- बीरेंद्र बरियार ज्योती
पूनम लग्नासाठी स्वत:ला सजवत होती. भावी पतीच्या बाबतीत मनामध्ये सुवर्ण स्वप्ने चमकत होती. वरात आल्याची बातमी कळताच तिच्या हृदयाचे ठोके वाढले. हृदय हट्ट करू लागले. काहीशी बेधुंद होऊ लागली. मनात फुगे फुटू लागले. तेवढयात तिच्या मैत्रिणी वरमालेच्या विधीसाठी तिला नेण्यास खोलीत आल्या.
पूनम मदोन्मत्त पावलांनी रुणझुणत्या पैंजणाच्या सुमधुर आवाजात थाटामाटात वरमालेसाठी बनवलेल्या स्टेजवर पोहोचली. वरमालेचा विधी सुरू झाला. जेव्हा वराने आपला मुकुट उतरविला तेव्हा पूनम जणू काही बेहोष होऊन खाली पडली. वराला टक्कल पडले होते. वर आणि वधुच्या कुटुंबीयांत व नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला.
पूनमने लग्नास स्पष्ट नकार दिला. खूप समजावल्यानंतर ती लग्नास तयार झाली. लग्नाला १५ वर्ष पालटली तरी पूनमच्या मनात हे शल्य आहे की तिचा नवरा टक्कल पडलेला आहे. ती म्हणते की तिचा नवरा अभियंता आहे आणि त्यांचे चांगले उत्पन्न आहे, तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, परंतु ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचे लग्न टक्कल असलेल्या मुलाशी करणार नाही.
आजच्या युगात पूनमसारख्या स्थितीचा आता मुलींना सामना करावा लागणार नाही. आज केस प्रत्यारोपणाच्या तंत्रामुळे आणि त्यातील वाढत्या प्रवृत्तीने टक्कल पडण्याची समस्या आणि त्यातून उद्भवणारी विचित्र परिस्थिती बऱ्याच प्रमाणात दूर केली आहे. त्वचाविज्ञानी डॉ सुधांशु कुमार म्हणतात की केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगातील तरुण टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. केस गळल्यानंतर ती व्यक्ती वास्तविक वयापेक्षा १०-१५ वर्षांनी मोठी दिसते. डोक्याचे केस गेल्यानंतर माणसाचे व्यक्तिमत्त्वच बदलते. आत्मविश्वास खालावतो. टक्कल पडलेला माणूस गर्दी, पार्ट्या, मुलाखती इ. मध्ये स्वत: अस्वस्थतेचा अनुभव करू लागतो.
केस उगवण्याच्या नावाखाली फसवणूकदेखील बरीच होते. टक्कल पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर केस उगवण्याच्या नावाखाली होमिओपॅथ आणि आयुर्वेद डॉक्टरांनी बरीच रक्कम गोळा केली. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा-जेव्हा एखाद्या माणसाचे केस उडण्यास सुरवात होते तेव्हा ते वाचविण्यासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. कोणी एखादा सल्ला दिला नाही की लगेच तो अंमलात आणतो.