* डॉ. नीरजा श्रीवास्तव नीरू

प्रत्येक पेहरावाचे आपले एक महत्त्व असते, परंतु ते परिधान करण्याचे प्रसंग मात्र वेगवेगळे असतात. काही शालीन, काही भडक, काही र्ट्रैडिशनल, काही मॉडर्न, तर काही इंडोवेस्टर्न आउटलुक असलेले ड्रेस आपण आपली इच्छा आणि गरजेनुसार किंवा मग प्रसंगानुरूप परिधान करतो. घरी तर आपण काहीही परिधान करू शकता, जे आपल्याला कंफर्टेबल वाटेल, पण याचा अर्थ असा नव्हे की, आपण दिवसभर नाइटी घालून फिराल. घरात घालायचे पेहराव काम करताना सोईस्कर आणि घरातील सदस्यांच्या उपस्थितीनुसार असले पाहिजेत. कुर्ता-सलवार, कुर्ता-पायजमा, कुर्ता-कॅपरी, टॉप, शॉर्ट्स, फ्रॉक, साडी इ. काहीही. मात्र जर गोष्ट बाहेर जाण्याची किंवा खास प्रसंगाची असेल, तेव्हा विशेष लक्ष देण्याची गरज असते. यादृष्टीने ड्रेसेसना काही भागांत विभागले जाऊ शकते, जेणेकरून वापरण्यास, काळजी घेण्यास व मॅनेज करण्यास सोपे होईल :

पार्टी वेअर

पार्टी, उत्सव व सणांच्या निमित्ताने आपण व्हाइब्रंट कलर्ड पेहरावांचा वापर करून आपला जलवा दाखवा व खूश व्हा. डयूअल आणि मल्टी टोन साडया आजकाल खूप प्रचलित आहेत. चंदेरी साडी तर नेटचा पदर, सिल्क, कांजिवरम, बांधणी, कलकुट्टी व बनारसी इ. पारंपरिक साडया कोणत्याही एज ग्रुपसाठी खूप छान दिसतात. थंडीच्या मोसमात तर पश्मीना शाल खांद्यावर स्टाईलमध्ये घेतली जाऊ शकते, तसेच हाल्टर कॉलर ब्लाउज, गराराशरारा, पटियाला सलवार, चुडीदारवर कळयांची अनारकली किंवा ऑब्लिक कॉलरवाला लांब ब्रॉकेड कुर्ता अथवा ग्लॉसी फॅब्रिक, फ्लाजोसोबत लांब काँट्रास्ट साइड मिडल कटवाला डिझायनर कुर्ता, वर भरतकाम केलेला हायनेक फ्रंट ओपन बॉर्डरचा, स्लिव्हलेस श्रग गाउन किंवा लांब सुंदरसे जॅकेट घाला. बया कफ्तान, स्टायलिश लेस मॅक्सी गाउनमध्ये आपण चाळीशी पार केलेली असेल तरी यंग दिसाल आणि आपला लुकही एकदम वेगळा आय कॅचिंग दिसेल. कमी वयाच्या महिला, मुली शायनिंग ब्राइट कलरवाले जंप सूट, फ्लॅशी टॉपसोबत लाँग स्कर्ट, अक्ने फ्लोरोसेंट कलर्ड थ्री फोर्थ गाउनसोबत हॉल्टर कॉलरवाले सुंदर फुलांच्या प्रिंटचे लाँग फ्रॉक, पॅचवर्क असणाऱ्या लांब बाह्यांसोबत कॉकटेल पोर्म ड्रेस ट्यूनिक, स्पॅगेटी, काहीही असे परिधान करू शकता, जे वातावरण आणखी छान बनवतील. स्टोल, बेल्ट, कॅप, हॅट, ग्लव्ज, स्कार्फ, रंगीबेरंगी मिटन इ. अॅक्सेसरीजने आणखीही आकर्षक स्टायलिंग करू शकता.

पिकनिक, मौजमस्तीसाठी बनविलेला हिप्पी ब्लाउजवाला बोहो ड्रेस, काँट्रास्ट टॉपवाले जंप सूट, कॅपरी टॉप, डॅनिम ब्लू ब्लॅक जीन्स पँट. शिमर किंवा नेट पलाजो लेगिंग, प्लेन कुर्ता अथवा कुर्त्यासोबत प्रिंटेड स्लिव्हलेस जॅकेट किंवा हायनेक कोटी. क्राफ्ट टॉप्स, प्लेअर्ड जीन्स, डेनिम शॉर्ट्स, थंडीमध्ये मिनी स्कर्टसोबत जाड कपडयाचे कलरफुल टाइट किंवा थर्मल लेगिंग वापरा. वेगवेगळे ब्राइट कलरचे ड्रेस लेअरिंग स्टाईलमध्ये परिधान करा. स्लीव्हलेस जॅकेटसोबत टर्टल कॉलरचा शर्ट बऱ्याच कालावधीपासून वापरला जातो, जो छान दिसतो.

