अंधश्रद्धाळू का नाकारतात सत्य

* डॉ. नीरजा श्रीवास्तव

कोठे दिखाव्याचे सोंग तर कोठे भिति श्रद्धा तर काही भोंदू बाबांच्या रूढी हे सर्व मिळून तयार होतो आपला समाज. जिथे धर्मांधतेमुळे पंडीत, पुजारी उत्सवपर्वांना विविध प्रकारच्या कर्मकांडाशी जोडून तथ्यांना नाकारत आणि त्यांचे खरे मूळ आनंददायी स्वरूप नष्ट करतात. शुभ घडण्याची लालसा आणि अनिष्ट घडण्याची शंका यामुळेच त्यांची सेवा करण्यासाठी सामान्य जनता विवश होते अन् भयभीत मनाने लोक अंधश्रद्धेच्या चक्रात अडकत जातात. कारण आपल्या धार्मिक ग्रंथातूनही ईश्वराविषयी, धार्मिक कार्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी शिकवण असते. विरोध केल्यास सर्व काही नष्ट होईल.

भग्वत गीता श्लोक १८/५८

अथ चेत्त्वमहंकारान्न श्रीष्यसि विनंक्ष्यारी. अर्थात, जर तू अहंकारामुळे ऐकलं नाहीस तर तुझा पूर्णपणे नाश होईल.

न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां यो भ्यऽसूयति. भग्वत गीता श्लोक १८/६७. अर्थात, हे ज्ञान तू कोणाला सांगितले नाही पाहिजे. त्या व्यक्तीला तर मूळीच नाही जो माझी निंदानालस्ती करतो..

हे सर्व काय आहे

जर देव आहे आणि देव सर्वशक्ति आहे तर हे त्याला सर्वांना सांगण्याची काय आवश्यकता होती? त्यांनी आपले वचन सर्व भाषांत का नाही लिहिली? काम्प्युटर सॉफ्टवेअरप्रमाणे सर्व ज्ञान-विज्ञान त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. मग पत्रांवर, दगडांवर का लिहून घेतले? जे देवता मानत नाहीत त्यांच्यासमोर गीतेतील वचन वाचण्यास का अडवले? उलट हे वचन त्यांच्या कानी पडताच ते पवित्र झाले पाहिजेत. सरळ गोष्ट आहे की ते या गोष्टीचा तर्क विचारतात आणि यांच्याकडे कोणत्याच प्रश्नांचे उत्तर नसते. मग त्यांची पोल खोल होते. त्यांचे सत्य सर्वांसमोर येते. तथ्यांना नाकारणे, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट मान्य करणे. धर्मभीरू मन येथूनच दुर्बल होते किंवा गैरसमज होण्यास सुरूवात होते असे आपण म्हणू शकतो. या भितिनेच नव-नव्या अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि अंधश्रद्धाळूंची संख्या वाढते.

एक गोष्ट जेव्हा मनात खोलवर रूजली गेली की जर तर्काशिवाय हे करणे चांगले आणि नाही केले तर वाईट होईल. जेव्हा इतरांच्या बाबतीत वाईट होते तसेच आपल्या बाबतीतही होऊ शकते. येथूनच अंधश्रद्धेची मालिका सुरू होते. कधी क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी, तर कधी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी, कधी निवडणुका जिंकण्यासाठी हवन, पूजा केल्या जातात. जर यामुळे काही होणं शक्य असेल तर बलात्कार, हत्या वा दुर्घटना थांबवण्यासाठी भारतासारख्या देशात कोणतेही हवन का केलं जात नाही, ही विचार करण्यासारखी बाब आहे.

दिखाव्याचे सोंग

मांजर आडवी गेली आणि वाईट घडले तर त्यामुळे आपल्या मनात गैरसमज निर्माण होतो. पुन्हा असेच घडले तर आपला गैरसमज पक्का होतो. मग तिसऱ्यावेळेसही असे घडले तर गैरसमजाचे रूंपांतर अंधश्रद्धेत होते. लोकांच्या मनात भीती एवढी रूजलेली असते की ते आपला मार्ग बदलतात किंवा दुसरे कोणी या रस्त्याने जाईल याची वाट पहात बसणे किंवा पाच पावले मागे जाणे. मनातल्या भितिचे घर एवढे मोठे झाले की कधीकाळी काही चांगलेही घडले असेल याची आठवणच राहिली नाही. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला असे करत करत याची माऊथ पब्लिसीटीच करून सगळीकडे ही गोष्ट पसरवली आहे. जेवढी संख्या या धर्मभीरूची वाढली नाही त्याहून अधिक संख्या अंधश्रद्धाळूची वाढलेली आहे. धर्मातील नियम हे व्यक्तिचे मन दुर्बळ होण्यामागील दुसरे कारण समजले जाते. ज्यामुळे लोक श्रद्धेच्या तथ्यांना सरळसरळ नाकारू लागले.

दिखाव्याचे सोंग करणे हे तिसरे कारण आहे. जसे की काही लोक धार्मिक कर्मकांडापासून अलिप्त राहतात. मात्र दर्शवतात की ते खूपच धार्मिक आहेत. अतिशय सच्चे आणि विश्वासू अशी पवित्र आत्मा असलेली व्यक्ती आहेत. ते दान-पुण्याच्या आड गोरखधंदा किंवा काळेधंदे चालवतात. जगाच्या आणि न्याय व्यवस्थेच्या डोळ्यांत धूळ फेकत प्रंचड धन-दौलत, मान-सन्मान, प्रतिष्ठा कमावतात.

