* गरिमा

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि आईवडील दोघेही कामाला जात असल्यामुळे मुले जणू लहापणापासूनच घराच्या चार भिंतीत कैद झाली आहेत. उद्यान किंवा मोकळया जागेत खेळण्याऐवजी ती व्हिडीओ गेम खेळतात. त्यांचे मित्र हे त्यांच्याच वयाची मुले नाहीत, तर टीव्ही, संगणक, मोबाइल हे आहेत.

याचा मुलांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या मानसिकतेवर प्रचंड परिणाम होतो. ते समाजात रहायला शिकू शकत नाहीत, शिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्वही विकसित होऊ शकत नाही.

का गरजेची आहेत सामाजिक कौशल्ये

योग्य भावनिक विकासासाठी सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. संदीप गोविल सांगितले की, ‘‘माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजापासून वेगळा राहू शकत नाही. यशस्वी आणि चांगल्या आयुष्यासाठी, मुलांना इतर लोकांशी वागताना, बोलताना कुठलीही अडचण येऊ नये, हे महत्त्वाचे आहे. ज्या मुलांमध्ये सामाजिक कौशल्ये विकसित होत नाहीत त्यांना मोठे झाल्यावर समाजासोबत निरोगी संबंध प्रस्थापित करताना अडचणी येतात. सामाजिक कौशल्यांमुळे मुलांमध्ये भागीदारीची भावना विकसित होते आणि ती मुलांना आत्मकेंद्री होण्यापासून वाचवते. त्यांच्या मनात एकटेपणाची भावना कमी करते.’’

आक्रमक वर्तनाला आळा घालण्यासाठी डॉ. संदीप गोविल सांगतात, ‘‘आक्रमक वर्तन ही एक अशी समस्या आहे जी मुलांमध्ये असणे ही सामान्य बाब बनत चालली आहे. कौटुंबिक ताण, टीव्ही किंवा इंटरनेटवर हिंसक कार्यक्रम पाहणे, अभ्यासात चांगले गुण मिळवण्याचे दडपण किंवा कुटुंबापासून दूर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांमध्ये आक्रमक वर्तन हे जास्त दिसून येते. अशी मुले सर्वांपासून लांब राहणेच पसंत करतात. इतर मुलांनी त्यांचे मन दुखावल्यास आरडाओरड करू लागतात. अर्वाच्च भाषेत बोलून मारहाण करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा खूपच राग आल्यास ते खूपच हिंसक होतात.’’

मुलांना लहानपणापासूनच समाजकरणाचे धडे दिले तर त्यांच्यात अशा प्रकारची प्रवृत्ती जन्मालाच येणार नाही.

मुलांना एका दिवसात समाजवादाचे धडे दिले जाऊ शकत नाहीत. यासाठी लहानपणापासूनच त्यांच्या संगोपनावर लक्ष देणे गरजेचे आहे.

जेव्हा मूल लहान असते : विभक्त कुटुंबात राहणारी ५ वर्षांपर्यंतची मुले सहसा आईवडील किंवा आजीआजोबांकडेच जास्त वेळ राहतात. प्रत्यक्षात लहान वयापासून त्यांना सतत स्वत: जवळ न ठेवता समाजात चांगल्या प्रकारे वावरायला शिकवले पाहिजे.

आपल्या मुलांशी बोला : पारस ब्लिस रुग्णालयाच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. रूबी आहुजा यांनी सांगितले की, ‘‘जेव्हा तुमचे मूल लहान असते तेव्हापासूनच त्याच्या नावाने त्याला हाक मारा. त्याच्याशी बोलत रहा. त्याला सभोवतालच्या सर्व गोष्टींबद्दल सांगत रहा. जर तो खेळण्यांसोबत खेळत असेल तर त्याला त्या खेळण्याला काय म्हणतात, हे विचारा. खेळण्यांचा रंग कोणता आहे आणि त्यामध्ये काय विशेष आहे, अशा अनेक गोष्टी विचारत रहा. नवनवीन प्रकारे खेळायला शिकवा.’’

मुलाला मित्र आणि शेजाऱ्यांची ओळख करुन द्या : दर रविवारी मुलगा एखादे नवीन नातेवाईक किंवा शेजाऱ्यांना भेटेल असा प्रयत्न करा. पार्टीत किंवा तत्सम कार्यक्रमात लहान मुल हे बऱ्याचदा खूप साऱ्या अनोळखी लोकांना एकत्र पाहून घाबरते. पण, जर तुम्ही तुमच्या खास लोकांशी आणि त्यांच्या मुलांशी आपल्या मुलाची वेळोवेळी भेट घडवून आणत असाल तर मूल जसजसे मोठे होईल तसे या नात्यांमध्ये अधिकाधिक मिसळण्यास शिकेल.

इतर मुलांबरोबर मिसळू द्या, खेळू द्या : आपल्या मुलाला आपल्या आजूबाजूच्या किंवा त्याच्या शाळेतील इतर मुलांबरोबर मिसळण्यास मदत करा, जेणेकरून इतरांना सहकार्य करण्यासोबतच मिळूनमिसळून रहायचे असते, हे त्याच्या लक्षात येईल. मुले खेळतात तेव्हा ती एकमेकांशी बोलतात. एकमेकांत मिसळून जातात. यामुळे सहकार्याची आणि आत्मीयतेची भावना वाढते. त्यांची वृत्ती विकसित होते आणि त्यांना इतरांच्या समस्या समजतात. इतर मुलांशी मिळूनमिसळून जीवन मजेत जगण्याचा गुण त्यांच्या अंगी विकसित होतो, जो त्यांच्यासोबत आयुष्यभर राहतो.

जेव्हा मुले मोठी होत असतात

पालनपोषणात बदल घडवून आणत रहा : डॉ. संदीप गोविल सांगतात की, ‘‘मुलांच्या गरजेच्या वेळी मानसिक आणि शारीरिकदृष्टया त्यांच्यासोबत रहा, परंतु त्यांना त्यांची थोडी स्पेस द्या. त्यांच्याबरोबर नेहमीच सावलीसारखे राहू नका. आपण ३ वर्षांच्या आणि १३ वर्षांच्या मुलाबरोबर एकाच पद्धतीने वागू शकत नाही. मुलांच्या वागणुकीत बदल होऊ लागताच त्यानुसारच त्याला समजून घेऊन त्याच्याशी बोला.

गॅझेटसोबत कमी वेळ घालवू द्या

गॅझेट्सचा जास्त प्रमाणात वापर केल्याने मुलांच्या आजूबाजूला असलेला संबंध तुटतो. मेंदूत ताणतणावाची पातळी वाढते, ज्यामुळे वर्तन किंचित आक्रमक होते. यामुळे सामाजिक, भावनिक आणि एकाग्र होऊ न शकण्ययाची समस्या उद्भवते. सतत स्क्रीन पाहण्यामुळे अंतर्गत चक्र बिघडते.

मुलांना गॅझेटचा वापर कमीत कमी करू द्या, कारण त्याच्याबरोबर जास्त वेळ घालविल्यामुळे मुलांना स्वत:चा स्वत:शी आणि इतरांशीही संपर्क साधण्यातही समस्या येऊ शकतात. दिवसभरात २ तासांपेक्षा जास्त वेळ टीव्ही पहायला देऊ नका.

धार्मिक कार्यांपासून दूर ठेवा : आपल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी सांगा. त्यांना धार्मिक कार्य, पूजापाठ अशा अवैज्ञानिक विचारांपासून दूर ठेवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...