कोणता फ्लॉप होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, ओटीटी फक्त तेच चित्रपट विकत घेऊ इच्छितात जे आधीपासूनच हिट आहेत.’’

सध्या मनोरंजन क्षेत्रात फक्त ओटीटी प्लॅटफॉर्मच असे आहे जे फायद्यात आहे. लॉकडाऊनच्या काळात  लोकप्रिय शो आणि चित्रपट पुन्हा पाहणे बरेच जण पसंत करीत आहेत, यामुळे या प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांची संख्या वाढली आहे.

२०१९ मध्ये या इंडस्ट्रीने १७,३०० कोटींची कमाई केली. यावरून २०२० मध्ये हा प्लॅटफॉम कमाईची किती रेकॉर्ड मोडीत काढेल याचा अंदाज लावता येईल.

चित्रपटगृहात बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होणे आणि त्यांना लोकप्रियता मिळणे याला महत्त्व आहे, हे जगजाहीर आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे घडणे अवघड आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म पाच कोटींचा चित्रपट विकत घेऊ शकतील पण १०० कोटींचा चित्रपट विकत घेण्याची क्षमता त्यांच्यात नाही. म्हणूनच बॉलिवूडचे चित्रपट चित्रपटगृहातच प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

या चित्रपटांच्या कमाईचा मोठा हिस्सा दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसह भारतातील १० महानगरांमधून येतो जी सध्या कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांचे भविष्य  अंधकारमय आहे.

कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट

प्रसिद्ध तारेतारका सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या नजेसमोर राहत आहेत. कुणाला आपला एसी खराब झाल्याची काळजी वाटत आहे तर कुणी भांडी घासणे हेदेखील कामच आहे, असे दाखवून स्वत:ला वेगळया रुपात सादर करीत आहेत. पण, पडद्यामागे काम करणाऱ्यांसाठी हा बेरोजगारी आणि उपासमारीचा काळ आहे.

चित्रपटाचे शुटिंग आणि संबंधित सर्व कामे बंद असल्याचा तितकासा दुष्परिणाम मोठे बॅनर आणि कलाकारांवर जाणवत नसला तरी तो पडद्यामागे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठया प्रमाणात जाणवत आहे. क्रु मेंबर्स, रोजंदारी आणि छोटया प्रोजेक्टमधून पैसे कमावणाऱ्यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.

दोन वेळचे जेवणही मिळेनासे झाले आहे

प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, कोरोना संकटामुळे बॉलिवूडचे काम ठप्प झाल्यामुळे या इंडस्ट्रीशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या जोडल्या गेलेल्या सुमारे १० लाख लोकांचे नुकसान झाले. अनेकांच्या हाताला काम नाही. बॉलिवूडमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या ३५,००० कामगारांचे सर्वात जास्त हाल झाले.

सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीनटाने या कामगारांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन बॉलीवूडच्या तारेतारकांना केले. त्याला प्रतिसाद देत रोहित शेट्टी, सलमान खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, विद्या बालन हे रेशन तसेच आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आले.

नवीन कलाकार, फ्रीलान्सर फोटोग्राफरही असुरक्षित

मुंबई महानगरी आहे आणि येथे देशातील विविध भागातून तरुणाई आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. पण भाडयाच्या घरात राहणाऱ्या तरुणांनाही घरी परत जावे लागले आहे. ते सर्व छोटया-मोठया  प्रोजेक्टमध्ये काम करून कसेबसे उदरनिर्वाह करीत होते. पण कामच नसल्याने आईवडिलांवर विसंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली.

साधारणपणे दिवसाला ११,००० ते २०,००० रुपये कमावणाऱ्या या फ्रीलान्स फोटोग्राफर्सचे मिळकतीचे मार्ग बंद झाले आहेत. दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टी, अभिनेता हृतिक रोशन यांनी त्यांच्यासाठी आर्थिक मदत दिली आहे.

