* पूनम अहमद

ज्या कोणाचे कधी ब्रेकअप झाले असेल त्याला माहित असेल की ब्रेकअप करणे सोपे नसते. पण कधीकधी जेव्हा दोघेही समजूतदार असतील, तर एक्स असल्यावरही आपसांत मैत्री टिकवता येते. जर नातेसंबंधात सर्व काही ठीक होत नसेल, तर जोडप्यांना अनेकदा ब्रेकअपचा निर्णय घ्यावा लागतो. ही दु:खाची बाब असते की जी व्यक्ती आतापर्यंत तुम्हाला सर्वात प्रिय होती, आता तुम्ही त्याच्यासोबत तुमचे सुख-दुख शेअर करू शकणार नाहीत. पण ही एक चांगली गोष्ट आहे की आजची पिढी अतिशय व्यावहारिक आहे आणि या प्रकरणावर वेगळा विचार करते. कोणतेही नाते कोणत्याही कारणास्तव संपुष्टात येऊ शकते.

विचारसरणी बदलत आहे

जर तुमच्या आयुष्यात कोणी एका भूमिकेत बसत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्या भूमिकेतही बसणार नाही.

२६ वर्षीय रूही तिच्या एक्ससोबत इतकी कंफर्टेबल आहे की ती आजही त्याच्यासोबत अनेक गोष्टी शेअर करते. तिच्या कोणत्याही समस्येमध्ये तिला तोच आठवतो. अगदी तिच्या एक्सची मैत्रीणही आनंदाने हे स्वीकारते.

रुही म्हणते, ‘‘आमचे ब्रेकअप झाले. काही गोष्टी जमल्या नाहीत, पण मला माहित आहे की तो मला नेहमी योग्य सल्ला देईल, मला त्याच्यासमोर कोणत्याही गोष्टीत अस्वस्थ वाटत नाही. तो माझा चांगला आणि खरा मित्र आहे. माझे कुटुंब अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवते.’’

असे बनवा आपल्या एक्सला मित्र

फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर एक्ससोबत मैत्रीची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. जरी तुमचे ब्रेकअप झाले असेल, तरीही तुम्ही ज्या व्यक्तीवर दीर्घकाळ प्रेम केले असेल, त्याची काळजी घेतली असेल त्याच्याशी तुम्ही मैत्री टिकवून ठेवू शकता. हे कठीण असू शकते, परंतु काही मार्ग आहेत जे अवलंबून तुम्ही तुमच्या एक्सचे मित्र बनून राहू शकता आणि ते आपल्याला विचित्रदेखील वाटणार नाहीत. जसे :

* ब्रेकअपचे कारण नेहमी तुम्ही चुका केल्या असे नसते. कधीकधी असे घडते की नातेसंबंध कार्य करत नाहीत. जे नातं काम करत नाही ते सोडून द्यायला शिका. एकमेकांच्या चुका सांगू नका. जे झाले ते विसरून जा, एकमेकांना क्षमा करा. ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तुम्ही वाद घातला तर परिस्थिती आणखी वाईट होईल. तुमच्या दोघांमधील कटुता आणखी वाढेल.

* नातेसंबंध टिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ब्रेकअपनंतर हे नातं वाचवण्यासाठी तुम्ही किती वेळ वाया घालवला, किती ऊर्जा वाया गेली याचा विचार करत बसू नका. यामुळे तुम्हाला फक्त वाईटच वाटेल. आता एकमेकांना मित्र अवश्य समजा. तुम्ही एकमेकांना ओळखत तर आहातच. एकमेकांच्या अडचणींमध्ये एकमेकांना साथ देणे थांबवू नका.

* ब्रेकअप झाल्यानंतर लगेच मैत्रीच्या गाडीमध्ये चढू नका. स्वत:ला थोडा वेळ द्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा आणि त्याच खांद्यावर डोके ठेवून पुन्हा रडू नका, कारण शेक्सपिअरनेही म्हटले आहे की आशा हे सर्व दु:खाचे मूळ आहे.

* नाते संपले आहे, तुम्ही दु:खी आहात, दु:खी व्हा, तुम्हाला जितका शोक-विलाप करायचा आहे तितका व्यक्त करा. जोपर्यंत रडू यायला होतं तोपर्यंत रडा. त्यानंतर तुमच्या मित्रांसोबत बाहेर जा आणि ब्रेकअपबद्दल बोलू नका.

* लगेच घाईत बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड शोधू नका. समंजस आणि परिपक्व विचारसणी ठेवा.

* स्वत:ला अशा उपक्रमांमध्ये गुंतवा, जे तुम्हाला करायचे होते पण या नात्यामुळे शक्य होत नव्हते.

* तुम्हाला तुमच्या एक्ससोबत मैत्री करण्याबद्दल शंका आहे का? हे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा की तुम्हाला तुमच्या एक्सशी मैत्री का करायची आहे. एकाच फ्रेंड सर्कलसाठी, की कॉलेजमधील एकाच वर्गासाठी?

* जर तुमची तुमच्या एक्स सोबतची केमिस्ट्री तुम्ही नातेसंबंध सुरू करण्यापूर्वीसारखी नसेल तर या मैत्रीसारख्या भावनेला फुलू देण्याचा जास्त विचार करू नका. हा प्रयत्न तुम्हाला इतर काही गोष्टींमध्ये दुखावू शकतो तेदेखील तेव्हा, जेव्हा तुम्ही तुटलेल्या नात्यातून बाहेर पडत आहात.

* जर ती इतर लोकांसोबत बाहेर जात असेल तर या गोष्टीचा आदर करत आयुष्यात तुम्ही स्वत:ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा. फक्त तिच्या डेटिंग पॅटर्नवर लक्ष ठेवण्यासाठी तिच्याशी मैत्री केल्याने तुम्हाला त्रास होईल. म्हणून सकारात्मक रहा आणि स्वत: ही जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...