* डॉ. नीरजा श्रीवास्तव
कोठे दिखाव्याचे सोंग तर कोठे भिति श्रद्धा तर काही भोंदू बाबांच्या रूढी हे सर्व मिळून तयार होतो आपला समाज. जिथे धर्मांधतेमुळे पंडीत, पुजारी उत्सवपर्वांना विविध प्रकारच्या कर्मकांडाशी जोडून तथ्यांना नाकारत आणि त्यांचे खरे मूळ आनंददायी स्वरूप नष्ट करतात. शुभ घडण्याची लालसा आणि अनिष्ट घडण्याची शंका यामुळेच त्यांची सेवा करण्यासाठी सामान्य जनता विवश होते अन् भयभीत मनाने लोक अंधश्रद्धेच्या चक्रात अडकत जातात. कारण आपल्या धार्मिक ग्रंथातूनही ईश्वराविषयी, धार्मिक कार्यांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी शिकवण असते. विरोध केल्यास सर्व काही नष्ट होईल.
भग्वत गीता श्लोक १८/५८
अथ चेत्त्वमहंकारान्न श्रीष्यसि विनंक्ष्यारी. अर्थात, जर तू अहंकारामुळे ऐकलं नाहीस तर तुझा पूर्णपणे नाश होईल.
न चाशुश्रूषवे वाच्यं न च मां यो भ्यऽसूयति. भग्वत गीता श्लोक १८/६७. अर्थात, हे ज्ञान तू कोणाला सांगितले नाही पाहिजे. त्या व्यक्तीला तर मूळीच नाही जो माझी निंदानालस्ती करतो..
हे सर्व काय आहे
जर देव आहे आणि देव सर्वशक्ति आहे तर हे त्याला सर्वांना सांगण्याची काय आवश्यकता होती? त्यांनी आपले वचन सर्व भाषांत का नाही लिहिली? काम्प्युटर सॉफ्टवेअरप्रमाणे सर्व ज्ञान-विज्ञान त्यांच्याकडे पूर्वीपासूनच आहे. मग पत्रांवर, दगडांवर का लिहून घेतले? जे देवता मानत नाहीत त्यांच्यासमोर गीतेतील वचन वाचण्यास का अडवले? उलट हे वचन त्यांच्या कानी पडताच ते पवित्र झाले पाहिजेत. सरळ गोष्ट आहे की ते या गोष्टीचा तर्क विचारतात आणि यांच्याकडे कोणत्याच प्रश्नांचे उत्तर नसते. मग त्यांची पोल खोल होते. त्यांचे सत्य सर्वांसमोर येते. तथ्यांना नाकारणे, तर्काशिवाय कोणतीही गोष्ट मान्य करणे. धर्मभीरू मन येथूनच दुर्बल होते किंवा गैरसमज होण्यास सुरूवात होते असे आपण म्हणू शकतो. या भितिनेच नव-नव्या अंधश्रद्धेचा जन्म होतो आणि अंधश्रद्धाळूंची संख्या वाढते.
एक गोष्ट जेव्हा मनात खोलवर रूजली गेली की जर तर्काशिवाय हे करणे चांगले आणि नाही केले तर वाईट होईल. जेव्हा इतरांच्या बाबतीत वाईट होते तसेच आपल्या बाबतीतही होऊ शकते. येथूनच अंधश्रद्धेची मालिका सुरू होते. कधी क्रिकेट मॅच जिंकण्यासाठी, तर कधी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी, कधी निवडणुका जिंकण्यासाठी हवन, पूजा केल्या जातात. जर यामुळे काही होणं शक्य असेल तर बलात्कार, हत्या वा दुर्घटना थांबवण्यासाठी भारतासारख्या देशात कोणतेही हवन का केलं जात नाही, ही विचार करण्यासारखी बाब आहे.