अशी सावरेल फिल्म इंडस्ट्री

लॉकडाउन उघडल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीला व्यवसायाची गाडी पुन्हा रुळावर आणावी लागेल. पण हे तितकेसे सोपे नाही. चित्रपट निर्मात्यांना प्री-प्रोडक्शनचे काम खूपच काळजीपूर्वक पूर्ण करावे लागेल.

प्रोडक्शन सुरू करण्यासाठी प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने ‘बॅक टू अॅक्शन’ हा अहवाल जारी केला आहे. यात व आणि ऑफ स्टेज, प्री आणि पोस्ट प्रोडक्शन अशा सर्व विभागांसाठी निर्देश जारी केले आहेत. यातील काही प्रमुख सूचना पुढील प्रमाणे :

* लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरुवातीचे ३ महिने सेटवर येणाऱ्या प्रत्येकाचे तापमान तपासले जाईल. त्याने सॅनिटायजेशन, सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे असेल. शक्य असेल तर ‘वर्क फ्रॉम होम’चे पालन करणे गरजेचे असेल. सोबतच मोजकेच स्टार कास्ट, क्रू मेंबर आणि शक्यतो बाहेरच्या लोकेशनवर शूटिंग कमी करण्यावर भर देणे आवश्यक असेल. सेटवर मेडिकल टीम असणे बंधनकारक असेल.

* सेटवर प्रत्येकाला दर थोडया वेळाने हात धुवावे लागतील. ट्रिपल लेयर मास्क लावूनच ठेवावा लागेल. प्रत्येकाला ३ मीटर अंतर ठेवणे या नियमाचे पालन करावे लागेल. हस्तांदोलन, गळाभेट, किसिंग टाळावे लागेल.

* सेटवरील प्रत्येक क्रू मेंबर आणि स्टाफला त्यांचे आरोग्य उत्तम असल्यासंदर्भातील अर्ज भरावा लागेल. कुठल्याही प्रोजेक्टवर स्वाक्षरी करण्यापूर्वी  आपल्या आरोग्याबबात सर्व माहिती द्यावी लागेल.

* शूटिंगच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती नोंदविली जाईल. शूटिंगच्या ४५ मिनिटे आधी सेटवर पोहोचावे लागेल, जेणेकरुन त्यांना कोरोना संसर्ग टाळण्याचे उपाय सांगितले जातील आणि हा नवीन  दिनक्रम त्यांच्यासाठी नेहमीची सवय बनेल.

* जे घरुन काम करु शकतात त्यांना घरुनच काम करावे लागेल. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा एखादा आजार असलेल्याने घरुनच काम करणे बंधनकारक असेल.

आता पहावे हे लागेल की, ही परिस्थिती आणखी किती काळ टिकणार आहे. सर्वांचा प्रयत्न हाच आहे की, काम लवकरात लवकर रुळावर यायाला हवे आणि त्याने वेग पकडला पाहिजे.

जर आपण प्रेमाशिवाय लग्न करू शकता तर आपण पतीशिवाय आई का होऊ शकत नाही?”: आलिया श्रॉफ

9 महिन्यांचा प्रवास हा एक असा प्रवास आहे जो पुरुष आणि स्त्रीच्या जीवनाचा उत्सव साजरा करतो आणि त्यांनी एकत्र सुरुवात केली. परंतु अशा बर्‍याच स्त्रिया आहेत जो भागीदारशिवाय पालक बनणे निवडतात. याची कारणे भिन्न असू शकतात, परंतु केवळ स्त्रीलाच आई असल्याचा हक्क आहे, मग ती विवाहित असो, नात्यात किंवा अविवाहित असो! जरी एकट्या आई होण्याची निवड करणे फार अवघड आहे, परंतु हे देखील खरे आहे की स्त्रियांना आई बनण्याच्या त्यांच्या मार्गाची निवड करण्यासाठी आणि त्यास समर्थन देण्यासाठी कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नाही.

