* पद्मा अग्रवाल

आज जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने आणि कित्येकदा त्यांच्यापेक्षा जास्त पगार घेत आहेत तेव्हा हा त्यांचा अधिकार आहे की त्या या आपल्या कमवलेल्या पैशांना आपल्या इच्छेनुसार खर्च करतील.

परंतु पुरुष नेहमी स्त्रीवर सत्ता गाजवत आला आहे आणि आजदेखील पत्नीवर स्वत:चा अधिकार समजतो.

प्रोफेशनल कॉलेजमध्ये लेक्चरर इला चौधरी यांच्या फोनवर मेसेज आला की त्यांच्या पतीने त्यांच्या जॉइंट अकाउंटमधून ४०,००० काढले आहेत. त्यांचा मूड खराब झाला. त्या चिडून उठल्या.

घरी येऊन स्वत:लाच खूप संयमित करीत काहीशा तिखट आवाजात त्या बोलल्या, ‘‘कॉलेजच्या फंक्शनसाठी मी मॉलमधील एक ड्रेस आणि मॅचिंग सँडल पसंत केले होते. माझ्या अकाउंटमध्ये आता आता केवळ दहा हजारच उरले आहेत आणि अजून पूर्ण महिना जायचा आहे. तो ड्रेस विकला गेल्याशिवाय राहील का?’’

मग काय, पती आदेश नाराज होऊन ओरडू लागले, ‘‘न जाणो आपल्या पैशांची किती घमेंड आली आहे. ड्रेसेस आणि सँडल्सचा भडिमार आहे, परंतु नाही. पॉलिसी एक्सपायर झाली असती, यामुळे मी पैसे काढले.’’

ईला चौधरी म्हणू लागल्या, ‘‘माझी सॅलरी ६०,००० आहे. मला कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने ड्रेसअप होऊन जावे लागते. परंतु जसे मी काही नवे खरेदी करू इच्छिते, तुम्ही राग दाखवून मला माझ्या मनाचे करू देत नाही.’’

पतिने मूर्खात काढले

एका मोठया स्टोअरमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करणाऱ्या मृदुला अवस्थी सांगतात, ‘‘आमच्या स्वत:च्या स्टोअरच्या मॅनेजरने पैशात पुष्कळ अफरातफरी केली. त्यामुळे त्याला काढले. पती हैराण होते. मी घरात रिकामी असण्याने दिवसभर वैतागायचे. त्यामुळे मी म्हटले की मी एमबीए आहे. जर तुम्ही म्हणाल तर स्टोअर सांभाळेन, परंतु माझी अट आहे की मी पूर्ण सॅलरी म्हणजेच तितकीच जितकी मॅनेजर घ्यायचा, घेईन.’’

पती अमर खुश होऊन म्हणाले, ‘‘हो. तू पूर्ण सॅलरी घे. तसंही सगळं तुझंच तर आहे.’’

पहिल्या महिन्यात तर कित्येक वेळा मागितल्यानंतर दिली. परंतु पुढच्या महिन्यापासून काही नाही. ‘सगळे काही तुझे वाला’ डायलॉग मूर्ख बनवण्यासाठी पुष्कळ आहे.

यासोबतच कोणतीही चूक झाल्यावर संपूर्ण स्टाफ समोर अपमानित करणेदेखील सोडत नाहीत.

मध्यमवर्गीय कुटुंबातील इशिता लग्नाच्या आधीपासूनच काम करायच्या. त्या आपल्या भावाला आपल्या पैशातून शिकवत होत्या आणि नंतर लग्नाच्या दरम्यान हुंडा इत्यादीमध्येदेखील त्यांचा पुष्कळ पैसा खर्च झाला.

पती आशिषने थेट तर नाही परंतु घुमवून फिरवून विचारले की, तू तर मागच्या काही वर्षांपासून काम करत होतीस. बँक बॅलन्स तर काहीही नाही.

पतीचे बोलणे ऐकून ईशिता हैराण झाल्या. त्या अॅडव्हर्टायझिंग फील्डमध्ये होत्या. सोबतच कपडयांचीदेखील त्यांना खूप आवड होती. पार्लरला जाणे त्यांच्यासाठी गरजेचे होते, पण पतीसाठी फालतू खर्च. पत्नीचे ऑफिसला चांगल्या पद्धतीने ड्रेस होऊन जाणे पतिला पसंत नव्हते.

इशिताची सॅलरी नंतर यायची, त्याआधीच खर्च आणि इन्वेस्टमेंटची प्लॅनिंग तयार असायची. जर त्या काही म्हणाल्या, तर नात्यात कडवटपणा. त्यामुळे मन मारून राहायच्या.

