* अनुराधा गुप्ता

उन्हाळ्याच्या दिवसात अंगातून निथळणारा घाम त्रासून सोडतो. जर स्त्रियांबद्दल म्हणाल तर त्यांना या समस्येला सर्वाधिक तोंड द्यावं लागतं. यामागचं कारण म्हणजे त्यांची अंतर्वस्त्र. शरीर व्यवस्थित व सुडौल दिसण्यासाठी अंतर्वस्त्राची गरज असते, त्याचप्रमाणे फॅशननुसार अंतर्वस्त्र असणं जरूरी असतं.

पण उष्णतेच्या दिवसात अंतर्वस्त्रांच्या घट्टपणामुळे त्वचेसंबंधी आजार जसे घामोळे, चट्टे इत्यादींचा त्रास निर्माण होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी या ऋतुमध्ये योग्य अंतर्वस्त्रांची निवड करणे गरजेचे असते. या ऋतुमध्ये कशाप्रकारची अंतर्वस्त्रे वापरावीत ते जाणून घेऊ :

योग्य कापडाची निवड : उन्हाळ्याच्या दिवसात योग्य अंतर्वस्त्रांची निवड अत्यंत गरजेची असते. अनेक महिला जी अंतर्वस्त्र थंडीच्या मोसमात वापरतात, तिच उन्हाळ्याच्या ऋतुतही वापरतात. पण दोन्ही ऋतुंमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिकची अंतर्वस्त्र वापरली पाहिजेत. थंडीच्या मोसमात वापरली जाणारी नायलॉन किंवा सिंथेटिक फॅब्रिकचे इनरवेअर्स जर उन्हाळ्यात घातली तर शरीरातून खूप घाम येत असतो, ज्यामुळे घामोळे होण्याची शक्यता असते. या मोसमात कॉटन, लायक्रा किंवा नेटचे अंडरगारमेंट्स वापरल्याने त्वचेला ऑक्सीजनचा पुरवठा व्यवस्थित होतो.

पॅडेड इनरवेअर वापरणे टाळा : अलीकडे महिलांमध्ये पॅडेड इनरवेअर वापरण्याची खूप क्रेझ आहे, पण उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेच्या आरोग्यासाठी हे अजिबात योग्य नाहीत आणि पॅडेड अंतर्वस्त्र वापरली तरी फक्त कॉटनचीच असतील याकडे लक्ष द्या.

एकावर एक अंतर्वस्त्र घालणे टाळा : अनेकदा गरज नसतानाही अनेक स्त्रिया एकावर एक अंतर्वस्त्र घालतात. उदाहरणार्थ अनेक महिला ब्रा घातल्यानंतर त्यावर स्पॅगेटी घालतात तर काही महिला पॅण्टीवर शेपवेअर घालतात, ज्या वास्तविक काहीच गरज नसते. यामुळे दोन समस्या उद्भवतात. एकतर उन्हाळ्याच्या दिवसात अशाने शरीर अजून गरम होते आणि दुसरे म्हणजे याच्या घट्टपणामुळे अस्वस्थ वाटू लागते.

स्टॅ्रपी किंवा सीमस लेपॅटर्न : हल्ली ब्रँड स्टॅ्रपी आणि सीमलेस अंडरगारमेंट्स बाजारात आणत आहेत. अशाप्रकारची अंतर्वस्त्र उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरतात. यांची आरामदायक फिटिंग शरीराला योग्य आकार देतात आणि स्टे्रपी डिझाइनमुळे हवा सहजतेने त्वचेपर्यंत पोहोचते.

ब्रा निवडताना या बाबींची काळजी घ्या

* उन्हाळी मोसमात अंडरवायर नसणारीच ब्रा वापरा. टीशर्ट ब्रा या सिझनसाठी योग्य ठरू शकेल. ही योग्य फिटिंगबरोबरच आरामदायकसुद्धा असते व कुठल्याही टॉपसोबत तुम्ही वापरू शकता.

* उन्हाळ्याच्या दिवसात डीप बॅक कट ड्रेससोबत बॅलकेस ब्रा वापरू शकता. महिलांमध्ये गैर समज असा आहे की बॅकलेस ब्रा फक्त एकदाच वापरू शकता, पण असं नाहीए.

* लहान ब्रेस्ट असणाऱ्या महिला पुशअप ब्रा वापरू शकतात. या ब्राची विशेषता अशी की जेव्हा गरज असेल तेव्हा पॅड्स लावले जाऊ शकतात व गरज नसताना काढताही येतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...