परंपरांचा धावा करणे

प्रतिष्ठा पणाला लागल्यावर, जीवनात आणखी काय उरणार? अशी लोकांची धारणा बनलेली आहे. भ्रष्ट नेते, करचोरी करणे, सिने तारका मोठ्या थाटात माध्यमांच्या घोळक्यासह मंदिरात प्रवेश करतात. देवी-देवतांचे दर्शन, मोठ्या प्रमाणात दान करून स्वत:ला धार्मिक, पवित्र आणि स्वच्छ चारित्र्याचे असल्याचे ढोंग करतात. हे सर्व काही डोळे उघडण्यासाठी पुरेसे नाहीए? खरंतर आपण झोपत नाही फक्त डोळे बंद करून असतो. झोपणाऱ्या व्यक्तिला जागं करता येत, परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं करता येऊ शकत नाही.

चौथे कारण म्हणजे भोंदूबाबाच्या रूढींचा धावा करणे. आपले पूर्वज, घरातील वृद्ध व्यक्ती ज्या पूर्वापार करत आलेल्या आहेत, त्याचेच डोळे झाकून अनुकरण केलं जातं. असे करण्यातच लोक आपले कर्तव्य मानतात. असे वागण्याला ते मोठ्यांप्रती त्यांचे असलेले प्रेम-आदर दाखवण्याचा मार्ग समजतात. याबाबतीत कोणताही तर्क लावत नाहीत. फक्त अनुकरण करतात. असे करताना सुंतष्टी मिळाली, चांगले वाटले तर हळूहळू विश्वासही बसू लागला. जसे की कुलूप लावून आरामात फिरायला निघून जाणे कारण आता घर सुरक्षित आहे. या कर्मकांडाचे, अंधश्रद्धांचे पालन करून आपले भविष्य सुरक्षित बनत आहे असा अनुभव लोक करू लागतात. थोरामोठ्यांना करताना पाहिले म्हणून त्यांचे अनुकरण काही विचार विनिमय न करता तसेच केले जाते.

पाचवे कारण म्हणजे असाक्षरता आणि अज्ञानता. हेदेखील एक मोठे कारण आहे. आज शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार-प्रचार होत आहे. काही लोकांना का, कसे हे प्रश्न पडू लागले आहेत. व्यक्ती प्रथम त्या गोष्टीचे कारण समजू इच्छितात आणि मग ते मान्य करू इच्छितात. परंतु देशाची संख्या आजही १०० टक्के शिक्षित झालेली नाही. काही लोक मोबाइल आणि गाड्यांचा उपयोग तर करतात, पण भोंदू बाबाच्या चमत्काराच्या आशेने त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या कचाट्यात अडकतात. साई बाबा, आसारामबापूसारखे लोक कोठे आहेत? यांची सत्यता आज कोणापासून लपलेली नाही. जीव धोक्यात घालून, दुर्गम डोंगराळ भागात देवी देवतांचे दर्शन घ्यायला लोक मंदिरात जातात. काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो पण त्यांना विश्वास असतो की शरीराला कष्ट दिले, उपवास केला, दान धर्म केल्यास देवीदेवता प्रसन्न होऊन आपले कल्याण करतात. इच्छा-आंकाक्षा पूर्ण करतात. पण जर यांना कोणताही तर्क का आणि कसे शक्य आहे विचारले तर याचे उत्तर त्यांच्याजवळ नसते.

अतार्किक कहाणी

कोणी अडविले तर नजर लागली किंवा काम सुरू होताच कोणी शिंकले तर वाईट होईल. जर कोठे काणा व्यक्ती दिसल्यास खूप वाईट, डोळा फडफडणे, दिवा विझणे, मांजर आडवी गेली, कुत्र्याचे रडणे इत्यादी कोण जाणे किती गैरसमज पाळले जातात. शिक्षण घेऊन त्यांनी आपलं ज्ञान वाढवलं तर त्यांना सर्व कारणे ज्ञात होतील. जगात असे काहीच नाही ज्याचे कारण नाही, तर्क नाही. आपल्याला माहिती नाही हे आपले अज्ञान आहे.

दिवस-रात्र कसे होतात? माहिती नाही म्हणून काही तरी स्वरचित बनावट गोष्ट बनवली. जसे की राक्षस रोज सूर्याला गिळकृंत करतो किंवा यासारखाच आणखी कल्पनाविलास करतात. आजही जगात केवढ्या कला, विज्ञान लपलेले आहे. आपण त्यादृष्टीने आपला मेंदू वापरला पाहिजे. आपण या बनावट गोष्टींपासून वाचले पाहिजे. त्यासाठी साक्षरतेसह ज्ञानाची जोपसना करणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायचे सोडून आपण निरर्थक कार्यात व्यस्त राहातो आणि जीवनातील अनमोल वेळ वाया घालवतो. अंधश्रद्धेतच अडकून राहिल्यास, जीवनात संपूर्णत: प्रसन्नही राहू शकणार नाही म्हणूनच प्रत्येकाने साक्षरतेसोबत आपल्या बुद्धीचे बंद दरवाजे उघडून ज्ञानाचा प्रकाश दुरवर पसरवला पाहिजे.

धार्मिक उपवास एक जीवघेणं कर्मकांड

* हरि विश्नोई

धर्माच्या नावावर आपल्या समाजात वर्षांनुवर्षं विविध प्रकारे कर्मकांड होत आली आहेत. उपवास हा त्याचाच एक भाग आहे. पुण्य कमवण्यासाठी, मोक्ष मिळवण्यासाठी, नवस करण्यासाठी किंवा अगदी दुसऱ्यांचं अनुकरण करून खाणंपिणं सोडून दिलं जातं. पण हे बरेच दिवस उपाशी राहणं जीवावर बेतू शकतं.

काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अशीच एक घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय आराधनाने सलग ६८ दिवस उपवास केला. यात ती संपूर्ण अन्नत्याग करून फक्त पाणी पित होती. यामुळे ती अशक्त बनली. पण तरीही तिला नववधूप्रमाणे सजवून-नटवून, रथात बसवून तिची मिरवणूक काढण्यात आली.

