– एनी अंकिता
आजचे तरुण सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार असतात. बस्स, सेल्फी चांगली यावी, जेणेकरून सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड करून त्यांना सर्वांची प्रशंसा मिळवता येईल.
मीडियामध्ये जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार, २०१५ साली ओठांच्या सर्जरीचा एक नवीन रेकॉर्ड समोर आला आहे. अमेरिकेत आकर्षक पाउट घेऊन फोटो काढण्यासाठी लोक ओठांची सर्जरी करून घेत आहेत. इथे दर १९ मिनिटाला ओठांची सर्जरी होत आहे. अमेरिकेन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जंसच्या एका सर्वेक्षणातून असं कळलं आहे की, २०१५ मध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये २७, ४९९ लिप इम्प्लांट्स झाले आहेत, जे २०००च्या तुलनेत ४८ टक्के जास्त आहेत. अमेरिकेत प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. दुसऱ्या स्थानी ब्राझिल, तिसऱ्या स्थानी चीन आणि चौथ्या स्थानी भारताचा क्रमांक येतो.
का वाढतंय याचं प्रस्थ
अलीकडे सोशल मीडियामुळे लोक आपल्या सौंदर्याच्या बाबतीत काही जास्तच जागरूक झाले आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण झाली आहे. होय, आता ते जेव्हा सोशल साइट्सवर इतरांचे फोटो बघतात, तेव्हा ते स्वत:लाही तसंच दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात. अलीकडे भुवया वर करून पाउट बनवून फोटो काढण्याच्या ट्रेण्डचं प्रस्थ सुरू आहे आणि यासाठीच स्त्रिया आकर्षक पाउट लिप्स मिळवण्यासाठी सर्जरी करून घेत आहेत.
खरंतर ओठ खूपच पातळ असतील तर हसताना ते दिसत नाहीत. बऱ्याचदा ओठांचा आकार बरोबर नसतो. वरचा ओठ खूपच पातळ तर खालचा ओठ जाड असतो. कधीकधी एखाद्याच्या ओठांवर एक छोटासा उभार असतो, जो पूर्ण सौंदर्य बिघडवून टाकतो. वाढत्या वयाबरोबर ओठांचे कोपरेही लोंबकळू लागतात, तेदेखील सर्जरी करून सुधारले जाऊ शकतात.
वेगवेगळे उपचार
इंजेक्शनमध्ये आर्टिफिशियल किंवा नैसर्गिक फिलर भरून ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात. पण हे फक्त काही महिन्यांसाठीच असतं. ही एक अस्थायी पद्धत आहे. स्थायी परिणामासाठी इंम्प्लांट आणि सर्जरीसारखे पर्याय आहेत, ज्यामध्ये वारंवार इंजेक्शनच्या प्रोसेसमधून जावं लागत नाही.
लिप इन्हांसमेंट, फॅट ट्रान्सफर इंजेक्शन : यामध्ये तुमच्या शरीरातील ज्या भागात जास्त फॅट असतं, तिथून फॅट घेऊन ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले आणि जाड दिसू लागतात.
डर्मल ग्राफ्ट सर्जरी : त्वचेच्या खोल थरात जाऊन तिथून वसा काढली जाते आणि ती ओठांच्या कडेला म्हणजे मोस्कोसाच्या आत भरली जाते, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात.
लिप इम्प्लांट : ही तोंडाच्या आतमधून केली जाणारी सर्जरी आहे. याचे अनेक नैसर्गिक आणि सिंथेटिक इम्प्लांट पर्याय उपलब्ध आहेत.
बॉलीवूड अभिनेत्रीही मागे नाहीत
चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी बॉलीवूडच्या या अभिनेत्रींनीही लिप सर्जरी केली आहे :
अनुष्का शर्मा : अनुष्का शर्माने जेव्हा शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातून आपल्या चित्रपट करिअरची सुरूवात केली तेव्हा तिचा चेहरा नॅचरल होता. पण २०१२ साली जेव्हा ‘जब तक है जान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटात अनुष्काचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व दिसून आलं. तिचे ओठ पूर्वीसारखे पातळ नव्हते, त्यामध्ये भरीवपणा आलेला.
राखी सावंत : कायम चर्चेत राहाणाऱ्या राखी सावंतला सर्जरी क्वीन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वत:ला जास्त ग्लॅमरस दाखवण्यासाठी राखीने अनेक प्रकारच्या सर्जरी केल्या आहेत. त्यापैकी एक लिप सर्जरीही आहे.
प्रियंका चोप्रा : प्रियंका ही गोष्ट स्वीकारत नाही की तिने सर्जरी केली आहे, पण तिचे ओठ खोटं बोलत नाहीत. त्यावरून स्पष्ट कळतं की तिने सर्जरी करून घेतली आहे.
कतरीना कैफ : बॉलीवूडची बार्बी डॉल कतरीना कैफ आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिनेही सर्जरी करूनच आपल्या ओठांना भरीवपणा आणला आहे. मात्र ही गोष्ट तिने सर्वांसमोर स्वीकार केली नाहीए. मात्र पातळ लिप्सपासून पाउट लिप्सचा झालेला बदल सर्वांनाच सांगत आहे की तिने लिप सर्जरी केली आहे.
स्त्रियांना हवीय सेल्फी स्माइल
सेल्फी म्हणजे चेहऱ्याचा फोटो, ज्यामध्ये शरीराचा इतर भाग कमीच दिसतो, चेहऱ्यावर जास्त फोकस केला जातो. यामुळेच स्त्रिया आपल्यातील कमतरता लपवण्यासाठी सर्जरीचा आधार घेत आहेत. त्या ओठांना आणि नाकाला योग्य शेप देण्यासाठी सर्जरी करत आहेत. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी सर्जरी करत आहेत. इतकंच नव्हे तर, त्या आपले वाकडेतिकडे दातही चांगले करत आहेत.