* पद्मजा अग्रवाल
चंदिगडच्या एका शाळेत नशा करून आलेल्या एका विद्यार्थ्याला टीचर रागावले म्हणून त्याने टीचरला मारून मारून रक्तबंबाळ केले. परीक्षेत नापास झाल्यावर मुख्याध्यापक रागावले म्हणून विद्यार्थ्याने त्यांच्यावर ४ गोळया चालवल्या.
प्ले स्कूलच्या मुख्याध्यापक स्वाती गुप्ता यांचे म्हणणे आहे, ‘‘आजकाल एकल कुटुंबामुळे व महिला नोकरी करत असल्याने परिस्थिती बदलली आहे. दोन अडीच वर्षांची मुलं सकाळी सकाळी नटूनथटून, बॅग आणि बाटलीचे ओझे घेऊन शाळेत येतात. अनेक मुलं ट्युशनलासुद्धा जातात. कित्येकदा स्त्रियांना मी बोलताना ऐकते की काय करणार घरात खूपच त्रास देतो. शाळेत गेला की ४-५ तासांचा निवांत वेळ मिळतो.’’
गुरुग्राममधील रेयॉन शाळेतील प्रद्यूम्न हत्याकांड असो किंवा इतर कोणत्या घटना असो, जनमानसाला क्षणभरासाठीच विचलित करतात. म्हणजे पहिले पाढे पंच्चावन्नच.
अलाहाबाद विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख दीपा पुनेठा यांच्या मते, ‘‘पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत नको तेवढे सतर्क राहू लागले आहेत. मूल जन्माला येताच ते ठरवतात की त्यांचा मुलगा डॉक्टर बनेल की इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलाविरुद्ध एकही शब्द ऐकायला आवडत नाही.
चेन्नईतील एका विद्यार्थिनीने शिक्षिकेने मारले म्हणून आत्महत्या केली. दिल्लीतील एका विद्यार्थिनीने टिचरने डस्टर फेकून मारले म्हणून एक डोळा गमावला, अशाप्रकारच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रांमधून चर्चेत असतात.
जितक्या सुविधा तितकी फीज
अलीकडे शिक्षण संस्था या पैसा कमावण्याचे स्रोत झाल्या आहेत. जणू काही बिझिनेस सेन्टर्सच आहेत. जितक्या जास्त सुविधा तेवढी जास्त फीज. सगळयाच पालकांना वाटते की आपल्या मुलाला उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्नसुद्धा करतात, तरीही अधिकांश पालक ना त्यांच्या मुलांच्या प्रगतीवर खुश असतात ना त्यांच्या वर्तनावर. यासाठी मोठया प्रमाणावर पालक स्वत:च जबाबदार असतात, कारण त्यांच्या स्वत:च्या हे लक्षात येत नाही की ते त्यांच्या मुलांशी कोणत्या वेळी कसे वागतात.
मुलं अभ्यास करण्याची टाळाटाळ करतात, तेव्हा आई कधीकधी थापड मारते, कधी रागावते तर कधी धमकी देते. पण कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही की शेवटी मूलाला अभ्यास का करायचा नाही. शक्यता आहे की त्याला त्याच्या टीचर आवडत नसतील, त्याची आयक्यू लेव्हल कमी असेल किंवा त्याला त्यावेळी अभ्यास करायची इच्छा नसेल.
मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षिका आपले दु:ख व्यक्त करताना म्हणाली की अलीकडे शिक्षकांवर मॅनेजमेंटचा दबाव, मुलांचा दबाव, पालकांचा दबाव खूप असतो. समजा एखाद्या मुलाचा गृहपाठ झाला नसेल तर २-३ वेळा सांगितले जाते किंवा चांगल्याप्रकारे बोलायला सांगितले तरी मुलं घरी जाऊन तिखट मीठ लावून सांगतात म्हणून आम्ही आजकाल विषय शिकवून आपले काम संपवतो.
पालकांचा दबाव
आता शाळा असो वा पालक, सगळयांना मुलांच्या टक्केवारीतच रस आहे. शाळांना आपली निकालाची काळजी आहे तर पालकांना आपल्या मुलाला सर्वात पुढे ठेवण्याची चिंता आहे. मुलांवर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव टाकला जात आहे. पालक आणि शाळा दोघेही मुलाच्या त्या क्षमतांकडून अतीअपेक्षा बाळगतात. मुलांवर एवढा दबाव व ओझे वाढते की तो या ओझ्याखाली दबून सगळया अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो किंवा बंड पुकारून आपल्या मानासारखे वागू लागतो.
अलाहाबादमधील एका सुप्रसिद्ध शाळेतील रुची गुप्ता सांगते की पालकांच्या नको तेवढया हस्तक्षेपामुळे मुलांना अभ्यास करणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. मुलांना अभ्यास करायचा नसतो आणि जर त्यांच्यावर जबरदस्ती केली तर राईचा पर्वत करतात. सगळे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडले जाते. जेव्हा मॅनेजमेंट नाराज असते, तेव्हा बळीचा बकरा शिक्षकांनाच बनवले जाते.
पैशाचा माज
आजकाल मुलं पालकांच्या जीवावरच शाळेत शिक्षकांना कस्पटासमान लेखतात. वर्गात शिक्षकांची थट्टा उडवणे व उगाच मुर्खासारखे प्रश्न विचारत राहणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. आजकाल पालक शाळा व टिचरमधले दुर्गुण मुलांसमोरच बोलतात. अनेकदा पालक मुलांसमोरच म्हणतात की या टिचरची तक्रार मॅनेजमेंटकडे करू. लगेच त्यांना काढून टाकू. असे बोलणे ऐकल्यावर शिक्षकांबाबत मुलांच्या मनात आदर सन्मान कसा राहील?
टिचरचे कर्तव्य
पालक मंजू जायस्वाल आपले दु:ख व्यक्त करत म्हणाल्या की कोणतेच शिक्षक आपली चूक कबूल करायला तयार नसतात. जर घटना गंभीर होऊन वरपर्यंत गेली तर ते मुलाला क्षणोक्षणी अपमानित करतात. त्यामुळे मुलं घरी काही सांगत नाहीत. अशाप्रकारच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या की पालकसभेत शिक्षक केवळ आपलेच म्हणणे पुढे करतात आणि तेही मुलांच्या तक्रारी. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आईवडील मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. ते पैशाच्या बळावर क्रश वा नोकराच्या भरवशावर वाढतात. त्यामुळे त्यांच्या मनात संस्काराऐवजी आक्रोश असतो. पालकांना हे सांगण्यात अभिमान वाटतो की त्यांचा मुलगा त्यांचे ऐकत नाही. मोबाईल व टीव्हीला चिकटलेला असतो. तरीही ते शिक्षकांकडून अशी अपेक्षा करतात की त्यांनी ही सवय सोडवावी. जर मूल जास्तीतजास्त वेळ तुमच्याजवळ असते.
शिवाय जे विद्यार्थी अभ्यासात कमकुव असतात, त्यांची इतकी उपेक्षा केली जाते की ते घुसमटत राहतात व अभ्यासातून त्यांचे मन उडते. अशावेळी सर्व मुलांकडे लक्ष देणे हे शिक्षकांचे कर्तव्य असते. त्यांच्यातील प्रतिभा शोधून व त्यांच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यांनी मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.