* प्रतिनिधी
- मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. विवाहाला ३ वर्षं झाली आहेत. आम्ही अजूनही शरीरसंबंध साधले नाहीत. विवाहाच्या पहिल्या रात्री शरीरसंबंध साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेदना झाल्यामुळे मी पतीला अडवलं. त्याच भीतीने पुन्हा प्रयत्नच केला नाही. पतीनेही कधी बळजबरी केली नाही, परंतु आता घरची मंडळी मुल हवं म्हणून मागे लागली आहेत. त्यांना अधिक काळ टाळता येणार नाही. तसं बघता अपत्य आम्हालाही हवं आहे. शरीरसंबंधाशिवाय हे शक्य नाही, परंतु यादरम्यान होणाऱ्या वेदना मी सहन करू शकले नाही कर काय होणार?
पहिल्यांदा शरीरसंबंध साधताना स्त्रीला थोडीशी वेदना आणि रक्तस्त्राव होतो, परंतु ही वेदना असहनीय नसते. संभोगादरम्यान मिळणाऱ्या लैंगिक सुखासमोर ही वेदना काहीच नसते. विवाहाला इतका कालावधी लोटला असूनही तुम्ही अजून सेक्सचा आनंद उपभोगू शकला नाहीत. तुमच्या मनातील सेक्सप्रतिची भीती दूर करून शरीरसंबंध साधा आणि आपलं गृहस्थ जीवन आनंदी बनवा.
- मी एका मुलावर प्रेम करत होते. प्रेमात आम्ही मर्यादा ओलांडून परस्परांशी अनैतिक संबंध ठेवले होते. काही वर्षांपूर्वी आमचा ब्रेकअप झाला. आता घरात माझ्या लग्नाचा विषय सुरू आहे. मी मात्र अजिबात उत्साहित नाही. कारण मला भीती आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री संबंध साधल्यावर मला रक्तस्त्राव झाला नाही, तर पतीला पहिल्या रात्रीच समजेल की माझे विवाहपूर्व शारीरिक संबंध होते. पती मला अपमानित करून घराबाहेर काढेल. यापेक्षा मी लग्न न करणंच योग्य ठरेल. तुमचं काय मत आहे?
तुम्ही भूतकाळात जी चूक केली, त्यासाठी आता पश्चाताप वा लग्न न करण्याचा तुमचा निर्णय योग्य नाही. तुम्ही जोपर्यंत आपल्या मुखाने स्विकारणार नाही की तुम्ही कधी कुणाशी संबंध साधले आहेत तोवर पतीला समजणार नाही. तेव्हा या गोष्टी विसरून लग्नाची तयारी करा.
- मी २२ वर्षीय तरुण आहे. एका मुलीवर ३-४ वर्षांपासून प्रेम करत होतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मागच्या वर्षी प्रथम मंदिरात आणि त्यानंतर कोर्ट मॅरेज केलं. आम्हा दोघांचे कुंटुंबीय विवाहासाठी तयार नव्हते, त्यामुळे पैशांची व्यवस्था करून मी स्वतंत्र खोली घेतली आणि मग तिला सोबत राहायला बोलावलं. महिनाभर आम्ही अतिशय आनंदात राहिलो, परंतु त्यानंतर ती आपल्या घरच्यांना भेटू लागली. कुणास ठाऊक तिच्या घरच्यांनी तिला काय समजावलं? ती आपल्या घरी निघून गेली आणि पुन्हा परतलीच नाही. फोनसुद्धा बंद केला.
एके दिवशी तिचे भाऊ येऊन मला घरातून उचलून घेऊन गेले आणि चौकीत तक्रार नोंदवली. परंतु माझी काहीच चूक नसल्याने त्यांना मला सोडावं लागलं. आता मुलीकडील लोक दबाव आणत आहेत की मी घटस्फोट द्यावा. मला समजत नाहीए की परस्परसंमतीने विवाह केल्यानंतरही तिने माझी अशी फसवणूक का केली?
तुमच्या पत्नीचं वय खूप कमी आहे. त्यामुळे प्रेम आणि विवाहाप्रति त्या फारशा गंभीर दिसत नाहीत. शिवाय किशोरावस्थेत विरूद्धलिंगी व्यक्तिप्रति निर्माण झालेले आकर्षण प्रेम नसतं. हे लैंगिक आकर्षण जितक्या वेगाने निर्माण होतं, तितक्याच वेगाने लोप पावतं. हेच कारण आहे की भावनेच्या भरात तुम्ही दोघांनी (विशेषत: तुमच्या पत्नीने) विवाह केला, परंतु लवकरच एकमेकांकडून अपेक्षाभंग झाला. जर मुलगी कुटुंबियांच्या दबावाखाली येऊन तुमच्याकडे घटस्फोटाची मागणी करत असेल तर तो तुम्ही दिली पाहिजे.
- मी २७ वर्षीय तरुणी आहे. माझ्या विवाहाला ४ वर्षं झाली आहेत. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. परंतु सद्यस्थितित मी थोडी द्विधा मन:स्थितीत आहे. माझ्या ऑफिसमध्ये माझा एक सहकारी मला पसंत करतो. प्रत्येक लहानसहान समस्येमध्ये नेहमी मला सहकार्य करतो. तो माझ्याशी मैत्री करू इच्छितो, परंतु मल भीती वाटते की माझ्या पतींनी ही मैत्री गैरअर्थाने घेऊ नये आणि यामुळे माझं वैवाहिक जीवन प्रभावित होऊ नये. मला माहीत आहे की माझे पती तितके उदारमतवादी नाहीत. आमच्या गप्पांमध्येही नकळत त्याचा विषय निघाला तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात. मी काय केलं पाहिजे, ते सांगा?
तुम्ही समजदार तरुणी आहात. तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की जर आपल्या तथाकथित सहकाऱ्याशी तुम्ही मैत्री केली, तर ही गोष्ट तुमच्या पतीला आवडणार नाही. केवळ तुमचे पतीच नव्हे सामान्यत: प्रत्येक पतीला हेच वाटतं की त्याच्या पत्नीने केवळ त्याचंच असावं. अन्य पुरुषासोबत पत्नीची जवळीक कोणत्याही पतीच्या गळी उतरत नाही. तेव्हा आपल्या सहकाऱ्याला सहकारीच राहू द्या. आवश्यकता भासल्यासच त्याची आपल्या ऑफिसच्या कामात मदत घ्या. शक्यता आहे की तुम्हाला आकर्षित करण्यासाठी वा तुमच्याशी जवळीक वाढवण्यासाठीच तो तुम्हाला तत्परतेने मदत करत असेल. ऑफिसमध्ये पुरुष सहकाऱ्यांशी थोडं अंतर राखून वागणंच योग्य असतं. तुम्हीही थोड्याशा सावध राहिलात तर तुमचं वैवाहिक जीवन प्रभावित होणार नाही.