* प्राची भारद्वाज
कॉस्मेटिक्सचे रंगीबेरंगी जग महिलांना आकर्षित करते. सोबतच त्यांना आकर्षकही बनवते. तुमच्याकडे कॉस्मेटिक्समधील बारकावे माहिती करुन घ्यायला जास्त वेळ नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कॉस्मेटिक्सचा क्रॅश कोर्स.
कॉस्मेटिक्स टूल्स
फाऊंडेशन, पावडर, ब्लश, काजळ, आयलायनर, आयशॅडो, लिपस्टिक याशिवाय आता आणखी कितीतरी नवीन कॉस्मेटिक्स टूल्स बाजारात आले आहेत. जसे की :
* ब्युटी ब्लेंडर एक असा स्पंज आहे ज्याचा योग्य प्रकारे फाऊंडेशन व कंसीलर लावण्यासाठी वापर केला जात आहे. तो पाण्यात भिजवून वापरला जातो. यामुळे फाऊंडेशन व कंसीलर एकसारखे लागते तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आल्यासारखे वाटते.
* सध्या चांगल्या प्रकारे मेकअप करण्यासाठी वेगवेगळे ब्रश उपलब्ध आहेत. गालावर कंटुरिंग करण्यासाठी, डोळयांवर आयशॅडोच्या लेअरिंगसाठी, पापण्यांवर आयलॅशेज कर्लर, अशा प्रकारे विविध ब्रश आहेत.
* हेअरड्रायर आणि हेअरस्ट्रेटनरची खरेदी करण्यापूर्वी सर्वप्रथम केसातील गुंता सोडवण्यासाठी चांगले ब्रश खरेदी करा. ओल्या केसांसाठी वेट ब्रश आणि कोरडया केसांसाठी डिटेगलिंग ब्रश वापरा.
* टॉवेल किंवा हातांनी चेहऱ्यावरील मेकअप पुसल्यामुळे चेहरा अस्वच्छ होण्याची किंवा किटाणूच्या संसर्गाचा धोका असतो. म्हणूनच आजकाल चेहरा पुसण्यासाठी फेशियल क्लिनिंग डिवाइस वापरण्याचा सल्ला दिला जातो. याचा वापर करुन केलेला मेकअप पुसून काढता येतो. याशिवाय ते तेलकट त्वचेसाठीही उत्तम आहे. मृत त्वचा काढून टाकण्यासही ते मदत करते. सोबतच चेहऱ्यावरील ब्युटी प्रोडक्ट शोषून घेण्याची क्षमताही वाढवते.
* सिलिकॉनने बनवण्यात आलेले मेकअप ब्रश क्लीनर घ्यायाला विसरू नका. इतर ब्रश वापरल्यानंतर खराब होतात, अशावेळी हे ब्रश तुम्हाला खूपच उपयोगी पडेल.
उत्तम मेकअप गुरू
* सर्वात आधी चेहरा धुवून किंवा वेट वाइप्सचा वापर करुन स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर त्यावर गुलाबजाम टोनरचा स्प्रे मारा.
* चेहरा कोरडा असेल तर त्यावर चांगल्या प्रकारे मॉईश्चराईज लावून घ्या. पाऊस किंवा गरम होत असेल किंवा तुमची त्वचा तेलकट असेल तर मॉईश्चराईज लावू नका. गरमीत सनस्क्रीन नक्की लावा.
* आता चेहऱ्यावर प्राइमर वॉटर स्प्रे मारा. त्याने चेहरा ओला करा आणि सुकू द्या. स्प्रे करताना डोळे बंद ठेवा. तुम्ही प्रायमर जेल लावणार असाल तर ते केवळ मटाराच्या दाण्याइतकेच घ्या. ठिपक्या ठिपक्यांप्रमाणे ते संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. व्यवस्थित थापून ब्लेंड करुन घ्या. प्रायमर कमीत कमी १ मिनिट आणि जास्तीत जास्त ५ मिनिटांपर्यंत सुकू द्या.
* आता वेळ येते ती एसपीएफयुक्त कॉम्पॅक्टची. यामुळे तुमचा मेकअप सेट होतो.
* जर तुमच्या आयब्रोज शेपमध्ये असतील तर अतिउत्तम, अन्यथा आयब्रो पेन्सिलने त्यांना शेप द्या. कारण आयब्रोज संपूर्ण चेहऱ्यावर उठून दिसतात. त्यामुळेच त्यांचा शेप चांगला असणे खूपच गरजेचे असते.