“जर तू प्रेमाशिवाय लग्न करू शकशील तर तू पतीविना आई का होऊ शकत नाही?” असे म्हणणे आहे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनच्या नवीन कथा ‘स्टोरी 9 मंथस की’ ची प्रमुख पात्र असलेल्या आलिया श्रॉफचे. आपण कदाचित ही ओळ ऐकण्यासाठी प्रेरित होऊ शकता, कारण असा विषय आतापर्यंत दूरदर्शनवर दर्शविला गेलेला नाही, ज्यामध्ये एक नायिका स्वतः तिच्या अटींवर आई होण्याची इच्छा व्यक्त करते. त्याचे शीर्षक असे काहीतरी आहे जे ऐकल्यानंतर प्रेक्षकांना निश्चितच या प्रवासाचा भाग व्हायचे असेल.

आलिया श्रॉफ ही आजची एक स्त्री आहे, जी हेतूने ठरलेली आहे, मनाने महत्वाकांक्षी आहे आणि निसर्गाने एक परिपूर्णता दर्शविली आहे! वयाच्या 30 व्या वर्षी, ती एक सुशिक्षित आणि यशस्वी उद्योजक आहे आणि तिने आपल्या आयुष्याची बरीच योजना आखली आहे. परंतु संबंधांच्या बाबतीत ती स्वत:ला व्यक्त करू शकत नाही, मग ती वैयक्तिक असो की व्यावसायिक. आलिया बाहेरून कडक दिसू शकते, परंतु तिचे हृदय सोन्यासारखे शुद्ध आहे आणि लोकांना तिच्याबद्दल खरोखर माहित नाही.

आलिया आई होण्यासाठी निवडते आणि पुरुष निर्णय न घेता, म्हणजेच आयव्हीएफ (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) च्या माध्यमातून तिच्या निर्णयावर ठाम राहते. यासाठी त्याने सर्व व्यवस्था केली आहे, परंतु त्याच्या मार्गात एकच अडथळा आहे आणि तो एक परिपूर्ण शुक्राणू दाता आहे! आलियाच्या मते, तो स्वतःप्रमाणेच परिपूर्ण दाता शोधत आहे, परंतु तो नाही म्हणतो, नशिबाचा खेळ खूप विचित्र असतो आणि प्रत्येक गोष्ट योजनेनुसार चालत नाही!

जेव्हा आलिया तिच्या इच्छेनुसार आई बनण्याच्या व्यस्ततेत व्यस्त असते, तेव्हा तिला अचानक मथुरा येथील तरुण आणि महत्वाकांक्षी लेखिका सारंगधर यांच्याशी सामना करावा लागला. आलिया आणि सारंगाधर दोघेही नदीचे दोन वेगवेगळे किनारे आहेत, ज्यांचे स्वरूप एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. तथापि, सारंगधर यांना आलियाच्या कंपनीत नोकरी म्हणून लेखक म्हणून आपली कारकीर्द मिळते. मग नशिबाने असे वळण घेतले की ते आलियाचे दाता होते! आलियाला तिच्या दाताबद्दल काही माहिती असेल का? शेवटी, ‘स्टोरी 9 महिने’ चे वळण काय असेल? आजपासून 9 महिने कथा जाणून घेण्यासाठी, सोमवार ते गुरुवार रात्री 10.30 वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर.

आव्हानात्मक भूमिका करायला आवडते – नेहा महाजन

* सोमा घोष

मराठी सिनेमा आणि थिएटरद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणारी नेहा महाजन प्रसिद्ध सतार वादक पंडित विदुर महाजन व अपर्णा महाजन यांची कन्या आहे . कलेच्या वातावरणात मोठया झालेल्या नेहाने लहानपणापासून अगदी लहान वयात आपल्या वडिलांच्या सहवासात सतारीचे प्रशिक्षण घेणे सुरु केले. तिची आईसुद्धा मराठी कथा लेखिका आहे. नेहाने मराठी चित्रपटाशिवाय हिंदी, इंग्लिश व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचे नाव सतारवादनात आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाते. अलीकडेच तिने गायक व कवी रिकी मार्टिनसोबत सतार वाजवली आहे, ज्यामुळे ती अतिशय खुश आहे. विनम्र, हसतमुख नेहाशी तिच्या प्रवासाविषयी झालेल्या गप्पा खूपच रोमांचक होत्या, सादर आहे यातील काही भाग :

अभिनयात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?