आराधनाचं व्रत पूर्ण झाल्यानंतर साजरा करण्यात आलेल्या सोहळ्याला बरीच गर्दी जमली होती. यात काही नेतेही उपस्थित होते. पण त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या आईवडिलांविरूद्ध चुकीच्या उद्देशाने हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन त्यावर पडदा टाकू पाहणाऱ्या भक्तांनी मृत मुलीला बालतपस्वी म्हणून जाहीर केले.

धर्म एक व्यसन आहे आणि आपल्या देशात अशा धर्मांध आईवडिलांची कमतरता नाही, जे साधूसंतांच्या आहारी जाऊन आपल्या निष्पाप मुलांना त्यांच्या हातात सोपवतात किंवा मांत्रिकांच्या बोलण्याला भुलून आपल्या नको त्या स्वार्थासाठी मुलांचा बळी देतात. वर्तमानपत्रांमध्ये रोज अशा बातम्या छापून येत असतात.

धर्मांधांची कमतरता नाही

डोळे झाकून उपासतापास केल्याने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बिजनौरमध्ये एक महिला देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस उपाशी राहिली. या दिवसांमध्ये ती फक्त दोन लवंग पाण्यासोबत अख्ख्या गिळून खात असे,

एक दिवस तिच्या अन्ननलिकेत लवंग अडकली आणि तिथे जखम झाली. त्यानंतर ४ दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ती महिला वयाने मोठी होती पण आराधना तर अल्पवयीन होती.

कमी वयाच्या मुलीला ६८ दिवस उपाशी राहण्याचा परिणाम माहीत नव्हता. तिच्या आयुष्यासाठी हा निबंध धोकादायक ठरेल याची तिला कल्पना नव्हती. अशावेळी उपाशी राहण्याचे परिणाम काय होतील हे तिच्या आईवडिलांनी तिला समजावणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनी तिला असं करण्यापासून रोखणं आवश्यक होतं. पण त्यांना आपल्या समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची होती.

पुस्तकांतून मिळतंय प्रोत्साहन

धर्माच्या पुस्तकांत व्रतवैकल्यांचा महिमा सांगण्यात आला आहे. याला त्यागतपस्या म्हटलं गेलं आहे. योग दर्शन, जैनेंद्र सिद्धांत कोश, वसुनंदी श्रावकाचार, जैन दर्शन व्रत विधान, सर्वोदय जैन तंत्र, नैसर्गिक चिकित्सेने रोगमुक्ती आणि दैवी उपचार, इत्यादी अनेक पुस्तकांमध्ये उपवासामुळे पोट बरे होणे, तब्येत चांगली होणे, चेहऱ्यावर चमक येणे आणि विविध रोगांपासून मुक्ती असे फायदे सांगण्यात आले आहेत.

याशिवाय लोकांना धार्मिक उपवासांच्या पद्धती सांगून या चुकीच्या परंपरेला प्रोत्साहन देणारी कितीतरी पुस्तके तीर्थस्थळे, मंदिर, फूटपाथवर बेधडक विकली जातात. सत्यनारायण, संतोषी माता आणि वैभव लक्ष्मी इ. देवांच्या नावावर भक्तांच्या संख्येत वाढ होतच राहते.

निरर्थक गोष्टी

कधीतरी पोटाला आराम म्हणून किंवा आजारी पडल्यावर हलकं जेवण किंवा एकवेळ उपाशी राहाणं समजून घेण्यासारखं आहे. पण मोक्ष मिळवण्यासाठी महिनाभर सातत्याने उपाशी राहाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे.

पायी चालत तिर्थक्षेत्री जाणे किंवा लोळत लोळत मंदिरात जाणे, आपल्या शरीरावर चाबूक, चाकू, वगैरे मारून घेणे आणि उपाशी राहून कष्ट सोसणाऱ्यांचे गोडवे गायले जातात. त्यामुळे बरेचसे धर्मांध लोक जेवण-खाणं सोडून उपासतापास करत राहतात. काहीवेळा तर महिनोंमहिने उपाशी राहतात.

गुरू घंटाळ

धर्मगुरूंच्या मते उपवास हे महाकल्याणकारी, शास्त्रीय, पापनाशल, स्वर्ग आणि मोक्ष मिळवून देणारे तसेत मनातल्या इच्छा पूर्ण करणारे असतात. आपलं म्हणणं खरं ठरवण्यासाठी निरर्थक उदाहरणे देतात. माणसे अति खाल्ल्याने मरतात. भुकेने नाही असं त्यांचं म्हणणं असतं. लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी उपवास करूनही जिवंत राहिलेल्या लोकांच्या काल्पनिक गोष्टी ऐकवत राहतात.

धर्मगुरू व्रतवैकल्यांना प्रोत्साहन देतात कारण अशाच गोष्टींमुळे त्यांचा धंदा चालतो. व्रतांमध्ये दान करण्याचा सल्ला दिला जातो. दानामध्ये मिळालेला सर्व माल ते स्वत:च हडप करतात. असे उपवास करणाऱ्यांची संख्या वाढली की त्यांना हवी तशी वातवरणनिर्मिती आपोआपच मिळते.

गावांमध्ये आणि शहरांतही बऱ्याच मुली लग्न वेळेत आणि चांगल्या घरामध्ये व्हावं म्हणून १६ सोमवार, संतोषी माता आणि बृहस्पती यांसाठी दिवसभर उपाशी राहतात, गरीब महिला श्रीमंत होण्यासाठी वैभव लक्ष्मी व्रत करतात. पुरुष रोजगार आणि नोकरीतील बढती यासाठी मंगळवारचा उपवास करतात.

कर्मकांड

पुरूष असोत वा महिला उपवासाच्या नावावर आजकाल सगळे दिखावाच करत असतात. उपवास फक्त नावाला असतो. पण त्या दिवशी एरव्हीपेक्षा जास्त फळे, वडे, तिखट मीठ घालून राजगिऱ्याच्या पुऱ्या, पराठे, लाडू, मिठाई इ. गोष्टी मनसोक्त हादडल्या जातात.

