* दीप्ती अंगरीश

अरे रोमा, काय झालंय बरं तुला? या वयातच आण्टी दिसू लागली आहेस. चेहऱ्यावर सुरकुत्या तर डोळ्यांखाली काळी वर्तुळं. अशाच काही प्रश्नांना तुम्हालाही सामोरं जायचं नसेल तर तुम्ही वेळेबरोबर चालणं गरजेचं आहे. तुमचा आहार तर योग्य असायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर एण्टी एजिंग टिप्सवरही लक्ष देणं गरजेचं आहे आणि याबद्दल सांगत आहेत सुप्रसिद्ध ब्यूटी एक्सपर्ट आणि एल्प्सची ऐग्जिक्यूटिव डायरेक्टर इशिका तनेजा.

एण्टीएजिंग सीटीएमपी : वयाच्या ४० वर्षांनंतर त्वचा रुक्ष पडते. अशात क्लींजिंगसाठी नरिशिंग क्लींजिंग मिल्क किंवा क्लींजिंग क्रीमचा वापर करा. हे त्वचेला रुक्ष केल्याविना डीप क्लीन करतात. वाढत्या वयाच्या खुणांमध्ये ओपन पोर्स म्हणजे उघडलेल्या रंध्रांची समस्या असते. काळाबरोबर ओपन पोर्स वाढत जातात, ज्यामुळे त्वचेवर वय दिसू लागतं. हे पोर्स कमी करण्यासाठी क्लींजिंगनंतर टोनिंग जरूर करा. लक्षात ठेवा, अल्कोहोलयुक्त टोनिंग प्रॉडक्टमुळे त्वचेमधील ओलावा हरवतो, म्हणून यापासून बचावण्यासाठी लायकोपिनयुक्त टोनर्सचा वापर करा. त्वचेमधील ओलसरपणा कमी झाल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. याच्यावर आळा घालण्यासाठी त्वचेवर मॉश्चरायझर जरूर लावा. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.

मेकअप ट्रिक्स : एका ठराविक वयानंतर आपल्या भुवया खालच्या बाजूला झाकू लागतात आणि विरळही होतात. अशा वेळी डोळे वर उठवण्यासाठी आय पेन्सिलीच्या मदतीने आर्क बनवा आणि जर आर्क बनलेलाच असेल तर तो पेन्सिलीने गडद करा. याने तुमचे केस ताठ आणि मोठे दिसतील. वाढत्या वयाबरोबर डोळ्यांच्या आकारातील लवचिकता कमी झाल्यामुळे डोळे आधीपेक्षा थोडे लहान होतात. अशात लिक्विड आयलायनरऐवजी पेन्सिल आयलायनर किंवा आयलैश जॉइनरचा वापर करणं योग्य ठरतं. आयलायनरची एक बारीकशी रेघ ओढून स्मज करा आणि लक्षात ठेवा की ते डू्रपिंग होऊ नये, उलट वरच्या दिशेला उठलेले असावे. ओठांवर ब्राइट शेडची लिपस्टिक लावून तुम्ही आपल्या वयापेक्षा १० वर्षं लहान दिसू शकता.

नाइट रेजीम : जितकं दिवसा सीटीएमपी म्हणजे क्लींजिंग, टोनिंग, मॉश्चरायझिंग आणि प्रोटेक्शन आहे तितकंच गरजेचं रात्री सीटीएमएन म्हणजे नरिशमेण्ट आहे. आपली त्वचा दररोज रात्री स्वच्छ केल्यानंतर नरीश करण्यासाठी एएचए सीरम किंवा आमंड ऑइलचा वापर करा. हे सीरम दररोज वापरल्याने वयाची लक्षणं कमी होतात, तसंच त्वचा नितळ आणि तरुण दिसू लागते. मग चेहऱ्यावर बदाम तेलाने मालीश करा. मालीश केल्याने रक्तसंचार उत्तम होतो, ज्यामुळे त्वचा ओलसर आणि टवटवीत दिसू लागते.

डाएटमध्ये सुपर फूड्स सामील करा : फूड हॅबिट्सचं सौंदर्याशी घट्ट नातं आहे. स्वस्थ्य त्वचेसाठी डाएटमध्ये सुपर फूड्स जसं की गाजर, टोमॅटो, संत्र, ऐवोकैडो, सामन फिश, चिया बीज इत्यादी सामील करा. याचं भरपूर सेवन तुम्हाला एजिंगपासून दूर ठेवेल.

पाणी भरपूर प्या : दिवसभरात १२ ते १५ ग्लास पाणी जरूर प्या. पाण्याच्या जास्त सेवनाने शरीरात उपस्थित विषाक्त पदार्थ तर बाहेर निघतातच, पण त्याचबरोबर त्वचेमधील ओलावाही टिकून राहातो. पाण्याबरोबरच ताक, ज्यूस किंवा नारळपाण्याचाही आपल्या डाएटमध्ये समावेश करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...