* लव कुमार सिंह
राणी आणि रजनी खास मैत्रिणी. दोघीही मध्यमवर्गीय, सुशिक्षित, उदार, सहिष्णू, मितभाषी, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या, नवनवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक.
फक्त दोघींमध्ये एकच अंतर. ते अंतर म्हणजे देह प्रेमाबाबतचं. एका छताखाली राहात असूनदेखील राणी आणि तिच्या पतीमध्ये शारीरिकसंबंध जुळण्यास खूप वेळ लागतो. महिने असेच निघून जातात.
इकडे रजनी आणि तिचा पती आठवड्यातून १-२ वेळा तरी शारीरिकसंबंध ठेवतात. राणी तर या संबंधांना घाणेरडंदेखील समजते, तर रजनी मात्र असा विचार करत नाही. दोघी एकमेकींमधल्या या अंतराच्या गोष्टी जाणून आहेत.
तुम्ही आता म्हणाल हे कसलं बरं अंतर? होय, हेच तर खूप मोठं अंतर आहे. काही दिवसांपूर्वी या एका अंतराने दोघी मैत्रिणींमध्ये अनेक अंतरं निर्माण केली होती.
या एका अंतरानेच राणी शरीर स्वच्छ ठेवण्यात संकोचली होती. एवढंच नाही तर, तिच्या पतीचीदेखील अशीच काहीशी अवस्था होती. त्याला त्याच्या व्यवसायातून फुरसत नव्हती. तो सतत गुटखादेखील चघळत असायचा.
सेक्स स्वच्छता शिकवतं
इकडे रजनी पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक बाबतीत सतर्क होती. योग्य ताळमेळ, प्रेम, सुसंवाद आणि नियमित सहवासामुळे रजनीला याची जाणीव होती की एकांत, वेळ आणि सहवास मिळाल्यावर पती कधीही तिला मिठीत घेऊ शकतो. तो कधीही तिच्या कोणत्याही शरीराच्या भागाचं चुंबन घेऊ शकतो. कधीही दोघांच्या लैंगिक अंगांचं मीलन होऊ शकतं. अशा परिस्थितीत ती शरीराच्या आंतरिक स्वच्छतेबाबत बेपर्वा होऊ शकत नव्हती. रजनीकडून या प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया तिच्या पतीलादेखील आंतरिकरित्या स्वच्छ ठेवण्यात मदत करायची.
या एका अंतरामुळे राणी तिचा देह आणि खानपानाबाबतदेखील निष्काळजी झाली होती. जेव्हा तुमचं शरीर न्याहाळणारं, देहाची स्तुती करणारं कोणी नसेल तर अनेकदा लग्नानंतर अशा प्रकारचा निष्काळजीपणा वागण्यात येतो. राणी याचं अगदी ठळक उदाहरण होती. अशाप्रकारे काळाबरोबरच तिने चरबीच्या अनेक थरांना जणू निमंत्रण दिलं होतं. इकडे रजनीचं स्वत:वर व्यवस्थित नियंत्रण होतं. त्यामुळे ती छान सडपातळ होती.
या अशा त्यांच्या अंतरामुळेच राणी एक दिवस डॉक्टरच्या समोर बसली होती. रजनीदेखील सोबत होती. राणीला जननेंद्रियाच्या भागात वेदनेची समस्या होती, जी बऱ्याच दिवसांपासूनची होती. डॉक्टरांनी सांगितलं की इन्फेक्शन आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली होती.
राणीची ही गोष्ट रजनीच्या पतीलादेखील समजली होती. खरंतर तशी प्रत्येक गोष्ट रजनी आणि तिच्या पतीला तशी समजायचीच. दोघेजण यावर चर्चादेखील करायचे. रात्री जेव्हा रजनीने पती राजेशला ही गोष्ट सांगितली तेव्हा राजेश म्हणाला, ‘‘तू तुझ्या मैत्रिणीला समजवायला हवं की समागम ही वाईट गोष्ट नाहीए. मला असं नाही म्हणायचंय की अशी सर्व विवाहित लोक जी संबंध ठेवत नाहीत, ती शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहात असतील. परंतु एक गोष्ट मी गॅरण्टीने सांगू शकतो की जर पतिपत्नी नियमितपणे समागम करत असतील तर दोघेही आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहू शकत नाहीत. म्हणजेच जर ते एकमेकांच्या सहवासात आनंद घेत असतील तर ते अधिक निरोगी आणि स्वच्छ राहातात.’’
