* शकुंतला सिन्हा

अलीकडे डिशवॉशर म्हणजेच भांडी धुणाऱ्या मशीनची मागणी वाढू लागलीय. तुमची मोलकरीण आली नसेल वा तुमच्याकडे नसेल तर दोन्ही परिस्थितीत ही खूपच कामाची वस्तू आहे.

किती प्रकारे

डिशवॉशर प्रामुख्याने २ प्रकारचे असतात -एक म्हणजे फ्री स्टँडिंग जे वेगळं लावू शकता आणि दुसरं बिल्ट इन जे किचनच्या ओट्याखाली कायमचं लावू शकता. बिल्ट इन डिशवॉशर लावून घेणं अधिक सुविधादायक आहे.

साधारणपणे डिशवॉशर १२ ते १६ प्लेस सेटिंगचे असतात. भारतात १२ प्लेस सेटिंग असणाऱ्या मशिन्स मिळतात. एक प्लेस सेटिंग म्हणजे १-१ मोठ जेवणाचं ताट व नाश्ता प्लेट, बाउल, ग्लास, चहा वा कॉफी कप व प्लेट, सुरी, काटे आणि २-२ चमचे आणि सलाड फोर्क लोड करू शकता. याव्यतिरिक्त काही रिकाम्या जागा असतात, ज्यामध्ये जेवणाची भांडीदेखील ठेवू शकता.

भारतीय बाजारात डिशवॉशर

भारतात सीमेन्स, व्हर्लपुल, एलजी आणि आयएफबी ब्रँडचे डिशवॉशर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत साधारणपणे २४ हजारापासून ४० हजारच्या मध्ये आहे. सध्या आयएफबी ब्रँडच मार्केट शेयर सर्वाधिक आहे आणि याच्या किमतीदेखील इतरांपेक्षा कमी आहेत. २०१७ साली डिशवॉशरचं मार्केट ३०० लाख डॉलरचं होतं म्हणजे २१० कोटीचं.

डिशवॉशर लावण्यापूर्वी

डिशवॉशरसाठी ४ गरजा – ठेवण्यासाठी योग्य जागा, विजेची सुविधा, पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था. साधारणपणे डिशवॉशर २४×२४चं असतं आणि याची उंची ३५ इंच असते आणि यामध्ये अडजस्टेबल लेग्स असतात.

अलीकडे मोड्युलर किचन केलं जातंय आणि यामध्ये बिल्ट इन डिशवॉशर सहजपणे लावता येऊ शकतं. ज्यांचं स्वत:चं घर आहे वा जे नवीन बनविणार आहेत त्यांच्यासाठी बिल्ट इन मॉडेल उत्तम आहे. तुमचं घर भाडयाचं असेल तर फ्री स्टँडिंग डिशवॉशर तुम्ही घेऊ शकता, ते लावण्यात वा घेऊन जाताना तोडफोड करण्याचीदेखील गरज लागत नाही. किचन जुनं असेल तर डिशवॉशर लावण्यासाठी थोडीफार तोडफोड करावी लागेल. ओटयाखाली पुरेशी जागा बनवून तिथपर्यंत पाण्याचा पुरवठा आणि ड्रेनेजची व्यवस्था करावी लागणार.

डिशवॉशरबाबत गैरसमज

डिशवॉशरबाबत लोकांमध्ये जागरूकता अधिक नाहीए. एक समज आहे की यामध्ये विजेचं बिल आणि पाणी अधिक खर्च होतं, खरंतर असं अजिबात नाहीए. सुरुवातीला खर्च थोडा अधिक येतो. सर्वसाधारण समज आहे की यासाठी खास किचन प्लॅन लागतो, परंतु अलीकडे जे अपार्टमेंटस बनत आहेत त्यामध्ये मॉड्युलर किचनच असतात आणि त्यामध्ये डिशवॉशर सहजपणे लावू शकता. यामध्ये डिशबरोबरच वेगवेगळी जेवणाची भांडीदेखील धुतली जातात.

सेटिंग्स : तुमचं डिशवॉशर ऑटोमॅटिक असेल तर एकदा भांडं ठेवून तुमची सायकल निवडून चालू केल्यावर भांडयांच्या स्वच्छेतेनंतर ते आपोआप बंद होईल. साधारणपणे ४ वॉश प्रोग्राम असतात. यामध्ये दिलेडं स्टार्टचीदेखील सुविधा असते म्हणजे तुम्हाला हवं असल्यास तुमच्या सुविधेनुसार २, ४ तास वा यापेक्षा जास्त वेळेनंतरदेखील सुरु होणारा प्रोग्रॅम निवडू शकता. यामध्ये चाईल्ड सेफ्टी लॉकचीदेखील सुविधा आहे.