मला सिनेमा हे माध्यम फारच आवडायचे. मी महाराष्ट्रातील तळेगाव येथील आहे. कॉलेजमध्ये मला केवळ १६ वर्षांची असताना अमेरिकेतील टेक्सासमध्ये  जाण्याची संधी मिळाली. मी तिथे शिकायला गेले, पण मला थिएटरच आवडायचे. परत आल्यावर मी पुण्यात शिक्षण सुरु केले. या प्रवासात मला जे अनुभव आलेत ते शेअर करण्यासाठी मला एखाद्या मंचाची गरज होती. संगीताने मनाला थोडेफार समाधान मिळायचे पण थिएटरमध्ये ज्या कथा कथन केल्या जातात, त्यांचा एक भाग मला व्हायचे होते. म्हणून मी अभिनयाशी जोडले गेले.

अभिनयातील पहिला ब्रेक कुठे व कसा मिळाला?

लहानपणीच मी सतार वाजवणे सुरु केले. अनेक मोठमोठे संगीतज्ज्ञ आमच्याकडे येत असत. मी अनेक मोठमोठया काँसर्टमध्येसुद्धा जाऊन आले आहे. संगीताचे वातावरण लहानपणापासूनच बघितले आहे. पण व्यवस्थित रियाज मी १८ वर्षांची असतानापासून सुरु केला. माझी आई प्राध्यापिका आहे. माझ्या घरी एक चांगला माणूस बनणे, पैसा कमावण्यापेक्षा जास्त महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मी शिक्षणासोबत सतार वाजवणे सुरु केले व नंतरच अभिनयाकडे वळले. पहिला ब्रेक मला दीपा मेहता यांनी ‘मिड नाईट चिल्ड्रन’ यात दिला, जो एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट होता. तो अनुभवसुद्धा खूप छान होता. जेव्हा मी मुंबईला गेले तेव्हा ऑडिशन दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मला कळले की मी हा चित्रपट करत आहे. यामुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

सध्या काय करते आहेस?

माझा शेवटचा इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यात मी रणदीप हुडाच्या पत्नीची भूमिका केली आहे. यानंतर मी रिकी मार्टिनच्या एका गाण्यात सतार वाजवली. मी माझ्या कामाबाबत समाधानी आहे. अभिनयाची कामंही मला बरीच मिळत आहेत. वेब सिरीजसुद्धा करत आहे. मराठीतसुद्धा काही नवे करायचा प्रयत्न करत आहे.

हिंदी, इंग्रजी, मराठी भाषांमध्ये तू काम केले आहे, यात काय फरक जाणवतो?

माध्यम ही माझ्यासाठी फार मोठी समस्या नाही आहे. मला अनेक भाषा ऐकायची सवय आहे. पण यात फरक बजेटचा असतो. काही चित्रपटात कमी असतो तर काही चित्रपटात जास्त असतो. मी जेव्हा रोहित शेट्टीच्या बिग बजेट चित्रपट ‘सिम्बा’मध्ये काम केले तेव्हाचा अनुभव छान होता पण मराठी चित्रपट ‘नीलकंठ मास्तर’ केला होता, ज्याचे बजेट खूपच कमी होते. तिथे व्हॅनिटी व्हॅनसुद्धा नव्हती. एका लहानशा गावात जाऊन शूटिंग करत होते. तिथे कपडे बदलण्यासाठी व मेकअपसाठी आम्ही सगळयांनी एक घर घेतले होते. मला अनेक भाषा शिकणे आवडते. मी चित्रपटाच्या सेटवर भूमिका आणि भावना यात जगते.

अभिनयामुळे सतार वादनापासून दूर जाते आहेस का?

असे काही नाही, कारण एका चित्रपटाचा काळ २-३ महिने असतो आणि या काळात मी सतारीचा रियाज थोडा थांबवते.पण कुठेही गेले तरी सतार माझ्यासोबत असतेच. जेव्हा वेळ मिळतो, अर्धा, एक तास सतार वाजवतेच. शूटिंग संपल्यावर परत सतारीचा रियाज करते.

