* पारुल भटनागर
थंडीमध्ये त्वचेची सोबतच ओठांचीदेखील विशेष काळजी घेण्याची गरज असते, कारण ते खूप कोमल असतात. त्यांच्यावर थंडी आणि कोरडया हवेचा थेट प्रभाव पडतो. अशावेळी फाटलेले ओठ जिथे जळजळ निर्माण करतात, तिथेच आपला विंटर चर्मदेखील संपवतात. त्यामुळे त्यांच्या विशेष काळजीची गरज असते. लिप्स केअर संबंधात जाणूया गेट सेट युनिसेक्स सलूनचे एक्सपर्ट समीर यांच्याकडून.
हिवाळा हा रुक्ष त्वचा आणि पापुद्राच्या ओठांचा ऋतू. हेच कारण आहे की या ऋतूमध्ये तुम्हाला खूप काळजीपूर्वक अशी लिप्स्टिक निवडायला हवी, जी रूक्ष आणि कोरडया त्वचेवर चांगल्या पद्धतीने काम करू शकेल.
वेगळे आहेत नियम
लिपस्टिक लावण्याचेदेखील वेगवेगळे रुल्स असतात, जसे दिवसाच्या वेळी लाईट कलरची लिपस्टिक लावायला हवी, तर रात्री ब्राईट आणि डार्क कलरची. अशाच प्रकारे ऋतूच्या हिशेबाने लिपस्टिक लावायला हवी. गरजेचे नाही की तुम्ही जी लिपस्टिक उन्हाळयामध्ये वापरता, तीच थंडीच्या ऋतूतदेखील तुम्हाला सूट करेल.
मॅट लिपस्टिक तुम्हाला कितीही आवडत असली तरी हिवाळयात ती लावण्याने तुमचे ओठ रूक्ष होऊ शकतात. तुम्ही जेव्हा केव्हा ही मॅट लिपस्टिक विशेषत: लिक्विड मॅट लिपस्टिक लावण्याविषयी विचार कराल, तेव्हा तुम्हाला या गोष्टीची तयारी आधी करावी लागेल, जेणेकरून तुम्ही आपल्या ओठांना रूक्ष आणि पापुद्रे युक्त होण्यापासून वाचवू शकाल.
जेव्हा मॅट लिपस्टिक वापराल
लिक्विडड मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.
* ओठांवर व्हॅसलिन अप्लाय करा, जेणेकरून मॉइश्चर टिकून राहील.
* नंतर ब्रशचा वापर करून ओठांना एक्सफोलिएट करा आणि त्यानंतर त्यांच्यावर लीप बाम लावा.
* आता लिक्विड लिफ्ट कलर लावा.
* त्यावर प्रायमर लावा जेणेकरून लिपस्टीक पुष्कळ काळापर्यंत टिकून राहील.
* शेवटी ओठांच्या मधोमध हायलायटर लावा, जेणेकरून ओठ रसरशीत दिसतील. असे करण्याने ओठांवर पुष्कळ चांगला रिझल्ट येईल.
जर तुम्ही हिवाळयात ओठांना रसरशीत दाखवण्यासाठी ग्लॉसी लिपस्टिक लावू इच्छित असाल तर हा एक चांगला ऑप्शन आहे. मॅट लिपस्टिकऐवजी ग्लॉसी लिपस्टिक रिफ्लेक्शनमुळे चमकदार दिसते. ही तुम्ही थेटदेखील अप्लाय करू शकता किंवा मग मॅट लिपस्टिकच्या टॉप कोटसारखीदेखील वापर करू शकता. काही ग्लोसी लिपस्टिक्समध्ये ऑर्गन ऑइलचे गुण असतात ज्यामुळे तुमचे ओठ मऊ राहतात आणि त्यांचे ग्लॉसी टेक्सचर हिवाळयात तुमच्या ओठांना आरोग्यदायी लुक देते. ग्लॉसी लिपस्टिकसोबत सॅटन लिपस्टिकदेखील हिवाळयात पर्फेक्ट मानली जाते.
घरगुती उपाय
असर्वसाधारणपणे तीव्र हवा किंवा तीव्र उन्हाच्या संपर्कात येण्याने ओठ शुष्क होतात आणि मग फाटू लागतात. जर तुम्हीदेखील ओठ फाटण्याच्या समस्येतून जात असाल तर त्यांच्या बचावासाठी योग्य लिपस्टिक आणि लीप बामचा वापर करा. याशिवाय खालील घरगुती उपायदेखील करून पाहू शकता.
नाभीमध्ये तेल लावा : सकाळी अंघोळीच्या आधी नाभीमध्ये तेल लावण्याने फाटलेल्या ओठांच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.
ओठांवर तूप लावा : जर तुम्ही फाटलेल्या ओठांच्या समस्येने हैराण असाल तर त्यांच्यावर तूप लावा. याशिवाय लोण्यात मीठ घालून लावण्यानेदेखील ओठ नरम होतात.
साखरेने स्क्रब करा : साखरेमध्ये ग्लायकोलीक आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड असते ज्यामुळे नरमपणा कायम राहतो. ब्राउन आणि व्हाईट शुगरने ओठांना स्क्रब करा. समस्या छूमंतर होईल