सेक्स औषध आहे
राजेश अगदी बरोबर म्हणाला होता. खरंतर जेव्हा पतिपत्नींना ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना शारीरिकरित्या लवकर जवळ यायचं असतं, याची जाणीव असते तेव्हा ते दोघेही स्वाभाविकपणे आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत सचेत राहातात. यामुळे दोघांचं व्यक्तिमत्त्व दृढ होतं आणि दोघांमध्ये मधुर संबंधदेखील निर्माण होतात. तसंच अनेक रागांपासूनदेखील शरीर दूर राहातं. याउलट जी जोडपी शारीरिकसंबंधांबाबत उदासीन राहातात, ते त्यांच्या स्वच्छतेबाबतदेखील बेपर्वा असू शकतात.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वैवाहिक जीवनात पतिपत्नीमध्ये शारीरिक संबंधाचे २ प्रमुख उद्देश्य असतात. पहिलं म्हणजे गर्भवती होणं आणि दुसरं म्हणजे आनंद मिळवणं. परंतु बारकाईने पाहाता सहवासामुळे अजून एक तिसरं उद्दिष्टदेखील साधता येतं. याला आपण असंदेखील म्हणू शकतो की जर पतिपत्नीमध्ये नियमित अंतराने शारीरिकसंबंध बनत असतील तर ते अधिक निरोगी असतात.
नक्कीच, पतिपत्नीमध्ये सेक्सला अनेक प्रकारचे त्रास दूर करण्याचं औषध असल्याचं सांगण्यात आलंय. सेक्सबाबत जगभरात खूप संशोधन करण्यात आलंय आणि केलं जातंय. विविध शोधानंतर जगभरातील तज्ज्ञांनी सेक्सचे फायदे अशाप्रकारे सांगितले आहेत.
* पतिपत्नींमध्ये नियमितपणे शारीरिकसंबंध निर्माण झाल्याने तणाव आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो; तेव्हा इतर अन्य रोगदेखील आजूबाजूला फिरकत नाहीत.
* आठवड्यातून १-२ वेळा केलेला सेक्स रोगप्रतिरोधकक्षमता वाढवितो.
* सेक्स खुद्द एक शारीरिक व्यायाम आहे आणि तज्ज्ञांनुसार अर्ध्या तासाचा सेक्स जवळजवळ ९० कॅलरीज कमी करतो म्हणजेच सेक्सच्या माध्यमातून वजन कमी करण्यासदेखील मदत मिळते.
* एका संशोधनानुसार जी व्यक्ती आठवड्यातून १-२ वेळा सेक्स करते त्यांच्यामध्ये हृदयविकाराची शक्यता खूपच कमी असते. कारण शारीरिक प्रेम हे एकप्रकारे भावनात्मक प्रेमाचं बाहेरचं रूप आहे, म्हणून जेव्हा आपण शारीरिक प्रेम करतो, तेव्हा भावनांचं घर म्हणजेच आपलं हृदय निरोगी राहातं.
* वैज्ञानिकांच्या मते सेक्स, फील गुडच्या अनुभूतीबरोबरच स्वसन्मानाची भावना वाढविण्यास सहाय्यक ठरतो.
* शारीरिकसंबध हे प्रेमाचं हार्मोन ऑक्सीटॉसिन वाढविण्याचं काम करतं; ज्यामुळे स्त्रीपुरुषाचं नातं मजबूत होतं.
* सेक्स शरीरातील अंतर्गत अशा उपजत पेनकिलर एण्डोर्फिसला उत्तेजन देतं, ज्यामुळे सेक्सनंतर डोकेदुखी, मायग्रेन आणि अगदी सांधेदुखीपासूनदेखील आराम मिळतो.
* वैज्ञानिकांच्या मते ज्या पुरुषांमध्ये नियमित अंतराने स्खलन (वीर्यपतन) होत असतं, त्यांच्यामध्ये वय वाढताच प्रोटेस्टसंबंधी समस्या वा प्रोटेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. इथे नियमित अंतराने म्हणजे एका आठवड्यातून १-२ वेळा समागम करण्याशी आहे.
* झोप न येण्याचा त्रास हा सेक्समुळे कमी होतो; कारण सेक्स केल्यानंतर खूप छान झोप येते.
* समागम एक औषध आहे. औषधदेखील असं की ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. म्हणूनच पतिपत्नींनी निरोगी राहाण्यासाठी या औषधांचं नियमित अंतराने सेवन आवर्जून करायला हवं.