* दीप्ति अंगरीश

पावसाळयाच्या दिवसांत अति फॅशनपेक्षा साध्या फॅशनला महत्त्व दिले पाहिजे. उदा. असे कपडे वापरा, जे उडणार नाहीत, अन्यथा ते लवकर खराब होतात. या दिवसांत कपडयांची निवड कशी करावी, या जाणून घेऊ :

* पावसाळी फॅशनसाठी आपण आपल्या वॉर्डरोबमध्ये लाल, पिवळा, हिरवा, नारिंगी इ. रंग सामील करू शकता.

* या मोसमात इंडोवेस्टर्न लूक कॅरी करू शकता. कॉलेजच्या तरुणी वाटल्यास कॅप्री व शॉर्ट पँटसोबत कलरफुल आणि स्टाईलिश टॉपही वापरू शकतात.

* पावसाळयाच्या दिवसांत लहरिया स्टाईल खूप सुंदर दिसते. तरुणी लहरिया स्टाईलचा सलवार सूट, कुर्ता, ट्युनिकही वापरू शकतात.

* जर तुम्ही साडी नेसत असाल, तर लहरिया साडीबरोबर मॉडर्न स्टाईलचे ब्लाउजही वापरा. प्लेन लहरिया साडीसोबत उत्तम नक्षीकाम केलेले ब्लाउजही ट्राय करू शकता.

* तुम्ही जर पावसाळयात बाहेर जात असाल, तर गडद रंगाचे कपडे वापरणं टाळा. कारण पावसाळयात त्यांचा रंग जाण्याची भीती असते.

* पावसाळयाच्या दिवसांत ओलाव्यापासून वाचण्यासाठी असे कपडे वापरा, जे शरीराला चिकटणार नाहीत. या मोसमात लाइट वेट किंवा स्ट्रेचेबल लाइक्रा आणि कॉटन कपडे कमी वापरा. पॉलिस्टर आणि सिंथेटिक कपडे तर या मोसमात टाळाच.

* या वातावरणात कपडयांच्या रंगांशी मॅचिंग एक्सेसरीजचा वापरही करा. तुम्ही जर ऑफिसला किंवा कॉलेजला जाणाऱ्या असाल, तर पॉप आणि एक्सेसरिजही वापरता येऊ शकतील.

* या मोसमात फॅशनेबल दिसायची इच्छा असेल, तर सध्या बाजारात उपलब्ध गडद हलक्या कॉम्बिनेशनचे कलरफुल स्कार्फ किंवा लहरिया, बंधेज स्टाईलचे स्कार्फही वापरून पाहा.

* सलवार-कुर्ता वापरायचा असेल, तर सिंथेटिकच वापरा.

* बॉटम ड्रेस डार्क रंगाचे असतील, तर उत्तम. कारण ते ट्रान्सपरंट नसतात आणि यावरील डागही दिसत नाहीत. यांच्यासोबत अपरवेअरमध्ये ब्राइट आणि फंकी कलर्सची निवड करू शकता. ऑरेंज, पिंक, टर्क्वाइज, लेमन यलो, ब्लू, ग्रीन यांसारखे कलर्सही मूड छान बनवतात. फ्लोरल आणि स्ट्राइप्सही वापरू शकता.

* फॅब्रिकबद्दल म्हणाल, तर या वेळी लाइक्रा टाळा. हे बॉडीला चिकटतात व ह्युमिडीटीही निर्माण करतात. याऐवजी कॉटन नेट, सिल्क, पॉलिनायलॉन आणि कॉटन ब्लेंडचा वापर करू शकता. हे लवकर आकसत नाहीत.

* कॉटन आणि पॉलिस्टर कपडा टाळा, हा लवकर क्रश होतो.

* लेदरच्या चप्पल किंवा हँडबॅग पावसाळयात ओले होऊन खराब होतात. म्हणून यांचा वापर टाळा.

हेसुद्धा आजमावून पाहा

याबरोबरच गुलाबी, नारिंगी, पीच इ. रंगांच्या फिकट शेड्ससुद्धा या मोसमात आजमावू शकता. पारदर्शी रंगीबेरंगी रेनकोट, रंगीत स्पोर्ट्स शूज, वेजिस आणि गमबूट यांचा वापर या दिवसांत केला जाऊ शकतो. पोल्का प्रिंट्स, जिओमॅट्रिकल प्रिंट्स आणि फ्लोरल प्रिंट्सचे आकर्षण फॅशनप्रेमींना भुरळ घालेल. ड्रेसच्या रंगांना मॅच करणारे फॅशनेबल कलरफुल स्लीपर्सही वापरू शकता.

जीन्स-टीशर्टवर रुंद बेल्टऐवजी छोटा बेल्ट लावा. मुलींसाठी नीलेंथ फ्रॉक, फ्लोरल प्रिंट स्कर्ट इ. मान्सूनसाठी उत्तम पेहराव आहेत. सुती व शिफॉनचे ड्रेस तरुणाईच्या जास्त पसंतीस उतरतात. डोळयांच्या सुरक्षेसाठी व थकवा टाळण्यासाठी प्रत्येक मोसमात गॉगलचा वापर करा. कपडयांच्या स्टाईलसोबत केसांनाही नवीन लूक द्या.

फूटवेअर

पावसाळयाच्या दिवसांत बाजारात फूटवेअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात, ज्या पावसाळ्यातही तुमची स्टाईल कायम राखतात. बाजारात रंगीत फ्लिपफ्लॉप, फ्लोटर, रेन बूट्स आणि प्लॅस्टिक चपलांच्या अनेक स्टाईल उपलब्ध आहेत. हे फूटवेअर लाल, निळे, पिवळे, हिरवे प्रत्येक रंगात पाहायला मिळतील.

याबरोबरच, फ्लॉवर प्रिंट व अन्य आकर्षक डिझाइनमध्येही फूटवेअर मिळतील, जे तुम्हाला खूश करतीलच, पण हटके लूक प्रदान करतील. जर आपण स्वत:साठी पावसाळी फूटवेअरची शॉपिंग करायला निघाला असाल, तर स्टाईलसोबत पायांना आराम कसा मिळेल, याचाही विचार करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...