* नसीम अन्सारी कोचर
उन्हाळयाचा ऋतू सुरु होताच डासांची भुणभुण सुरु होते आणि पावसाळयात तर यांची संख्या खूपच जास्त वाढते. संध्याकाळ होताच डासांचा त्रास सगळ्यांसाठी मोठी समस्या बनते. यांना पळवून लावायला कडुलिंबाचा पाला जाळला जातो, कुठे स्प्रे शिंपडण्यात येतो, तर कुठे मॉस्किटो कोईल लावण्यात येते. सरकारसुद्धा डासांपासून सुटका व्हावी म्हणून शहरात निरनिराळे उपक्रम राबवते. गल्लीबोळात डास मारण्याच्या औषधांची फवारणी आणि धूर निघणारी गाडी फिरवली जाते, नाले खड्डे आणि साठलेल्या पाण्याच्या जागा स्वच्छ केल्या जातात. तरीही डासांचा त्रास कमी होत नाही. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजाराने लोक त्रस्त असतात.
कोईल, स्प्रे यासारखी उत्पादने तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, हे सांगू शकत नाही. घरात ते सतत पेटवून ठेवणे शक्य नसते. पण टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला घरातील डासांच्या त्रासापासून सुटका मिळवायची असेल तर बस्स काही रोपं खरेदी करा आणि आपल्या बाल्कनी, अंगण, बगीचा आणि बैठकीत त्यांना छान सजवून ठेवा. बघा की कशा चमत्कारिक पद्धतीने डास आणि माशा तुमच्या घरातून गायब होतात ते. ही रोपं ना केवळ आपल्या घरात डासांचे आगमन थांबवते तर यांच्यामुळे पसरणाऱ्या आजारांनासुद्धा तुमच्या कुटुंबापासून दूर ठेवते.
या जाणून घेऊ या जादूच्या सुगंधित रोपटयांबाबत :
लेमनग्रास : ही एक जडीबुटी आहे, ज्याचे वैज्ञानिक नाव सिंबोपोगन साइझेटस आहे. यात उपस्थित असलेल्या लिंबाच्या सुवासामुळे याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हे एक बारमाही गवत आहे, भारत आणि आशियाच्या उष्णकटीबंधीय भागात उगवते, प्रत्येक घरात लेमनग्रासचा वापर त्याच्या सुवासामुळे केला जातो. चहाच्या स्वरूपात याचे खूप सेवन केले जाते. साधारणत: लेमन ग्रासचा वापर सुवासासोबत डास नाहीसे करण्याच्या अनेक औषधांमध्येसुद्धा केला जातो. याचा मनमोहक आणि ताजेतवाने करणारा सुवास जसा एकीकडे ताण नाहीसा करून तुमचा मूड फ्रेश करण्याचेसुद्धा काम करतो, तसाच दुसरीकडे डाससुद्धा यांच्या सुवासाने दूर पळतात. मग आजच लेमनग्रासचे रोप आपल्या बाल्कनी आणि बैठकित आणून ठेवा आणि मग बघा कसे डास तुमच्या घरात डोकावायलासुद्धा घाबरतात ते.
झेंडू : झेंडू तर वर्षानुवर्षे उगवणारे फूल आहे. भारतात घराघरात झेंडूचे झाड लावले जाते. पिवळया रंगाचे हे फूल ना केवळ तुमच्या घराच्या बाल्कनीला सुंदर करते, तर त्याच्या सुवासाने डास आणि उडणारे किडे तुमच्यापासून दूर राहतात. डासांना पळवण्यासाठी या झाडाला फुल लागले असण्याची गरज नाही, तर याचे झाडच त्यांना पळवून लावायला पुरेसे असते. याच्या पानांमधून पसरणारा सुवास डासांना अजिबात आवडत नाही आणि ते या झाडापासून दूरच राहतात. घराचा दरवाजा, खिडकी, बाल्कनीमध्ये झेंडूचे झाड ठेवा आणि डासांपासून आपल्या घराला सुरक्षित ठेवा.
लव्हेंडर : फिक्कट वांगी रंगाचे फूल असलेल्या या रोपटयाचा वापर निरोगी राहण्यासाठी केला जातो. काळजी दूर करणे, ताणापासून सुटका मिळवणे, त्वचेच्या समस्या आणि मुरुमांवर उपाय, श्वसनसमस्या यांच्यावर उपचार करण्याची क्षमता लव्हेंडरच्या रोपात आहे. लव्हेंडर तेलाचा वापर अरोमाथेरपीत केला जातो. हे निसर्गत:च झोप येण्यात सहाय्यक ठरते. तुम्हाला क्वचितच हे माहीत असेल की तुम्ही डासांना दूर ठेवण्यासाठी जे मॉस्किटो रिपेलंट वापरता, त्यातही लव्हेंडर ऑइल मिसळलेले असते. आपले घर सुगंधीत ठेवण्यासोबतच डासांना पळवून लावण्यासाठी तरी घरात लॅव्हेंडरचे झाड लावा. याचे फूलसुद्धा खूप सुंदर दिसते आणि त्याचा सुवास आपल्यात ताजेपणा आणतो.
लसूण : तुम्ही लहानपणापासून आपल्या थोरामोठयांकडून ऐकले असेल की लसूण खाल्ल्याने रक्ताला एका वेगळयाप्रकारचा वास येऊ लागतो, जो डासांना अजिबात आवडत नाही. जर तुम्हाला स्वत:ला लसूण खाणे आवडत नसेल तर घरात एक लसूणाचे झाड लावा. मोहरीच्या तेलात लसूण परतल्याने निघणारा धूरसुद्धा डासांना पळवून लावतो. लसणाचे रोप घरात लावून तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
तुळस : भारतात जवळपास प्रत्येक घरात हे रोप दिसते. तुळशीत औषधी गुण असतात, हे रोप हवा स्वच्छ ठेवते शिवाय लहानसहान किडे आणि डास यांना तुमच्यापासून दूर ठेवते, याची पानं चहा आणि काढा बनवण्यातसुद्धा वापरतात. जर तुम्ही घराच्या बाल्कनीत ७-८ कुंडयांमध्ये तुळशीची रोपं लावलीत तर हे एखाद्या सुरक्षारक्षकाप्रमाणे तुमच्या घरावर पहारा देतील आणि यातून आलेल्या सुवासाने डास तुमच्या घराकडे फिरकणारही नाहीत.