एकादशी, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर सर्व सण मिळून वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी साधारण २५० दिवस उपवासांचे असतात. आठवड्याला, पंधरवड्याला किंवा दर महिन्याला धान्य आणि मीठ असलेलं अन्न सोडून उपवास करणं शक्य आहे. पण भक्ती जीवावर बेतू शकते.

उपाशी पोटाचे परिणाम काय असतात?

वेळेवर न जेवल्याने तब्येतीवर वाईट परिणाम होतो. आहारतज्ज्ञ ममता यांच्या म्हणण्यानुसार बराच काळ शरीराला इंधन न मिळाल्याने ताकद देणारे ग्लायकोजन तुटू लागतात. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. खूप वेळ उपाशी राहिल्याने रक्तातील ग्लुकोज घटू लागते. पेशी कमकुवत होतात. रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. तसेच वजन कमी होते. असे सतत होत राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो.

उपदेश

खरा दोष धर्मगुरू आणि धर्म प्रचारकांचा आहे. ते सतत सांगत असतात की उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं. आत्म्याची ताकद वाढते, दु:ख नाहीसं होतं आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे भित्रे भक्त त्यांच्या बोलण्याला भुलतात.

सुखी राहण्यासाठी उपासतापासांच्या जंजाळातून बाहेर पडून अंधश्रद्धांपासून मुक्ती मिळवणं आणि विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. याशिवाय हे समजून घेण्याची गरज आहे की इच्छा उपवास करून वा मरून नव्हे, बुद्धिच्या आणि मेहनतीच्या बळावर पूर्ण केल्या जातात. आयुष्यातल्या समस्या कर्मकांडाने नाही तर समजूतदारपणे सोडवल्या जातात.

डोळे द्ब्राकून केल्या जाणाऱ्या उपवासांचा फायदा भक्तांना कमी तर धर्मगुरूंनाच जास्त होतो. आजच्या विज्ञानयुगात अशाप्रकारची ढोंगं करून आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे स्वत:ला फसवण्यासारखं आहे. उपवासाने कोणाचं भलं व्हायचं असतं तर एव्हाना ते झालंही असतं. त्यामुळे उपाशी राहण्याचा काहीच फायदा नसतो.

दानाच्या मोबदल्यात प्रेम मिळविण्याची धार्मिक पद्धत

* मोनिका गुप्ता

रामायण, गीता, कुराण, बायबल यासारख्या धार्मिक ग्रंथांना धंद्याचे माध्यम म्हणावे की मग नैतिक शिक्षण मिळविण्याचे माध्यम? पाहायला गेल्यास आज आपल्या देशात देवाच्या नावे सर्वात मोठा धंदा सुरू आहे. धंदा करायचाच असेल तर धर्माच्या नावाखाली कशाला? आजच्या युगात याचा काहीच अर्थ नसतानाही लोक हे ग्रंथ कशासाठी वाचतात आणि ऐकतात? देवाच्या नावाखाली एक माणूस दुसऱ्या माणसाला लुटून निघून जातो. धर्माच्या नावाखाली मारहाण केली जाते.

आपल्या ग्रंथात खरेच असे लिहिले आहे

प्रत्यक्षात एक धार्मिक कथा जिथे एका पत्नीने आपल्या पतिचे प्रेम मिळविण्यासाठी पतिलाच दान म्हणून दिले, ही पौराणिक कथा आहे, पण आजही ऐकविली जाते. फेसबूकवर, अध्यात्मिक कथांच्या पेजवर पोस्ट केलेल्या अशा कथांना बऱ्याच लाईक्सही मिळाल्या आहेत. आजचे युग, आजचा काळ, आजच्या लोकांशी त्या युगातील कथांचा खरंच काही संबंध आहे का?

ही कथा कृष्ण लीलांशी संबंधित आहे, त्याच कृष्णाशी ज्याने गोपिकांशी रासलीला खेळून स्नानाच्या वेळी गोपिकांचे कपडे पळवले होते. कथेच्या सुरुवातीचे वाक्य असे आहे की कृष्णाच्या १६००८ पत्नींमध्ये राणी होण्याचा मान फक्त ८ जणींनाच होता. हे कुठल्याही युगात स्वीकारले जाणार नाही, परंतु आजच्या काळात अशाप्रकारे त्याचे वर्णन करणे चुकीचे आहे.

लोभ आणि मत्सर

आजच्या युगात, पत्नी असूनही तुम्ही दुसरे लग्न केले तर आपला समाज आणि कायदासुद्धा तुम्हाला दोषी मानतो, कारण आजच्या काळात समाज आणि कायदा दोघेही याविरूद्ध आहेत. आजच्या युगात असे झाल्यास पहिली पत्नी पोलिसांपेक्षाही जास्त आक्रमकपणे विरोध करेल. अशावेळी सत्यभामाची कथा सातत्याने सांगून एकापेक्षा जास्त महिलांशी असलेल्या संबंधाच्या कथेचा गौरव का केला जातो?

कथेत असे सांगितले आहे की सत्यभामा आणि रुक्मिणी अशी कृष्णाच्या दोन राण्यांची नावे होती. सत्यभामाला गर्व होता की कृष्ण तिच्यावरच सर्वात जास्त प्रेम करतो. पण जिथे प्रेम असते, तिथे केवळ सकारात्मकताच असते. जिथे नकारात्मकता येते, ते प्रेम खरे असूच शकत नाही. शिवाय ही अभिमानाची गोष्ट आहे, गर्व असण्याची नाही. पण कथेत लेखक म्हणतात की कृष्णाचे तिच्यावर इतके प्रेम असूनही सत्यभामाला अधिक प्रेम हवे होते आणि तेच सत्यभामाच्या आयुष्यात लोभ आणि मत्सर घेऊन आले, जो इतका वाढला की सत्यभामाने कृष्णालाच दानात देऊन टाकले.