काही मॉडेल्समध्ये एक्वा आणि लोड सेन्सर्सदेखील असतात, जे पाणी आणि विजेची बचत करतात. एक्वा सेन्सर्स मशीनच्या लोडनुसार पाण्याचं तापमान आणि वॉशिंग टाईम निवडतात.

डिशवॉशरचे फायदे

सुविधादायक : डिशवॉशरची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे खूपच सुविधादायक आहे आणि यामध्ये वेळेची बचत होते. भांडयांच्या स्वच्छतेसाठी अधिकवेळ सिंकजवळ उभं राहण्याची गरज नाहीए. तसंच किचनदेखील उठून दिसतं.

जर मोलकरणीवर अवलंबून रहायचं नसेल आणि आणि तिच्या अटींपासून वाचायचं असेल तर हा खूपच छान पर्याय आहे. तसंही शहरामध्ये आणि मोठया अपार्टमेंटसमध्ये मोलकरणींचे भाव दिवसेंदिवस वाढतंच चाललेत.

वीज आणि पाणी : अलीकडचे डिशवॉशर वीज आणि पाण्याच्या बाबतीत खूपच इकॉनॉमिकल आहेत. साधारणपणे एक इकॉनॉमिक वॉश सायकलमध्ये १ युनिट वीज खर्च होते. भांडी लवकर सुकविण्यासाठी हिटर चालू केला तर २ युनिट प्रति वॉश वीज जाळली जाते म्हणजेच वीज ८-१० लिटर प्रति वॉश सायकल होते, याउलट हाताने धुतल्यास यापेक्षा अधिक पाणी लागतं.

फक्त डिशेसच धूत नाही : डिशवॉशरमध्ये केवळ डिशच नाही तर तुम्ही किचनमध्ये लागणारी सर्व भांडी धुवू शकता. फक्त एक लक्षात घ्या की तुमची प्लास्टिक, काचेची आणि चिनीमातीची भांडी डिशवॉशर सेफ असावीत. अनेकदा अशी भांडी बनविणाऱ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनावर असं लिहून देतात.

डिशवॉशरचं लोडिंग : डिशवॉशरचे उत्पादक त्यांच्या माहिती पुस्तिकेत वॉशर लोड करण्याची योग्य पद्धत सचित्र समजावतात. त्यांच्या सूचनेनुसार भांडी लोड करतेवेळी वेळेची बचत आणि लोडिंग व अनलोडिंगची सुविधा असते. डिश व इतर भांडयांना उलट करून ठेवा म्हणजे पाण्याची वेगवान धार मलिन जागी पडेल आणि भांडी व्यवस्थित स्वच्छ होतील.

गरम पाण्याचा वापर : जर गरम पाणी हवं असेल तर तुमच्याजवळ हॉट वॉटरचा पर्याय आहे. वॉशर लावण्यापूर्वी तुमच्या किचन सिंकमधील गरम पाण्याचा नळ चालू करा. जेव्हा गरम पाणी येऊ लागेल तेव्हा पुन्हा बंद करा. त्यानंतर वॉशरमध्ये गरम पाणी जाऊ द्या. असं केल्याने वॉशर थंड पाण्याने धुण्याऐवजी सरळ गरम पाण्याने धुवेल.

प्रिवॉश गरजेचं नाही : अनेकदा उत्पादक प्रिवॉश करण्याचा सल्ला देतात परंतु असं करणं गरजेचं नाहीए. यामध्ये वेळ, वीज आणि पाण्याची नासाडी होते. वॉशरला लोड करून रीन्स ओन्ली सायकल निवडू शकता.

स्वच्छता : डिशवॉशरची वेळोवेळी स्वच्छता करायला हवी. वरच्या रॅकच्या मधोमध एका कपात अर्धा कप पांढरं व्हिनेगर टाकून मशीन चालू केल्याने मशीन स्वच्छ होईल आणि दुर्गंधीदेखील दूर होईल. याव्यतिरिक्त वॉशरच्या फिल्टरची स्वछता करत रहायला हवी यामुळे ड्रेन लाईन चोक होणार नाही.

काही भांडी हाताने धुवा : डिशवॉशर सेफ नसणारी भांडी हातानेच धुवा. याव्यतिरिक्त कॉपर आणि एल्युमिनियम भांडयांचा रंग खराब होऊ शकतो. लाकडाची भांडी क्रॅक होण्याची शक्यता असते.

फुली इंटिग्रिटेड डिशवॉशर लावा : तुम्ही वेगळा डिशवॉशरदेखील लावू शकता परंतु इंटिग्रिटेड वॉशर अधिक योग्य आहे. हे तुमच्या किचनच्या ओटयाखाली एकसमान असेल आणि त्याचं ऑपरेटिंग पॅनेल तुमच्या समोर असेल. वॉशरचं ड्रेन किचनच्या ड्रेनला मिळालेलं असेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...