* डोळे उठून दिसण्यासाठी त्यांच्यावर सौम्य रंगाचे व कडांना गडद रंगाचे आयशॅडो लावा. जर डोळयांवर विविध रंगांचा एकत्रित इफेक्ट हवा असेल तर तुम्ही आयशॅडोच्या २-३ शेड्स मिक्स करुनही लावू शकता.
* पापणीच्या वरच्या बाजूला काजळ लावू नका. अनेकदा काजळ पापणीवर पसरुन तिला काळपट करते. लिक्विड आयलायनर लावा. ते लावताना डोळयांच्या कडांपासून सुरुवात करुन दुसऱ्या टोकापर्यंत लावा. पातळ ब्रशचा वापर करा. यामुळे लाइन तिरपी झाली तरी तिला नीट करता येईल. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार ती लाईन तुम्ही जाड करु शकता.
* काजळाचा वापर तुम्ही डोळयाच्या खालील कडांवर करू शकता. यामुळे डोळे अधिक सुंदर दिसतात.
* तुम्ही एखाद्या पार्टीला जाणार असाल तर डोळे जास्त आकर्षक दिसण्यासाठी मसकारा लावू शकता.
* गालांवर सौम्य रंगाचे ब्लशर लावा. ब्लशची लाइन लांबून दिसणार नाही, याकडे लक्ष द्या. चेहऱ्याला मॅचिंग किंवा सौम्य शेडचा ब्लश घ्या. पिंक किंवा न्यूट्रल शेड असेल तर अतिउत्तम. कंटुरिंग ब्रशने ते खालील गालांपासून ते कानाच्या जवळपर्यंत फिरवा. थोडेसे नाकाच्या टोकावरही फिरवा.
* डोळयांच्या खालील भागावर हायलायटर लावल्यामुळे संपूर्ण चेहरा तजेलदार दिसतो.
* आता लीपलायनरने ओठांना शेप द्या. नंतर बोटाच्या आतील भागाने अलगद लिपस्टिक लावा. लिक्विड लिपस्टिक असल्यास ती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता अधिक असते. खालच्या ओठांच्या आतल्या भागापर्यंत लिपस्टिक लावा अन्यथा ओठांवर ओठांचा रंग आणि अर्धवट लिपस्टिकचा रंग असे दोन्ही खूपच खराब दिसेल.
* सर्वात शेवटी चेहऱ्यावर मेकअप सेटरने २-३ वेळा स्प्रे करा. तो मेकअपच्या सर्व लेअर्स ब्लेंड करुन चेहऱ्याला चांगले फिनिशिंग देईल आणि मेकअपही दीर्घकाळ टिकून राहील.
डार्क सर्कल आणि पिग्मेंटेशन कसे लपवाल?
भारतीय त्वचेवर डोळयांखाली डार्क सर्कल म्हणजे काळी वर्तुळे येण्यासोबतच बऱ्याचदा ओठांच्या आजूबाजूला पिग्मेंटेशन होते. ते लपवण्यासाठी ऑरेंज कलरचे कंसीलर वापरा. ऑरेंज कलर भारतीय त्वचेच्या रंगावर चांगल्या प्रकारे मॅच होतो. तो डोळयांखाली, ओठांच्या आजूबाजूला आणि जिथे पिग्मेंटेशन असेल तिथे लावा. डोळयांखाली लावून ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करा.
इंडियन स्किन टोनसाठी मेकअप
लक्षात ठेवा, फाऊंडेशन गोरे दिसण्यासाठी नसून मेकअपला चांगला बेस देण्यासाठी लावले जाते. चुकीच्या रंगाचे फाऊंडेशन घेऊ नका. तुम्ही तुमच्या रंगापेक्षा गडद रंगाचे फाऊंडेशन घेतले तर चेहरा जास्तच गडद दिसेल आणि तुमच्या रंगापेक्षा सौम्य रंगाचे फाऊंडेशन घेतले तर तुमचा चेहरा फिकट दिसेल.
इंडियन स्किन टोन म्हणजेच भारतीय त्वचेचा पोत बऱ्याचदा सावळा, तेलकट आणि सुरकुतलेला असतो. चेहऱ्यावरील तेलकट भाग आणि फाइनलाइन्सवर कंसीलर दिसेनासे होते. अशावेळी कॉम्पॅक्ट हे स्पंजच्या मदतीने चांगल्या प्रकारे लावा. दुहेरी हनुवटी लपवण्यासाठी तेथे ब्लश करा. ते तुम्हाला चांगला लुक मिळवून देईल.