कथेत लेखक सांगतो की नारदला याबाबत समजले त्यावेळी त्याचे काम तर तसेही देवलोकात भ्रमण करणे हेच होते, मग ते भ्रमण करत राहाणे असो किंवा त्यावेळी कळ लावणे, काय फरक पडतो? आजच्या युगात नारदासारख्या व्यक्तिरेखेचे कौतुक करणे चुकीचे आहे, पण कथांमधून त्याला उच्च स्थान दिले जाते. नारदाने सत्यभामाला आपल्या जाळयात अडकवले आणि सांगितले की, तिने तुलाव्रत करावे, ज्यामुळे श्रीकृष्णाचे सत्यभामावरील प्रेम कितीतरी पटीने अधिक वाढेल.

बिनबुडाची कथा

आज जर तुम्ही तार्किकपणे या उपवासाचा संपूर्ण विधी ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल. या व्रताच्या संपूर्ण विधीबाबत नारदांनी सांगितले की आधी कृष्णाला दानात देऊन नंतर परत मिळविण्यासाठी कृष्णाच्या वजनाचे सोने द्यावे लागेल. सत्यभामा हे कार्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कृष्ण नारदाचे गुलाम होतील. असा प्रेमाचा सौदा करायला कोण शिकविते? हा एक प्रकारचा जुगार आहे, हेदेखील येथे पौराणिक कथेच्या रूपात मनावर बिंबवले जाते.

नारदाच्या या खेळाकडे दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास लक्षात येते की या युगात सर्व मोहमाया आहे. आजही नारद प्रत्येक घरात, प्रत्येक मंदिर, मशिदीत बसलेला दिसेल. कुठे फकीर म्हणून, कुठे पुजारी म्हणून, तर कुठे भगवी वस्त्र परिधान केलेला. कोणी चंदनाचा टिळा लावून सकाळी सकाळी टीव्हीवर ज्ञान पाजळत असतो.

अशा कथांचा असा प्रभाव पडतो की यामुळे कोणाचेही काम पूर्ण होत नाही. मेहनत घेण्याऐवजी आपण हातांच्या रेषा दाखवण्यातच धन्यता मानतो आणि हात पाहून भविष्य सांगणारा तुमचा भविष्यकाळ आणि सोबतच प्रत्येक समस्येचे समाधान सहजपणे सांगून झोळी घेऊन गल्लोगल्ली फिरतो. पण मग त्याच्या आयुष्यात स्थिरता का नसते?

सत्यभामाला प्रेम कृष्णच देऊ शकत होते, नारद नाही. ही वस्तुस्थिती सत्यभामा समजूच शकली नाही. तिच्यातील लोभ आणि अभिमानाने तिला विचारच करू दिला नाही. ती नारदाच्या बोलण्यात फसत गेली आणि विसरून गेली की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तोच आपले दु:ख दूर करू शकतो, इतर कोणीही नाही.

खरे प्रेम आणि खरा विश्वास

कथेतील सत्यभामाच्या व्रतानुसार कृष्णाला दानात देण्यात आले. आता कृष्णाला तराजूवर बसवून त्याच्या वजनाइतके सोने दान करण्याची वेळ आली. सत्यभामाने पूर्ण प्रयत्न केला, पण ती अपयशी ठरली. तितके सोने गोळाच करू शकली नाही. शेवटी रुक्मिणीने खरे प्रेम आणि विश्वासाने सोने बाजूला करून तुळशीचे एक पान दुसऱ्या पारडयात टाकले आणि त्याचे वजन कृष्णाइतके झाले. सत्यभामाचा अभिमान तिथेच गळून पडला. यामुळे सोने तुच्छ झाले आणि तुळशीची पूजा श्रेष्ठ ठरली. सोने द्या प्रेम मिळवा हेदेखील सांगितले गेले आणि तुळशीची पूजा करा हेसुद्धा.

या कथेत उपदेश देण्यात आला की खरे प्रेम दिखावा करून मिळत नाही, प्रेम कोणतीही वस्तू नाही, जिचे वजन करता येऊ शकेल. जे पारखून पाहण्यासाठी योजना आखावी लागेल. वास्तव असे आहे की ही एक भावना आहे, जी अनुभवता येते.

या कथेमागचा छुपा उद्देश असा की साधुसंत पंडित पतिचे प्रेम परतवूही शकतात आणि परतही हिरावूनही घेऊ शकतात. म्हणूनच पतिला खूश करण्यासाठी त्याचे प्रेम मिळविण्यासाठी, मोठया प्रमाणात दान करा, अंधविश्वासाच्या मार्गावरून चाला. कोणाच्याही बोलण्यात येऊन आपले सर्वस्व गमावून बसा. जसे सत्यभामाने नारदाच्या शब्दात येऊन केले.

आजच्या काळात लोक जर देवाला खूप सारे सोने-चांदी दान करत असतील तर ते अशाच कथांनी प्रेरित होऊन. हे पुन्हा पुन्हा मनावर बिंबवले जाते की देव लोभी आहे. आपण त्याला काही देत नाही तोपर्यंत तो आपली इच्छा पूर्ण करत नाही. देव लाच घेतो आणि त्याचे एजंट येऊन घेऊन जातात. अशा प्रकारच्या कथांचा प्रसार-प्रचार आजच्या काळातत पुन्हा उच्च-नीचता आणि लुबाडणूक करण्यासाठी केला जात आहे.

कीर्तन धार्मिक किट्टी पार्टी

* प्राची भारद्वाज

‘‘शैलजा, उद्या तू कामाला जाऊ नकोस. सुट्टी घे. नवदुर्गाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात कीर्तन असते. माताराणीच्या चरणी आपण दोघी लीन होऊया,’’ असे सासूनं सांगितल्यावर शैलजाला होकारार्थी मान डोलवावी लागली.