शास्त्रीय संगीताची परंपरा कमी होत चालली आहे, अशात हे संगीत लुप्त होऊ नये यासाठी तरुणांना काय संदेश देशील?

सगळयांनी विचार करायची गरज आहे की जीवनात काय महत्त्वाचे आहे? कोरोनाच्या संक्रमणाने सगळयांनाच जीवनाचा अर्थ कळू लागला आहे. पैसा कमावण्याच्या स्पर्धेत लोक जीवनातील आवश्यक गोष्टी विसरत चालले आहेत. शिवाय लोकांकडे एकमेकांशी बोलायला दुसरे काही असायला हवे. संगीत त्यांना व्यक्त व्हायला मंच उपलब्ध करून देते. संगीताचा उपयोग ती आपल्या आनंदासाठी करते. जीवनात संगीत असणे खूप आवश्यक आहे. यामुळे माणसाला शक्ति आणि आत्मविश्वास मिळतो.

सतार वादनाचे कार्यक्रम करताना देशी व विदेशी श्रोत्यांच्या अभिरुचीमध्ये काय फरक जाणवतो?

आपल्या देशात सगळयांना तिकडचे जग आवडते. कारण त्यांना ते माहीत नसते. विदेशात राहणाऱ्यांना आपला देश आवडतो, कारण आपण त्यांच्यासाठी नवे आहोत. नवीन गोष्ट सगळयांनाच आवडते. संगीताचे प्रशंसक संपूर्ण जगात असतात. वेगळे काहीही नसते.

कोणत्या प्रोजेक्टने तुझे जीवन बदलले?

प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीना काही नवीन शिकायला मिळते. प्रत्येक काम जीवन बदलून टाकते. माणूस कामामुळेच बदलत जातो.

उत्सव येत आहे आणि सगळे कोरोनामुळे घरात अडकले आहेत. कशा प्रकारे उत्सव साजरा करायला हवा?

प्रत्येक उत्सव घरात आनंद घेऊन येतो. म्हणून अशावेळी घरातच राहून परिवारासोबत उत्सव साजरा करा. यावर्षी तर विचार करून भावनात्मकरीत्या सण साजरा करायला हवा व मीसुद्धा असाच साजरा करणार आहे.

चित्रपट व वेब सिरीजमधील खाजगी दृश्य करताना तू कितपत सहज असते?

कोणत्याही वेब सिरीज अथवा चित्रपटात हिंसा दाखवणे मला अनैतिक वाटते, कारण हे बघायची लोकांना सवय होऊन जाते. चुंबन दृश्यात प्रेम व सखोल भावना दडलेली असते, जे लोकांच्या हृदयात चांगली भावना निर्माण करते. जर कथेत प्रेमाची दृश्य ही कथेची गरज असेल तर ते करण्यात काही हरकत नाही. मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडते.

एखादया बायोपिकवर काम करण्याची इच्छा आहे का?

मला एखाद्या गायकाची बायोपिक करायला आवडेल. उदाहरणार्थ, हिराबाई बडोदेकर, किशोरी आमोणकर वगैरे. एखाद्या स्त्रीला यशस्वी गायिका होणे सोपे नाही. त्यानी अनेक संकटे झेलल्यावर यश मिळते

तुझ्या कामात आई-वडिलांचे किती सहकार्य असते?

सहयोगासोबत मला प्रेरणासुद्धा मिळत असते, आई व बाबा दोघेही क्रिएटिव्ह क्षेत्रातील आहेत. मी दिग्दर्शक झाले तर माझ्या आईच्या कथांवर अवश्य चित्रपट बनवेन.

गृहशोभिकेद्वारे वाचकांना काय संदेश देऊ इच्छिता?

स्वत: शिवाय दुसऱ्यांबाबतही काही चांगला विचार करा. धर्म, जात सोडून व्यक्तिबाबत विचार करा व काहीतरी चांगले करायचा विचार करा, जेणेकरून सगळेच आनंदी राहू शकतील.

आवडता रंग – पिवळा.

