* आशिमा शर्मा, फॅशन डिझायनर
भारतीय कपडे आणि ते परिधान करण्याची पद्धत खूप बदलली आहे, पण साडी हा असा पारंपरिक पोशाख आहे ज्याचा लुक सर्वात हटके असतो. चला, जाणून घेऊया साडी नेसण्याच्या काही अनोख्या पद्धती :
फुलपाखरू ड्रेपिंग
फुलपाखरू किंवा बटरफ्लाय साडी ड्रेपिंग बारीक आणि सुडौल बॉडी असलेल्या महिलांसाठी योग्य पर्याय आहे. ड्रेपिंगची बटरफ्लाय स्टाईल कोणत्याही साडीसोबत ट्राय करता येते.
तुम्ही जर कोटा किंवा शिफॉनसारखी हलकी साडी निवडली तर फुलपाखराचे पंख उभे राहतात. साडी अशी निवडा ज्यावर थोडी नक्षी असेल. ही स्टाईल समोरच्या पदरासोबत केली जाते. सोनम कपूरला अशा प्रकारची साडी नेसायला आवडते. परफेक्ट लुक मिळवण्यासाठी, हलक्या साडीसोबत हेवी पेपलम ब्लाऊज घाला.
धोती साडी
सध्या तरुणाईत धोती स्टाईल साडीचा ट्रेंड आहे, कारण ती नेसायला सोपी आणि आरामदायक आहे. सोनम कपूर, दिया मिझा इत्यादी अनेक बॉलिवूड अभिनेत्री अशा प्रकारच्या साडीमध्ये दिसल्या आहेत.
हा ट्रेंड तुमची फॅशन स्टेटमेंट लेव्हल वाढवतो. ही साडी कट ब्लाऊज, क्रॉप टॉप किंवा शर्टसह परिधान करता येते. हिवाळयात तुम्ही ती जाकिट आणि ब्लेझरसोबतही नेसू शकता.
लेहेंगा साडी
ही स्टाईल आजकाल सर्वसामान्य आहे आणि तुम्ही ती लग्न सोहळा, दिवाळीतही नेसू शकता.
सध्या नववधूचा लेहेंगा याच पॅटर्नमध्ये असतो. रेड कार्पेटवरही लेहेंगा साडी पाहायला मिळते. साडीसारखा दिसणारा हा पॅटर्न साडीच्या प्रकारात सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. या स्टाईलसाठी तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभासी रंगाची लेहेंगाचोळी आणि एक साडी गरजेची असते. यामुळे काहीसा साडीसारखा लुक देता येतो.
मुमताज साडी
अभिनेत्री मुमताज फंकी ही स्टाईल स्टेटमेंटसाठी खूपच लोकप्रिय होती. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चरचे…’ या गाण्यात मुमताजने नेसलेली साडी आताही लोकप्रिय आहे. चमकदार किनार आणि कूल ड्रेपिंग स्टाईलचा अजूनही तरुण मुलींमध्ये ट्रेंड आहे.
दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोपडासह अनेक अभिनेत्री या अनोख्या साडी लुकमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. शिफॉन साडीत पेवी आणि मोठया किनारीची शिमर आणि भरजरी कलाकुसर असलेली साडी सर्व प्रकारच्या सण-समारंभात नेसण्यासाठी सर्वोत्तम आहे.
गुजराती स्टाईल साडी
या साडयांमध्ये पदर समोरच्या बाजूला असतो. जास्त करून गरबा खेळताना अशा प्रकारची साडी नेसली जाते, कारण गुजराती स्टाईल साडी पारंपरिक लुक देते. या स्टाईलसाठी तुम्ही शिफॉन आणि जॉर्जेटची साडी वापरू शकता.
साडीचा पदर नसलेला भाग कमरेला खोचा आणि कमरेवरून घेऊन व्यवस्थित खोचून पुन्हा पुढच्या बाजूला आणा. त्यानंतर पदर काढा आणि लांबी कमी ठेवून मागून फिरवून उजव्या खांद्यावर पिनअप करा.
पदराची साडी
ही फारच क्वचित दिसणारी स्टाईल आहे. ९० च्या दशकात ती खूपच लोकप्रिय होती. ही स्टाईल आता फॅशन म्हणून परत आली आहे. बोहो प्रेमी ही साडी स्कार्फप्रमाणे दागिन्यांसह नेसतात. रेट्रो युगातील ही एक सुंदर आठवण आहे आणि ती थीम पार्टीत वापरली जाऊ शकते. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की, तुम्ही गळयाभोवती चारी बाजूंनी पदराला स्कार्फप्रमाणे गुंडाळून घ्या.