शैलजा नवविवाहिता होती. सासरचे वातावरण खूपच धार्मिक असल्याचे तिला लग्नावेळी केलेल्या पूजाविधीतूनच लक्षात आले होते. प्रत्येक मुलीला सासरच्यांशी जुळवून घ्यावे लागते, असा विचार करून शैलजाही तिचा सासरचे प्रत्येक रीतीरिवाज, सण-उत्सव साजरे करू लागली होती.

महानगरात लहानाची मोठी झालेली, आजच्या आधुनिक काळातील मुलगी असूनही, एक चांगली सून होण्यासाठी तिने आपल्या आधुनिक विचारसरणीला मुरड घातली होती.

नि:श्वासे न हि विश्वास: कदा रुद्धो भविष्यति।

कीर्तनीयमतो बाल्याद्धरेनार्मैव केवलम्॥

कैवल्याष्टकम – ४ शास्त्रानुसार श्वासाचे काही खरे नसते. म्हणूनच लहानपणापासूनच भजन कीर्तनात रमायला हवे. या विचारांचा फायदा लांडग्याची कातडी ओढून घेतलेले आजचे ढोंगी भ्रष्ट गुरू घेतात. आता विचार करायची गोष्ट अशी की, जर लहानपणापासूनच भजन कीर्तनात वेळ घालवू लागलो आणि इष्टदेवता किंवा गुरूचा जप सुरू करू लागलो तर मग अभ्यासाला कितीसा वेळ मिळेल, शिवाय करिअरचे नुकसान होईल ते वेगळेच. त्यावर जर आसाराम किंवा राम रहिमसारखा गुरू मिळाला तर काय परिणाम होईल, हे सर्वश्रृत आहे.

कीर्तनाआडून एकच मानसिकता विकली जाते ती म्हणजे पुण्य कमवायचे असेल तर कीर्तन, सत्संग करावा लागेल. जो देवाचे नाव घेणार नाही किंवा इतरांना असे करण्यापासून परावृत्त करेल तो पापाचा भागीदार होईल.

कीर्तन विरुद्ध अवडंबर

कीर्तन ही केवळ देवाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याची प्रक्रिया नाही तर समाजात आपली श्रीमंती दाखवून देण्याचा योग्य मार्ग बनत चालला आहे. पूजेच्या दरबाराला भारदस्त ओढण्या, लाईटच्या माळा आणि फुलांची सजावट, येणाऱ्या सर्व महिलांची बसण्याची व्यवस्था करणे, धूप, अगरबत्ती, कापूरचे ताट सजवणे, येणाऱ्या लोकांसाठी मृदंग, टाळ यांची व्यवस्था करणे, प्रसादात उपवासाच्या पदार्थांची सोय करणे, हे सर्व हेच दर्शवते.

इतकेच नाही तर कीर्तनानंतर चहा-नाश्त्याची व्यवस्थाही करायची असते. कीर्तन आयोजित करणारी महिला किती हुशार आहे, हे तिच्या कीर्तन मॅनेजमेंटवरुन ठरत असते.

मोक्षाची नाही प्रशंसेचा हव्यास

एका पौराणिक कथेनुसार एकदा नारद मुनींनी ब्रह्माजींना सांगितले, ‘‘असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे अक्राळविक्राळ काळाच्या जाळयात मी अडकणार नाही.’’

याच्या उत्तरादाखल ब्रह्माजींनी सांगितले:

आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूत कलिर्भवति.

अर्थात, जर एखाद्याने देवाचे नाव घेतले फक्त तरच तो या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईल. असाच एक श्लोक पद्म पुराणात आहे :

ये वदंति नरा नित्यं हरिरित्यक्षरद्वयम्।

तस्योच्चारणमात्रेण विमुक्तास्ते न संशय:॥

यात इथपर्यंत सांगण्यात आले आहे की, शुद्ध (पवित्र) किंवा अपवित्र (अशुद्ध), सावध किंवा बेसावध अशा कोणत्याही क्षणी ‘हरि’ नामाचा जप केल्यास किंवा नामोच्चार केल्यास मनुष्याला मुक्ती मिळते. यात कोणतीही शंका नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ‘मुक्ती’ म्हणजे काय? धर्मानुसार मुक्ती म्हणजे संसार, प्रपंचापासून मुक्त होणे. पुढचा, मागचा जन्म काय आहे, हे कोणी सप्रमाण सांगू शकेल का? कीर्तन केल्यामुळे जन्म-मृत्यूपासून मुक्ती मिळाली, हे देखील कुणीही सिद्ध करू शकत नाही. तर मग मोक्ष म्हणजे काय?

ज्या महिला कीर्तनात टाळमृदंग वाजवतात त्यांना मोक्षाऐवजी आपल्या कलेचे कौतुक जास्त आकर्षित करत असते. त्यांना बसण्यासाठी एक खास जागा तयार केलेली असते. त्या आल्यानंतरच कीर्तन सुरू होते आणि ज्या महिला माईकवर भजन गातात त्यांना तर माईक सोडवतच नाही. माइक जिच्याकडे येतो तिला सूरतालातले काही समजत नसले तरी ती माईक सोडायला तयार नसते. बेसूर आवाज, चुकीचा ताल किंवा मग थरथरणाऱ्या आवाजात भजन गाण्याची जणू स्पर्धा लागते.

व्यक्तिगत स्त्री कशीही असली तरी ती जर धार्मिकतेचा खोटा बुरखा चढवण्यात यशस्वी झाली तर आपला समाज तिला ‘सदाचारी स्त्री’चा मुकुट घालण्यासही मागेपुढे पाहत नाही.