आऊटफिट – आरामदायक वेस्टर्न व भारतीय.

आवडते पुस्तक – द स्कल्प्चर, वॉर अँड पीस.

फावल्या वेळात – मेडिटेशन व पुस्तक वाचणे.

नकारात्मक भाव मनात आल्यास –  विचार करते अन्यथा शेअर करते.

पर्यटन स्थळ – कान्हा जंगल, निसर्गाजवळ जाणारे पर्यटन स्थळ.

परफ्युम – फॉरेस्ट एसेंशियलचे नर्गिस.

जीवनातील आदर्श – सौंदर्य, सत्य व शांती.

सामाजिक काम – मुलांसाठी संगीत व शिक्षण क्षेत्रात काम करणे.

मला नाटकी लोक आवडत नाहीत – रसिका सुनील

– सोमा घोष

मराठी मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’मुळे चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री रसिका सुनील मुंबईची आहे. तिने वयाच्या १८व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. कलेचा वारसा असलेल्या कुटुंबातच ती जन्मली. रसिकाला अभिनयाव्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात जाण्याची इच्छा नाही, कारण लहानपणापासून तिने आपली आजी आणि आई यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहिले होते. लहान वयातच ती नृत्य आणि संगीत शिकली. कॉलेजमध्ये गेल्यावर ती रंगमंचावर काम करू लागली. स्वभावाने हसरी असलेली रसिका सध्या लॉकडाऊन काळात आपले छंद पूर्ण करत आहे. तिच्याशी बोलणे रोमांचक  होते. या जाणून घेऊ, काय सांगते रसिका आपल्या एकूणच अभिनयसफरीबाबत :

अभिनयाची प्रेरणा कुठून मिळाली?

माझी आजी कल्पना आणि आई मनीषा यांना मी लहानपणापासून नाटकात काम करताना पाहिले आणि तेव्हापासूनच माझ्यात अभिनयकलेप्रति आवड निर्माण झाली. पण मी स्वत: अभिनयाची सुरूवात कॉलेजला गेल्यापासून केली, कारण तेव्हा मला वाटले की मी या दिशेने मेहनत करू शकते आणि मी तसे केले.

प्रथम जेव्हा अभिनय करण्याबाबत तुझ्या पालकांशी बोललीस, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?

सुरूवातीपासूनच त्यांचा मला पाठींबा होता, कारण लहानपणापासून माझी आई    मला नृत्य आणि संगीताच्या क्लासला घेऊन जायची. याच कारणामुळे मी भारतीय शास्त्रीय संगीतात विशारद केले आणि भरतनाट्यमची पदविका घेतली आहे. घरातून मला कोणीच अडवले नाही. माझी आई खूपच खंबीर व्यक्तिमत्त्वाची आहे. तिच्याकडून मला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळते.

पहिला ब्रेक केव्हा आणि कसा मिळाला?

मी कॉलेजमध्ये अभिनयाला सुरूवात केली होती. त्याआधी मी नृत्य आणि संगीतात व्यस्त होते. मराठीत मी प्लेबॅक सिंगर होते. अभिनयाची सुरूवात मी एका व्यावसायिक नाटकाने केली. त्यानंतरचा माझा मोठा ब्रेक टीव्ही मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हा होता, ज्यामुळे मी लोकप्रिय झाले.

अभिनय करत असताना नृत्य आणि संगीत सुटेल याची भीती वाटली नाही का?

मला असे कधीच वाटले नाही, कारण असे वाटताच मी नवेकाही शिकायला क्लासला जाते. मला नवीन काही शिकण्यात खूप मजा वाटते. मी अनेक वाद्य वाजवायला शिकले आहे. मला तबला आणि हार्मोनियमसुद्धा वाजवता येते. अभिनय करत असताना माझे गायन जवळपास सुटले होते, पण आता परत मी गायनाकडे वळते आहे. मी काही व्हिडिओज आणि शोजही केले आहेत. मी ५व्या इयत्तेत असल्यापासून स्टेजवर वाद्य वाजवण्यास सुरूवात केली.

