* एनी अंकिता
लग्न, पार्टी, मॉडेलिंग फोटोशूटबाबत तुम्ही बरंच काही नक्कीच ऐकलं असणार, परंतु आता एका नव्या फोटोशूटचा ट्रेण्ड सुरू झालाय आणि तो आहे बेबी बंपचा. पूर्वी जिथे स्त्रिया आपल्या बेबी बंपला झाकून ठेवायच्या, तिथे आज आपलं सौंदर्य कॅप्चर करून त्यांना कायम आठवणीत ठेवायचं असतं. हा त्यांची फॅशन आणि लाइफस्टाइलचा भाग बनत चाललाय.
पूर्वी बेबी बंप केवळ हॉलीवूड सेलिब्रिटीज दाखवत असत, परंतु आता हा ट्रेण्ड बॉलीवूड सेलिब्रिटीजदेखील फॉलो करत आहेत. त्या त्यांच्या फॅन्समध्ये राहाण्यासाठी सोशल मीडियावर आपल्या बेबी बंप्सचे फोटो शेअर करत आहेत.
लॅक्मे फॅशन वीक समर २०१६मध्ये मॉडेल कॅरोल ग्रेझियसने साडी परिधान करून रॅम्पवर वॉक करून हा ट्रेण्ड अधिक पॉप्युलर बनविलाय.
या सेलिब्रिटीजने केलंय बेबी बंप फोटोशूट
कोंकणा सेन : आपल्या ऑफ बीट परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या कोंकणाने आपल्या बेबी बंपसोबत असंच काहीसं केलंय. तिने एका मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी बेबी बंपसोबत फोटोशूट केलंय.
श्वेता साल्वे : हिची बेबी बंप एक्सपेरिमेण्ट पाहून तर तुम्ही चकितच व्हाल की बेबी बंपसोबत एवढी क्रिएटिव्हिटी केली जाऊ शकते. श्वेताने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये बरेच फोटो शूट केले आहेत.
लारा दत्ता : आपल्या प्रेगन्सीच्या दरम्यान लारा दत्ताने कधीही आपलं सोशल लाइफ बंद केलं नाही, याउलट कायम आपल्या बेबी बंपसोबत ट्रेण्डी आउटफिट्समध्ये दिसली.
जेनेलिया डिसूझा : बॉलीवूडचं क्यूट कपल जेनेलिया आणि रितेश देशमुखनेदेखील आपल्या दुसऱ्या बाळाच्यावेळी ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोशूट केले होते.
अर्पिता खान आणि आयूष शर्मा : या कपलनेदेखील मॅटरनिटी फोटोशूट केलंय. व्हाइट ड्रेसमध्ये दोघे खूपच एलिगंट दिसत होते.
बेबी बंप फोटोशूट आपल्या मुलांसोबत आपले सुंदर क्षण सजवून ठेवण्याची एक पद्धत आहे. तुम्हीदेखील मॅटरनिटी फोटोशूटचं प्लानिंग करणार असाल तर अजिबात संकोच करू नका, उलट आपले सुंदर क्षण आठवणींच्या अल्बममध्ये साठविण्यासाठी काही टिप्सचा आधार घ्या.
केव्हा कराल फोटोशूट
प्रेगनन्सीमध्ये फोटोशूट नेमकं केव्हा करायचं याचा तुमच्या मनात विचार येत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ६व्या आणि ७व्या महिन्यामधीलचा काळ बेबी बंप फोटोशूटसाठी उत्तम असतो. यावेळी तुमचं बंप गोल गरगरीत आणि सुंदर दिसतं.
काय घालायचं आणि काय नाही
तुमचं बंप उठून दिसण्यासाठी खूप सैलसर कपडे वापरू नका; कारण यामुळे तुमच्या बंपचं सौंदर्य उठून दिसणार नाही.
तुम्ही बटन असणारं ब्री शर्टदेखील वापरू शकता. थोडासा सेक्सी लुक देण्यासाठी बंपजवळचं बटन उघडं ठेवा. हवं असल्यास तुम्ही टीशर्टदेखील ट्राय करू शकता, फक्त टीशर्ट फिटिंगचे नसावं.
कलरमध्ये तुम्ही लाइट कलर म्हणजेच क्रीम, बेज, ग्रे, व्हाइट इत्यादी रंगांची निवड करा. डार्क कलर, फ्लोरल प्रिण्ट आणि चौकटीचे कपडे वापरू नका.
बेबी बंप फोटोशूटमध्ये हेवी ज्वेलरी वापरू नका. कारण हेवी ज्वेलरी वापरल्याने बेबी बंपचं सौंदर्य कमी होतं, त्यामुळे सिंपल व नॅचरल दिसण्याचा प्रयत्न करा.
हेअरस्टाइल व मेकअप साधा असावा
तुम्ही फोटोशूट करून घेताय याचा अर्थ असा नाहीए की तुम्ही भरपूर मेकअप लावावा किंवा लेटेस्ट हेअरस्टाइल करावी. तर अशा वेळी जास्तीत जास्त नॅचरल दिसण्याचा प्रयत्न करा; कारण तुम्ही फोटोत जेवढ्या नॅचरल दिसाल तेवढंच तुमचं सौंदर्य अधिक द्विगुणित होईल.
फोटोशूटसाठी काही टिप्स
* तुम्ही तुमच्या बंपवर तुमचा हात ठेवून फोटो क्लिक करू शकता. तुम्ही काही प्रॉप्सचादेखील वापर करू शकता. जसं बाळाचं पहिलं अल्ट्रासाउंड, बेबी शूज इत्यादी. परंतु एकाच फोटोत भरपूर प्रॉप्सचा वापर करू नका.
* तुम्ही सेल्फीच्या माध्यमातूनदेखील तुमचं बेबी बंप शूट करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला कॅमेऱ्याचा अँगल सेट करावा लागेल म्हणजे तुमचं बंप दिसून येईल. तुम्ही आरशात पाहूनदेखील क्लिक करू शकता.
* फक्त तुमचाच फोटो क्लिक करत राहू नका, काही रोमॅण्टिक कपल शॉट्सदेखील घ्या. तुमचं बाळ तुमच्यासाठी जेवढं खास आहे तेवढंच तुमच्या पार्टनरसाठीदेखील आहे. हवं असल्यास काही फोटोमध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सचादेखील समावेश करू शकता.
* हो, पण एक लक्षात घ्या, सतत फोटोशूट करत राहू नका, उलट अधूनमधून थोडा ब्रेक घ्या. थकण्यापासून वाचण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे तुम्ही फोटोग्राफरसोबत बसून अगोदरच चर्चा करून घ्या की तो कसा शॉट घेणार आहे आणि तुम्हाला कसा फोटो हवाय म्हणजे शूटसाठी अधिक वेळ लागणार नाही. हवं असल्यास ज्या फोटोग्राफरकडून तुम्ही फोटो काढून घेणार आहात त्याने यापूर्वी काढलेले फोटो बघा. यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि तुम्ही फोटोग्राफरला योग्य प्रकारे समजावू शकाल.
* कॅमेरा ऑन होताच आपण सर्वकाही विसरून जातो. फोटो चांगला यावा यासाठी डिफरंट पोझ ट्राय करू लागतो, परंतु तुम्ही तुमच्याकडे थोडं लक्ष द्या. तुम्हाला ज्या पोझमध्ये कम्फर्टेबल वाटेल, तीच पोझ घ्या.