कीर्तन संपले, किटी पार्टी सुरू

कीर्तनानंतर चहा-नाश्ता मिळताच त्याच्यासोबत एकमेकांच्या चुगल्या, उणीधुणी काढायला सुरुवात होते. ज्या महिला काही वेळापूर्वी जोरजोरात भजन गात होत्या की, हे जग मोहजाल आहे, जगातील सर्व नातेवाईक, संपत्ती, खरे-खोटे सर्व येथेच सोडून जायचे आहे, त्याच महिलांमध्ये आता आपली सासू, पती, सून किंवा शेजाऱ्यांबद्दल वाईट बोलण्याची जणू स्पर्धा सुरू होते. पाहायला गेल्यास या सर्व धार्मिक कार्याच्या नावाखाली एकत्र जमलेल्या असतात, पण सत्य हे आहे की, धर्माच्या नावाखाली या सर्व केवळ आपला वेळ घालवण्यासाठी एकत्र आलेल्या असतात.

ज्या महिला मुलांची जबाबदारी किंवा आधुनिक विचारसरणीमुळे कीर्तनात सहभागी होत नाहीत, त्यांना धार्मिकतेचा बुरखा परिधान केलेल्या या महिला बरेच उपदेश करतात. पूजापाठ न केल्यामुळेच जीवनात कष्टाचा सामना करावा लागत आहे, असे सांगतात. दुर्दैवाने आपल्या समाजात पुरोगामीपणापेक्षा रूढीवाद आणि अंधविश्वासाला अधिक महत्त्व दिले जाते. कदाचित हेच कारण आहे की ज्या महिलांकडे काहीही काम उरलेले नसते त्या विदेशी महिलांप्रमाणे आपल्या आसपासच्या समाजात सुधारणा, स्वच्छता आणि समाज सुंदर करण्याऐवजी कीर्तनात वेळ घालवणे पसंत करतात.

बृहन्नारदीय पुराणात असे सांगितले आहे की :

संकीर्तनध्वर्नि श्रृत्वा ये च नृत्यतिंमानवा:।

तेषां पादरजस्पर्शान्सद्य: पूता वसुंधरा॥

अर्थात जे देवाच्या नामस्मरणाचा आवाज ऐकताच भक्तिभावाने लीन होऊन नाचू लागतात त्यांच्या चरणस्पर्शाने पृथ्वी पवित्र होते. यातूनच प्रेरणा घेऊन चैतन्य महाप्रभूंनी सामूहिक कीर्तन प्रणाली सुरू केली. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी याच हरिनाम संकीर्तनाचा प्रसार जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत केला.

जर वरील श्लोकांचा अर्थ खरा मानला तर इतक्या ठिकाणी कीर्तन केल्यामुळे आतापर्यंत पृथ्वीचे कितीतरी भले व्हायला हवे होते. पण पृथ्वी तर दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. येथील नैसर्गिक ठेवा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर प्रदूषणाचा दुष्परिणाम होत आहे…या सर्वांवरील उपाय खरोखरच कीर्तनात आहे का?

हे स्पष्ट आहे की जर आपण आपले जीवन सुंदर बनवू इच्छित असाल तर या जगाला अतिउत्तम बनवावे लागेल आणि आपल्या पृथ्वीला सुधारायचे असेल तर कीर्तनात वेळ वाया घालवण्याऐवजी काम करण्याची आवश्यकता आहे. समाजाला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक विचारांना आपलेसे करावे लागेल.

घातक आहे धार्मिक उन्माद

* दीपान्विता रायबनर्जी

धार्मिक ढोंगीपणा माणसांची विचारसरणी संकुचित बनवितो यामुळे माणसं अतिक्रूर बनून आपलं तनमनधन सर्वकाही हरवून बसतात.

२ जून, २०१६ साली झालेला मथुरा कांड याचं ताजं उदाहरण आहे. रामवृक्ष यादवने आपल्या संकुचित विचारसरणीमुळे २४ निरपराध्यांचे जीव घेण्याबरोबरच      स्वत:देखील आपल्या अंधश्रद्धांसोबत स्फोटात जीव गमावून बसला.

वेडेपणाच्या नादात हा इसम देशाची घटना, कायदा आणि सरकार तिन्ही गोष्टींशी विद्रोह करून स्वत:ला देव समजू लागला होता. आपल्या उन्मादी भाषणांद्वारे अंधश्रद्धाळू भक्तांची फौज एकत्रित करत होता. मथुराच्या जवाहर बागेत स्फोटक सामुग्री जमा करत होता. दुर्घटनेच्या दिवशी उन्मादी भक्तांनी या व्यक्तिसोबत मिळून भयानक स्फोट घडविला. अंधश्रद्धा जर रोखली गेली नाही तर हे किती विध्वंसक होऊ शकतं हे कोणापासूनही लपलेलं नाहीए.

कोणीही यापासून बचावलं नाहीए

देश असो वा परदेश, अंधश्रद्धेच्या विषवृक्षाने नेहमीच अतिवादी विचार पसरवले आहेत.

आंतरराष्ट्रीय पटलावर कुकलक्स कलान यांचं भयानक नाव बनून समोर आलं. जेव्हा दक्षिण युरोपात गणराज्याची स्थापना झाली तेव्हा काळ्या लोकांची गुलामगिरीतून सुटका झाली. तेव्हा एलीट लोकांच्या समूहातून कूकलक्स कलान नावाची भयानक जातीयवादी संघटना प्रस्थापित झाली जी काळ्या लोकांच्या गुलाम प्रथेची समर्थक होती आणि गोऱ्या लोकांची सुपरमॅसी म्हणजेच बाजूची होती. या संघटनेच्या लोकांनी शाळा, चर्चेसवर हल्ले करायला सुरूवात केली. रात्रीच्या अंधारात हे भीतिदायक कपडे घालून काळ्या लोकांवर हल्ले करत असत. त्यांनी काळ्या लोकांना धमकावण्यापासून ते त्यांचा खून करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सरकारी दबावामुळे यांचा प्रभाव कमी झाला, परंतु आता यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. हे आफ्रिकन अमेरिकन हेट ग्रपुच्या सिद्धांतावर चालतात.