ऑफिस वेअर, फॉर्मल वेअर

जर तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तिथे एखादा ड्रेस कोड असेल, तर तोच वापरा अन्यथा तिथे जशी पद्धत असेल, त्यानुसार साडीसूट किंवा शर्टपँट, टायकोट, कट कॉलर, प्लेन कॉलर कोट, बंद गळयाचा टर्टल कॉलर कोट, लाँग कोट इ. असे वेअर वापरा. हलक्या प्रिंटचे सोबर सूट, साडया अथवा शरीराला शालीनतेने झाकणारे उत्तम स्मार्ट् ड्रेसेस ऑफिससाठी उपयुक्त आहेत. जिथे ब्लॅक, ब्लू डेनिम जीन्ससोबत व्हाइट किंवा लाइट कलर्ड बटनअप शर्ट खूप छान दिसतो, तिथे भडक, ब्राइट कलर, डिझायनर व अंगप्रदर्शन करणारे ड्रेस वापरणे टाळा. जेणेकरून इतरांच्या कार्यात तुमच्यामुळे बाधा येऊ नये. वर्क प्लेसमध्ये स्वत:चाच नव्हे, तर इतरांच्या कामाचाही टेम्पो भंग न करण्यात समजदारी आहे. कपडे स्मार्टली वापरा, जेणेकरून ऑफिसमधील काम तुम्ही व्यवस्थित करू शकाल. जर तुम्ही ऑफिस गोइंग नसाल, पण आपल्याला कधीतरी ऑफिसला जावे लागत असेल, तरीही या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी मीटिंग्जमध्ये थंडीत स्मार्ट ब्लॅक जॅकेट किंवा ब्लेझर अथवा ग्रे, स्किन, कॉफी कलर व खांद्यावर घेतलेली शाल छान सूट करेल.

लग्न व सेरेमोनियल

लग्नासाठी गोल्डन सिल्व्हर शायनिंग ब्राइट बोल्ड कलर्सचा ड्रेस अधिक पसंत केला जातो. जरीची भारी बनारसी साडी, ब्लाउज खूप छान दिसेल. जर घरातील संबंधितांचे लग्न असेल किंवा मैत्रिणीचे, तेव्हा आपण हेवी वर्कवाल्या ओढणीसोबत जयपुरी लेहंगा, स्टे्रट किंवा कळयांचा, जरदोसी काम केलेला चमकदार वेलींचा घेरेदार लेहंगा, वर बॅकलेस पूर्ण बाजू हेवी वर्क असलेली सोनेरी, चमकणारी चोली किंवा कुर्ताही घालू शकता किंवा मग दुसरे काहीतरी, ज्यामध्ये तुम्ही आनंदाने डान्सची मजा लुटू शकता. लेटेस्ट लेहंग्यांमध्ये रॉयल लूक देण्यासाठी जॅकेट, रोब्स कॅप्सचाही उत्तमप्रकारे वापर केला जाऊ शकतो.

रिसेप्शनसाठी थोडी हलकी जरी, मोती-टिकल्या किंवा शिंपल्या जडलेल्या साडीसोबत स्लिव्हलेस किंवा फोर्थ बाजू असलेले बॅकलेस एलिगेंट ब्लाउज अथवा अनारकली सूट, नेट लेस किंवा टिश्यूवर एम्ब्रॉयडरी केलेला लाँग स्कर्ट किंवा जास्त वर्क केलेला फिल्मी लांब आभूषणांसोबत आपल्याला स्टायलिश लुक देईल.

हळदी समारंभाला जात असाल, तेव्हा पिवळया रंगाचा पेहराव करून जा, सुंदर दिसेल. अशा प्रकारे मेंदीच्या कार्यक्रमाला जात असाल, तेव्हा मेंदी कलरच्या पेहरावाची निवड करा. त्यामुळे तुम्ही खरोखरच त्यांच्या आनंदात मनापासून सहभागी आहात असे जाणवेल.

एक्सरसाइज, वॉक जॉग वेअर

वॉकिंगसाठी सैल कुर्ता, कुर्ती-पायजामा, टॉप, ट्राउजर, कॅपरी, जॉगिंगसाठी ट्रॅक सूट, व्यायामासाठी गुडघ्यांपर्यंत स्किनी लेगिंग, शॉर्ट्स, कॉटन स्लीव्हलेस टॉप इ. योग्य ठरतात, जेणेकरून बॉडीची आरामात हालचाल करू शकता आणि घामही शोषला जातो.

साधेसरळ ड्रे

असे अनेक प्रसंग येतात, जिथे चमकदार, नक्षीदार महागडे कपडे परिधान करून जाणे मुळीच योग्य नसते. उदा. आजारी व्यक्तिला हॉस्पिटल किंवा त्याच्या घरी पाहायला जायचे असेल किंवा शोकसभेला, तेव्हा साधे सफेद किंवा हलके रंग आणि प्रिंटवाले सोबर कपडे परिधान करा.

नाइट वेअर

नाइट गाउन किंवा नाइटी काही महिलांना तर एवढी प्रिय असते की त्यांना घरी त्यातच वावरायला आवडते. भाजी खरेदी करायला जायचे असेल तरी त्या त्याच कपडयांत जातात, पण असे करणे अशोभनीय आहे. पायजमा, कुर्ता, टॉपवाला नाइट सूटही योग्य आणि सोइस्कर आहे.

स्पोर्ट्स वेअर

सैल टॉप शॉर्ट्स किंवा स्कर्ट्स, स्किनी शॉर्ट्स खेळताना सोईस्कर आणि चपळपणासाठी सहायक असतात. पोहण्यासाठी विविध प्रकारचे स्वीमिंग सूट मिळतात. टू पीस किंवा वन पीस बिकिनी आपल्या आवडीनुसार निवडा. इतर पेहराव पोहण्यासाठी सोइस्कर नसतात आणि हास्यास्पदही ठरतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...