मुंबईच्या रीना जौहरी आपली वेदना व्यक्त करीत म्हणतात, ‘‘माद्ब्रा सगळया बोटांमध्ये डायमंड रिंग पाहून स्वत:लादेखील घालण्याची खूप इच्छा होती. मी पतीला सांगून एक रिकरिंग स्कीममधून एक लाख वाचवले. जेव्हा ती रक्कम मॅच्युअर झाली, तेव्हा मी जेव्हा अंगठीची गोष्ट बोलले, तेव्हा पती सुधीर म्हणाले, ‘‘काय फरक पडतो की अंगठी डायमंडची आहे का गोल्ड ची?’’

मी पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट केलेले आहेत. ते पैसे तुझेच असतील. तुझ्याच नावाने इन्व्हेस्ट केलेले आहेत. ‘‘रिनाच्या डोळयात अश्रू आले. प्रश्न आहे की पैसा पत्नीचा, मग निर्णय पतीने का घ्यावा?

पतीचे कर्तव्य

 

जेव्हा त्यांनी आपल्या पैशांनी स्कूटी खरेदी करण्याची गोष्ट सांगितली तेव्हा घरात वाद झाला.

गरज ही आहे की पतीने पत्नीच्या गरजांना समजावे. पत्नीची आवश्यकता, इच्छा, गरजांचा आदर करावा. तिच्या प्राथमिकतेला समजण्याचा प्रयत्न करावा.

मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या रिद्धीची बहिण सिद्धी तिच्या घरी पहिल्यांदा आली होती. ती आपल्या छोटया बहिणीला मुंबई फिरवण्यासाठी रोज कुठे ना कुठे जायची. त्यावेळी पती अर्पितदेखील त्यांच्यासोबतच असायचे. एक दिवस ते ऑफिसला गेले होते. दोघी बहिणी मॉलमध्ये शॉपिंग करायला गेल्या. तिने छोटया बहिणीला २-३ महाग ड्रेसेस खरेदी करून दिले. पेमेंट करताच पतीच्या फोनवर मेसेज गेला.

अर्पितने घरी येताच रागात रिद्धीला म्हटले, ‘‘खर्च करण्याचीदेखील काही मर्यादा असते. तू तर अशा पद्धतीने पैसे उडवत आहेस जणू आपण करोडपती आहोत.’’ बहिणीसमोर रिद्धीला आपली बेइज्जती सहन झाली नाही आणि छोटयाशा गोष्टीवर चांगलाच वाद सुरू झाला.

वेळेची गरज

आज वेळेचीही गरज आहे, की पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या कुटुंबाला आधुनिक सुख सुविधा द्याव्यात. आर्थिक रुपाने स्वावलंबी होणे महिलांना काम करण्यासाठी सगळयात जास्त प्रेरित करते. काम करण्याने महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो.

वर्किंग कपल्समध्ये बहुधा पती आपल्या पत्नीच्या सॅलरीवर आपला पूर्ण हक्क समजतात. त्यांना वाटते की पत्नीची सॅलरीदेखील तिने आपल्या मर्जीनुसार खर्च करावी.

सुरुवातीला काही महिने पत्नी भले संकोचत ही गोष्ट सहन करेल. होऊ शकते, की तोंडाने बोलणार नाही परंतु ती मनातल्या मनात विचार करेल, की जेव्हा ती पतीला त्याची सॅलरी मागत नाही तर मग पतीला काय अधिकार आहे की त्याने प्रत्येक महिन्याला तिची सॅलरी हातात घ्यावी

वेगवेगळया प्राथमिकता

आजकाल आई-वडील मुलींचे खूप स्पेशल ट्रीटमेंट देऊन पोषण करतात, ज्यामुळे त्या सासरीदेखील स्पेशल ट्रीटमेंट इच्छितात आणि जिथे ती मिळू शकत नाही तिथे वाद आणि असंतोषाचे हे कारण बनते.

पती-पत्नी दोघेही वेगवेगळे वातावरण, विचार आणि परिस्थितीतून गेलेले असतात. त्यामुळे दोघांच्या प्राथमिकता वेगवेगळया असतात. पती-पत्नीमध्ये कोणीही डॉमिनेटिंग नेचरचे असू शकते. अशा वेळी दुसरा हर्ट होतो.

जर पती, पत्नीच्या एखाद्या चुकीवर नाराज होतो तेव्हा ती लगेच चिडते की तिला कोणाचा असा अटीट्युड सहन करण्याची काय गरज आहे, तीदेखील कमावते. कित्येक वेळा नोकरदार पत्नी छोटया गोष्टीवर ओव्हर रिअॅक्ट करून चिडून नाराज होऊन राईचा पर्वत करते.

असे कोणते नाते आहे ज्यात थोडे फार भांडण, वाद-विवाद नसतील. पती पत्नीचे नाते तर लहान मुलांच्या मैत्री सारखे असायला हवे. क्षणात कट्टी, क्षणात बट्टी. आनंद तर आपल्या आजूबाजूलाच विखुरलेला असतो. फक्त तो शोधण्याची गरज असते. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणी आनंद शोधा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...