लॉकडाऊनमध्ये काय करतेस?

लॉकडाऊनमध्ये प्रोडक्टिव्ह काम करायचा प्रयत्न करत आहे, पण अभिनेता इरफान खान आणि अभिनेता ऋषी कपूर यांच्या मृत्यूने मला दु:खी केले आहे. ज्यातून बाहेर पडण्यासाठी  मी संगीत आणि वर्क आऊटचा आधार घेतला आहे. इरफान खानच्या ‘करीब करीब सिंगल’ हा चित्रपट मला खूप आवडला होता, ज्यात त्यांची भूमिका अतिशय सशक्त होती. ऋषी कपूरचाही ‘अग्निपथ’ हा    चित्रपट मला आवडला होता, कारण यात  त्यांनी नेहमीच्या चॉकलेट बॉयच्या प्रतिमेला छेद देत भेदक खलनायकाची भूमिका केली आहे.

कोणत्या प्रकारचे पदार्थ बनवते आहेस?

मला जेवण बनवणे आवडते आणि या लॉक डाऊनमध्येसुद्धा बनवते आहे. मी दुधीची कोफ्ता करी छान बनवते. यासाठी मी काजू आणि टोमॅटो बारीक करून कमी तिखट करी बनवली, जी क्रिमी लायटर ग्रेव्ही तयार झाली. त्यानंतर दुधी किसून कोफ्ते बनवले आणि त्यात टाकले.

हिंदी चित्रपट अथवा शो केव्हा येणार आहे?

बोलणी सुरु आहेत, पण लॉकडाऊनमुळे सध्या बंद आहेत. मला चांगला आणि प्रभाव टाकेल असा अभिनय करायला आवडतो.

तुला आव्हानांचा सामना करावा लागला आहे का?

माझ्या पहिल्या मराठी शोमुळे मी खूप चर्चेत असायचे. दोन वर्षांनंतर मी हा शो सोडला व अमेरिकेत गेले. तिथे जाऊन काही वेगळे करायचे असे ऐकल्यावर प्रेक्षकांनासुद्धा आश्चर्य वाटले. पण मी भारतात माझ्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाचे प्रमोशन करायला भारतात परत आले.

लॉकडाऊन समाप्तीनंतर इंडस्ट्रीला परत रुळावर यायला कोणती रणनीती वापरायला हवी?

याचे उत्तर आत्ता देणे कठीण आहे, कारण इंडस्ट्रीत संपुर्ण टीम असते. जिथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अतिशय कठीण आहे. बहुतेक ७०चे दशक परत येईल. दूर दूर उभे राहून रोमान्स करावा लागेल, जोवर कोरोनाची लस येत नाही. डिजिटल प्लँटफॉर्म आणखीन सक्रिय होईल व कथानकातही बदल करण्याची गरज भासेल.

फॅशन किती आवडते?

मला चांगले कपडे घालून तयार व्हायला आवडते, पण मला आरामदायक कपडे घालायला आवडते. ड्रेस कितीही सुंदर असो पण आरामदेह नसेल तर मी नाही घालू शकत.

गृहशोभिकेद्वारे काही संदेश द्यायचा आहे का?

प्रत्येकाने लॉकडाऊनमध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित ठेवायला हवे, तरच आपण या परिस्थितीतून चांगल्याप्रकारे बाहेर पडू शकू. यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

आवडता रंग – ब्लॅक आणि लव्हेंडर.

आवडती वेशभूषा – कंफर्टेबल आणि बॅगी कपडे.

फावल्या वेळात – संगीत ऐकणे आणि गाणी लिहिणे.

नकारात्मकता दूर करण्याचा उपाय – सकारात्मक विचार आणि मेडिटेशन.

आवडते पर्यटनस्थळ – देशात केरळ , विदेशात अमेरिका.

जीवनातील आदर्श – साधे राहणे आणि मला नाटकी लोक आवडत नाहीत.

आवडता परफ्युम – डेव्हिडऑफ.

सामाजिक काम – मेन्स्ट्रुअल पॅड्ससाठी काम करणे, जे मी सध्या करत आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें