* प्रतिनिधी
- मी ३४ वर्षीय महिला आहे. पती नेहमीच कामासाठी बाहेरगावी असतात आणि कधी-कधी तर अनेक आठवडे घरी येत नाहीत. या दरम्यान २५ वर्षांच्या एका तरुणाशी माझी मैत्री झाली. ही मैत्री एवढी दाट झाली की आमच्यात शारीरिक संबंधही आले. तो खूप हसरा आणि हजरजबाबी आहे. खूप उत्साही आणि सेक्सच्या कलेत पटाईतही आहे. सेक्सच्या वेळी तो खूप वेळपर्यंत फोरप्ले करतो आणि त्यावेळी मीही त्याला खूप साथ देते.
आमच्यामध्ये कमिटमेंट आहे की आमच्यात मैत्री कायम राहिल आणि जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा सेक्स संबंध बनवण्यात मागे-पुढे हटणार नाही. इकडे काही दिवसांपासून सेक्स संबंध बनवताना त्याची इच्छा आहे की ओरल सेक्सच्या वेळी मी त्याचे वीर्य (सीमन) पिऊन टाकावं. मी नकार देताच तो नाराज होतो. तो नाराज झाला, तर माझं कुठल्याही कामात मन लागत नाही. पण मी घाबरते की असं केल्याने मी कोणत्याही रोगाला बळी पडू नये. कृपया सांगा, मी काय करू?
आपण विवाहित आहात, पण आपल्याला मूल आहे की नाही, हे तुम्ही सांगितलं नाही. सध्यातरी काहीही असो, तुम्ही आगीशी खेळताय आणि कधीही हे आपल्या वैवाहिक जीवनाला उद्ध्वस्त करू शकते.
विवाहबाह्य संबंध नंतर असे चिघळतात, त्याची जखम लवकर भरत नाहीत.
आपण सांगितलं आहे की आपण आपल्यात आणि कथित मित्रामध्ये एक कमिटमेंट आहे, जी केवळ मैत्रीपुरती आहे. पण ती केवळ आपण मैत्रीपर्यंतच मर्यादित ठेवली असती, तर बरं झालं असतं. जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर या नात्याला संपवून वैवाहिक जीवन जगण्याचा प्रयत्न करा. पतिसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. पतिला विनंती करा की ते जेव्हा टूरवर जातील, तेव्हा आपल्याला सोबत घेऊन जावं. या काळात पतिची काळजी घ्या आणि त्यांचा आवडता ड्रेस घाला. सोबत सिनेमा पाहायला जा. मोकळ्या वेळात फिरायला जा. मग पाहा, आपल्याला जेवढं प्रेम मिळेल आपल्या पतिकडून मिळेल तेवढं दुसऱ्या कोणाकडून नाही.
राहिला प्रश्न ओरल सेक्सच्या वेळी वीर्यपान करण्याचा, तर जर सेक्स पार्टनर निरोगी असेल आणि त्याला कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे नसेल, तर हे नुकसानदायक नाही. यासाठी विवेकाने वागणं उत्तम ठरेल.
- मी ३० वर्षांचा आहे आणि नुकतंच माझं लग्न झालं आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. जिथे दोन कुटुंबे सोबत राहतात. पत्नी शिकलेली आहे, पण विचाराने स्वतंत्र नाहीए. तिची पूजा-अर्चना, बुरसटलेल्या रीतिरिवाजांना मानणं मला ओझं वाटतं. ती नेहमीच टीव्ही मालिकाही पाहत असते.
खासगी क्षणांमध्येही ती माझ्यासोबत सहकार्य करत नाही, फोरप्लेमध्येही साथ देत नाही. उलट मला वाटतं की खासगी क्षणांत तिने आधुनिक ड्रेस घालावेत आणि आम्ही भरपूर सेक्स एन्जॉय करावं. याखेरीज ती माझी संपूर्ण काळजी घेते. कृपया योग्य सल्ला द्या.
जसं की, आपण सांगितलं आहे की आपलं नवीन लग्न झालं आहे, मग सरळ आहे की आपली पत्नी आपल्याशी मोकळी होण्यास थोडा वेळ लागेल.
पत्नी शिकलेली आहे, पण विचारांनी मुक्त नाहीए, म्हणजे सरळ आहे की ती ज्या वातावरणातून आली आहे, ते मुक्त नसेल. पत्नीचं पुढचं शिक्षण निश्चित करा आणि तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रेरित करा.
यात काही शंका नाही की बहुतेक टीव्ही चॅनेल्सवर अंधश्रध्देने प्रेरित मालिकांचं प्रसारण होतं. निरर्थक आणि अनेक काळापूर्वीचे रीतिरिवाज मीठमसाला लावून सादर केले जातात. त्यांचा आजच्या वैज्ञानिक युगाशी काही देणं-घेणं नाही.
पत्नीला उत्तम साहित्य वाचायला द्या. मासिके आणून द्या. विचार लादू नका. स्वातंत्र्य द्या. पत्नी घरातून बाहेर पडेल, आपल्या पायावर उभी राहिल, तर विचारांत बदल होईल. स्वत:हून पुढाकार घेईल.
सध्यातरी पत्नीसोबत बाहेर फिरायला जा. हॉटेलमध्ये राहा. तिला मोकळेपणाची जाणीव करून द्या. तिथे ती आधुनिक ड्रेस घालेल, तर हळूहळू तिला हे चांगले वाटू लागेल.
पत्नीचा स्वभाव थोडा मोकळा होईल, तेव्हा ती स्वत:ही सेक्सक्रीडेमध्ये आनंद अनुभवेल आणि फोरप्ले तिला सुखद वाटेल.
- मी ४९ वर्षीय महिला आहे. १८ वर्षांच्या वयातच लग्न झालं होतं. मला २ मुले आहेत. दोघंही मोठी आणि सेटल आहेत. पतिचं अजूनही माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांची इच्छा आहे की मी रोज सेक्स संबंध बनवावेत. पाळीच्या दिवसांतही पती सेक्स करण्याची इच्छा बाळगतात. मी काय करू?
आपले पती आपल्यावर एवढं प्रेम करतात, ही तर चांगली गोष्ट आहे. पतिपत्नीमध्ये नियमित सहवास केवळ आपसातील संबंधच मजबूत बनवत नाहीत, तर दाम्पत्य जीवन नेहमी आनंदी राखतं.
दुसरं म्हणजे, सेक्स निसर्गाने दिलेली एक अनमोल भेट आहे आणि शरीरासाठी छान टॉनिकही.
पतिसोबत सेक्ससंबंधांचा खूप आनंद घ्या. राहिला प्रश्न पाळीच्या काळात सेक्स करण्याचा, तर या काळातही आपण सेक्सचा आनंद घेऊ शकता.
‘गृहशोभिका’ मासिकात आम्ही वेळोवेळी यासंबंधी लेख प्रकाशित करत असतो.