* प्रतिनिधी

जर तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल, पण ६ वारी साडी नेसता येणे व ती सांभाळणे जमत नसेल तर एकदा ग्लॅमरस साडी गाउन वापरून पाहा. साडी आणि गाउनच्या कॉम्बिनेशनने बनलेले साडी गाउन खूपच स्टायलिश दिसतात व हे सांभाळणेही खूपच सोपे असते. पण साडी गाउनची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे जाणून घ्या फॅशन डिझायनर प्रीति सिंघलकडून:

का वापरावे साडी गाउन

एव्हरग्रीन व कायम फॅशनमध्ये असणारा साडी गाउन घालायला व सांभाळायलाही एकदम सोपा आहे. कारण याच्या निऱ्यांबरोबरच ब्लाऊज व पदरही जोडलेला असतो. त्यामुळेच एखाद्या ड्रेसप्रमाणेच हा आपण सहजतेने वापरता येतो आणि सर्वकाही अटैच असल्यामुळे निऱ्या किंवा पदर सुटण्याची काही भीतिसुद्धा नसते व हा सहजतेने अंगात बसतो.

कसा निवडाल परफेक्ट साडी गाउन

साडी गाउन खरेदी करताना बाजारात तुम्हाला याचे पॅटर्न, स्टाईल व फ्रॅबिक खूप विविधता पहायला मिळेल. त्यामुळे जर तुम्हांला परफेक्ट साडी गाउन विकत घ्यायचा असेल तर खालील बाबी लक्षात घ्या:

पॅटर्न : मार्केटमध्ये साडी गाऊनच्या अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. धोती, पॅन्ट स्टाईलपासून फिश कट, लहेंगा तसेच स्टे्रट कटसुद्धा. त्यामुळे साडी गाउनची निवड तुम्ही आपले व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन करा. असा पॅटर्न निवडा, जो तुमच्या बांध्याला शोभून दिसेल. जसं की जर तुमची उंची कमी असेल तर स्ट्रेट किंवा फिश कट साडी गाउन घ्या. यामुळे तुम्ही उंच दिसाल व तुमची उंची जर जास्त असेल तर फ्लेयर्ड साडी गाऊन खरेदी करा.

ब्लाऊज : साडी गाउनच्या ब्लाऊजमध्येही खूप पॅटर्न असतात. जसे वन शोल्डर, ऑफ शोल्डर, स्लीवलेस, हाफस्लीव, फुलस्लीव, थ्रीफोर्थ, स्लीव ब्लाऊज इ. याबरोबरच नेकलाइनमध्येही वेगवेगळ्या व्हरायटी पहायला मिळतील. जसं की राऊंड, स्क्वेअर, ओवल, पॅक नेकलाइन. यामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा दिसणाऱ्या ब्लाऊजसोबतच साडी गाउनची निवड करा.

डिझाइन : साधे आणि सोबर ते सीक्वेंस, शीयर आणि एम्ब्रॉयडरी वर्क असणारे साडी गाउनही बाजारात सहजतेने उपलब्ध आहेत. याची निवड सोहळ्यानुसार करा. जसे की लग्नप्रसंगी, सीक्वेंस, शीयर किंवा एम्ब्रॉयडरी असणारा हेवी वर्कचा साडी गाऊन खरेदी करा, तर डे पार्टीसाठी गेट टू गेदरसाठी सिंपल व सोबर डिझाइनचा साडी गाउन खरेदी करा.

रंग : फिकट रंगांपासून गडद, उजळ रंगांपासून ते फिकट रंगांमध्येही साडी गाउनचे अनेक पर्याय मिळतील. पण तुमच्या स्किनटोनला मॅच होईल असा रंग निवडा. जर तुम्ही गोऱ्या असाल तर लाल, गुलाबी, सोनेरी, चंदेरी शेड्समध्ये साडी गाउन खरेदी करा. जर रंग सावळा असेल तर फिकट किंवा पेस्टल शेड्सचा साडी गाउन खरेदी करा. काही गाउन ड्यूअल शेड, कॉन्ट्रास्ट कलर्स व मल्टी शेड्समध्येही बनवले जातात. हेसुद्धा ट्राय करू शकता.

फॅब्रिक

नेट, सिल्क, ब्रोकेट तसेच जॉर्जेट फॅब्रिकमध्येही साडी गाउन उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये यांचा लुकही खूप वेगळाच असतो. फॅब्रिकची निवड साडी गाउनचा लुक व ऋतु लक्षात घेऊन करायला हवा. फ्लो असणाऱ्या फॅब्रिकने बनलेला साडी गाउन सर्वात सुंदर दिसतो. यासोबत ब्लाऊजसाठी ट्रान्सपरन्ट फॅब्रिकची निवडही साडी गाउनला सेक्सी लुक देतो.

स्मार्ट आयडिया

साडी गाउनमध्ये आपला लुक कंप्लीट दिसावा म्हणून तुम्ही या स्मार्ट आयडियांचा वापर करा.

दागिन्यांची निवड : साडी गाउनवर हेवी ज्वेलरी घालायची चूक करू नका. इअररिंग्ज, ब्रेसलेट व अंगठी एवढे पुरेसे आहे.

केशरचना : परफेक्ट लुकसाठी केसांचा हाइ किंवा लो बन बनवा किंवा केसांना स्टे्रटनिंग करून केस मोकळेही सोडू शकता.

मेकअप लुक : गॉडी लुकपासून बचावण्यासाठी डार्क शेडची लिपस्टिक लावावी किंवा स्मोकी आय मेकअप करावा. दोन्ही हायलाइट करू नये.

्रेन्डी फुटवेअर : स्लिम लुकसाठी साडी गाउनसोबत हायहिल, पेन्सिल फुटवेअर वापरा, सिंपल गाउनबरोबर सोबर व हेवी गाउनबरोबर ज्वेंल्ड फुटवेअर वापरा.

क्यूट क्लच : आपला लुक कंप्लीट करण्यासाठी साडी गाउनला शोभून दिसणारा एखादा क्लच घ्यायला विसरू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...