या सर्व घटना चरमपंथाशी संबधित आहेत, जिथे मानव उलटसुलट तर्क, सहनशीलता, उदारता यांची कट्टर विरोधक बनते. त्यांच्यासाठी स्वत:चा स्वार्थ सर्वोपरी होतो.

आज आयएसआयएस कट्टरवादी आतंकवादाचा क्रूरतम चेहरा आहे, ज्याची प्रत्येकाला दहशत आहे. स्वत:ला वा विशेष धर्माला अथवा जातीला मोठं करून अंधश्रद्धेखाली लोकांना आणलं जाण्यासाठी दहशत पसरवली जाते.

अमेरिकन राष्ट्रपतींनी आयएसआयएसवरच्या कारवाईच्यावेळी सांगितलं होतं की यांचा सिद्धांत नॉनइस्लामिक आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे की धर्माच्या आड केलं जाणारं क्रूरतम काम कधीही वास्तविक धर्माचं उद्देश्य पूर्ण करू शकत नाही.

ढोंगी बाबाबुवांचं जाळं

आपल्या देशात आसाराम बापू प्रकरण तसं फारसं जुनं नाहीए. कथित परमपूज्य आसाराम बापूला १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आलं. या मुलीचे आईवडील आसारामच्या आश्रमात अनेक वर्षापासून सेवा करत होते.

आसारामवर खून, बलात्कार, तांत्रिक मंत्रसिद्धीद्वारे वशीकरण, कामोत्तेजना वाढविणाऱ्या औषधांचं सेवन करवून स्त्रिया आणि मुलींचं शारीरिक शोषण, जमीन हडपणं इत्यादी अनेक आरोप लागले आहेत.

आसाराम हरपलानी, जन्म १९४१, पूर्वी टांगेवाला, नंतर रस्त्यालगत चहा विकणारा आणि त्यानंतर जमिनी बळकावत स्वयंभू भगवान बनतो. त्याने जवळजवळ ३० लाख अंधश्रद्धाळू भक्तांची फौज तयार केली, त्यांच्यासाठी हा पूज्य संत श्री आसाराम बापू बनला.

आसारामचे अंधभक्त अतिरेकी संघटनेतील जिहादीसारखे आहेत, जे याच्या एका इशाऱ्यावर मरण्यास आणि मारण्यासदेखील तयार होतात. यांच्यासाठी गुरूच्या अंधशक्तीपेक्षा अधिक असं काहीही नाहीए. आता जरा विचार करा की देशातील एवढी मोठी लोकसंख्या जर अंधश्रद्धेच्या वेडेपणाच्या मानसिकतेत असेल, बुद्धी आणि तर्कवार त्याच्यापुढे गौण ठरत असेल तर देशाचा विकास कसा होईल?

स्त्रियादेखील सावज ठरतात

धर्माच्या नावाखाली लोकांना विश्वासात घेऊन एकामागोमाग एक अतिरेक्यांच्या क्रूरकर्मा संघटना मजबूत होत चालल्या आहेत. जातिधर्माच्या ढोंगाचं जाळं पसरवून अशा संघटनांचे कर्ताधर्ता आपल्या मानसिक संकीर्णतेला संतुष्ट करतात.

अगदी गृहिणीदेखील धर्म आणि ढोंगीपणाचं खातं उघडून बाबाबुवा, मौलवी, भटब्राह्मण, तांत्रिकांच्या मागे लागलेल्या दिसतात. मग मूल आजारी असो, पदोन्नती, शत्रूंचा बीमोड असो वा मनासारखी वास्तू मिळवण्याची गोष्ट असो, लोक आश्रम, देऊळ, मस्जिदची गुलामी करू लागतात. धर्माच्या आड लोकांना घाबरवून स्वत: विलासी जीवन जगणं ही तर भटब्राह्मण, मौलवी, पाद्री यांचा व्यवसाय आहे.

धर्माच्या ठेकेदारीने हे ढोंगी कुशल तंत्राने लोकांना वश करणं खूपच चांगलं जाणून आहेत. भीतीला हत्यार बनवून हे लोकांची मानसिकताच बोथट करून टाकतात.

आपल्या इच्छेनुसार सर्व काही मिळविण्याच्या लालसेपायी मनुष्य           भ्रष्ट होत जातो. लोकांच्या या लालसेला ढाल बनवून हे पंडित, मुल्ला आपलं काम साधून घेतात.

माणसाने जर आपल्या डोक्याचा योग्य वापर केला तर त्याला कोणाताही धर्म वा अंधश्रद्धेची गरज पडणार नाही. बाबाबुवांच्या फेऱ्यात सापडून लोकांची विचारसरणी बोथट होते, तेव्हा हे बाबाबुवा साधना, तंत्रमंत्र, दान, भक्तीच्या गोष्टी सांगून पैसा उकळत राहातात. नंतर वेगवेगळ्या व्यवसायात पैसा लावतात. आपल्यामागे स्वत:च्या साम्राज्याच्या रक्षणासाठी सेना उभी करतात, बलात्कारापासून ते अगदी खुनापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत यांचे हात माखलेले असतात.

सुशिक्षित अंधश्रद्धाळू

आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या या युगातदेखील लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

मनुष्य होण्याची सार्थकताही आपण अंधश्रद्धेच्या अधीन जाऊ नये यातच आहे. आस्थेचं एक महत्त्व आहे, परंतु ही आस्था सत्याच्या आधारावर असावी, लबाडी, थोतांडावर नसावी.

आयुष्यात जादूने काहीही होत नाही, सर्वकाही मेहनत आणि वैज्ञानिक सत्यावर आधारित असतं. जर अंधश्रद्धा आणि नक्कल करणाऱ्यांच्या भरवशावर अवलंबून      राहिलात तर आयुष्यात अशी ठोकर बसेल की सांभाळण्याची संधीदेखील मिळणार नाही. म्हणून न्याय आणि सत्याच्या मार्गाने अंधश्रद्धेला न जुमानता चला, मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें